एक्स्प्लोर

Horoscope Today, April 29, 2022 : कन्या, वृश्चिकसह ‘या’ राशींना नोकरीत बदल होण्याचे संकेत! जाणून घ्या आजचं राशीभविष्य..

Horoscope Today, April 29, 2022 : मेष आणि वृषभेच्या लोकांना उत्पन्न वाढीत आज मित्रांची साथ मिळू शकते. जाणून घ्या आजचं राशीभविष्य...

Horoscope Today, April 29, 2022 : आज चंद्र मीन राशीत आहे आणि संध्याकाळनंतर तो मेष राशीत जाईल. सकाळी चंद्र चित्रा नक्षत्रात राहील. गुरु मीन राशीत तर, शनि कुंभ राशीत आहे. मेष आणि वृषभेच्या लोकांना उत्पन्न वाढीत आज मित्रांची साथ मिळू शकते. जाणून घ्या आजचं राशीभविष्य...

मेष (Aries Horoscope) : नवीन मालमत्ता खरेदी करण्याची तुमची इच्छा आज पूर्ण होऊ शकते. मोकळ्या वेळेचा सदुपयोग करा. कौटुंबिक समस्यांकडे लक्ष द्या. कुटुंबात धार्मिक कार्ये आयोजित होतील. एखाद्या मित्राच्या मदतीने तुम्हाला व्यवसायात लाभाची संधी मिळू शकते. घरातील शुभ कार्यात अधिकचा खर्च होईल. मानसिक दडपणाखाली निर्णय घेऊ नका. व्यवसायात नवीन रणनीती बनवावी लागेल, तरच नफा मिळवू शकाल.

वृषभ (Taurus Horoscope) : आज तुमची निर्णय घेण्याची क्षमता चांगली असल्याचे सिद्ध होईल. मुलांचे सहकार्य आणि प्रेम मिळेल. कामाच्या ठिकाणी कोणाशीही बोलताना संकोच बाळगण्याची गरज नाही. नोकरदार वर्गाला प्रमोशन किंवा पगार वाढ यासारखी चांगली बातमी ऐकायला मिळेल. मित्राच्या मदतीने उत्पन्न वाढवण्यासाठी नवीन योजना आखू शकता. सुखसुविधांच्या गोष्टींवरचा खर्च वाढू शकतो. कुटुंबातील कोणत्याही विषयावर वादात पडू नका.

मिथुन (Gemini Horoscope) : सगळ्यांशी सामंजस्याने काम कराल, तर अनेक फायदे होतील. व्यवसायात यश मिळेल. सध्या नवीन व्यवसाय सुरू करण्याचा विचार टाळा. धार्मिक कार्यात व्यस्त राहाल. नोकरीत काही अतिरिक्त जबाबदारी मिळू शकते. कामाचा ता वाढू शकतो. आज अनेक कामांत तुम्हाला वडिलांची साथ मिळेल. कोर्ट केसेसमध्ये यश मिळण्याची शक्यता आहे. मात्र, प्रेमात मतभेद होऊ देऊ नका.

कर्क (Cancer Horoscope) : आजचा दिवस तुमचा सन्मान वाढवणारा असेल. प्रवास लाभदायक ठरू शकतो. तुमचे आरोग्य आणि व्यावसायिक स्थिती ठीक राहील. मन प्रसन्न राहील. संभाषणात संयम ठेवा. उत्पन्नात घट, तर खर्च जास्त अशी परिस्थिती निर्माण होऊ शकते. नोकरी आणि व्यवसायात यश मिळेल. अनेक दिवसांपासून रखडलेली काही सरकारी कामे पूर्ण होतील. देवाचे नामस्मरण करा.

