एक्स्प्लोर

Horoscope Today, May 16, 2022 : मकर, कुंभसह ‘या’ राशींची करिअरमध्ये प्रगती होणार! जाणून घ्या आजचे राशीभविष्य

Horoscope Today, May 16, 2022 : आज वैशाख पौर्णिमा. मिथुन आणि सिंह राशींना नव्या नोकरीच्या ऑफर मिळू शकतात. कन्या राशीच्या लोकांना नव्या जबाबदाऱ्या मिळू शकतात.

Horoscope Today, May 16, 2022 : आज वैशाख पौर्णिमेच्या दिवशी, सूर्योदयाच्या वेळी, चंद्र विशाखा नक्षत्रात आहे आणि सकाळी 07:55 पर्यंत तूळ राशीत आहे, नंतर तो वृश्चिक राशीत प्रवेश करेल. गुरु आता मीन राशीत आहे आणि सूर्य वृषभ राशीत आहे. मिथुन आणि सिंह राशींना नव्या नोकरीच्या ऑफर मिळू शकतात. कन्या राशीच्या लोकांना नव्या जबाबदाऱ्या मिळू शकतात. जाणून घ्या आजचे राशीभविष्य...  

मेष (Aries Horoscope) : कोणताही व्यवसाय करायचा असेल, तर तुम्हाला नशिबाची पूर्ण साथ मिळेल. आजचा दिवस तुमच्यासाठी संमिश्र राहील. वैवाहिक जीवनात काही संघर्ष चालू असेल, तर तो संपेल. बोलण्यात कठोरता राहील, मात्र स्वभाव शांत ठेवा. स्पर्धा परीक्षा आणि मुलाखतींसाठी अनुकूल परिणाम मिळतील. उत्पन्नात वाढ होईल. तुमची नियमित कामे हाताळताना काही समस्यांना सामोरे जावे लागेल.

वृषभ (Taurus Horoscope) : आपल्या भावनांवर नियंत्रण ठेवा. आरोग्याबाबत तुम्ही चिंतेत राहू शकता. नोकरीत प्रगतीच्या संधी मिळतील. खर्च वाढू शकतो. मानसिक शांतीसोबतच मनात असंतोषही राहील. व्यवसाय करणाऱ्या लोकांना खूप धावपळ केल्यावरच यश मिळेल. नवीन योजनांकडे लक्ष द्यावे लागेल, तरच ते तुम्हाला अचानक लाभ देऊ शकतात. सरकारी यंत्रणेच्या भानगडीत पडू नका.

मिथुन (Gemini Horoscope) : आजचा दिवस व्यवसाय करणार्‍या लोकांसाठी फायद्याची संधी देणारा आहे. या संधी त्वरित ओळखून अंमलात आणाव्या लागतील. नोकरीत बदली होण्याची शक्यता आहे. नोकरीच्या ठिकाणी मेहनतीसोबतच उत्पन्नातही वाढ होईल. स्वतःला व्यस्त आणि आनंदी ठेवा. मनात वेगवेगळे विचार येत राहतील. सकारात्मक मानसिकतेने पुढे जाल.

कर्क (Cancer Horoscope) : आपल्या भावनांवर नियंत्रण ठेवा आणि कोणत्याही परिस्थितीत तुम्हाला भावनिक होण्याची गरज नाही. तुम्हाला काही अप्रिय परिस्थितींचा सामना करावा लागू शकतो. छोट्याशा गोष्टीवर तुम्हाला खूप राग येऊ शकतो. टीकाकाराच्या टीकेकडे लक्ष देऊ नका. सामाजिक संवाद वाढवून यश मिळेल. मोठ्या खर्चावर लगाम घालण्याचाही प्रयत्न करावा लागेल.

सिंह (Leo Horoscope) : कठोर परिश्रमानंतरच तुम्हाला यश मिळेल. सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांची जबाबदारी वाढेल. जे नोकरीत आहेत, त्यांना आज दुसऱ्या नोकरीची ऑफर मिळू शकते. उत्पन्न घटल्याने खर्च वाढू शकतात. महत्त्वाकांक्षा पूर्ण करण्याच्या दिशेने वाटचाल कराल, परंतु तरीही तुम्ही तुमच्या काही महत्त्वाकांक्षांवर नियंत्रण ठेवावे. नकारात्मक मानसिकतेच्या लोकांपासून दूर राहा.

कन्या (Virgo Horoscope) : अनुभवांतून तुम्हाला खूप काही शिकायला मिळेल. पैशाशी संबंधित तुमचे काम आज पूर्ण होईल. विवाहाचा प्रस्ताव प्राप्त होऊ शकतो किंवा नवीन प्रेम प्रकरण सुरू होऊ शकते. आज तुम्हाला तुमच्या कार्यक्षेत्रात नवी जबाबदारी मिळू शकते. आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका. कौटुंबिक जबाबदाऱ्या वाढण्याची शक्यता आहे. नोकरीत जास्त काम होईल. तसेच उत्पन्नही चांगले राहील.

