Horoscope Today, Daily Horoscope 17 May 2023: आज 17 मे 2023, राशीभविष्यानुसार बुधवारचा दिवस अत्यंत महत्त्वाचा आहे. नोकरीच्या शोधात असलेल्या मिथुन राशीच्या लोकांना नोकरीची संधी उपलब्ध होईल. तर धनु राशीच्या लोकांच्या घरातील कलह दूर होतील. जाणून घ्या मेष ते मीन राशीच्या लोकांसाठी बुधवारचा दिवस कसा राहील त्याबाबत सविस्तर... 


मेष (Aries)


मेष राशीच्या लोकांबद्दल बोलायचं झालं तर आजचा दिवस तुमच्यासाठी नक्कीच फलदायी असणार आहे. कुटुंबातील ज्येष्ठ सदस्यांकडून काही महत्त्वाच्या जबाबदाऱ्या तुमच्यावर सोपवण्यात येतील, ज्या तुम्ही निश्चितपणे पार पाडाल. एखाद्या जुन्या मित्राच्या घरी मेजवानीसाठी बोलावणं येईल, तिथे जाणं अजिबात टाळू नका, कारण तिथे तुमच्या सर्व जुन्या मित्रमंडळींशी भेटीगाठी होतील. आज तुमची एखाद्या खास व्यक्तीसोबत भेट होईल. जी व्यक्ती तुमचे खूप दिवसांपासून रखडलेले पैसे मिळवण्यात खूप मदत करेल. तुमच्या जोडीदारानं केलेल्या प्रगतीमुळे तुम्ही खूप आनंदी दिसाल. घरी पूजा किंवा एखाद्या शुभकार्याचं आयोजन करणं अत्यंत शुभ ठरेल. आजच्या दिवसात तुम्हाला पालकांचा सहवास आणि सहकार्य मिळेल.


तुमच्या जवळच्या काही लोकांना आज महत्त्वाचे निर्णय घेण्यास भाग पाडलं जाईल, ज्यामुळे तुम्ही तणावात आणि चिंतेत असाल. आर्थिक लाभ होण्याचाही योग आज तुमच्या राशीत आहे. आर्थिक फायदा झाल्यामुळे घरातील आवश्यक वस्तूंची खरेदी कराल. आजचा दिवस तुमच्यासाठी उत्साही असेल. तुमच्या जोडीदारासोबत काही आनंदाचे क्षण तुम्हाला घालवता येतील. 


आज काही धार्मिक ग्रथांची खरेदी करणं तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल. त्यामुळे तुमच्या मनातील तणाव दूर होऊन तुम्हाला शांती मिळेल. घरात तुमचं लग्न जमवण्याची लगबग सुरू असेल, तर आज तुम्हाला नक्कीच आनंदाची बातमी मिळेल. विद्यार्थ्यांनी अभ्यासात लक्ष देऊन अधिकाधिक वेळ अभ्यासाला देण्याचा प्रयत्न करावा. 


वृषभ (Tauras)


जर तुम्ही वृषभ राशीचे असाल तर आजचा दिवस फक्त तुमचाच आहे असं समजा. ऑफिसमध्ये बॉसकडून मिळालेल्या सर्व जबाबदाऱ्या वेळत आणि व्यवस्थित पार पाडाल. बॉसकडून तुमच्यावर विश्वास दाखवून तुमच्यावर काही महत्त्वाच्या जबाबदाऱ्याही सोपावल्या जातील. जर तुमचा बिझनेस असेल तर आर्थिक फायद्यासाठी काही महत्त्वाचे निर्णय घ्यावे लागतील. निर्णय घेताना पूर्णपणे विचारपूर्वक घ्या, नाहीतर नुकसान होण्याचा धोकाही आहे. तुमच्या घरातील ज्येष्ठांकडून तुमच्या बिझनेससाठी आर्थिक मदत मिळू शकते. महत्त्वाच्या कामांमध्ये कुटुंबातील सदस्य पाठीशी ठामपणे उभे राहतील, तसेच त्यांचं सहकार्य मिळेल. कौटुंबिक सदस्यांसोबत धार्मिक स्थळी जाण्याचा योग आहे. तुमच्या स्वभावातील सर्वात महत्त्वाचा गुण म्हणजे, तुमची विनोदबुद्धी. तुम्हाला मानसिक तणाव जाणवेल तो दूर करण्यासाठी तुमच्या तुम्ही तुमच्या स्वभावातील याच गुणाचा वापर करु शकता. 


