Horoscope Today, June 3, 2022 : आज चंद्र मिथुन राशीत आहे आणि दुपारी 12:22 मिनिटांनी कर्क राशीत प्रवेश करेल. सकाळी चंद्र पुनर्वसु नक्षत्रात राहील. सूर्य वृषभ राशीत आणि गुरु मीन राशीत आहे. मेष राशीच्या लोकांना आज व्यवसायात लाभ होण्याची शक्यता आहे. तर, वृषभ राशीचे लोक गुंतवणूक करण्यावर लक्ष देतील. जाऊन घ्या आजचे राशीभविष्य...
मेष (Aries Horoscope) : नवीन काम सुरू करण्यासाठी सकाळची वेळ अनुकूल राहील. आज सरकारी लाभ होण्याची शक्यता आहे. व्यवसायात लाभ होईल. नोकरीत अधिकारी तुमच्या कामावर खुश राहतील. उत्पन्न आणि खर्चात समतोल राहील. विचारांमध्ये लवकरच बदल होईल. दुपारनंतर मन एखाद्या गोष्टीबद्दल गोंधळलेले राहू शकते. यामुळे तुमची अनेक कामे अपूर्ण राहतील. प्रिय व्यक्तीसोबत वेळ घालवू शकाल.
वृषभ (Taurus Horoscope) : आजचा दिवस तुमच्यासाठी मध्यम फलदायी आहे. आज मित्र आणि प्रियजनांच्या भेटीने मन प्रसन्न राहील. गुंतवणुकीचे नियोजन करण्यात तुम्ही आजचा बराचसा वेळ घालवाल. मात्र, तुम्ही हुशारीने गुंतवणूक करावी. दुपारनंतर वाणीवर नियंत्रण ठेवावे लागेल. नोकरदारांसाठी काळ चांगला आहे. व्यवसायातही तुमच्या मेहनतीचे फळ मिळेल. भावंडांशी तुमचे संबंध सुधारतील. आरोग्य चांगले राहील.
मिथुन (Gemini Horoscope) : ऑफिसमध्ये नवीन जबाबदारी मिळू शकते, सहकाऱ्यांची मदत करावी लागू शकते. कपड्यांचे व्यापारी आज निराश होऊ शकतात, विक्री त्यांच्या अपेक्षेप्रमाणे फायदा होणार नाही. विद्यार्थ्यांनी आपला मौल्यवान वेळ अनावश्यक गोष्टींमध्ये वाया घालवू नये आणि आपले ध्येय साध्य करण्यासाठी खर्च करावा. घरातील वातावरण बिघडलेले दिसते. ताबडतोब सुधारण्यासाठी प्रयत्न करणे चांगले ठरेल.
कर्क (Cancer Horoscope) : व्यवसायात सुधारणा होईल. व्यवसायासाठी परदेशात जाण्याची शक्यता आहे. प्रवास लाभदायक ठरेल. मुलांकडून चांगली बातमी मिळू शकते. संभाषणात संयम ठेवा. आज उत्पन्नापेक्षा खर्च जास्त होईल. आर्थिक दृष्टीकोनातून दिवस लाभदायक राहील. कौटुंबिक वातावरणही चांगले राहील. नकारात्मक भावनांना मनापासून दूर ठेवा. कोणत्याही कामात यश मिळवण्यासाठी आज वरिष्ठांचे सहकार्य मिळेल.
सिंह (Leo Horoscope) : आज सरकारी अधिकाऱ्याशी वाद होण्याची शक्यता आहे. प्रसारमाध्यमांशी निगडित लोकांनी सक्रिय असले पाहिजे. नवीन व्यवसायात सामील होणे टाळा. सामाजिक आणि व्यावसायिक क्षेत्रात आनंददायक आणि लाभदायक बातम्या मिळतील. मित्रांसोबत दिवस चांगला जाईल. उत्पन्न वाढेल आणि धनलाभ होईल. वाहन चालवताना काळजी घ्या. मानसिक चिंता वाढू शकते. कुटुंब आणि मुलांसोबत मतभेद होऊ शकतात.
कन्या (Virgo Horoscope) : आजचा दिवस आनंददायी आणि लाभदायक असेल. व्यवसायात लाभ होईल. सामाजिक क्षेत्रात तुमची प्रशंसा होईल. उधार दिलेले पैसे परत मिळू शकतात. कुटुंबातही आनंदाचे वातावरण असेल. व्यवसायात पैशाच्या कमतरतेमुळे मन अस्वस्थ होईल. तुम्हाला एखाद्या गोष्टीची काळजी वाटत असेल. आरोग्यही काहीसे नरम राहील. बोलण्यात संयम ठेवावा लागेल, अन्यथा कोणाशी वाद होऊ शकतो.
