एक्स्प्लोर

Horoscope Today, August 1, 2022 : मेष, वृषभसह ‘या’ राशींसाठी दिवस असणार खास! जाणून घ्या आजचे राशीभविष्य

Horoscope Today, August 1, 2022 : मेष राशीच्या लोकांना ऑफिसमधून एखादी नवीन आणि मोठी जबाबदारी मिळू शकते. वृषभ राशीच्या लोकांना आर्थिक व्यवहारात यश मिळेल.

Horoscope Today, August 1, 2022 : आज चंद्र पूर्वा फाल्गुनी नक्षत्रात आणि सिंह राशीत आहे. गुरु मीन राशीत आहे. सूर्य कर्क राशीत आहे. मेष राशीच्या लोकांना ऑफिसमधून एखादी नवीन आणि मोठी जबाबदारी मिळू शकते. वृषभ राशीच्या लोकांना आर्थिक व्यवहारात यश मिळेल. जाणून घ्या आजचे संपूर्ण राशीभविष्य...

मेष (Aries Horoscope) : आज तुम्हाला तुमच्या रागीट स्वभावावर संयम ठेवण्याची गरज आहे. शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या आराम मिळेल. कठोर परिश्रम करूनही अपेक्षित यश पदरात पडणार नाही. मुलांच्या भविष्याची काळजी वाटेल. ऑफिसमधून एखादी नवीन आणि मोठी जबाबदारी मिळू शकते, जी तुमच्या करिअरसाठी चांगली ठरेल.  व्यवसायात वाढ होईल. खर्च वाढतील. अनावश्यक वाद आणि भांडणे टाळा.

वृषभ (Taurus Horoscope) : आज तुम्ही मजबूत मनोबल आणि आत्मविश्वासाने काम करू शकाल. या कामाचे फळही तुम्हाला अपेक्षेप्रमाणे मिळेल. वडिलांकडून किंवा आईकडून सुखद बातम्या मिळतील. विद्यार्थ्यांना अभ्यासात यश मिळेल. सरकारी क्षेत्रात फायदा होईल. आर्थिक व्यवहारात यश मिळेल. आज ऑफिसमध्ये तुमच्या कामाचे कौतुक होईल. जर, तुम्ही प्रवासाची योजना आखत असाल, तर तुमच्यासाठी हा काळ चांगला आहे.

मिथुन (Gemini Horoscope) : नवीन काम सुरू करण्यासाठी आजचा दिवस शुभ आहे. सरकारी कामातून लाभ मिळण्याची शक्यता आहे. व्यवसायात भागीदाराचे चांगले सहकार्य मिळेल. एखाद्या छोट्याशा सहलीचे आयोजन केले जाऊ शकते. जवळचे मित्र किंवा शेजारी यांच्याशी असलेले जुने वाद मिटताना दिसतील. आज कोणताही निर्णय घेण्यापूर्वी वडिलांचा सल्ला घ्या. अन्यथा तुमच्यासोबत मोठी फसवणूक होऊ शकते.

कर्क (Cancer Horoscope) : नकारात्मक मानसिकतेने वागू नका. आज शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या तुम्ही अस्वस्थ राहाल. मनात एखादी खदखद आणि असंतोषाची भावना असू शकते. कौटुंबिक वातावरण अनुकूल राहणार नाही. कुटुंबातील सदस्यांसोबत गैरसमज होणार नाहीत याची काळजी घ्या. आजचा दिवस तुमच्यासाठी सामान्य असणार आहे. जे काही काम कराल, त्यात यश मिळेल. केलेले प्रत्येक काम फायदेशीर ठरेल.