बऱ्याच काळापासून अडकलेले पैसे तुम्हाला मिळतील. तसेच, मुलांना अभ्यासात तुमची गरज भासेल. यामुळे मुलांसोबत वेळ घालवण्याची संधी तुमच्याकडे असेल त्यामुळे त्यांना नाही न म्हणता, त्यांची मदत करा. तुमच्या जोडीदारासोबत वेळ घालवण्याची संधीही आज तुम्हाला मिळेल. तसेच, एखादा जुना मित्र किंवा मैत्रीणीची खूप दिवसांनी भेट होईल. आज फक्त तुमच्या आरोग्याकडे लक्ष द्या. कामाच्या व्यापात आरोग्याकडे दुर्लक्ष होऊ देऊ नका. 


मिथुन (Gemini)


मिथुन राशीच्या लोकांबद्दल बोलायचं तर आजचा दिवस तुमच्यासाठी चांगला असेल. जे लोक नोकरीच्या शोधात असतील, त्यांना आज एखाद्या ओळखीच्या व्यक्तीच्या मदतीनं चांगली नोकरी मिळू शकते. तुमच्या वैवाहिक आयुष्यात काही अडचणी असतील, तर त्या दूर करण्यासाठी तुमचा भाऊ एखाद्या देवदूतासारखा धावून येईल. नातेवाईकांच्या मदतीनं तुमचा भाऊ तुमच्या सासरच्या सर्व अडचणी दूर करेल. आज घरी एखादं मंगल कार्याचं आयोजन करणं तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल. आज तुमच्या घरी पाहुणेही येतील, त्यामुळे पाहुणचार करण्याची तयारी ठेवाल. घराच्या दुरुस्तीसह घरातील काही सामान खरेदी करण्यासाठी खर्च करावा लागेल. तसेच, मित्रमंडळींसह किंवा घरातील सदस्यांसह खरेदीसाठी किंवा सहलीसाठी जाण्याचा प्लानही होऊ शकतो. खूप दिवसांनी आई-वडिलांसोबत निवांतपणे वेळ घालवण्याची संधी मिळेल. 


आज तुमच्या खिशाला मोठी कात्री लागू शकते. घरातील सदस्यासाठी एखादी महागडी गोष्ट घ्यावी लागेल. आज एक काळजी घ्या, कोणत्याही व्यक्तीवर आंधळेपणानं विश्वास ठेवू नका. कारण आज तुमचा विश्वासघात होण्याची शक्यता आहे. तसेच, आज तुमच्या जोडीदारासोबत निवांत वेळ घालवण्याची संधी मिळेल. पैसा, प्रेम, कुटुंब यापासून दूर राहून, आज तुम्ही आनंदाच्या शोधात आध्यात्मिक गुरूला भेटायला जाऊ शकता.  संगीत, नृत्य आणि बागकाम यांसारख्या तुमच्या छंदांसाठीही वेळ काढा, यामुळे तुम्हाला समाधान मिळेल.


कर्क (Cancer)


कर्क राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस संमिश्र असणार आहे. बदलत्या हवामानामुळे तुम्हाला तब्येतीच्या कुरबुरींचा सामना करावा लागू शकतो. जसं की, दातदुखी, पोटातील अस्वस्थता, अंगदुखी यांसारख्या शारीरिक समस्यांमुळे तुम्ही त्रस्त व्हाल. त्वरित आराम मिळण्यासाठी चांगल्या डॉक्टरांचा सल्ला घेण्यास उशीर करू नका. प्रवासाचा योग आहे, त्यामुळे तुम्हाला थकवा आणि ताण येईल, परंतु हा प्रवास आर्थिकदृष्ट्या फायदेशीर ठरेल त्यामुळे अजिबात टाळू नका. तुम्ही मुलांसोबत थोडा वेळ घालवला पाहिजे, त्यांनी एखाद्या गोष्टीसाठी मदत मागितली किंवा तुमच्यासोबत खेळण्याचा आग्रह धरला तर नाही म्हणू नका. 


जोडीदारासोबत काही गोष्टींवरुन खटके उडू शकतात. पण वाद झाल्यास ताणू नका, त्वरित वाद सोडून नात्यातील अबोला दूर करा. महत्त्वाच्या कामात अडचणी येऊ शकतात. त्यामुळे तुम्ही तणावात राहाल. पण तुम्ही तुमच्या बुद्धीच्या जोरावर त्या अडचणी दूर करुन नक्कीच त्यातून मार्ग काढण्याचा प्रयत्न कराल. जुन्या मित्राशी अचानक भेट होऊ शकते. विद्यार्थी असाल तर एका शहरातून दुसऱ्या शहरात शिक्षणासाठी जाण्याचा योग येऊ शकतो. 


