Horoscope Today, May 29, 2022 : वृषभ, कर्कसह ‘या’ राशींचा धार्मिक कार्यात रस वाढेल! जाणून घ्या आजचे राशीभविष्य..
Horoscope Today, May 29, 2022 : वृषभ राशीच्या लोकांनी तब्येतीची विशेष काळजी घ्यावी. मेष आणि तूळ राशीच्या लोकांना व्यवसायात यश मिळेल.
Horoscope Today, May 29, 2022 : आज ज्येष्ठ महिन्याच्या कृष्ण पक्षाची चतुर्दशी आहे. चंद्र मेष राशीत आणि रोहिणी नक्षत्रात आहे. शनी कुंभ राशीत आहे. वृषभ राशीच्या लोकांनी तब्येतीची विशेष काळजी घ्यावी. मेष आणि तूळ राशीच्या लोकांना व्यवसायात यश मिळेल. जाणून घ्या आजचे राशीभविष्य...
मेष (Aries Horoscope) : धार्मिक कार्यात रस घ्याल. विद्यार्थ्यांसाठी आजचा दिवस अनुकूल आहे. नोकरीत प्रगती संभवते. वैवाहिक जीवन आनंदी राहील. अधिक धावपळ होईल. नोकरीत उत्पन्नात वाढ होऊ शकते. शांत राहा, जास्त राग टाळा. शारीरिक आणि मानसिक आरोग्यही चांगले राहील. कौटुंबिक वातावरण आनंददायी राहील. मित्र, प्रियजनांशी सलोखा होईल. व्यवसाय वाढवण्यासाठी सध्या कोणताही मोठा निर्णय घेऊ नका.
वृषभ (Taurus Horoscope) : आज तुम्ही एखाद्या गोष्टीबद्दल द्विधा मनस्थितीत राहू शकता. काम पूर्ण न झाल्याने तुम्ही असमाधानी राहाल. सर्दी-खोकला, कफ किंवा तापाची समस्या उद्भवू शकते. बाहेर जाणे आणि लोकांना भेटणे टाळा. कामाच्या ठिकाणी कामाचे ओझे होऊ शकते. धार्मिक कार्यातही पैसा खर्च होऊ शकतो. कामाचा उत्साह वाढू शकतो. आर्थिक लाभ होईल. गुंतवणुकीशी संबंधित कोणतेही महत्त्वाचे काम करू नका.
मिथुन (Gemini Horoscope) : मनावर नकारात्मकतेचा प्रभाव पडू शकतो. अनावश्यक राग टाळा. मुलाखतीतून आनंददायी परिणाम मिळतील. उत्पन्न वाढेल. कामात उत्साह राहील. आरोग्याबाबत सतर्क राहा. व्यवसायाच्या विस्तारात मित्राचे सहकार्य मिळेल. नोकरीत अडचणींचा सामना करावा लागू शकतो. अपेक्षेपेक्षा जास्त धनलाभ होईल. सरकारी कामे सहज पूर्ण होतील.
कर्क (Cancer Horoscope) : धार्मिक कार्याकडे कल राहील. व्यवसायात अपेक्षेप्रमाणे लाभ होईल. घराबाहेर पडताना पालकांची मदत घ्या. काळजी घ्या. भावनेच्या भरात घेतलेला निर्णय घातक ठरू शकतो. जोडीदारासोबत मतभेद होऊ शकतात. कुटुंबातही आनंदाचे वातावरण राहील. व्यवसाय आणि नोकरीत भागीदार किंवा अधिकाऱ्याशी अर्थपूर्ण चर्चा होऊ शकते. उत्पन्न स्थिर राहील.
सिंह (Leo Horoscope) : जोडीदारासोबत मतभेद होऊ शकतात. कुटुंबातही आनंदाचे वातावरण राहील. व्यवसाय आणि नोकरीत भागीदार किंवा अधिकाऱ्याशी अर्थपूर्ण चर्चा होऊ शकते. उत्पन्न स्थिर राहील. कुटुंबातील सदस्यांशी वाद होण्याचीही शक्यता आहे. धर्म आणि अध्यात्मामुळे तुम्हाला मानसिक शांती मिळेल. आरोग्यासाठी तुम्ही योगाची मदत घेऊ शकता.
