एक्स्प्लोर

Horoscope Today, August 30, 2022 : वृषभ, मिथुनसह ‘या’ राशींसाठी आजचा दिवस ठरणार लाभदायी! जाणून घ्या आजचे राशीभविष्य

Horoscope Today, August 30, 2022 : मेष राशीचे लोक आज कामात खूप व्यस्त असतील. वृषभ राशीच्या लोकांसाठी आर्थिकदृष्ट्या दिवस फलदायी असणार आहे.

Horoscope Today, August 30, 2022 : आज भाद्रपद महिन्यातील हरतालिका व्रताच्या दिवशी हस्त नक्षत्र असून, चंद्र कन्या राशीत आहे. शनि आज मकर राशीत आहे. गुरु मीन राशीत आहे. मेष राशीचे लोक आज कामात खूप व्यस्त असतील. वृषभ राशीच्या लोकांसाठी आर्थिकदृष्ट्या दिवस फलदायी असणार आहे. वाचा संपूर्ण राशीभविष्य...

मेष (Aries Horoscope) : आज तुमचा दिवस सामान्य असेल. कामाच्या ठिकाणी खूप व्यस्त असाल. व्यापाऱ्यांना काही ठिकाणी नुकसान होण्याची भीती आहे. जे लोक परदेशातील नोकरी किंवा व्यवसाय करत आहेत, त्यांच्यासाठी हा काळ चांगला आहे. आज कोणतेही नवीन काम सुरू करू नका. विद्यार्थ्यांना सुवर्णसंधी मिळू शकते. भावंडांचे पूर्ण सहकार्य मिळेल. जीवनसाथीसोबत मतभेद होण्याची शक्यता आहे.

वृषभ (Taurus Horoscope) : आजचा दिवस तुमच्यासाठी संमिश्र राहील. आर्थिकदृष्ट्या आजचा दिवस फलदायी ठरेल. तुमची आर्थिक स्थिती सुधारेल. व्यावसायिकांनी कठोर परिश्रम केल्यास चांगले परिणाम मिळतील. व्यापारी वर्गाला आर्थिक लाभ होण्याचीही शक्यता आहे. विद्यार्थ्यांसाठी दिवस अनुकूल आहे. कुटुंबातील सदस्यांकडून सहकार्य मिळेल. कौटुंबिक जीवन आनंदमय राहील. जोडीदाराचे पूर्ण सहकार्य मिळेल.

मिथुन (Gemini Horoscope) : आजचा दिवस तुमच्यासाठी सकारात्मक परिणाम देणारा असेल. मात्र, आज कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा. अन्यथा नंतर तो चुकीचा ठरू शकतो. जर कुटुंबातील कोणताही सदस्य एखाद्या गोष्टीचा आग्रह धरत असेल, तर त्याची संपूर्ण माहिती आधी घ्यावी लागेल. अन्यथा तुमची फसवणूक होऊ शकते. आहाराकडे विशेष लक्ष द्यावे, अन्यथा पोटाच्या समस्या तुम्हाला त्रास देऊ शकतात.

कर्क (Cancer Horoscope) : आजचा दिवस कर्क राशीच्या लोकांसाठी काही अडचणी निर्माण करणारा ठरू शकतो. तुमच्या करिअरच्या बाबतीत तुम्हाला काही समस्या उद्भवतील. तसे, तुम्हाला आयुष्यात अस्थिरतेची समस्या जाणवेल, पण ती निराधार असेल. मनातील संभ्रम दूर करा आणि तुमच्या कामावर लक्ष केंद्रित करा. मेहनत केल्याने तुम्ही योग्य ठिकाणी पोहोचाल.

सिंह (Leo Horoscope) : आजचा दिवस सामान्य असेल. आज तुम्हाला काही आव्हानांचा सामना करावा लागू शकतो. आर्थिक परिस्थिती चिंतेची बाब ठरू शकते. नोकरदारांना काही अडचणी येऊ शकतात. व्यावसायिकही व्यवसायाचे नियोजन करून, नवीन कामे सुरू करू शकतात. व्यापार्‍यांसाठीही लांबचा प्रवास फलदायी ठरेल. विद्यार्थ्यांसाठी आजचा दिवस फलदायी राहील. घरात मोठा भाऊ, बहीण आणि मित्रांकडून सहकार्य मिळेल.

