एक्स्प्लोर

Horoscope Today, April 22, 2022 : मेष, कर्कसह ‘या’ राशींना मिळणार नशिबाची साथ! जाणून घ्या आजचे राशीभविष्य

Horoscope Today April 22, 2022 : आज मिथुन राशीच्या लोकांना धनलाभाची शक्यता आहे. तर, कर्क राशीच्या लोकांचेही नशीब साथ देणार आहे.

Horoscope Today April 22, 2022 : आज पूर्वाषाध नक्षत्र आहे. चंद्र धनु राशीत आहे. शनि आज कुंभ राशीत आहे तर, गुरु मीन राशीत आहे. बुधासोबत सूर्य मेष राशीत असणार आहे. आज मिथुन राशीच्या लोकांना धनलाभाची शक्यता आहे. तर, कर्क राशीच्या लोकांचेही नशीब साथ देणार आहे. जाणून घेऊया आजचे राशीभविष्य...

मेष (Aries Horoscope) : आज मेष राशीच्या व्यक्तींसाठी दिवस भाग्याचा असणार आहे. प्रत्येक पावलावर नशीब साथ देईल. सन्मान होण्याची शक्यता आहे. मात्र, आर्थिक चणचण भासली तरी, व्यक्ती किंवा संस्थेकडून कर्ज घेणे टाळा. कर्ज घेतल्यास ते भविष्याच्या दृष्टीने अहितकारी ठरेल. जुन्या मित्रांचा सहवास लाभणार आहे. नवे मित्रही साथ देतील. नोकरीतही दिवस उत्तम जाईल.

वृषभ (Taurus Horoscope) : धार्मिक कार्यात खर्च होणार आहे. आज दिवसभर प्रचंड व्यस्त राहाल. अशावेळी स्वतःची काळजी घ्या. तुमच्या निर्णयक्षमतेमुळे आज तुमचा फायदा होईल. दीर्घकाळ प्रलंबित कामे पूर्ण होतील. मन विचलित होऊ देऊ नका. इतरांशी संवाद साधने लाभदायी ठरेल. आज एखाद्या सहकाऱ्याला कामात मदत करावी लागली तर ती आनंदाने करा. भविष्यकाळात याचे चांगले फळ मिळेल.

मिथुन (Gemini Horoscope) : आज तुम्हाला वायफळ खर्चापासून दूर राहावे लागेल. कोणताही निर्णय घेताना तो काळजीपूर्वक घ्या. सामाजिक कामात रस घ्याल. अचानक झालेल्या एखाद्या लाभामुळे अध्यात्मिक रुची वाढेल. मुलांकडून एखादी आनंदाची बातमी मिळेल. वैवाहिक जीवनही आनंदमय होईल. व्यवसायात पुढे जाताना अनुभवी व्यक्तींचा सल्ला घेणे आवश्यक आहे.

कर्क (Cancer Horoscope) : आज भाग्य तुमची साथ देणार आहे. केलेल्या मेहनतीचे चांगले फळ मिळेल. व्यवसायातही आनंदी आणि उत्साही वाटेल. प्रलंबित कामे आज पूर्ण होतील. मुलांवरील विश्वासाधिक दृढ होईल. स्वतःच्या चैनीसाठी काही पैसे खर्च कराल. मात्र, हे पाहून शत्रूचा जळफळाट होईल. आई-वडिलांच्या आरोग्याची काळजी घ्या. कामात यश मिळेल.

सिंह (Leo Horoscope) : आजचा दिवस तुमच्यासाठी संमिश्र परिणामांचा असणार आहे. आई-वडिलांचा आशीर्वाद पाठीशी असेल. दिवसाच्या उत्तरार्धात आराम मिळेल. वायफळ खर्च होण्याची शक्यता आहे. मात्र, तरीही आर्थिक आवक वाढेल. विद्यार्थांना नवीन संधी मिळतील. सर्वांशी गोड बोला. अन्यथा, नातेसंबंध बिघडण्याची शक्यता आहे. नोकरीच्या ठिकाणी व्यवसाय करणाऱ्या लोकांची दीर्घकाळ चाललेली समस्या संपेल.