कन्या (Virgo Horoscope) : तुम्ही तुमच्या बोलण्याने लोकांची मने जिंकू शकाल. कौटुंबिक जीवन आनंदी राहील. बरेच दिवस अडकलेले पैसे परत मिळू शकतात. ऑफिसच्या कामात अतिरिक्त जबाबदाऱ्या मिळू शकतात. रागावर नियंत्रण ठेवा, अन्यथा वाद होऊ शकतो. या राशीच्या अविवाहितांसाठी वैवाहिक संबंध येऊ शकतात. अनावश्यक वाद टाळा. कामाच्या ठिकाणी भरपूर मेहनत होईल.
तूळ (Libra Horoscope) : कोणतेही काम पूर्ण झाल्याने मन प्रसन्न राहील. शत्रूंवर विजय मिळेल. ऑफिसमध्ये अधिकाऱ्यांच्या मदतीने नोकरीत प्रगती होऊ शकते. कुटुंबासोबत खरेदीला जाता येईल. मित्रांच्या मदतीने व्यवसायात फायदा होईल. व्यवसाय वाढवण्यासाठी प्रवासाची शक्यता आहे. बोलण्यावर नियंत्रण ठेवा. गुप्त शत्रूंपासून सावध राहा. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी पूर्ण विचार करून पुढे जा.
वृश्चिक (Scorpio Horoscope) : आत्मविश्वास वाढेल. नवीन व्यवसाय सुरू करण्यासाठी आजचा दिवस चांगला आहे. नोकरीत बदल होण्याची शक्यता आहे. घराबाहेर पडताना ज्येष्ठांचा आशीर्वाद घ्या. शैक्षणिक कार्याशी संबंधित लोकांना आज काही चांगली बातमी मिळू शकते. पैशाशी संबंधित कामासाठी वेळ शुभ आहे. व्यवसायात आर्थिक लाभामुळे मन प्रसन्न राहील. रागावर नियंत्रण ठेवा. कुटुंबासोबत दिवस चांगला जाईल.
धनु (Sagittarius Horoscope) : मनःशांती राहील. कुटुंबात धार्मिक कार्ये होऊ शकतात. शैक्षणिक कामावर लक्ष केंद्रित करा. आरोग्याबाबत सावध राहा. नोकरीत प्रगतीची शक्यता आहे. नकारात्मक विचारांचा प्रभाव राहील. मित्रांचे सहकार्य मिळेल. जास्त मेहनत करूनही कामात कमी यश मिळेल. यामुळे निराशेची भावना निर्माण होऊ शकते. आजचा प्रवास पुढे ढकलणे तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल.
मकर (Capricorn Horoscope) : वैवाहिक जीवन आनंदी राहील. पालकांच्या पाठिंब्याने आर्थिक स्थिती मजबूत होईल. व्यवसायात तुम्हाला जास्त मेहनत करावी लागू शकते. ऑफिसमध्ये अतिरिक्त जबाबदाऱ्या मिळू शकतात. स्पर्धेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना काही चांगली बातमी मिळू शकते. कौटुंबिक मालमत्तेतून लाभ होण्याची शक्यता आहे. आज सरकार किंवा कोर्टाशी संबंधित कोणतेही काम करू नका.
कुंभ (Aquarius Horoscope) : आज तुम्हाला नवीन गोष्टी करण्याची प्रेरणा मिळेल, परंतु कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा. ऑफिसमधील जुनी प्रलंबित कामे करण्यासाठी आज जास्त वेळ द्याल. साहित्याशी संबंधित कामासाठी दिवस चांगला आहे. नवीन व्यवसाय सुरू करण्यासाठी आजचा दिवस शुभ आहे. अनावश्यक रागामुळे ऑफिसमध्ये अधिका-यांशी वाद होऊ शकतात.
मीन (Pisces Horoscope) : आकस्मिक आर्थिक लाभामुळे मन प्रसन्न राहील. वडिलांच्या मदतीने आर्थिक स्थिती मजबूत होईल. कार्यालयातील अधिकारी तुमच्या कामाचे कौतुक करू शकतात. व्यवसायात कठोर परिश्रम केल्यास पैसे मिळतील. उत्पन्नाचे नवीन स्रोत सापडतील. एखाद्यासोबत मतभेद आणि तणाव होऊ शकतो. आज तुम्हाला तुमच्या बोलण्यावर नियंत्रण ठेवावे लागेल.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. यासाठी संबंधित तज्ज्ञाचा सल्ला घ्यावा.)
महत्त्वाच्या बातम्या :