एक्स्प्लोर

Horoscope Today, October 1, 2022 : मेष, कन्यासह ‘या’ राशींसाठी दिवस असणार लाभदायी! जाणून घ्या आजचे राशीभविष्य

Horoscope Today, October 1, 2022 : मेष राशीच्या लोकांना आर्थिक बाबतीत नशिबाची पूर्ण साथ मिळेल. वृषभ राशीच्या लोकांना आज महत्त्वाचा निर्णय घ्यावा लागेल. जाणून घ्या संपूर्ण राशीभविष्य...

Horoscope Today, October 1, 2022 : आज सूर्य कन्या राशीत असून, ज्येष्ठ नक्षत्र आहे. चंद्र वृश्चिक राशीत आहे. गुरु मीन राशीत आहे. मेष राशीच्या लोकांना आर्थिक बाबतीत नशिबाची पूर्ण साथ मिळेल. वृषभ राशीच्या लोकांना आज महत्त्वाचा निर्णय घ्यावा लागेल. जाणून घ्या संपूर्ण राशीभविष्य...

मेष (Aries Horoscope) : व्यवसाय करणाऱ्या लोकांसाठी आजचा दिवस चांगला आहे. आर्थिक बाबतीत नशिबाची पूर्ण साथ मिळेल. कोणतेही काम जोडीदाराच्या भरवशावर सोडू नका. एखाद्या ठिकाणी अडकलेले पैसे परत मिळतील. कौटुंबिक समस्यांवर सहज उपाय सापडतील. मनातील एखादी गोष्ट पूर्ण होण्याआधी कुणालाही सांगू नका. अन्यथा लोक त्याचा फायदा घेतील.

वृषभ (Taurus Horoscope) : वृषभ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस शुभ राहील. तुम्हाला काही चांगली माहिती मिळू शकते. घरातील जबाबदाऱ्या पार पाडण्याच्या दिशेने काही नवीन निर्णय घेऊ शकता. आज तुमच्या व्यवसायात आणि नोकरीत प्रगती होईल. तुमचे काम आणि वागणूक तुमच्या घरातील वडिलधाऱ्यांना आनंद देईल. कामाच्या ठिकाणी सहकाऱ्यांना तुमचा हेवा वाटू शकतो.

मिथुन (Gemini Horoscope) : नोकरीत कामाचा ताण वाढू शकतो. मालमत्तेतून उत्पन्न वाढेल. आईकडून धनलाभ होऊ शकतो. कला आणि संगीतात रुची वाढेल. कार्यक्षेत्रात बदल होण्याची शक्यता आहे. एखादी चांगली बातमी मिळू शकते. आपण भूतकाळातील घटना बदलू शकत नाही, परंतु आपण त्यांच्याकडून धडा घेऊ शकतो आणि पुढे जाण्याचा प्रयत्न करू शकतो. असेच पुढे चालत राहायचे आहे.

कर्क (Cancer Horoscope) : आरोग्य चांगले राहील. कामाला वेळ द्या. आळसापासून दूर राहा. प्रेम जीवनात आनंदी राहील. राजकारणाशी संबंधित लोक अधिक सक्रिय होतील. अध्यात्मिक कार्यामुळे मन शांत होईल. सामाजिक स्तरावर तुमची जबाबदारी चांगल्या प्रकारे पार पाडाल. आयुष्यात वारंवार येणारे अपयश आणि तुमच्या आजूबाजूच्या लोकांचे चुकीचे वागणे तुमच्यात कटुता निर्माण करू शकते.

सिंह (Leo Horoscope) : आज तुम्ही शारीरिकदृष्ट्या अस्वस्थ आणि मानसिकदृष्ट्या चिंतेत राहाल. घरातील सदस्यांसोबत गैरसमज होऊ शकतात. आईसोबत कोणत्याही गोष्टीवरून वाद होऊ शकतो. घरातील महिलांच्या आरोग्याची चिंता राहील. सरकारी आणि मालमत्तेशी संबंधित महत्त्वाच्या कागदपत्रांवर स्वाक्षरी करण्यासाठी आजचा दिवस चांगला नाही. कामाच्या ठिकाणी तुमच्या योजनेनुसार काम करावे लागेल.