तूळ (Libra Horoscope) : जवळच्या किंवा दूरच्या प्रवासाला जाऊ शकता, जो तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल. कामाच्या ठिकाणी समस्यांचे निराकरण न झाल्यामुळे तुमचे मन अस्वस्थ राहील. वरिष्ठांच्या मदतीने नोकरीत प्रगती होण्याची शक्यता आहे. संचित संपत्ती वाढेल. नोकरीत बदल होऊ शकतो. करिअरच्या क्षेत्रात पुढे जाण्यासाठी तुमच्यासमोर अनेक नवीन मार्ग खुले होणार आहेत.

वृश्चिक (Scorpio Horoscope) : कामाच्या ठिकाणी काहीतरी विशेष करण्याच्या प्रयत्नात व्यस्त असाल. अनेक कामे दीर्घकाळासाठी पुढे ढकलली जाऊ शकतात. नोकरीच्या शोधात असलेल्या लोकांनाही काही चांगली बातमी मिळू शकते. शैक्षणिक कार्यामुळे समाजात सन्मान वाढेल. जोडीदारासोबत एखाद्या गोष्टीवरून मतभेद होऊ शकतात. कुटुंबासोबत धार्मिक प्रवासाला जाण्याची शक्यता आहे.

धनु (Sagittarius Horoscope) : धार्मिक कार्यात श्रद्धा वाढेल. व्यवसायात दीर्घकाळ रखडलेल्या काही योजना सुरू होतील, ज्यामुळे तुम्हाला भविष्यात निश्चितच पूर्ण लाभ मिळेल. नवीन नोकरीची ऑफर मिळू शकते. कामामुळे भार वाढू शकतो. कामाच्या ठिकाणी तुम्हाला जास्त मेहनत करावी लागेल. मानसिकदृष्ट्या तुम्ही शांत राहाल, पण रागावरही नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न करा.

मकर (Capricorn Horoscope) : नोकरीत यश मिळेल. तुमच्या चेहऱ्यावरील तेज पाहून शत्रूंचे मनोबल खचून जाईल. संध्याकाळी तुमच्या घरी अचानक पाहुण्यांचे आगमन होऊ शकते. मुलांकडून काही चांगली बातमी मिळू शकते. एखाद्या गोष्टीबद्दल मनात निराशा निर्माण होऊ शकते. बोलण्यात संयम बाळगा. कुटुंबासोबत चांगला वेळ जाईल. चांगली बातमी मिळेल. प्रवासात फायदा होईल.

कुंभ (Aquarius Horoscope) : विद्यार्थ्यांना करिअरमध्ये यश मिळेल. तुम्हाला आर्थिक लाभ मिळू शकतो. तुमच्याकडे जे काही नवीन प्लॅन आहेत, त्याबद्दल तुमच्या जवळच्या व्यक्तीला काहीही सांगू नका. आज लोक तुमचा मुद्दा समजून घेण्याच्या स्थितीत नाहीत. त्यांना पटवून देण्याचा प्रयत्नही करू नका. तुम्ही तुमचे काम सुरू करा. शिक्षण आणि राजकारणाच्या क्षेत्रात खूप यशस्वी व्हाल.

मीन (Pisces Horoscope) : आजचा दिवस तुमच्यासाठी त्रास आणि समस्यांनी भरलेला आहे. नकारात्मक भावनांपासून दूर राहा. आज तुम्हाला जे काही काम करायचे आहे, त्याचे आधीच नियोजन करा. यश न मिळाल्यास किंवा काही कामात विलंब झाल्यास निराश होऊ नका. महत्त्वाच्या कामात मित्र आणि कुटुंबीयांची पूर्ण मदत मिळेल. आज काही नवीन काम करू नका.

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. यासाठी संबंधित तज्ज्ञाचा सल्ला घ्यावा.) 

महत्त्वाच्या बातम्या : 