सिंह (Leo Horoscope) : ऑफिसमधील महत्त्वाची कामे उद्या करू, असे म्हणून सोडू नका. पैशाच्या व्यवहारात नुकसान होण्याची शक्यता आहे. त्यामुळे आर्थिक देवाण घेवाण करताना शहाणपणाने काम करा. नोकरीच्या ठिकाणी वादापासून दूर राहा. कार्यक्षेत्रात काही बदल होऊ शकतात. मन:स्थितीत थोडी सुधारणा होईल. रखडलेले पैसे परत मिळू शकतात. कोणताही निर्णय घेताना जोडीदाराशी सल्लामसलत करा.

कन्या (Virgo Horoscope) : व्यवसाय करणाऱ्या व्यक्तींसाठी आजचा दिवस चांगला असेल. जीवनसाथीचा सहवास लाभेल. नोकरीत तुमची प्रगती होईल. तुम्हाला प्रेम आणि व्यवसायात सहकार्य मिळेल. दैनंदिन कामात काही अडथळे येऊ शकतात. नोकरीत बदल होण्याची शक्यता आहे. कामाच्या वाढत्या ओझ्यामुळे गोंधळून जाऊ शकता. व्यवसायवाढीच्या योजना फायदेशीर ठरतील. उत्पन्न देखील वाढण्याची शक्यता आहे.

तूळ (Libra Horoscope) : तुमच्या कामाने प्रभावित झाल्याने, तुम्हाला एखादी मोठी संधी मिळू शकते. अनेक दिवसांपासून व्यवसायात अडकलेले पैसे आज परत मिळू शकतात. जुन्या मित्रांना भेटण्याचा बेत आखाल. आरोग्याबाबत सावध राहा. खर्चात वाढ होईल. लांबचे प्रवास घडण्याची शक्यता आहे. रखडलेली कामे पूर्ण होतील. आरोग्याबाबत निष्काळजी राहू नका. सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांची कीर्ती सर्वत्र पसरेल.

वृश्चिक (Scorpio Horoscope) : विवाह योग्य लोकांना चांगला प्रस्ताव मिळू शकतो. व्यवसायात येणाऱ्या अडचणींसाठी तुम्हाला अनुभवी व्यक्तीचा सल्ला घ्यावा लागेल. विद्यार्थ्यांसाठी आजचा दिवस चांगला जाईल. प्रेम आणि व्यवसायाची स्थिती छान असेल. अतिविचाराला बळी पडू नका. नोकरीत प्रगतीच्या संधी मिळू शकतात. आरोग्याची काळजी घ्या.

धनु (Sagittarius Horoscope) : वडिलधाऱ्यांचा आदर करावा आणि त्यांच्याशी गैरवर्तन करू नये. व्यवसाय करणाऱ्या लोकांसाठी आजचा दिवस खूप महत्त्वाचा आहे. नोकरीतही प्रगतीची शक्यता आहे. जोडीदाराच्या आरोग्याची काळजी घ्या. अधिक धावपळ होईल. मित्रांचे सहकार्य मिळेल. भावनांवर नियंत्रण ठेवा. राग आणि उत्कटतेचा अतिरेक टाळा. कोणाशीही वाद सुरू करू नका. व्यवसायाशी संबंधित प्रवासाला जावे लागेल

मकर (Capricorn Horoscope) : आर्थिक बाबतीत अत्यंत सावधगिरी बाळगण्याचा आजचा दिवस असेल. कोणतेही काम सावधगिरीने करावे लागेल. एखाद्याच्या सल्ल्यानुसार पैसे गुंतवले, तर ते तुमच्यासाठी फायदेशीर ठरतील.  जीवनात सकारात्मक ऊर्जेचा संचार होईल. अनावश्यक राग आणि वाद टाळा. कोणत्याही मालमत्तेतून पैसा मिळू शकतो. वैचारिक मतभेद होऊ शकतात. ऑफिसच्या कामात यश मिळेल.