कन्या (Virgo Horoscope) : आजचा दिवस तुमच्यासाठी खूप व्यस्ततेचा असेल. कपडे आणि दागिन्यांच्या व्यवसायाशी संबंधित लोकांना व्यवसायात चांगली कमाई होईल. जर, तुम्ही पैसे गुंतवण्याचा विचार करत असाल तर आजचा दिवस तुमच्यासाठी अनुकूल असेल. नोकरीत यश मिळेल. कामाच्या ठिकाणी गंभीर आणि जबाबदारीने वागावे लागेल. एखादे रखडलेले कामही आज सुरू होऊ शकते.

तूळ (Libra Horoscope) : मित्राच्या मदतीने तुम्ही उत्पन्नाचे नवीन साधन शोधू शकता. मनात शांती आणि आनंदाची भावना राहील. संभाषणात संयम ठेवा, रागाचा अतिरेक टाळा. शैक्षणिक कार्याचे सुखद परिणाम दिसतील. इतर ठिकाणी प्रवास करावा लागू शकतो. नोकरीत अधिकार्‍यांचे सहकार्य मिळेल, बदली होऊ शकते. आर्थिक गोष्टींचे नियोजन सुरु करा. अन्यथा पैशांची चणचण भासेल.

वृश्चिक (Scorpio Horoscope) : सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांसाठी आजचा दिवस चांगला जाणार आहे. कामाच्या ठिकाणी तुमच्यावर काही अतिरिक्त जबाबदाऱ्या पडू शकतात, ज्याकडे तुम्ही दुर्लक्ष करू नये. कामाच्या ओझ्यामुळे तुम्ही तणावाखाली येऊ शकता. नोकरदार लोक आपल्या सहकाऱ्यांकडून गोड बोलून आपली कामे सहज करून घेतील. जोडीदारासोबत चांगला वेळ घालवाल.

धनु (Sagittarius Horoscope) : आज अपघाताची भीती राहील. प्रत्येक बाबतीत सावधगिरी बाळगा. अचानक एखाद्या गोष्टीवर पैसा खर्च होऊ शकतो. स्वभावात थोडा चिडचिडेपणा राहील. शारीरिक व मानसिक आनंद मिळेल. मित्र आणि नातेवाईकांकडून भेटवस्तू मिळण्याची शक्यता आहे. कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील. नोकरदार लोकांना कोणत्याही कामात अडचण येणार नाही. व्यवसायात लाभ होण्याची शक्यता आहे.

मकर (Capricorn Horoscope) : मकर राशीच्या लोकांच्या चुकीच्या वागणुकीचा त्यांच्या वैवाहिक जीवनावर गंभीर परिणाम होऊ शकतो. मोठे आर्थिक व्यवहार करणे टाळा. काम करताना काळजी घ्या. कोणतेही चुकीचे काम करण्याचा विचार मनात आणू नका. आरोग्य सुधारेल. आनंदी जीवनासाठी आर्थिक प्रगतीसोबतच मानसिक शांतीही आवश्यक आहेत. मानसिक आरोग्य सुधारण्याचा प्रयत्न करा.

कुंभ (Aquarius Horoscope) : आज तुम्हाला संपत्तीशी संबंधित कोणत्याही कामात घाई करणे टाळावे लागेल, अन्यथा तुमचा हा व्यवहार तुमच्यासाठी हानिकारक ठरू शकतो. हातचं सोडून लोकांना मदत केल्यास, लोक तुमचा फायदा घेण्याचा प्रयत्न करतील. पैशासंबंधित कोणताही निर्णय काळजीपूर्वक घ्यावा लागेल. अन्यथा आर्थिक नुकसान होऊ शकते. कोणतीही निर्णय विचारपूर्वक घ्यावा.