सिंह (Leo)


सिंह राशीच्या लोकांबद्दल बोलायचं झालं तर आजचा दिवस तुमच्यासाठी चांगला जाणार आहे. नोकरदार लोकांना नोकरीत प्रगतीची संधी मिळेल. बेरोजगारांना चांगला रोजगार मिळण्याचे संकेत आहेत. वडिलोपार्जित संपत्तीतून आर्थिक लाभ मिळण्याची शक्यता आहे. एखाद्या कामात तुमच्या मुलांचं पूर्ण सहकार्य मिळेल. तुम्ही तुमच्या जोडीदाराला व्यवसायासाठी नवा पर्याय सुचवू शकता, जेणेकरून उत्पन्न वाढू शकेल. तुमचं दैनंदिन उत्पन्न चांगलं असेल पण तुमचे खर्चही वाढतील. व्यवसायात रखडलेल्या गोष्टी पुन्हा सुरू करता येतील. 


काही जुन्या गोष्टींच्या आठवणी तुमच्या मनात गोंधळ घालतील. यामुळे तुम्ही तणावात राहाल, पण जे घडलं ते घडलं त्यातून मार्ग काढून पुढे जाण्याचा विचार करा. गुंतवणूक करण्याच्या विचारात असाल, तर अजिबात घाई करु नका, तसेच लोभाला बळी पडू नका, नाहीतर मोठं आर्थिक नुकसान करुन बसाल. जवळच्या नातेवाईकांना भेटण्याचा योग आहे, त्यामुळे तुमचा तणाव काहीसा दूर होण्यास मदत होईल. जोडीदारासोबत आजचा दिवस अत्यंत चांगला जाईल. लग्नाची बोलणी सुरू असतील तर समोरुन होकार येऊ शकतो. 


कन्या (Virgo)


जर तुमची रास कन्या असेल तर आजचा दिवस फक्त आणि फक्त तुमचाच आहे, असं समजा. थोरामोठ्यांचा आशीर्वाद तुमच्यासोबत असेल. तसेच, आज मोठा आर्थिक फायदा होऊ शकतो. बऱ्याच काळापासून दिलेली उधारी तुम्हाला आज परत मिळेल. जर तुम्ही एखादी गुंतवणूक केली असेल, तर तुम्हाला त्याचा पुरेपुर फायदा मिळेल. तसेच नव्या गुंतवणुकीची संधीही असेल, फक्त गुंतवणूक करताना विचारपूर्वक कराल. खूप दिवसांनी तुम्ही भावंड एकत्र याल आणि वेळ घालवाल. 


जवळच्या नातेवाईकांच्या घरच्या समारंभाला हजेरी लावाल, त्यामुळे नातेवाईकांशी भेटीगाठी होतील. शैक्षणिक क्षेत्रात यश मिळेल. मित्रांच्या मदतीनं तुम्हाला उत्पन्नाच्या अनेक संधी मिळतील. आजच्या दिवशी तुम्हाला एका गोष्टीची काळजी घ्यावी लागेल, तुमच्या भावनांवर नियंत्रण ठेवावं लागेल. नाहीतर भावनेच्या भरात घेतलेल्या निर्णयांमुळे भविष्यात पश्चाताप करण्याची वेळ येईल. ऑफिसमध्ये सहकाऱ्यांशी जरा जपून वागा, तुम्ही सहज केलेली कृती एखाद्याच्या मनावर वार करेल आणि त्याचे परिणाम तुम्हाला भोगावे लागतील. व्यावसायात एखादा निर्णय घेताना विचारपूर्वक घ्या नाहीतर यामुळे पश्चाताप करावा लागेल. कौटुंबिक समस्या सोडवण्यात तुम्ही महत्त्वाची भूमिका बजावाल. 


आज तुमचा दिवस तसा निवांत असणार आहे, त्यामुळे तुम्ही तुमच्या मोबाईलवर मोकळ्या वेळेत कोणतीही वेब सिरीज पाहू शकता. तुमच्या घरातील गोष्टी तुमच्या परिचितांना सांगू नका. तुम्ही स्वतःसाठी वेळ काढाल, ज्यामध्ये तुम्ही तुमची आवडती कामे कराल.


तूळ (Libra)


तूळ राशीच्या लोकांबद्दल बोलायचं झालं तर आजचा दिवस तुमच्यासाठी खूप चांगला जाणार आहे. तुम्ही करत असलेल्या व्यवसायात तुम्हाला यश मिळेल. नवीन ओळखी होतील. तुमचा व्यवसाय पुढे नेण्यात तुम्ही यशस्वी व्हाल. शैक्षणिक क्षेत्रात यश मिळेल. जे ऑनलाईन काम करत आहेत, त्यांना बऱ्यापैकी फायदा होणार आहे. नोकरदार लोकांना नोकरीत दिलेली कामं पूर्ण करावी लागतील. वरिष्ठांकडून शुभवार्ता मिळतील. उच्च शिक्षणासाठी काळ चांगला आहे.