कन्या (Virgo Horoscope) : आजचा दिवस तुमच्यासाठी धाडसाचा असेल. निर्भयपणे सगळ्याला सामोरे जाल. कठीण काम देखील पूर्ण कराल. व्यवसाय आणि नोकरीत प्रगती होईल. आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. काही निष्फळ गोष्टींवर खर्च होण्याची शक्यता आहे. तिकूल परिस्थितीतही, धैर्य आणि संयम दोन्ही राखणे आवश्यक आहे. उत्पन्न लक्षात घेऊन खर्च करणे चांगले ठरेल.

तूळ (Libra Horoscope) : आजचा दिवस तुमच्या सगळ्या महत्वाकांक्षा पूर्ण करणारा असेल. नोकरीतही पद आणि प्रतिष्ठा वाढेल. एखाद्या नवीन गोष्टीत गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल, तर ती फायदेशीर ठरेल. विद्यार्थी त्यांच्या शैक्षणिक कामगिरीवर संतुष्ट असतील. मित्रांचे सहकार्य लाभेल. जवळच्या किंवा दूरच्या प्रवासाला जाण्याची संधी मिळाली तर, अवश्य जा. मनःशांती मिळेल.

वृश्चिक (Scorpio Horoscope) : आज मन अशांत राहील. एखाद्या गोष्टीमुळे चिंतीत असाल. व्यापार वाढीसाठी केलेले प्रयत्न असफल ठरतील. मात्र, नोकरदारांना आज चांगली बातमी मिळू शकते. शत्रू पक्ष आज तुमच्यावर भारी पडेल. एखादे महत्त्वाचे काम सोपवले असेल, तर ते तुम्हाला वेळेवर पूर्ण करावे लागेल. मनात येणाऱ्या निराशाजनक विचारांना झटकून टाका आणि जिद्दीने कामे पूर्ण करा.

धनु (Sagittarius Horoscope) : आज तुम्हाला नवीन गोष्टी शिकायला मिळतील. ज्ञानात भर पडेल. परोपकाराची भावना जागृत होईल. आज भाग्य देखील तुमची साथ देईल. आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. आरोग्याच्या बाबतीत जागरूक राहा. वेळच्या वेळी जेवण करा, तसेच खाण्यापिण्यावर संयम ठेवा. व्यवसायातील काही बदलांमुळे चांगली बातमी मिळू शकते. दैनंदिन कामांकडे दुर्लक्ष केले तर, तुम्हाला नंतर समस्यांना सामोरे जावे लागू शकते.

मकर (Capricorn Horoscope) : आज इच्छा नसतानाही तुम्हाला काही वायफळ खर्च करावे लागतील. समाजात मानसन्मान वाढेल. व्यवसाय करणाऱ्या लोकांसाठी दिवस चांगला जाईल. रखडलेली कामे देखील आज पूर्ण होतील. घरी पाहुण्यांचे आगमन होईल. मनातील कोणतीही इच्छा आपल्या जोडीदारासोबत शेअर करा. नवीन कामात गुंतवणूक करणे फायद्याचे ठरेल.

कुंभ (Aquarius Horoscope) : आजचा दिवस तुमच्यासाठी खूप फलदायी असणार आहे. घरासाठी काही गोष्टी खरेदी कराल. नोकरीच्या ठिकाणी प्रतिभा दाखवण्याची संधी मिळेल. शत्रू त्रास देत राहतील. प्रवास घडण्याची शक्यता आहे. हा प्रवास लाभदायी ठरणार आहे. विद्यार्थ्यांना त्यांच्या काही कमकुवत विषयांवर वरिष्ठांची मदत घ्यावी लागेल. कोणत्याही वादविवादापासून दूर राहणे उचित ठरेल.

मीन (Pisces Horoscope) : आजचा दिवस सामान्य असणार आहे. कोणतेही वाद सुरु असतील, तर ते आज संपुष्टात येतील. सामाजात सन्मान मिळेल. यामुळे तुमचे मनोबल वाढेल. कुटुंबासोबत गप्पा मारल्यामुळे दिवस छान जाईल. राजकारणात सक्रिय लोकांना आज चांगली बातमी मिळू शकते. हवामानाच्या प्रतिकूल परिणामामुळे काही आरोग्य समस्यांना सामोरे जावे लागू शकते. स्वतःची काळजी घ्या.

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. यासाठी संबंधित तज्ज्ञाचा सल्ला घ्यावा.) 