महत्त्वाच्या बातम्या

Budh Gochar 2026 : बुधाच्या संक्रमणाने 'या' राशींवर होणार परिणाम; 5 ऑगस्टपासून ताकही फुंकून पिण्याची येणार वेळ, अलर्ट राहा
बुधाच्या संक्रमणाने 'या' राशींवर होणार परिणाम; 5 ऑगस्टपासून ताकही फुंकून पिण्याची येणार वेळ, अलर्ट राहा
Shani Nakshatra Parivartan 2026 : दोन ग्रहांच्या दरम्यान शनिचं नक्षत्र परिवर्तन; 'या' 3 राशींच्या अडचणींत होणार डबल वाढ, वेळोवेळी सावधानतेचा इशारा
दोन ग्रहांच्या दरम्यान शनिचं नक्षत्र परिवर्तन; 'या' 3 राशींच्या अडचणींत होणार डबल वाढ, वेळोवेळी सावधानतेचा इशारा
Guru Gochar 2026 : बुधच्या नक्षत्रात गुरुची एन्ट्री, 'या' 4 राशींसाठी ऑक्टोबरपर्यंतचा काळ असणार शुभ, तुमची रास यात आहे?
बुधच्या नक्षत्रात गुरुची एन्ट्री, 'या' 4 राशींसाठी ऑक्टोबरपर्यंतचा काळ असणार शुभ, तुमची रास यात आहे?
Mangalagaur 2026: यंदा मंगळागौर कधीपासून आहे? लग्नानंतर पहिली 5 वर्षे व्रताची परंपरा काय? व्रताचे फळ? धार्मिक महत्त्व, पूजा पद्धत, तिथी, पौराणिक कथा... 
यंदा मंगळागौर कधीपासून आहे? लग्नानंतर पहिली 5 वर्षे व्रताची परंपरा काय? व्रताचे फळ? धार्मिक महत्त्व, पूजा पद्धत, तिथी, पौराणिक कथा... 

व्हिडीओ

Congress On Sunetra Pawar : गूंगी गुडियाचा टोला, वाद विकोपाला | Special Report ABP Majha
Ketan Agarwal Case Update : सियाचं कांड, लग्नाआधीच गुप्तहेरांना डिमांड | Special Report ABP Majha
Sanjay Raut Delhi PC : बिहारमधील निकालावरून संजय राऊतांचा भाजपवर हल्लाबोल
Prashant Kishor Bankipur Bypoll Election : बांकीपूर पोटनिवडणुकीत भाजपचा पराभव अहंकारामुळे झाला
Tukaram Mundhe News: तुकाराम मुंढेंच्या FDA ला मुंबई हायकोर्टाचा दणका; नेमकं काय घडलं?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
काँग्रेसकडून गुंगी गुडिया म्हणत टीका, पृथ्वीराज चव्हाणांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, अर्थातच सुनेत्रा पवारांकडून कृतीतून उत्तर मिळेल
काँग्रेसकडून गुंगी गुडिया म्हणत टीका, पृथ्वीराज चव्हाणांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, अर्थातच सुनेत्रा पवारांकडून कृतीतून उत्तर मिळेल
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 04 ऑगस्ट 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 04 ऑगस्ट 2026 | मंगळवार
अहिल्यानगरच्या शेवगावमध्ये बिबट्याची दहशत; नर-मादीसह पिल्लांचा वावर, शेतात जायचं कसं? ग्रामस्थ काळजीत
अहिल्यानगरच्या शेवगावमध्ये बिबट्याची दहशत; नर-मादीसह पिल्लांचा वावर, शेतात जायचं कसं? ग्रामस्थ काळजीत
ट्विटरवरुन पोस्ट हटवा, माफी मागा; सुनेत्रा पवारांवरील टीकेनंतर राष्ट्रवादी आक्रमक, तटकरे-पटेलांचा काँग्रेसला इशारा
ट्विटरवरुन पोस्ट हटवा, माफी मागा; सुनेत्रा पवारांवरील टीकेनंतर राष्ट्रवादी आक्रमक, तटकरे-पटेलांचा काँग्रेसला इशारा
लोकलमध्ये हरवलेली बॅग परत; पोलिसांची कामगिरी, तीन वर्षांनी तपास, प्रवाशाला मिळालं 271 ग्रॅम सोनं
लोकलमध्ये हरवलेली बॅग परत; पोलिसांची कामगिरी, तीन वर्षांनी तपास, प्रवाशाला मिळालं 271 ग्रॅम सोनं
BLOG : खड्डेमुक्त रस्त्यांची उद्दिष्टपूर्ती होत नाही तोपर्यंत वाहनांवरील दंडात्मक कारवाई ला स्थगिती द्या !
BLOG : खड्डेमुक्त रस्त्यांची उद्दिष्टपूर्ती होत नाही तोपर्यंत वाहनांवरील दंडात्मक कारवाई ला स्थगिती द्या !
तानाजी सावंत अन् मोटेंचे समर्थक भिडले; धाराशिवमध्ये महायुतीत राडा, शिवसेना-राष्ट्रवादी भिडले, 10 गाड्या फोडल्या
तानाजी सावंत अन् मोटेंचे समर्थक भिडले; धाराशिवमध्ये महायुतीत राडा, शिवसेना-राष्ट्रवादी भिडले, 10 गाड्या फोडल्या
तरणाबांड मुलगा जिवानीशी गेला, ठेकेदारावर गुन्हा दाखल करण्याची कुटुंबीयांची मागणी; पोलिसांची पीडित काकालाच धमकी
तरणाबांड मुलगा जिवानीशी गेला, ठेकेदारावर गुन्हा दाखल करण्याची कुटुंबीयांची मागणी; पोलिसांची पीडित काकालाच धमकी
Embed widget