एक्स्प्लोर

Horoscope Today, May 22, 2022 : वृषभ, मीनसह ‘या’ राशींच्या व्यक्तींनी स्वतःच्या निर्णयांना प्राधान्य द्यावे! जाणून घ्या आजचे राशीभविष्य

Horoscope Today, May 22, 2022 : मेष ते मीन राशींच्या आयुष्यात आज काय काय घडणार? जाणून घ्या आजचे संपूर्ण राशीभविष्य...

Horoscope Today, May 22, 2022 : आज सूर्योदयाच्या वेळी चंद्र धनिष्‍ठ नक्षत्र आणि मकर राशीत आहे. दुपारी 12.57 नंतर चंद्र कुंभ राशीत प्रवेश करेल. गुरु मीन राशीत आहे आणि सूर्य शुक्र वृषभ राशीत आहे. वृषभ, मीन, मकर या राशीच्या लोकांनी आज इतरांच्या सल्ल्याकडे लक्ष न देता स्वतःच्या निर्णयांना प्राधान्य दिले पाहिजे. जाणून घ्या आजचे संपूर्ण राशीभविष्य...

मेष (Aries Horoscope) : आज तुम्हाला तुमच्या बोलण्यावर नियंत्रण ठेवण्याची गरज आहे, अन्यथा कुटुंबात मतभेद होऊ शकतात. स्पर्धेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना आज काही चांगली बातमी मिळू शकते. कुटुंबातील सदस्यांचे सहकार्य मिळेल. रखडलेले काम पूर्ण होईल. ऑफिसमध्ये आज तुमचे कौतुक होईल. कार्यक्षेत्राच्या विस्तारात मित्राची साथ मिळेल. पैशाच्या बाबतीत यश मिळेल.

वृषभ (Taurus Horoscope) : गुंतवणूक फायदेशीर ठरेल. धार्मिक कार्यात रुची राहील. मान-प्रतिष्ठेत वाढ होईल. घरात सकारात्मकता राहील. कायदेशीर बाबींमध्ये यश मिळू शकते. इतरांची मदत घेण्यापेक्षा स्वतःच्या निर्णयाला प्राधान्य द्या. व्यवसायात गुंतवणूक करताना अनुभवी व्यक्तीचा सल्ला घ्या. अनावश्यक वादात अडकणे टाळा. नोकरीत अधिकाऱ्यांचे सहकार्य मिळेल. कार्यक्षेत्रात बदल होऊ शकतो. संभाषणात संयम बाळगा.

मिथुन (Gemini Horoscope) : आई-वडिलांचे पूर्ण सहकार्य मिळेल, ज्यामुळे तुम्ही आयुष्यात पुढे जाल. शारीरिकदृष्ट्या तुम्हाला ताजेतवाने वाटेल. तुम्हाला कठोर परिश्रमाचे चांगले परिणाम दिसतील. रागाचा अतिरेक टाळा. शत्रूंवर विजय मिळेल. नोकरीत अधिकाऱ्यांचे सहकार्य मिळेल. नवीन गोष्टी शिकण्यात थोडा वेळ जाईल. जवळच्या व्यक्तीकडून वाईट बातमी मिळू शकते.

कर्क (Cancer Horoscope) : अनावश्यक खर्चापासून दूर राहून अत्यावश्यक खर्चाला प्राधान्य द्या. अनेक दिवसांपासून रखडलेली कामे पूर्ण होतील. खर्च वाढतील. कौटुंबिक मतभेद होऊ शकतात. व्यावसायिकांसाठी आजचा दिवस चांगला आहे. कौटुंबिक समस्या कमी होऊ शकतात. मित्रांचे सहकार्य मिळेल. कामाच्या ठिकाणी बदल होण्याची शक्यता आहे. जुन्या मित्राची साथ मिळेल.