कन्या (Virgo Horoscope) : आजचा दिवस कन्या राशीच्या लोकांसासाठी अनुकूल असेल. तुम्हाला विनाकारण त्रास देणाऱ्या व्यक्तीशी मैत्री करणे टाळावे लागेल. व्यवसाय करणाऱ्या लोकांना त्यांनी केलेल्या मेहनतीनुसार नफा मिळू शकतो. चांगले काम केल्याने अधिकाऱ्यांकडून प्रशंसा मिळू शकते. तुमचा जोडीदाराशी सुरू असलेला वाद शांत बसून सोडवा. विद्यार्थ्यांना अभ्यासात खूप मेहनत करावी लागेल.

तूळ (Libra Horoscope) : मनात आशा आणि निराशेच्या भावना असू शकतात. व्यवसायात जास्त मेहनत घ्यावी लागेल. काही अडचणी निर्माण होऊ शकतात. वडिलांच्या तब्येतीची काळजी घ्या. व्यवसायाच्या विस्तारावर खर्च वाढू शकतो. कमी उत्पन्न आणि जास्त खर्चाच्या परिस्थितीमुळे तुम्ही अस्वस्थ असाल. कुटुंबाचे सहकार्य मिळेल. जोडीदाराच्या आरोग्याची काळजी घ्या.

वृश्चिक (Scorpio Horoscope) : आजचा दिवस तुमच्यासाठी प्रगतीचा दिवस असेल. जे लोक नोकरीच्या शोधात आहेत, त्यांना जास्त वाट पाहावी लागणार नाही. कारण, तुम्ही तुमच्या मित्राच्या मदतीने चांगली नोकरी मिळवू शकता. तुम्ही भागीदारीत कोणताही व्यवसाय सुरू करणार असाल, तर तो तुमच्यासाठी चांगला नाही. सर्जनशील कार्यातही तुम्ही सक्रिय सहभाग घ्याल. सरकारी नोकरीत काम करणाऱ्या लोकांना आज पदोन्नती मिळू शकते.

धनु (Sagittarius Horoscope) : आज तुमचा दिवस सामान्य असेल. पण, तुम्हाला मानसिक तणाव जाणवू शकतो. बहुतांश कामे वेळेवर पूर्ण होऊ शकतात. नोकरीच्या ठिकाणी पद, प्रतिष्ठा वाढू शकते. व्यापारी वर्गासाठी आजचा दिवस सामान्य आहे. विद्यार्थ्यांना काही आव्हानात्मक समस्यांचा सामना करावा लागू शकतो. भावंडांमध्ये वाद वाढू शकतात. घरगुती वस्तूंवर खर्च वाढू शकतो. अतिआत्मविश्वास आणि रागामुळे कुटुंबात मतभेद होऊ शकतात.

मकर (Capricorn Horoscope) : आजचा दिवस तुमच्यासाठी कठीण असू शकतो. तुम्ही कोणत्याही सरकारी कामात गुंतवणूक करणार असाल तर काळजी घ्या. नोकरी करणाऱ्या लोकांवर ऑफिसमध्ये जास्त जबाबदाऱ्यांचा भार वाढू शकतो, त्यामुळे त्यांना जास्त तणाव येऊ शकतो. कुटुंबाच्या समस्यांसाठी तुम्हाला थोडा वेळ काढावा लागेल. आरोग्यविषयक समस्या असतील, तर डॉक्टरांचा सल्ला जरूर घ्या.

