Horoscope Today, May 9, 2022 : आज चंद्र कर्क राशीत आहे आणि संध्याकाळी 05:09 नंतर चंद्र सिंह राशीत प्रवेश करेल. सकाळी चंद्र चित्रा नक्षत्रात असेल. गुरू मीन राशीत आहे. शनी कुंभ राशीत आहे. कर्क आणि मकर राशीच्या लोकांना आज मित्राकडून मदतीचा हात मिळू शकतो. जाणून घ्या आजचे राशीभविष्य...


मेष (Aries Horoscope) : आज जुन्या मित्राशी भेट होण्याची शक्यता आहे. त्यांच्यासोबत कुठेही फिरायला जाऊ शकता. वडिलांच्या सहकार्याने कोणतेही महत्त्वाचे काम पूर्ण होईल. आज तुम्ही कामाच्या ठिकाणी खूप मेहनत कराल. तुमच्या कर्तृत्वाचा तुम्हाला अभिमान वाटेल. विद्यार्थ्यांसाठी दिवस चांगला जाणार आहे. लोक तुमच्या कलेचे खूप कौतुक करतील. अनियोजित खर्च वाढतील.


वृषभ (Taurus Horoscope) : गुंतवणूक योजनांबद्दल व्यवस्थित जाणून घेण्याचा प्रयत्न करा. कोणतेही पाऊल उचलण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या. अनेक दिवसांपासून रखडलेले महत्त्वाचे काम आज पूर्ण होईल. ऑफिसमधील वरिष्ठ तुमचे काम पाहून आनंदित होतील. नोकरीच्या मुलाखतींमध्ये यश मिळेल. उत्पन्न वाढेल. एखाद्या जुन्या मित्राची भेट होऊ शकते. कोणत्याही मानसिक दडपणाखाली येऊ नका.


मिथुन (Gemini Horoscope) : ऑफिसच्या कामात दिवसभर व्यस्त असाल. दिवसभराच्या कामामुळे तुम्हाला संध्याकाळी थकवा जाणवेल. कामात यश मिळेल. गरजूंना मदत करण्याची संधी मिळेल. मित्राच्या मदतीने नोकरीच्या नव्या संधी मिळू शकतात. स्वावलंबी व्हा. जास्त रागराग टाळा. कुटुंबाचे सहकार्य मिळेल. जुने वाद मिटतील. भावनांवर थोडं नियंत्रण असणं गरजेचं आहे. अनावश्यक खर्चावर नियंत्रण ठेवा.


कर्क (Cancer Horoscope) : संध्याकाळपर्यंत एखादी चांगली बातमी मिळाल्याने घरात चांगले वातावरण निर्माण होईल. करिअरमध्ये केलेल्या मेहनतीचे फळ तुम्हाला मिळेल. कोणत्याही आर्थिक योजनांमध्ये अडकणे टाळा, गुंतवणूक करताना सावधगिरी बाळगा. व्यवसायात लाभाच्या संधी मिळू शकतात. अधिक धावपळ होईल. कामाची व्याप्ती वाढेल. मित्राच्या मदतीने नोकरीच्या संधी मिळतील.


सिंह (Leo Horoscope) : कुटुंबाचे सहकार्य मिळेल. मित्राच्या मदतीने नोकरीच्या संधी मिळू शकतात. कार्यक्षेत्रात बदल होऊ शकतो. दैनंदिन कामात यश मिळेल. घरातील वातावरण प्रसन्न राहील. व्यवसायात सुधारणा होईल. उत्पन्न वाढेल. आरोग्याची काळजी घ्या. व्यवसायात मोठी रक्कम एकरकमी मिळू शकते, ज्यामुळे आर्थिक आवक वाढेल. भावनेच्या भारत कोणताही निर्णय घेऊ नका.


कन्या (Virgo Horoscope) : कुटुंबातील सदस्यांसोबत अधिकाधिक वेळ घालवण्याची संधी मिळेल. पैशाशी संबंधित काही कामे आज थांबू शकतात. कुटुंबासमवेत मनोरंजनासाठी घरी एखादा खेळ खेळण्याचा विचार कराल. अचानक मोठा आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. मनातील कोणतीही इच्छा पूर्ण होईल. वाहन चालवताना निष्काळजी राहू नका. चांगली नोकरी मिळण्याची शक्यता आहे.