सिंह (Leo Horoscope) : तरुणांसाठी आजचा दिवस चांगला राहील. आज तुम्ही तुमच्या मित्रांसोबत कुठेतरी जाण्याचा प्लॅन बनवू शकता. आर्थिक स्थितीही मजबूत असेल. अपूर्ण कामे पूर्ण करण्याच्या प्रयत्नात तुम्ही व्यस्त राहू शकता. कोणतेही काम करण्याची घाई करू नका, अन्यथा नुकसान होऊ शकते. वडीलधाऱ्यांकडून लाभ मिळेल. सामाजिक प्रतिष्ठेत वाढ होईल. बोलण्यात आणि वागण्यात रागाचा स्वर लागणार नाही याची काळजी घ्या.

कन्या (Virgo Horoscope) : तुमचा आजचा दिवस शारीरिक आणि मानसिक चिंतांच्या ओझ्याखाली जाईल. रागावर नियंत्रण राहील याची विशेष काळजी घ्या. कोर्टाच्या कामात सावध राहा. अचानक पैसा खर्च होईल. मित्रांसोबत मतभेद होऊ शकतात. धार्मिक कार्यात पैसा खर्च होईल. शांत मनाने काम करा. मानसिक चिंता राहील. तब्येत बिघडणार नाही याची काळजी घ्या. नोकरदार लोकांनी त्यांच्या हाताखाली काम करणाऱ्यांपासून सावध राहा.

तूळ (Libra Horoscope) : तुमचा आजचा दिवस शुभ आहे. तुम्हाला अनेक क्षेत्रात फायदा होईल. उत्पन्न वाढू शकते. मित्रांकडून लाभ होईल. मात्र, काही पैसा खर्चही होऊ शकतो. एखाद्या पर्यटन स्थळी जाण्याचा प्लॅन कराल. कुटुंबातील सदस्यांची भेट आनंददायी ठरेल. अविवाहित लोकांसाठी चांगले स्थळ सांगून येऊ शकते. कौटुंबिक जबाबदाऱ्याही वाढू शकतात. मान सन्मान मिळेल. प्रत्येक कामात आत्मविश्वास दिसू द्या.

वृश्चिक (Scorpio Horoscope) : आजचा दिवस तुमच्यासाठी चांगला जाईल. व्यवसायाच्या ठिकाणी वातावरण अनुकूल राहील. नोकरदार लोकांवर उच्च अधिकारी खुश राहतील. तुमचे प्रत्येक काम आज यशस्वीपणे पूर्ण होईल. तुमची प्रतिष्ठा वाढेल. नोकरीत पदोन्नतीही होऊ शकते. आजचा दिवस आरोग्याच्या दृष्टीने फायदेशीर आहे. जोडीदाराच्या आरोग्याची काळजी घ्या. आत्मविश्वासाने प्रत्येक काम पूर्ण कराल.

धनु (Sagittarius Horoscope) : आपल्या दैनंदिन कामात हलगर्जीपणा करू नका. अन्यथा ते तुमच्या त्रासाचे कारण बनेल. आज तुमच्या आनंदात वाढ होईल. मात्र, आरोग्य कमजोर राहण्याची शक्यता आहे. शारीरिक सुस्ती जाणवेल. मानसिकदृष्ट्याही तुम्ही काही चिंतेत राहाल. व्यवसायात काही अडथळे येऊ शकतात. नोकरदार लोकांवर कामाचा अतिरिक्त ताणही पडेल. मात्र, नकारात्मक विचारांपासून दूर राहा.

मकर (Capricorn Horoscope) : तुमचा दिवस धर्मादाय कार्यात जाईल. व्यवसायात अचानक आर्थिक लाभ होऊ शकतो. उच्च अधिकार्‍यांशी काही वाद झाला असेल, तर तो आज मिटेल आणि ते तुमची स्तुती करतानाही दिसतील. आळसाचा अतिरेक होऊ देऊन नका. अन्यथा व्यवसायात अडचणी येऊ शकतात. सावध रहा. मालमत्तेतून उत्पन्न वाढू शकते. बौद्धिक कार्यात व्यस्त राहाल. मनावर नकारात्मक विचारांचा प्रभाव पडू शकतो.

