एक्स्प्लोर

Horoscope Today, May 12, 2022 : वृषभ, वृश्चिकसह ‘या’ राशीच्या लोकांची नोकरीत प्रगती होणार! जाणून घ्या आजचे राशीभविष्य

Horoscope Today, May 12, 2022 : सिंह, कन्या, तूळ राशीच्या लोकांना आज व्यवसायात फायदा होऊ शकतो.

Horoscope Today, May 12, 2022 : आज चंद्र उत्तरा फाल्गुनी नक्षत्रात आहे आणि तो कन्या आहे. सूर्य मेष राशीत आणि शनि कुंभ राशीत आहे. गुरु मीन राशीत आहे. सिंह, कन्या, तूळ राशीच्या लोकांना आज व्यवसायात फायदा होऊ शकतो. जाणून घ्या आजचे राशीभविष्य...

मेष (Aries Horoscope) : कोणाशीही रागाने बोलणे टाळावे लागेल, अन्यथा घरातील सदस्य तुमच्यावर नाराज होऊ शकतात. अनावश्यक राग आणि वाद टाळा. कौटुंबिक समस्यांकडे लक्ष द्या. कौटुंबिक जीवन आनंदी राहील. उत्पन्नाचे स्रोत विकसित होऊ शकतात. भावनांवर नियंत्रण ठेवा. नोकरदारांना अधिकाऱ्यांच्या मदतीचा फायदा होईल. मित्रांसोबत मजेत वेळ घालवाल.

वृषभ (Taurus Horoscope) : नोकरीत पदोन्नतीकडे वाटचाल कराल. कुटुंबासोबत भविष्यातील योजनांवर विचार कराल. कुटुंबात धार्मिक कार्ये होऊ शकतात. भेटवस्तू म्हणून कपडे मिळू शकतात. कौटुंबिक जीवन काहीसे कठीण होऊ शकते. एखादी चांगली बातमी मिळू शकते. शब्दांचा प्रभाव वाढेल. मित्राच्या मदतीने पैसे मिळण्याची शक्यता आहे. काही अप्रिय लोकांच्या भेटीमुळे अनावश्यक त्रासाला सामोरे जावे लागू शकते.

मिथुन (Gemini Horoscope) : मन प्रसन्न राहील. मात्र, आत्मविश्वासाची कमतरता राहील. कामाच्या ठिकाणी अडचणी येऊ शकतात. अधिक धावपळ होईल. उत्पन्नात घट आणि खर्च अधिक अशी परिस्थिती राहील. कुटुंबात धार्मिक कार्ये होतील. प्रेम जीवनात काही बदल संभवतात. शत्रूंपासून सावध राहा. विद्यार्थ्यांना त्यांच्या कामात यश मिळेल. नोकरीतील बदलाशी संबंधित कोणताही निर्णय विचारपूर्वक घ्या.

कर्क (Cancer Horoscope) :  कोणत्याही स्पर्धात्मक परीक्षा आणि मुलाखतीत यश मिळेल. मान-सन्मान मिळेल. परदेश प्रवासाच्या संधीही मिळू शकतात. व्यवसायाची स्थिती सुधारेल. कामाचा व्याप वाढेल. लाभाच्या संधी मिळतील. इतरांना मदत करताना तुम्हाला तुमच्या कामातही लक्ष द्यावे लागेल. सहकारी तुम्हाला त्रास देऊ शकतात. व्यवसायात कोणाचीही फसवणूक होऊ शकते.

सिंह (Leo Horoscope) : व्यवसायात नवीन करारामुळे लाभ होईल. कोणतीही धार्मिक कार्यांची योजना पुढे ढकलणे योग्य नाही. रागीट स्वभावामुळे तुम्ही मानसिकदृष्ट्या अस्वस्थ राहू शकता. इच्छा नसतानाही एखाद्या कामासाठी बाहेर जावे लागेल. अनावश्यक खर्च टाळा. प्रगतीच्या संधी मिळू शकतात. मित्रांचे सहकार्य मिळेल. प्रगतीचा मार्ग मोकळा होईल. आरोग्याची काळजी घ्या. उत्पन्नाचे नवीन स्रोत मिळतील.

कन्या (Virgo Horoscope) : व्यवसायात यश मिळाल्याने आनंदी व्हाल. व्यवसायात जोडीदाराशी वाद होऊ शकतो मनात शांती आणि आनंद राहील. दिवस आत्मविश्वासाने परिपूर्ण असेल. वैवाहिक सुखात वाढ होईल. आरोग्याची काळजी घ्या. कौटुंबिक जीवन काहीसे कठीण होऊ शकते. भावांसोबत वैचारिक मतभेद होऊ शकतात. मात्र, वडिलांची साथ मिळेल. आशा आणि निराशेच्या संमिश्र भावना मनात राहतील.