कुंभ (Aquarius Horoscope) : नोकरीत बदल होण्याची शक्यता आहे. कामासाठी दुसऱ्या ठिकाणी जावे लागेल. परदेशात जाण्याचीही संधी मिळू शकते. वाचनाची आवड वाढेल. शैक्षणिक कार्यात इच्छित परिणामांची अपेक्षा करू शकता. मित्रांचे सहकार्य मिळेल. कामाच्या ठिकाणी अडचणी येऊ शकतात. कामाचा व्याप वाढू शकतो. वडिलांचे सहकार्य मिळेल. जोडीदाराच्या आरोग्याची काळजी घ्या.

मीन (Pisces Horoscope) : आजचा दिवस तुमच्यासाठी फायदेशीर राहील. म्युच्युअल फंडामध्ये गुंतवणूक करणाऱ्या लोकांसाठी दिवस चांगला राहील. काही कामासाठी कुटुंबातील सदस्यांची मदत घ्यावी लागेल. कार्यक्षेत्रात तुम्ही काही नवीन योजना सुरू करू शकता, ज्यामध्ये तुम्हाला नक्कीच यश मिळेल. परंतु, तुम्हाला घरातील आणि बाहेरील कोणत्याही बाबतीत सल्ला देणे टाळावे लागेल, अन्यथा तुम्हाला त्रासाला सामोरे जावे लागेल.

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. यासाठी संबंधित तज्ज्ञाचा सल्ला घ्यावा.) 

महत्वाच्या बातम्या

Name Astrology: 'O' अक्षराच्या नावाचे लोक असतात लोकप्रिय आणि प्रतिष्ठित, सहजासहजी हार मानत नाहीत

Astrology : आयुष्यात प्रगती आणि आनंद हवा असेल, तर रविवारी करा हे 6 सोपे उपाय 

महत्त्वाच्या बातम्या

Budh Gochar 2026 : बुधाच्या संक्रमणाने 'या' राशींवर होणार परिणाम; 5 ऑगस्टपासून ताकही फुंकून पिण्याची येणार वेळ, अलर्ट राहा
बुधाच्या संक्रमणाने 'या' राशींवर होणार परिणाम; 5 ऑगस्टपासून ताकही फुंकून पिण्याची येणार वेळ, अलर्ट राहा
Shani Nakshatra Parivartan 2026 : दोन ग्रहांच्या दरम्यान शनिचं नक्षत्र परिवर्तन; 'या' 3 राशींच्या अडचणींत होणार डबल वाढ, वेळोवेळी सावधानतेचा इशारा
दोन ग्रहांच्या दरम्यान शनिचं नक्षत्र परिवर्तन; 'या' 3 राशींच्या अडचणींत होणार डबल वाढ, वेळोवेळी सावधानतेचा इशारा
Guru Gochar 2026 : बुधच्या नक्षत्रात गुरुची एन्ट्री, 'या' 4 राशींसाठी ऑक्टोबरपर्यंतचा काळ असणार शुभ, तुमची रास यात आहे?
बुधच्या नक्षत्रात गुरुची एन्ट्री, 'या' 4 राशींसाठी ऑक्टोबरपर्यंतचा काळ असणार शुभ, तुमची रास यात आहे?
Mangalagaur 2026: यंदा मंगळागौर कधीपासून आहे? लग्नानंतर पहिली 5 वर्षे व्रताची परंपरा काय? व्रताचे फळ? धार्मिक महत्त्व, पूजा पद्धत, तिथी, पौराणिक कथा... 
यंदा मंगळागौर कधीपासून आहे? लग्नानंतर पहिली 5 वर्षे व्रताची परंपरा काय? व्रताचे फळ? धार्मिक महत्त्व, पूजा पद्धत, तिथी, पौराणिक कथा... 