सिंह (Leo Horoscope) : जास्त कामामुळे थकवा येईल. आरोग्याच्या बाबतीत कुरबुरी सुरु होतील. नवीन ठिकाणाहून फायदा होऊ शकतो. घरातील समस्या बाहेरच्या व्यक्तीसोबत शेअर करू नका. आर्थिक स्थिती सुधारेल. नवीन काम सुरू करण्याचा विचार करू शकता. कोणताही करार अंतिम स्वरूप घेऊ शकतो. कोणतेही नवीन काम सुरू करण्यापूर्वी घरातील मोठ्यांचा सल्ला घ्या. पैशाच्या व्यवहारात सावधगिरी बाळगण्याची गरज आहे.

कन्या (Virgo Horoscope) : व्यवसायात मोठे यश मिळेल. परदेशात जाण्याचीही संधी मिळू शकते. एखादा जुना व्यावसायिक सौदा तुम्हाला अचानक नफा देऊ शकतो, ज्यामुळे तुमचे मन प्रसन्न राहील. आज सुरु केलेल्या कामात यश मिळेल. व्यवसायात अपेक्षेप्रमाणे लाभ होईल. आर्थिक स्थिती मजबूत राहील. नोकरीत कामाचा ताण वाढू शकतो. आर्थिक बाबतीत सावध राहावे लागेल, अन्यथा फसवणूक होऊ शकते.

तूळ (Libra Horoscope) : नातेवाईकांशी वैचारिक मतभेद होऊ शकतात. वागण्यातील आक्रमकतेमुळे लोक तुमच्यावर नाराज होऊ शकतात. खर्चावर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे. आर्थिक योजना सहजपणे पूर्ण होतील, ज्यामुळे तुमचे मन प्रसन्न राहील. उत्पन्नात वाढ होण्याची शक्यता आहे. अचानक पैसे मिळण्याची शक्यता आहे. कोणतेही नवीन काम सुरू करणे टाळा. तसेच, कोणाशीही पैशाची देवाणघेवाण करू नका.

वृश्चिक (Scorpio Horoscope) : स्वतःमध्ये बदल घडवून आणण्यासाठी आजचा दिवस चांगला आहे. पुढे जाण्यासाठी नवीन योजना आखू शकता. व्यापार्‍यांसाठी दिवस चांगला राहील. प्रलंबित कामे पूर्ण होतील. नोकरी-व्यवसायात प्रगती होईल. उधार दिलेले पैसे परत मिळू शकतात. कुटुंबाचे सहकार्य मिळेल. नोकरीत प्रगतीचा मार्ग मोकळा होईल. कामाच्या ठिकाणी जास्त मेहनत करावी लागेल. लाभाच्या संधी मिळतील.

धनु (Sagittarius Horoscope) : नवीन कामात फायदा होईल. गुंतवणुकीचा विचार कराल. हितचिंतकांचा सल्ला घ्यावा. तुम्ही जे काम करण्याचा प्रयत्न करत आहात, त्याचे सकारात्मक परिणाम लवकरच दिसून येतील. कोणतेही महत्त्वाचे काम करताना घरातील अनुभवी सदस्यांचा सल्ला घ्या. नोकरीच्या ठिकाणी कोणतेही काम काळजीपूर्वक करा. अनावश्यक वादात पडणे टाळा.

मकर (Capricorn Horoscope) : आजचा दिवस तुमच्यासाठी चांगला जाणार आहे. कुटुंबासोबत धार्मिक सहलीला जाऊ शकता. कार्यालयातील सहकाऱ्यांशी एखाद्या प्रकल्पाबाबत किरकोळ वाद होऊ शकतात. व्यवसायातही काळजी घ्यावी लागेल. एखाद्या सामाजिक कार्यक्रमात सहभागी होऊ शकता. नोकरीत बदल होण्याची शक्यता आहे. इतरांच्या सल्ल्यावर जास्त विसंबून राहू नका, अन्यथा अडचणीत येऊ शकता.

कुंभ (Aquarius Horoscope) : पूर्ण एकाग्रतेने स्वतःच्या कामांवर लक्ष केंद्रित करा. आज कोणत्याही प्रकारचे कर्ज घेणे हानिकारक ठरेल. नात्यातही दुरावा येऊ शकतो. नोकरी शोधणाऱ्यांना इच्छित नोकरी मिळाल्याने आनंद होईल.  नवीन काम सुरू करू शकाल. काही जुन्या गोष्टींमुळे तुम्ही थोडे चिंतेत असाल. शेअर मार्केटशी संबंधित लोकांना उत्कृष्ट लाभ मिळू शकतो. कोणाशीही वाद घालणे टाळा. नोकरीत बदल होण्याची शक्यता आहे.