तूळ (Libra Horoscope) : व्यवहारात थोडे सावध राहावे. तुमचे उत्पन्न वाढण्याची शक्यता आहे. छोट्या-छोट्या गोष्टींकडे लक्ष दिल्यास कामात यश मिळेल. व्यवसाय करणाऱ्या लोकांना आज नवीन गुंतवणूकदार मिळू शकतात. एखाद्या व्यवसायात तुम्ही देखील गुंतवणूक करू शकता. वडिलांची साथ मिळेल. बोलण्यावर नियंत्रण ठेवा, अन्यथा वादाला सामोरे जावे लागू शकते. राग अनियंत्रित होऊ देऊ नका.


वृश्चिक (Scorpio Horoscope) : काही महत्त्वाची कामे पूर्ण होतील. प्रवासात फायदा होईल. नवीन व्यवसाय सुरू होण्याची शक्यता निर्माण होत आहे. व्यवसायाच्या संदर्भात प्रवासाची योजना कराल. काही नवीन लोक तुमच्या कामात सहभागी होण्याचा प्रयत्न करतील. कौटुंबिक जीवन आनंदी राहील. व्यवसायात लाभाच्या संधी मिळतील. आरोग्याची काळजी घ्या.


धनु (Sagittarius Horoscope) : कुटुंबातील सदस्यांसोबत आनंदाचे क्षण घालवाल. कामाच्या ठिकाणी आव्हानांचा सामना करण्यात तुम्ही यशस्वी व्हाल. कोणतेही महत्त्वाचे काम करताना जोडीदाराचा सल्ला घेणे चांगले राहील. आरोग्याची काळजी घ्या. तुम्हाला तुमच्या बोलण्यावर नियंत्रण ठेवावे लागेल. पैशाचे व्यवहार करण्यापूर्वी सावधगिरी बाळगावी लागेल, अन्यथा तुमचे पैसे अडकू शकतात.


मकर (Capricorn Horoscope) : हट्टी स्वभाव नियंत्रणात ठेवा. पैसे कमावण्याच्या अनेक संधी मिळतील. कुटुंबाच्या मदतीने तुमची काही महत्त्वाची कामे पूर्ण होतील. अनावश्यक गोष्टींमध्ये पडणे टाळावे. मित्राच्या मदतीने व्यवसाय वाढू शकतो. लाभाच्या संधी मिळतील. संयम कमी होईल. मानसिक गोंधळ कायम राहील. नवीन योजनेत पैसे गुंतवले, तर ते तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल.


कुंभ (Aquarius Horoscope) : नोकरीच्या ठिकाणी जुन्या ओळखीचा लाभ मिळेल. सर्व रखडलेली कामे सहज पूर्ण होतील. मन प्रसन्न राहील. कुटुंबातील सर्वांना मदत करण्यात तुम्ही यशस्वी व्हाल. काही नवीन व्यवसायाचे प्रस्ताव मिळतील. धनप्राप्ती होऊ शकते. नोकरीत अडचणींचा सामना करावा लागू शकतो. वाद टाळण्यासाठी, बोलण्यावर नियंत्रण ठेवा. शत्रूंपासून सावध राहण्याची गरज आहे.


मीन (Pisces Horoscope) : एखाद्या जुन्या मित्राची भेट होऊ शकते. प्रवासाचे योग आहेत. कुटुंबातील सदस्यांशी वाद घालू नका. खर्च वाढतील. धावपळही जास्त होईल. मित्राकडून पैसे मिळू शकतात. कौटुंबिक जबाबदाऱ्या वाढू शकतात. कार्यालयीन वातावरण चांगले राहील. कामाचा ताणही कमी होईल. गुंतवणूक काळजीपूर्वक करा आणि अनावश्यक नुकसान टाळण्यासाठी योग्य सल्ला घ्या.


(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. यासाठी संबंधित तज्ज्ञाचा सल्ला घ्यावा.) 


महत्वाच्या बातम्या :