Horoscope : ज्योतिष शास्त्रात राहु हा पापी ग्रह मानला जातो. राहूचे चंद्राशी मोठे वैर आहे असे म्हटले जाते. पंचांगानुसार, कार्तिक महिन्याच्या कृष्ण पक्षाच्या दुसऱ्या तिथीला म्हणजे मंगळवारी 11 ऑक्टोबर 2022 रोजी ग्रहण योग तयार होत आहे. या दिवशी चंद्राचे संक्रमण मेष राशीत होत आहे, जिथे राहू आधीच बसला आहे. त्यामुळे काही राशीच्या लोकांना या काळात जास्त काळजी घ्यावी लागणार आहे. 


12 ऑक्टोबर 2022 रोजी रात्री 11.29 पर्यंत चंद्राचे संक्रमण मेष राशीत राहील. या काळात या राशीच्या लोकांनी खूप काळजी घेणे आवश्यक आहे.


मेष  : जर तुमच्याच राशीत चंद्राचे संक्रमण होत असेल तर त्याचा तुमच्यावर सर्वात जास्त प्रभाव पडणार आहे. या दोन दिवसात तुम्हाला पैशांशी संबंधित निर्णय काळजीपूर्वक घ्यावे लागतील. या काळा राग येऊ देऊ नका. कटू बोलणे टाळा. एखाद्याने वाद भडकावला तरी त्याकडे दुर्लक्ष करा किंवा टाळण्याचा प्रयत्न करा. चंद्र आणि राहूने तयार झालेला ग्रहण योग टाळण्यासाठी मंगळावर हनुमान चालीसा पाठ करा, बुधवारी संध्याकाळी गणेशजींना दुर्वा अर्पण करा. 


सिंह : तुम्हाला तुमच्या आरोग्याकडे लक्ष द्यावे लागेल. जुनी दुखापत किंवा कोणताही आजार तुम्हाला त्रास देऊ शकतो. वैवाहिक जीवनात काही अडचणी येऊ शकतात. जोडीदाराशी वाद घालू नका. पैशाच्या बाबतीत नवीन कर्ज घेणे टाळा. ऑफिसमध्ये प्रतिस्पर्धी तुमच्यासाठी आव्हाने निर्माण करू शकतात. सतर्क आणि सावध रहा. काळ्या कुत्र्याला रोटी खायला द्या आणि राहूच्या मंत्राचा जप करा.


वृश्चिक : रागावर नियंत्रण ठेवावे लागेल, अन्यथा नुकसान सहन करावे लागेल. राहु कामात अडथळे आणू शकतो. त्यामुळे या दोन दिवसांत अतिविचार करण्यासारखी परिस्थिती निर्माण होऊ शकते. हे टाळण्याची गरज आहे. मंगळवारी हनुमान चालिसा म्हणा. बुधवारी हिरव्या वस्तूंचे दान करा, लाभ होईल. 


(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.) 


महत्वाच्या बातम्या