तुम्हाला तुमच्या आवडत्या विषयाचा अभ्यास करण्याची संधी मिळेल. भावा-बहिणींचं सहकार्य मिळेल. सासरच्या मंडळींकडून काही चांगली बातमी कळेल. नवीन वाहनाचा आनंद मिळेल. घर खरेदीची इच्छा पूर्ण होईल. आरोग्य आधीच सुधारेल. 


कुटुंबातील सदस्यांसह एखाद्या धार्मिक स्थळाला भेट देण्याची योजना कराल, जिथे सर्वजण खूप आनंदी असतील. आई-वडिलांचे आशीर्वाद तुमच्या पाठीशी राहतील. परदेशात पडून असलेली तुमची जमीन आज चांगल्या भावात विकली जाऊ शकते, ज्यामुळे तुम्हाला फायदा होईल. मुलांना तुमच्यामुळे अभिमान वाटेल. 


वृश्चिक (Scorpio)


जर आपण वृश्चिक राशीच्या लोकांबद्दल बोललो तर आजचा दिवस इतर दिवसांपेक्षा चांगला असणार आहे. आज तुम्हाला आराम करावा लागेल आणि जवळचे मित्र आणि कुटुंबीयांसोबत आनंदाचे क्षण घालवावे लागतील. अचानक नफा किंवा सट्टेबाजीतून आर्थिक स्थिती मजबूत होईल. अभ्यासात रस कमी असल्यामुळे मुलं तुमची थोडी निराशा करू शकतात. आपल्या प्रिय व्यक्तीच्या प्रामाणिकपणावर शंका घेऊ नका. संध्याकाळी चांगला वेळ घालवण्यासाठी, तुम्हाला दिवसभर परिश्रमपूर्वक काम करणं आवश्यक आहे. आज तुम्ही पुन्हा एकदा तुमच्या जीवनसाथीच्या प्रेमात पडाल.


आज तुम्ही घरातील लहान मुलांना जीवनातील पाण्याचे मूल्य याविषयी व्याख्यान देऊ शकता. वरिष्ठांकडून कौटुंबिक जबाबदाऱ्या तुमच्यावर सोपवण्यात येतील, ज्या तुम्ही निश्चितपणे पार पाडाल. तुम्ही केलेल्या कामामुळे सर्वजण खूप खूश होतील. घरातून बाहेर पडताना ज्येष्ठांचे आशीर्वाद घ्या, मग तुमची सर्व कामं पूर्ण होतील. समाजाच्या भल्यासाठी तुम्ही केलेल्या कामाचा सन्मान मिळेल. राजकारणात करिअर करण्याची इच्छा असणाऱ्यांसाठी चांगली संधी आहे.  नेत्यांना भेटण्याची संधी मिळेल, सभांना संबोधित करण्याचीही संधी मिळेल. 


धनु (Sagittarius)


धनु राशीच्या लोकांबद्दल बोलायचं झालं तर आजचा दिवस तुमच्यासाठी आनंददायी असणार आहे. कुटुंबातील सदस्यांचं सहकार्य मिळेल. आज वरिष्ठ सदस्यांकडून काही कामं तुमच्यावर सोपवली जातील, जे तुम्ही पूर्ण केलंच पाहिजे. प्रत्येकजण आपले विचार एकमेकांना सांगतील. आज तुम्हाला तोंडातून अशी गोष्ट काढायची नाही, ज्यामुळे घरातील लोक तुमच्यावर रागावतील. तुम्ही काहीही बोललात, खूप विचारपूर्वक बोललात तर बरं होईल.


जोडीदाराचा कोणत्याही कामात पूर्ण पाठिंबा मिळेल. नोकरदार लोक नोकरीसोबत काही साईड वर्क करण्याचाही विचार करतील, जेणेकरून उत्पन्न वाढेल. वडिलोपार्जित संपत्तीतूनही आर्थिक लाभ मिळण्याची शक्यता आहे. अविवाहित लोकांचं नातं पुढे जाऊ शकतं. व्यक्तिमत्व विकासाच्या कामात तुमची उर्जा लावा, जेणेकरून तुम्ही आणखी चांगलं बनू शकाल. जे लोक दीर्घकाळ आर्थिक संकटातून जात होतं, त्यांना आज कुठून तरी पैसे मिळू शकतात, ज्यामुळे जीवनातील अनेक समस्या दूर होतील.