मीन (Pisces Horoscope) : आरोग्याच्या समस्या उद्भवू शकतात, आहाराकडे लक्ष द्या. व्यवसायात अपेक्षेप्रमाणे लाभ होईल. उधार दिलेले पैसे परत मिळू शकतात. वडिलधाऱ्यांचा सल्ला घेऊनच आज व्यवसायात नवीन काम सुरू केले, तर ते तुमच्यासाठी चांगले राहील. कामाच्या ठिकाणी गडबड होऊ शकते. मालमत्ता खरेदी-विक्रीसाठी काही महत्त्वाच्या योजना आखल्या जातील. इतरांवर अवलंबून न राहता स्वतःच्या निर्णयांना प्राधान्य द्या.

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. यासाठी संबंधित तज्ज्ञाचा सल्ला घ्यावा.) 

महत्त्वाच्या बातम्या : 

महत्त्वाच्या बातम्या

August 2026 Monthly Horoscope: तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीनपैकी 4 राशी श्रीमंतीच्या वाटेवर! ऑगस्ट अन् श्रावणात भाग्य उजळणार, मासिक राशीभविष्य
तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीनपैकी 4 राशी श्रीमंतीच्या वाटेवर! ऑगस्ट अन् श्रावणात भाग्य उजळणार, मासिक राशीभविष्य
August 2026 Monthly Horoscope: मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्यापैकी 4 राशींवर धनवर्षावाचे संकेत! ऑगस्ट अन् श्रावण करणार भरभराट, मासिक राशीभविष्य
मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्यापैकी 4 राशींवर धनवर्षावाचे संकेत! ऑगस्ट अन् श्रावण करणार भरभराट, मासिक राशीभविष्य
Lord Shiv: शिवलिंगाला चुकूनही पूर्ण प्रदक्षिणा का घातली जात नाही? अर्धीच प्रदक्षिणा का घातली जाते? धार्मिक, शास्त्रीय नियम जाणून थक्क व्हाल..
शिवलिंगाला चुकूनही पूर्ण प्रदक्षिणा का घातली जात नाही? अर्धीच प्रदक्षिणा का घातली जाते? धार्मिक, शास्त्रीय नियम जाणून थक्क व्हाल..
Sankashti Chaturthi 2026: आजची संकष्टी चतुर्थी अत्यंत शुभ योगात! 5 राशी भाग्यशाली, शुभ मुहूर्त, चंद्रोदय वेळ, पूजा पद्धत, महत्त्व, जाणून घ्या..
आजची संकष्टी चतुर्थी अत्यंत शुभ योगात! 5 राशी भाग्यशाली, शुभ मुहूर्त, चंद्रोदय वेळ, पूजा पद्धत, महत्त्व, जाणून घ्या..

व्हिडीओ

Tukaram Mundhe at Majha Katta | तुकाराम मुंढे कसे घडले?, डॅशिंग अधिकाऱ्याचा बेधडक कट्टा
Nitesh Rane on Sanjay Raut : संजय राऊत 420, अमित शाहांवर टीका करण्याची त्याची लायकी नाही
Chandrapur Flood : पुराच्या वेढ्यात चंद्र'पूर', वर्धा नदीच्या पाणीपातळीत मोठी वाढ | Special Report
Amit Thackeray : समोर उत्साह...आणि अमित ठाकरे भाषणच विसरले, का होतेय चर्चा? | Special Report
Raj Thackeray Mumbai Speech : मोदीजी, दुसऱ्यांना आया आहेत विसरु नका, UNCUT Speech