तूळ (Libra Horoscope) : कोणत्याही समस्येमुळे निराश न होता प्रयत्न वाढवावेत, तर मार्ग सापडेल. किरकोळ व्यापार्यांच्या नफ्यात वाढ होईल. जोडीदाराच्या आरोग्याची काळजी घ्या. उत्पन्नात घट आणि जास्त खर्चाची परिस्थिती निर्माण होऊ शकते. नोकरीत अधिकाऱ्यांशी वैचारिक मतभेद वाढू शकतात. कौटुंबिक समस्यांमुळे तुम्ही त्रस्त होऊ शकता. पैशाच्या गुंतवणुकीसाठी काळ अनुकूल आहे.
वृश्चिक (Scorpio Horoscope) : विरोधक आणि प्रतिस्पर्ध्यांशी वादात पडू नका. व्यवसायात परिस्थिती अनुकूल राहणार नाही. मुलाशी मतभेद होऊ शकतात. दुपारनंतर घर, कार्यालय किंवा व्यवसायाच्या ठिकाणी अधिकारी किंवा सहकाऱ्यांचे वर्तन नकारात्मक राहील. भागीदारीच्या कामात लाभ होईल. आशा आणि निराशेच्या संमिश्र भावना मनात राहतील. कुटुंबात तणाव निर्माण होऊ शकतो. नकारात्मक विचारांचा प्रभाव राहील.
धनु (Sagittarius Horoscope) : कामाचा ताण वाढल्यामुळे ऑफिसमध्ये जास्त वेळ घालवावा लागू शकतो. व्यापार्यांना आज व्यवसायात आव्हानाचा सामना करावा लागेल. पूर्ण उत्साहाने आणि उर्जेने काम करावे. रागामुळे नुकसान होण्याची शक्यता आहे. शारीरिक अस्वस्थता राहू शकते. व्यवसायात लोकांचे वर्तन नकारात्मक राहील. विरोधकांपासून सावध राहा, महत्त्वाच्या कामांसाठी आज निर्णय घेऊ नका.
मकर (Capricorn Horoscope) : कुटुंबात सुख-शांती राहील. सन्मान मिळण्याचीही शक्यता आहे. आर्थिक लाभ होईल. मित्र आणि नातेवाईकांसोबत दुपारचा काळ काळजीपूर्वक घालवाल. वाहन सुख मिळाल्याने मन प्रसन्न राहील. एखाद्या मनोरंजक ठिकाणी भेट देण्याचा कार्यक्रम कराल. मनामध्ये शांती आणि आनंदाची भावना राहील. नोकरीत बदल होण्याची शक्यता आहे. व्यावसायिक कामाचा ताण वाढू शकतो.
कुंभ (Aquarius Horoscope) : व्यावसायिकांची आर्थिक स्थिती सुधारेल. नोकरीत प्रगतीचा मार्ग मोकळा होईल. उत्पन्न वाढेल. कामाच्या ठिकाणी जास्त मेहनत करावी लागेल. जास्त खर्चामुळे तुम्ही निराश होऊ शकता. मुलांच्या भविष्याशी संबंधित काही चिंता असू शकते. अपूर्ण कामे पूर्ण होतील. शारीरिक स्वास्थ्य सुधारेल. आर्थिक लाभही होईल. व्यवसायात सहकारी कर्मचाऱ्यांचे सहकार्य मिळेल.
मीन (Pisces Horoscope) : खूप भावनिक होणे टाळा. जास्त विचार केल्यामुळे तुम्ही काळजीत राहाल. जमीन आणि घराशी संबंधित कामासाठी आजचा दिवस चांगला नाही. विद्यार्थ्यांसाठी आजचा दिवस लाभदायक आहे. प्रवासासाठी वेळ अनुकूल नाही. वादामुळे तुमचे नुकसानच होईल. पगारदार लोकांना काही नवीन काम मिळू शकते. आर्थिक गुंतवणूक करण्यापूर्वी एखाद्या अनुभवी व्यक्तीचा सल्ला अवश्य घ्या.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. यासाठी संबंधित तज्ज्ञाचा सल्ला घ्यावा.)
महत्त्वाच्या बातम्या :