मकर (Capricorn)


जर तुमची रास मकर असेल तर आजचा दिवस तुमच्यासाठी खूप चांगला असणार आहे. आज तुमचा दिवस उत्साहात जाईल. तुमची रखडलेली कामं पूर्ण करण्यासाठी तुम्ही त्याचा वापर करावा. दागिने केलेली गुंतवणूक फायदेशीर ठरेल आणि समृद्धी आणेल. तुमची परिस्थिती आणि गरजा समजणाऱ्या मित्रांसोबत बाहेर जा.


तुमचे व्यक्तिमत्व असे आहे की, जास्त लोकांना भेटल्यानंतर तुम्ही अस्वस्थ होतात आणि मग स्वतःसाठी वेळ काढण्याचा प्रयत्न करू लागतात, या अर्थाने उद्याचा दिवस तुमच्यासाठी खूप चांगला असणार आहे. उद्या तुम्हाला तुमच्यासाठी मिळालेला वेळ मिळेल.तुम्ही आईसोबत धार्मिक कार्यक्रमात सहभागी व्हाल, तिथे तुमच्या मनाला शांती मिळेल. कुटुंबातील सर्व सदस्य एकत्र जमून स्नेहभोजनाचा योग येईल.  


मित्रांच्या मदतीने तुम्हाला उत्पन्नाच्या नवीन संधी मिळतील. भावा-बहिणींचे सहकार्य मिळेल. आज तुमच्याकडे पुरेसा वेळ असण्याची शक्यता आहे, पण खयाली पुलाव शिजवण्यात मौल्यवान क्षण वाया घालवू नका. काहीतरी उपयुक्त काम करा.


कुंभ (Aquarius)


कुंभ राशीच्या लोकांबद्दल बोलायचं झालं तर आजचा दिवस तुमच्यासाठी महत्त्वाचा असणार आहे. राजकारणात करिअर करू इच्छिणाऱ्यांना सभांना संबोधित करण्याची संधी मिळणार आहे. तसेच, मोठ्या नेत्यांना भेटण्याची संधी मिळेल. व्यवसाय करणाऱ्या लोकांना व्यवसायात अपेक्षित नफा मिळेल. नोकरदार लोकांना नवीन नोकरीची ऑफर मिळेल, ज्यामध्ये उत्पन्न अधिक असेल, पदोन्नतीही मिळेल. बहिणीच्या लग्नाच्या प्रस्तावावर शिक्कामोर्तब होईल.


घरात मंगल कार्याची तारीख निश्चित होईल. नवीन वाहनाचा आनंदही मिळेल. जोडीदाराच्या प्रगतीमुळे कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील. पालकांचा सहवास आणि सहकार्य मिळेल. सरकारी क्षेत्रांतूनही तुम्हाला लाभ मिळण्याची चिन्हे आहेत. कामाच्या ठिकाणी वरिष्ठांचा दबाव आणि घरातील कलह यामुळे तुम्हाला तणावाचा सामना करावा लागू शकतो. ज्यामुळे तुमच्या कामातील एकता बिघडेल. तुम्हाला तुमचा जोडीदार आणि मुलांकडून अतिरिक्त स्नेह आणि पाठिंबा मिळेल.


मीन (Pisces)


मीन राशीच्या लोकांबद्दल बोलायचं झालं तर आजचा दिवस तुमच्यासाठी इतर दिवसांपेक्षा चांगला असणार आहे. आरोग्याच्या कुरबुरी दूर होऊन तुम्हाला उत्साही वाटेल. तुम्ही आईसोबत धार्मिक कार्यक्रमात सहभागी व्हाल, जिथे तुम्ही थोडा वेळ घालवाल, ज्यामुळे मनाला शांती मिळेल. घर, प्लॉट खरेदी करण्याची इच्छा पूर्ण होईल. रखडलेले पैसे मिळतील. जर तुम्ही याआधी कोणतीही गुंतवणूक केली असेल, तर तुम्हाला त्याचा पूर्ण फायदाही मिळेल. मुलांचं पूर्ण सहकार्य मिळेल.


नोकरदार लोकांना नोकरीत बढतीची संधी मिळेल. कुटुंबाचे सहकार्य मिळेल. भावाच्या लग्नात येणाऱ्या अडचणी दूर होतील. छोट्या व्यावसायिकांना आज खूप फायदा होईल. इतरांना पटवून देण्याची तुमची क्षमता अडचणी सोडवण्यात प्रभावी ठरेल. वादग्रस्त मुद्दे मांडणं टाळा. 



(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)