व्हिडीओ

Sanjay Raut Delhi PC : बिहारमधील निकालावरून संजय राऊतांचा भाजपवर हल्लाबोल
Prashant Kishor Bankipur Bypoll Election : बांकीपूर पोटनिवडणुकीत भाजपचा पराभव अहंकारामुळे झाला
Tukaram Mundhe News: तुकाराम मुंढेंच्या FDA ला मुंबई हायकोर्टाचा दणका; नेमकं काय घडलं?
Liquor Brands Banned: भारतात कोणत्या ब्रँड्सच्या रम आणि व्हिस्कीवर बंदी?, A टू Z माहिती
BMC Corrupt Officer : कारवाई झालेले २०७ पैकी ११२ अधिकारी सेवेत, प्रकरण काय? | Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
लोकलमध्ये हरवलेली बॅग परत; पोलिसांची कामगिरी, तीन वर्षांनी तपास, प्रवाशाला मिळालं 271 ग्रॅम सोनं
लोकलमध्ये हरवलेली बॅग परत; पोलिसांची कामगिरी, तीन वर्षांनी तपास, प्रवाशाला मिळालं 271 ग्रॅम सोनं
तानाजी सावंत अन् मोटेंचे समर्थक भिडले; धाराशिवमध्ये महायुतीत राडा, शिवसेना-राष्ट्रवादी भिडले, 10 गाड्या फोडल्या
तानाजी सावंत अन् मोटेंचे समर्थक भिडले; धाराशिवमध्ये महायुतीत राडा, शिवसेना-राष्ट्रवादी भिडले, 10 गाड्या फोडल्या
तरणाबांड मुलगा जिवानीशी गेला, ठेकेदारावर गुन्हा दाखल करण्याची कुटुंबीयांची मागणी; पोलिसांची पीडित काकालाच धमकी
तरणाबांड मुलगा जिवानीशी गेला, ठेकेदारावर गुन्हा दाखल करण्याची कुटुंबीयांची मागणी; पोलिसांची पीडित काकालाच धमकी
Trisha Krishnan : 'पाणी तिथे पोहोचलं पाहिजे...' त्रिशा कृष्णनवर उदयनिधी स्टॅलिन यांचे डबल मिनिंग वक्तव्य; हायकोर्टाचा मोठा आदेश
'पाणी तिथे पोहोचलं पाहिजे...' त्रिशा कृष्णनवर उदयनिधी स्टॅलिन यांचे डबल मिनिंग वक्तव्य; हायकोर्टाचा मोठा आदेश
Air India Flight Turbulence: एअर इंडियाचे विमान थांबले, उलटे-सुलटे झाले; अचानक भीषण टर्ब्युलन्स, अनेकजण जखमी, प्रवाशाने सांगितला थरारक प्रसंग
एअर इंडियाचे विमान थांबले, उलटे-सुलटे झाले; अचानक भीषण टर्ब्युलन्स, अनेकजण जखमी, प्रवाशाने सांगितला थरारक प्रसंग
Maharashtra Goverment Cabinet Decision: पिंपरी-चिंचवडमध्ये विशेष मोटार वाहन न्यायालय होणार; मंत्रिमंडळाच्या बैठकीत राज्य सरकारचे 7 धडाकेबाज निर्णय
पिंपरी-चिंचवडमध्ये विशेष मोटार वाहन न्यायालय होणार; मंत्रिमंडळाच्या बैठकीत राज्य सरकारचे 7 धडाकेबाज निर्णय
काँग्रेसकडून 'गुंगी गुडिया' टीकेचं समर्थन; हर्षवर्धन सपकाळांनी सांगितलं कारण, सुनेत्रा पवारांना मोलाचा सल्ला
काँग्रेसकडून 'गुंगी गुडिया' टीकेचं समर्थन; हर्षवर्धन सपकाळांनी सांगितलं कारण, सुनेत्रा पवारांना मोलाचा सल्ला
Arvind Kejriwal: E20 इंधनाविरोधात दिल्लीत अरविंद केजरीवाल यांचा एल्गार, पंतप्रधान मोदींच्या निवासस्थानाकडे आपचा मोर्चा; अमेरिकेच्या दबावाखाली देशावर निर्णय थोपवल्याचा आरोप
E20 इंधनाविरोधात दिल्लीत अरविंद केजरीवाल यांचा एल्गार, पंतप्रधान मोदींच्या निवासस्थानाकडे आपचा मोर्चा; अमेरिकेच्या दबावाखाली देशावर निर्णय थोपवल्याचा आरोप
Embed widget