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Delhi Jantar Mantar protests: जंतर मंतरवरील आंदोलनाबाबत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या वरिष्ठ नेत्याचा गंभीर आरोप, 'हे आंदोलन देशविरोधी होतं, संविधानविरोधात...'
जंतर मंतरवरील आंदोलनाबाबत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या वरिष्ठ नेत्याचा गंभीर आरोप, 'हे आंदोलन देशविरोधी होतं, संविधानविरोधात...'
Jalgaon Crime News: झोपलेल्या चिमुरड्यांवर जन्मदात्या बापाकडूनच जीवघेणा हल्ला, मुलीचा जागीच अंत, मुलगा गंभीर जखमी; जळगाव हादरलं!
झोपलेल्या चिमुरड्यांवर जन्मदात्या बापाकडूनच जीवघेणा हल्ला, मुलीचा जागीच अंत, मुलगा गंभीर जखमी; जळगाव हादरलं!
ज्यांनी आपलं मूल गमावलं अशा एका तरी शोकाकुल कुटुंबाला मोदी भेटले का? भारताच्या विद्यार्थ्यांना पंतप्रधानांच्या माफीची गरज नाही, मोदींनीच त्यांची माफी मागावी; राहुल गांधींचा प्रहार
ज्यांनी आपलं मूल गमावलं अशा एका तरी शोकाकुल कुटुंबाला मोदी भेटले का? भारताच्या विद्यार्थ्यांना पंतप्रधानांच्या माफीची गरज नाही, मोदींनीच त्यांची माफी मागावी; राहुल गांधींचा प्रहार
'न्यायपालिकेत आपण अशा व्यक्तींचा समावेश करतो नंतर ते लोकांच्या गटांचे वर्णन 'मुंग्या' असे करत असंवैधानिक टिप्पण्या करतात..' सुप्रीम कोर्टातील न्यायमूर्ती उज्वल भुयान यांची काॅलेजियम सिस्टमवर सडकून टीका
'न्यायपालिकेत आपण अशा व्यक्तींचा समावेश करतो नंतर ते लोकांच्या गटांचे वर्णन 'मुंग्या' असे करत असंवैधानिक टिप्पण्या करतात..' सुप्रीम कोर्टातील न्यायमूर्ती उज्वल भुयान यांची काॅलेजियम सिस्टमवर सडकून टीका
Pune Crime News: जॉब सोडल्यानंतर पैशांची चणचण; राहतं घर विकलं तरीही...; पिंपरीत कुटुंबाचा टोकाचा निर्णय; वडिलांचा मृत्यू, आई-मुलगी आयसीयूमध्ये, नेमकं काय घडलं?
जॉब सोडल्यानंतर पैशांची चणचण; राहतं घर विकलं तरीही...; पिंपरीत कुटुंबाचा टोकाचा निर्णय; वडिलांचा मृत्यू, आई-मुलगी आयसीयूमध्ये, नेमकं काय घडलं?
Abhijeet Dipke: 'अभिजित दिपकेंच्या वडिलांच्या संपत्तीची चौकशी करा, मुलाच्या परदेशातील शिक्षणासाठी पैसा कसा पुरवला?' निवडणूक आयोगासह टॅक्स अधिकाऱ्यांना सुद्धा कोणी लिहिलं पत्र?
'अभिजित दिपकेंच्या वडिलांच्या संपत्तीची चौकशी करा, मुलाच्या परदेशातील शिक्षणासाठी पैसा कसा पुरवला?' निवडणूक आयोगासह टॅक्स अधिकाऱ्यांना सुद्धा कोणी लिहिलं पत्र?
Currency notes RBI: 10 आणि 20 रुपयांच्या प्लॅस्टिक नोटा येणार; RBI जुन्या, खराब नोटांच काय करते? नोटा जाळत का नाही?
10 आणि 20 रुपयांच्या प्लॅस्टिक नोटा येणार; RBI जुन्या, खराब नोटांच काय करते? नोटा जाळत का नाही?
Ethanol Blended Petrol : ...तर पेट्रोलचा दर 125 रुपये लिटर झाला असता! इथेनॉल ब्लेंडिंगमुळे कसे वाचले तुमचे 30 रुपये? सरकारने दिली माहिती
...तर पेट्रोलचा दर 125 रुपये लिटर झाला असता! इथेनॉल ब्लेंडिंगमुळे कसे वाचले तुमचे 30 रुपये? सरकारने दिली माहिती
Embed widget