मीन (Pisces Horoscope) : आज तुमच्यात काहीतरी नवीन करून दाखवण्याची इच्छा असेल. चांगले पैसेही कमवू शकता. तरुणांना करिअरशी संबंधित नवीन माहिती मिळू शकते. आज जुन्या गोष्टींवर चर्चा करणे टाळा, अन्यथा तणाव निर्माण होईल. कौटुंबिक जीवनात परस्पर सहकार्यामुळे प्रेमाचे वातावरण निर्माण होईल. नातेवाईकांशी संपर्क साधता येईल.

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.  ) 

महत्वाच्या बातम्या

महत्त्वाच्या बातम्या

Raksha Bandhan 2026 : रक्षाबंधनच्या दिवशी चुकूनही 'या' 7 चुका करु नका; अन्यथा नात्यात येईल कायमचा दुरावा, वाचा नियम
रक्षाबंधनच्या दिवशी चुकूनही 'या' 7 चुका करु नका; अन्यथा नात्यात येईल कायमचा दुरावा, वाचा नियम
Baba Venga Prediction 2026 : बाबा वेंगाची भविष्यवाणी! मेष, वृषभसह 'या' 5 राशींना ऑगस्टच्या शेवटच्या आठवड्यात लागणार लॉटरी; श्रीमंतीचे योग, वाचा लकी राशी
बाबा वेंगाची भविष्यवाणी! मेष, वृषभसह 'या' 5 राशींना ऑगस्टच्या शेवटच्या आठवड्यात लागणार लॉटरी; श्रीमंतीचे योग, वाचा लकी राशी
Horoscope Today 22 August 2026 : आज शनिवारचा दिवस 5 राशींसाठी चक्रावणारा, शनिदेव दिवस संपण्याआधीच देणार कर्माचं फळ; वाचा तुमचे आजचे राशीभविष्य
आज शनिवारचा दिवस 5 राशींसाठी चक्रावणारा, शनिदेव दिवस संपण्याआधीच देणार कर्माचं फळ; वाचा तुमचे आजचे राशीभविष्य
Horoscope Today 22 August 2026: आजचा श्रावणी शनिवार 7 राशींसाठी भाग्याचा! अद्भूत शुभ योग जुळले, शनिकृपेने कोण भाग्यशाली? आजचे राशीभविष्य वाचा...
आजचा श्रावणी शनिवार 7 राशींसाठी भाग्याचा! अद्भूत शुभ योग जुळले, शनिकृपेने कोण भाग्यशाली? आजचे राशीभविष्य वाचा...

व्हिडीओ

Abhijeet Dipke On School : शाळेत धडक, नियम किती कडक? | Special Report ABP Majha
Prithviraj Chavan On NCP : पृथ्वीराज चव्हाणांचा दावा, तापली राजकीय हवा | Special Report ABP Majha
Anganwadi Sevika : पोषण आहाराचं वास्तव, अन्याय कारवाईचा विस्तव | Special Report ABP Majha
Vishakha Raut BMC : नगरसेवक पद धोक्यात, कुणबी प्रमाणपत्र रद्द; विखाशा राऊत काय म्हणाल्या? | ABP Majha Marathi News
Laxman Hake Pune : 1 सप्टेंबरला ओबीसींना मुंबईत येण्याचं आवाहन, सरकारने फसवलंय म्हणत हाकेंचा हल्लाबोल!