कुंभ (Aquarius Horoscope) : घरातील वातावरण बदलायचे असेल, तर कुटुंबाला अधिकाधिक वेळ द्या.  कार्यालयात सहकाऱ्यांशी वाद होण्याची शक्यता आहे. शांत राहून काम करावे. आत्मविश्वास वाढेल. नोकरीत बदलाच्या संधी उपलब्ध आहेत. जीवनसाथीचा सहवास मिळेल. आर्थिक प्रश्न सुटतील. तुमची प्रकृती चांगली राहील. एक्जाडी प्रिय वस्तू चोरीला जाण्याची भीती आहे, त्यामुळे सावधगिरी बाळगावी लागेल.

मीन (Pisces Horoscope) : मन प्रसन्न राहील. संभाषणात संयम ठेवा. व्यवसायात सुधारणा होईल, परंतु अधिक धावपळ होईल. प्रवासाचा खर्चही वाढू शकतो. शत्रू तुम्हाला त्रास देत राहतील. कामाच्या ठिकाणी वातावरण प्रसन्न राहील. तुमची व्यावसायिक स्थिती ठीक राहील. अनेक समस्या दूर होतील. नकारात्मक गोष्टी मनावर घेऊ नका. मनात मत्सराची भावना अजिबात ठेवू नका.

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. यासाठी संबंधित तज्ज्ञाचा सल्ला घ्यावा.) 

महत्वाच्या बातम्या : 

महत्त्वाच्या बातम्या

Horoscope Today 7 August 2026 : आज शुक्रवारच्या दिवशी 8 राशींवर प्रसन्न होणार देवी लक्ष्मी; संध्याकाळच्या वेळी मिळणार शुभवार्ता, वाचा आजचे राशीभविष्य
आज शुक्रवारच्या दिवशी 8 राशींवर प्रसन्न होणार देवी लक्ष्मी; संध्याकाळच्या वेळी मिळणार शुभवार्ता, वाचा आजचे राशीभविष्य
Weekly Horoscope: मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्यापैकी 5 राशींची पाचही बोटं तुपात! ऑगस्टचा दुसरा आठवडा नशीब पालटणार, पैसा, नोकरी.. साप्ताहिक राशीभविष्य
मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्यापैकी 5 राशींची पाचही बोटं तुपात! ऑगस्टचा दुसरा आठवडा नशीब पालटणार, पैसा, नोकरी.. साप्ताहिक राशीभविष्य
Horoscope Today 7 August 2026: आजचा शुक्रवार 6 राशींसाठी भाग्याचा! अद्भूत शुभ योग जुळले, लक्ष्मी-कुबेराच्या कृपेने कोण भाग्यशाली? आजचे राशीभविष्य वाचा...
आजचा शुक्रवार 6 राशींसाठी भाग्याचा! अद्भूत शुभ योग जुळले, लक्ष्मी-कुबेराच्या कृपेने कोण भाग्यशाली? आजचे राशीभविष्य वाचा...
Lucky Zodiac Signs : 7 ऑगस्टचा दिवस 'या' 5 राशींसाठी भाग्यशाली! देवी लक्ष्मीच्या कृपेने वाईट काळ लवकरच संपणार; वाचा लकी राशी
7 ऑगस्टचा दिवस 'या' 5 राशींसाठी भाग्यशाली! देवी लक्ष्मीच्या कृपेने वाईट काळ लवकरच संपणार; वाचा लकी राशी

व्हिडीओ

Sanjay Raut PC : विधीमंडळ पक्ष फुटला म्हणजे मूळ पक्ष फुटला नाही, कोर्टात व्यक्तिवाद, संजय राऊत UNCUT
Kunbi Certificate Issues Special Report : मराठा आरक्षणाचा पेच वाढला? कुणबी दाखलेच अवैध? | Special Report
Dharashiv News Special Report : धाराशिव जिल्हा परिषदेच्या दोन तास टीव्ही, मोबाईल बंद उपक्रमाला सुरुवात | Special Report
Analogue paneer Special Report : महाराष्ट्रात ॲनालॉग पनीरवर वर्षभराची बंदी, तुकाराम मुंढेंचा तडाखा
Mumbai Mayor Bungalow Special Report : मुंबई महापालिकेचा नव्या टेंडरमुळे वादंग : Ritu Tawade