कुंभ (Aquarius Horoscope) : नोकरीत असलेल्या लोकांवर जबाबदारी वाढणार आहे. लहान-मोठे व्यवसाय करतात, त्यांनीही नवीन योजना आखल्या पाहिजेत. व्यवसायात जास्त धावपळ होईल. लाभाच्या संधीही मिळतील. जोडीदाराच्या आरोग्याची काळजी घ्या. खर्च वाढतील. स्वावलंबी व्हा. राग आणि द्वेषाचा अतिरेक टाळा. कामाच्या ठिकाणी काही अडचणी येऊ शकतात.

मीन (Pisces Horoscope) : आत्मविश्वास राहील, परंतु नकारात्मक विचार टाळा. कुटुंबाच्या आरोग्याची काळजी घ्या. व्यवसायात बदलाची संधी मिळू शकते. उत्पन्न वाढेल. मनात निराशेची भावना असू शकते. आरोग्य खूप चांगले राहील. घरात शांती आणि आनंदाचे वातावरण राहील. दैनंदिन कामे चांगल्या प्रकारे करू शकाल. विरोधकांवर विजय मिळेल. मनात उत्साह राहील. समाजातील मान सन्मान वाढेल.

महत्त्वाच्या बातम्या

Shravan 2026 : भगवान शंकराला बेलपत्र प्रिय; पण घरात बेलपत्राचं रोप लावणं शुभ की अशुभ? वास्तूशास्त्रात म्हटलंय...
भगवान शंकराला बेलपत्र प्रिय; पण घरात बेलपत्राचं रोप लावणं शुभ की अशुभ? वास्तूशास्त्रात म्हटलंय...
Vastu Tips : राहू दोषापासून सुटका हवीय? तुमच्या घरातील रोपाची कुंडी 'या' दिशेला ठेवा, एका आठवड्यात फरक जाणवेल, वास्तूशास्त्र
राहू दोषापासून सुटका हवीय? तुमच्या घरातील रोपाची कुंडी 'या' दिशेला ठेवा, एका आठवड्यात फरक जाणवेल, वास्तूशास्त्र
Shravan 2026: श्रावणात मांसाहार का करत नाहीत? केस, नखे कापल्याने होतं गंभीर नुकसान? धार्मिकसह वैज्ञानिक कारण जाणून थक्क व्हाल...
श्रावणात मांसाहार का करत नाहीत? केस, नखे कापल्याने होतं गंभीर नुकसान? धार्मिकसह वैज्ञानिक कारण जाणून थक्क व्हाल...
Budhaditya Yog 2026 : अवघ्या काही तासांतच 4 राशींचं उजळणार भाग्य; बुधादित्य योगामुळे सुरु होणार सुवर्णकाळ, अचानक धनलाभाचे जुळणार योग
अवघ्या काही तासांतच 4 राशींचं उजळणार भाग्य; बुधादित्य योगामुळे सुरु होणार सुवर्णकाळ, अचानक धनलाभाचे जुळणार योग