तूळ (Libra Horoscope) : व्यवसायातील दीर्घकालीन व्यवहारांची समस्या आज दूर होऊन, लाभ होऊ शकतो. मित्रांसोबत दूरच्या सहलीला जाण्याची तयारी करू शकता. कुटुंबासह धार्मिक स्थळीही जाऊ शकता. उत्पन्नात घट आणि जास्त खर्चाची परिस्थिती निर्माण होऊ शकते. शांत राहण्याचा प्रयत्न करा. जास्त रागराग टाळा. वडिलोपार्जित संपत्तीचा लाभ मिळू शकतो. विद्यार्थ्यांच्या अभ्यासासाठी आजचा दिवस अनुकूल आहे.

वृश्चिक (Scorpio Horoscope) : रोजगार आणि नफा मिळण्याची शक्यता आहे. आरोग्य चांगले राहील. धार्मिक कार्यात तुमची आवड वाढेल. बौद्धिक कार्यात मान-सन्मान मिळू शकतो. नोकरीत प्रगतीच्या संधी मिळतील. कार्यक्षेत्रात बदल होऊ शकतो. व्यवसायात काही अडचणी येऊ शकतात. मात्र, पालकांचे सहकार्य मिळेल. जास्त तळलेले अन्न टाळणे आरोग्यासाठी चांगले ठरेल.

धनु (Sagittarius Horoscope) : जुनी कर्ज आज फेडू शकाल. नोकरीत प्रगतीची शक्यता आहे. मान-सन्मान मिळेल. उत्पन्न वाढेल. मित्राच्या मदतीने कमाईचे नवे साधन मिळेल. नोकरीत प्रगतीचा मार्ग मोकळा होईल. स्वावलंबी व्हा. विद्यार्थ्यांना यश मिळण्याची शक्यता आहे. अविवाहित लोकांना चांगली स्थळे सांगून येतील. पैशांशी संबंधित कामासाठी आजचा दिवस अनुकूल आहे.

मकर (Capricorn Horoscope) : नोकरदार लोकांसमोर आज काही समस्या निर्माण होऊ शकतात. संभाषणात संयम ठेवा. व्यवसायात सुधारणा होईल. परदेश प्रवासाची शक्यता आहे. प्रवास लाभदायक ठरेल. अतिउत्साही होणे टाळा.  घरी पाहुणे येऊ शकतात, यामुळे खर्च अधिक वाढेल. शिक्षणात प्रगती होत आहे. व्यवसायात यश मिळेल. नशीब तुम्हाला साथ देईल.

कुंभ (Aquarius Horoscope) : नोकरीत नवीन कामे सुरू होतील. आत्मविश्वास वाढेल. अचानक प्रवासाला जावे लागू शकते. नवीन प्रकल्प मिळाल्याने तुम्ही व्यस्त राहाल. रखडलेली कामे मार्गी लागतील. स्वाक्षरी करण्यापूर्वी कोणतीही महत्त्वाची कागदपत्रे व्यवस्थित वाचून घ्या. कुटुंबासोबत चांगला वेळ घालवाल. मेहनतीच्या जोरावर तुम्ही सन्मान आणि पैसा मिळवाल.

मीन (Pisces Horoscope) : आर्थिक लाभ होऊ शकतो. ऑफिसमध्ये तुमची प्रतिमा चांगली राहील. कामावर आपले ध्येय निश्चित करा. समाजात मान-सन्मान मिळेल. कुटुंबाची जबाबदारी वाढू शकते. रखडलेले पैसे परत मिळू शकतात. व्यवसायात जास्त मेहनत घ्यावी लागेल. प्रवास खर्च वाढू शकतो. आज कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करू नका. काही व्यवहार कौटुंबिक संबंधात तेढ निर्माण करू शकतात.

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. यासाठी संबंधित तज्ज्ञाचा सल्ला घ्यावा.) 

महत्त्वाच्या बातम्या : 