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
AI Deepfake Ban Rules : एआय डीपफेकवर केंद्र सरकारचा सर्जिकल स्ट्राईक; आक्षेपार्ह फोटो-व्हिडीओ 3 तासांत हटवावे लागणार
एआय डीपफेकवर केंद्र सरकारचा सर्जिकल स्ट्राईक; आक्षेपार्ह फोटो-व्हिडीओ 3 तासांत हटवावे लागणार
Maharashtra Live blog updates: ब्लिंक इटच्या डिलिव्हरी बॉयवर सहकाऱ्यांचा हल्ला, अंतर्गत स्पर्धेतून वाद, दोघांना अटक
Maharashtra Live blog updates: ब्लिंक इटच्या डिलिव्हरी बॉयवर सहकाऱ्यांचा हल्ला, अंतर्गत स्पर्धेतून वाद, दोघांना अटक
टीम इंडियात धावाधाव सुरु! आता फिटनेस सिद्ध करण्यासाठी 10 मिनिटात किती किमी पळावं लागणार? 1200 मीटर किती मिनिटात पूर्ण करावी लागणार? हा सुद्धा नियम ठरला
टीम इंडियात धावाधाव सुरु! आता फिटनेस सिद्ध करण्यासाठी 10 मिनिटात किती किमी पळावं लागणार? 1200 मीटर किती मिनिटात पूर्ण करावी लागणार? हा सुद्धा नियम ठरला
Womens Asia Cup 2026 : आशिया कपचं वेळापत्रक जाहीर, भारत पाकिस्तान 'या' दिवशी आमने सामने, दुबईत स्पर्धा रंगणार
आशिया कपचं वेळापत्रक जाहीर, भारत पाकिस्तान 'या' दिवशी आमने सामने, दुबईत स्पर्धा रंगणार
Mohan Bhagwat : खुल्या वर्गातील मुलांचं कटऑफ लिस्टमध्ये नाव खाली, आरक्षण कधीपर्यंत ठेवणार? Gen Z चे थेट प्रश्न, मोहन भागवतांचं रोखठोक उत्तर
खुल्या वर्गातील मुलांचं कटऑफ लिस्टमध्ये नाव खाली, आरक्षण कधीपर्यंत ठेवणार? Gen Z चे थेट प्रश्न, मोहन भागवतांचं रोखठोक उत्तर
Mohan Bhagwat: मुलांना देवाचं रूप मानलं जाते, तरीही आंदोलनात लाठीचार्ज, पेलेट गन फायर करण्यात आल्या, Gen Z चर्चेत थेट प्रश्न विचारताच सरसंघचालक मोहन भागवत नेमकं काय म्हणाले? पहिल्यांदाच जाहीर भाष्य
मुलांना देवाचं रूप मानलं जाते, तरीही आंदोलनात लाठीचार्ज, पेलेट गन फायर करण्यात आल्या, Gen Z चर्चेत थेट प्रश्न विचारताच सरसंघचालक मोहन भागवत नेमकं काय म्हणाले? पहिल्यांदाच जाहीर भाष्य
Eknath Shinde :
एकनाथ शिंदे अचानक दरे गावातून मुंबईकडे रवाना, अमित शाहांच्या भेटीसाठी दौरा आटोपल्याची सूत्रांची माहिती
Arvind Kejriwal: इथेनॉल, पेपरफुटीविरोधात बोलणाऱ्यांची खाती बंद करण्यासाठी सरकारचा मेटावर दबाव, मेटाने असली बदमाशी करत मोदींसमोर गुडघे टेकवू नयेत; केजरीवालांचा गंभीर आरोप
इथेनॉल, पेपरफुटीविरोधात बोलणाऱ्यांची खाती बंद करण्यासाठी सरकारचा मेटावर दबाव, मेटाने असली बदमाशी करत मोदींसमोर गुडघे टेकवू नयेत; केजरीवालांचा गंभीर आरोप
Embed widget