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Accident: लेकाच्या सहाव्या वाढदिवसाला ऑर्केस्ट्रा ठेवला अन् त्याच कार्यक्रमात भरधाव बस घुसली, बापासह पाच जणांचा चिरडून जीव गेला, 12 जण जखमी
लेकाच्या सहाव्या वाढदिवसाला ऑर्केस्ट्रा ठेवला अन् त्याच कार्यक्रमात भरधाव बस घुसली, बापासह पाच जणांचा चिरडून जीव गेला, 12 जण जखमी
Chhatrapati Sambhajinagar News : गेल्या वर्षीही कुणाल जीवन संपवण्यासाठी पोहोचलेला खवड्या डोंगरावर; तेव्हा मनधरणी केली पण यावेळी...; संभाजीनगरमधील त्रिकुटाच्या मृत्यू प्रकरणात हादरवणारी माहिती समोर
गेल्या वर्षीही कुणाल जीवन संपवण्यासाठी पोहोचलेला खवड्या डोंगरावर; तेव्हा मनधरणी केली पण यावेळी...; संभाजीनगरमधील त्रिकुटाच्या मृत्यू प्रकरणात हादरवणारी माहिती समोर
Rahul Gandhi Chhatron Ki Goonj: पुण्यात राहुल गांधींच्या ‘छात्रों की गूंज’ची जोरदार तयारी; बाराशे पोलिसांचा बंदोबस्त, कसा असणार कार्यक्रम? A टू Z माहिती
पुण्यात राहुल गांधींच्या ‘छात्रों की गूंज’ची जोरदार तयारी; बाराशे पोलिसांचा बंदोबस्त, कसा असणार कार्यक्रम? A टू Z माहिती
IND vs SL 2nd Test : कुलदीप यादव OUT, एका खेळाडूचं पदार्पण; श्रीलंकेविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात अशी असेल टीम इंडियाची Playing XI
कुलदीप यादव OUT, एका खेळाडूचं पदार्पण; श्रीलंकेविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात अशी असेल टीम इंडियाची Playing XI
Nashik Crime News: चार वर्षांपासून प्रेमसंबंध; नंतर लग्नाला दिला नकार, दोघांचं पुन्हा लग्न जुळवण्यासाठी भोंदूनं दाखवलं अमिष, स्मशानात रात्री पूजा अन्..., हजारो रूपये उकळले
चार वर्षांपासून प्रेमसंबंध; नंतर लग्नाला दिला नकार, दोघांचं पुन्हा लग्न जुळवण्यासाठी भोंदूनं दाखवलं अमिष, स्मशानात रात्री पूजा अन्..., हजारो रूपये उकळले
Share Market News : शेअर बाजारात 'देसी दम'! म्युच्युअल फंड, किरकोळ गुंतवणूकदारांचा दबदबा वाढला, परदेशी गुंतवणूकदारांना टाकले मागे
शेअर बाजारात 'देसी दम'! म्युच्युअल फंड, किरकोळ गुंतवणूकदारांचा दबदबा वाढला, परदेशी गुंतवणूकदारांना टाकले मागे
Aus vs Ban 2nd Test Mitchell Starc : मैदानात आले, मिनिटांत पुन्हा गेले... मिचेल स्टार्कने फलंदाजांचं कंबरडं मोडलं, 12 धावांवर बांगलादेशचा अर्धा संघ आऊट, नेमकं काय घडलं?
मैदानात आले, मिनिटांत पुन्हा गेले... मिचेल स्टार्कने फलंदाजांचं कंबरडं मोडलं, 12 धावांवर बांगलादेशचा अर्धा संघ आऊट, नेमकं काय घडलं?
Ind vs Sl 2nd Test : पहिल्या कसोटीत पराभव होताच श्रीलंकेने 3 जणांना बाहेर काढलं, टीम इंडियाविरुद्ध आता जाहीर केला नवा Squad, चक्रावून टाकणाऱ्या खेळाडूंची एन्ट्री
पहिल्या कसोटीत पराभव होताच श्रीलंकेने 3 जणांना बाहेर काढलं, टीम इंडियाविरुद्ध आता जाहीर केला नवा Squad, चक्रावून टाकणाऱ्या खेळाडूंची एन्ट्री
Embed widget