महत्त्वाच्या बातम्या

Budh Gochar 2026 : बुधाच्या संक्रमणाने 'या' राशींवर होणार परिणाम; 5 ऑगस्टपासून ताकही फुंकून पिण्याची येणार वेळ, अलर्ट राहा
बुधाच्या संक्रमणाने 'या' राशींवर होणार परिणाम; 5 ऑगस्टपासून ताकही फुंकून पिण्याची येणार वेळ, अलर्ट राहा
Shani Nakshatra Parivartan 2026 : दोन ग्रहांच्या दरम्यान शनिचं नक्षत्र परिवर्तन; 'या' 3 राशींच्या अडचणींत होणार डबल वाढ, वेळोवेळी सावधानतेचा इशारा
दोन ग्रहांच्या दरम्यान शनिचं नक्षत्र परिवर्तन; 'या' 3 राशींच्या अडचणींत होणार डबल वाढ, वेळोवेळी सावधानतेचा इशारा
Guru Gochar 2026 : बुधच्या नक्षत्रात गुरुची एन्ट्री, 'या' 4 राशींसाठी ऑक्टोबरपर्यंतचा काळ असणार शुभ, तुमची रास यात आहे?
बुधच्या नक्षत्रात गुरुची एन्ट्री, 'या' 4 राशींसाठी ऑक्टोबरपर्यंतचा काळ असणार शुभ, तुमची रास यात आहे?
Mangalagaur 2026: यंदा मंगळागौर कधीपासून आहे? लग्नानंतर पहिली 5 वर्षे व्रताची परंपरा काय? व्रताचे फळ? धार्मिक महत्त्व, पूजा पद्धत, तिथी, पौराणिक कथा... 
यंदा मंगळागौर कधीपासून आहे? लग्नानंतर पहिली 5 वर्षे व्रताची परंपरा काय? व्रताचे फळ? धार्मिक महत्त्व, पूजा पद्धत, तिथी, पौराणिक कथा... 

व्हिडीओ

Sanjay Raut Delhi PC : बिहारमधील निकालावरून संजय राऊतांचा भाजपवर हल्लाबोल
Prashant Kishor Bankipur Bypoll Election : बांकीपूर पोटनिवडणुकीत भाजपचा पराभव अहंकारामुळे झाला
Tukaram Mundhe News: तुकाराम मुंढेंच्या FDA ला मुंबई हायकोर्टाचा दणका; नेमकं काय घडलं?
Liquor Brands Banned: भारतात कोणत्या ब्रँड्सच्या रम आणि व्हिस्कीवर बंदी?, A टू Z माहिती
BMC Corrupt Officer : कारवाई झालेले २०७ पैकी ११२ अधिकारी सेवेत, प्रकरण काय? | Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
काँग्रेसकडून गुंगी गुडिया म्हणत टीका, पृथ्वीराज चव्हाणांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, अर्थातच सुनेत्रा पवारांकडून कृतीतून उत्तर मिळेल
काँग्रेसकडून गुंगी गुडिया म्हणत टीका, पृथ्वीराज चव्हाणांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, अर्थातच सुनेत्रा पवारांकडून कृतीतून उत्तर मिळेल
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 04 ऑगस्ट 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 04 ऑगस्ट 2026 | मंगळवार
अहिल्यानगरच्या शेवगावमध्ये बिबट्याची दहशत; नर-मादीसह पिल्लांचा वावर, शेतात जायचं कसं? ग्रामस्थ काळजीत
अहिल्यानगरच्या शेवगावमध्ये बिबट्याची दहशत; नर-मादीसह पिल्लांचा वावर, शेतात जायचं कसं? ग्रामस्थ काळजीत
ट्विटरवरुन पोस्ट हटवा, माफी मागा; सुनेत्रा पवारांवरील टीकेनंतर राष्ट्रवादी आक्रमक, तटकरे-पटेलांचा काँग्रेसला इशारा
ट्विटरवरुन पोस्ट हटवा, माफी मागा; सुनेत्रा पवारांवरील टीकेनंतर राष्ट्रवादी आक्रमक, तटकरे-पटेलांचा काँग्रेसला इशारा
लोकलमध्ये हरवलेली बॅग परत; पोलिसांची कामगिरी, तीन वर्षांनी तपास, प्रवाशाला मिळालं 271 ग्रॅम सोनं
लोकलमध्ये हरवलेली बॅग परत; पोलिसांची कामगिरी, तीन वर्षांनी तपास, प्रवाशाला मिळालं 271 ग्रॅम सोनं
BLOG : खड्डेमुक्त रस्त्यांची उद्दिष्टपूर्ती होत नाही तोपर्यंत वाहनांवरील दंडात्मक कारवाई ला स्थगिती द्या !
BLOG : खड्डेमुक्त रस्त्यांची उद्दिष्टपूर्ती होत नाही तोपर्यंत वाहनांवरील दंडात्मक कारवाई ला स्थगिती द्या !
तानाजी सावंत अन् मोटेंचे समर्थक भिडले; धाराशिवमध्ये महायुतीत राडा, शिवसेना-राष्ट्रवादी भिडले, 10 गाड्या फोडल्या
तानाजी सावंत अन् मोटेंचे समर्थक भिडले; धाराशिवमध्ये महायुतीत राडा, शिवसेना-राष्ट्रवादी भिडले, 10 गाड्या फोडल्या
तरणाबांड मुलगा जिवानीशी गेला, ठेकेदारावर गुन्हा दाखल करण्याची कुटुंबीयांची मागणी; पोलिसांची पीडित काकालाच धमकी
तरणाबांड मुलगा जिवानीशी गेला, ठेकेदारावर गुन्हा दाखल करण्याची कुटुंबीयांची मागणी; पोलिसांची पीडित काकालाच धमकी
Embed widget