व्हिडीओ

BMC Corrupt Officer : कारवाई झालेले २०७ पैकी ११२ अधिकारी सेवेत, प्रकरण काय? | Special Report
Voting Right Sold : मताधिकाराचा लिलाव; जिल्हा बँक निवडणुकीआधी धक्कादायक प्रकार | Special Report
Abhijeet Dipke On Narendra Modi : मोदींची डिग्री खरी असावी.. अभिजीत दिपके थेटच बोलले..
Sanjay Raut PC : संघामध्ये मोदी-शाहांनी आपले चमचे पेरले आहेत,संजय राऊतांचा हल्लाबोल
Balasaheb Fadnavis On Devendra Fadnavis: माझा पुतण्या आज ना उद्या पंतप्रधान होईल; देवेंद्र फडणवीसांच्या काकांना विश्वास, नेमकं काय म्हणाले?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sanjay Raut on Bankipur By-election Result: कुत्रा-मांजराला उभे केले तरी लोक निवडून देतील, हा अहंकार लोकांनी मोडून काढला; बांकीपूर पोटनिवडणुकीवरून संजय राऊतांचा भाजपवर घणाघात
कुत्रा-मांजराला उभे केले तरी लोक निवडून देतील, हा अहंकार लोकांनी मोडून काढला; बांकीपूर पोटनिवडणुकीवरून संजय राऊतांचा भाजपवर घणाघात
Sant Nivruttinath Maharaj Palkhi : परंपरेलाच तडा! बैलांऐवजी ट्रॅक्टरने ओढावा लागला संत निवृत्तीनाथांच्या पालखीचा रथ; 8 कोटींच्या रथाचे नुकसान, नेमकं काय घडलं?
परंपरेलाच तडा! बैलांऐवजी ट्रॅक्टरने ओढावा लागला संत निवृत्तीनाथांच्या पालखीचा रथ; 8 कोटींच्या रथाचे नुकसान, नेमकं काय घडलं?
Liquor Brands Banned Marathi News: Old Monk, RC पासून Bagpiper, McDowell's पर्यंत..., भारतात 5 मद्यांच्या ब्रँडवर बंदी, हादरवणारी 6 कारणं समोर!
Old Monk, RC पासून Bagpiper, McDowell's पर्यंत..., भारतात 5 मद्यांच्या ब्रँडवर बंदी, हादरवणारी 6 कारणं समोर!
Ketan Agrawal Crime Case: सियाने केतनला लोहगडावरुन ढकलल्याचा परिणाम लग्नाच्या बाजारपेठेवर, हायक्लास सोसायटीत नवा ट्रेंड उदयाला आला, नेमकं काय घडलं?
सियाने केतनला लोहगडावरुन ढकलल्याचा परिणाम लग्नाच्या बाजारपेठेवर, हायक्लास सोसायटीत नवा ट्रेंड उदयाला आला, नेमकं काय घडलं?
Tukaram Mundhe On Saoji Mutton: सावजी खाल्ल्यास एक महिना आजारी पडेन, तुकाराम मुंढेंच्या विधानावरुन वादाला फोडणी; आता आहार तज्ज्ञांनी सत्य सांगितलं!
सावजी खाल्ल्यास एक महिना आजारी पडेन, तुकाराम मुंढेंच्या विधानावरुन वादाला फोडणी; आहार तज्ज्ञांनी सत्य सांगितलं!
Bankipur bypoll 2026 Results: भाजपने दगड उभा केला तरी जिंकेल अशा मतदारसंघात प्रशांत किशोर कसे जिंकले? जेन झी आंदोलनाचा पहिला झटका, पराभवाची पाच कारणं
भाजपने दगड उभा केला तरी जिंकेल अशा मतदारसंघात प्रशांत किशोर कसे जिंकले? जेन झी आंदोलनाचा पहिला झटका, पराभवाची पाच कारणं
Pune Police : गाडीच्या बोनेटवर बसवून गुन्हेगारांची धिंड काढणाऱ्या पुणे पोलिसांना झटका, राज्य मानवधिकार आयोगाची नोटीस, आयुक्त अमितेश कुमारही गोत्यात
गाडीच्या बोनेटवर बसवून गुन्हेगारांची धिंड काढणाऱ्या पुणे पोलिसांना झटका, राज्य मानवधिकार आयोगाची नोटीस, आयुक्त अमितेश कुमारही गोत्यात
Solapur Adinath Sugar factory: सोलापूरमधील 450 कोटींचा साखर कारखाना 120 कोटींना विकण्याच्या हालचाली, बड्या भाजप नेत्याचा डाव, शरद पवार गटाच्या नेत्याचा आरोप
सोलापूरमधील 450 कोटींचा साखर कारखाना 120 कोटींना विकण्याच्या हालचाली, बड्या भाजप नेत्याचा डाव, शरद पवार गटाच्या नेत्याचा आरोप
Embed widget