हेही वाचा :

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Raj Thackeray : राज ठाकरेंनी नाशकात पाय ठेवताच भाजपच्या महिला आमदार भेटीसाठी दाखल; नेमकं कारण काय?
राज ठाकरेंनी नाशकात पाय ठेवताच भाजपच्या महिला आमदार भेटीसाठी दाखल; नेमकं कारण काय?
शिवसेनेचं ऑपरेशन शिवधनुष्य अन् टायगर; ठाकरेंना दे धक्का, मंत्री उदय सामंतांचा गौप्यस्फोट
शिवसेनेचं ऑपरेशन शिवधनुष्य अन् टायगर; ठाकरेंना दे धक्का, मंत्री उदय सामंतांचा गौप्यस्फोट
IPhone अन् अँड्रॉईड युजर्संसाठी वेगवेगळं भाडं; ओला, उबर कंपनीला केंद्राची नोटीस, हे काय लावलंय?
IPhone अन् अँड्रॉईड युजर्संसाठी वेगवेगळं भाडं; ओला, उबर कंपनीला केंद्राची नोटीस, हे काय लावलंय?
Parli : आर्थिक घोटाळ्याचे परळी कनेक्शन; पंढरपुरातील 30 ठेवीदारांना एक कोटीचा गंडा 
आर्थिक घोटाळ्याचे परळी कनेक्शन; पंढरपुरातील 30 ठेवीदारांना एक कोटीचा गंडा 
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Nanded  : नांदेडच्या परांडात अंधश्रद्धेच्या कारणावरून 7 वर्षीय चिमुरडीचं अपहरणShivsena Melava : दोन्ही शिवसेनेच्या मेळाव्याची तयारी, बाळासाहेब ठाकरेंच्या जयंतीनिमित्त आयोजनWalmik karad Audio Clip : कराडसंबंधीत सनी आठवले नावाच्या तरुणानं प्रसिद्ध केली धक्कादायक ऑडिओ क्लिपEknath Shinde Shivsena : शिंदेंच्या शिवसेनेत नव नियुक्तीसाठी मुलाखती होणार

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Raj Thackeray : राज ठाकरेंनी नाशकात पाय ठेवताच भाजपच्या महिला आमदार भेटीसाठी दाखल; नेमकं कारण काय?
राज ठाकरेंनी नाशकात पाय ठेवताच भाजपच्या महिला आमदार भेटीसाठी दाखल; नेमकं कारण काय?
शिवसेनेचं ऑपरेशन शिवधनुष्य अन् टायगर; ठाकरेंना दे धक्का, मंत्री उदय सामंतांचा गौप्यस्फोट
शिवसेनेचं ऑपरेशन शिवधनुष्य अन् टायगर; ठाकरेंना दे धक्का, मंत्री उदय सामंतांचा गौप्यस्फोट
IPhone अन् अँड्रॉईड युजर्संसाठी वेगवेगळं भाडं; ओला, उबर कंपनीला केंद्राची नोटीस, हे काय लावलंय?
IPhone अन् अँड्रॉईड युजर्संसाठी वेगवेगळं भाडं; ओला, उबर कंपनीला केंद्राची नोटीस, हे काय लावलंय?
Parli : आर्थिक घोटाळ्याचे परळी कनेक्शन; पंढरपुरातील 30 ठेवीदारांना एक कोटीचा गंडा 
आर्थिक घोटाळ्याचे परळी कनेक्शन; पंढरपुरातील 30 ठेवीदारांना एक कोटीचा गंडा 
Video: व्हॉलीबॉल टोलवताना क्रीडामंत्री भरणेमामा कोसळले, थोडक्यात बचावले; व्हिडिओ व्हायरल
Video: व्हॉलीबॉल टोलवताना क्रीडामंत्री भरणेमामा कोसळले, थोडक्यात बचावले; व्हिडिओ व्हायरल
Rohit Pawar : पोटदुखी सांगून सहानुभूती...; रोहित पवारांचा वाल्मिक कराडबाबत खळबळजनक दावा; नेमकं काय म्हणाले?
पोटदुखी सांगून सहानुभूती...; रोहित पवारांचा वाल्मिक कराडबाबत खळबळजनक दावा; नेमकं काय म्हणाले?
मोठी बातमी! रामगोपाल वर्माला अटक करा, 3 महिन्यांचा तुरुंगवास; 7 वर्षांपूर्वीच्या खटल्यात न्यायालयाचा निकाल
मोठी बातमी! रामगोपाल वर्माला अटक करा, 3 महिन्यांचा तुरुंगवास; 7 वर्षांपूर्वीच्या खटल्यात न्यायालयाचा निकाल
वाल्मिक कराड रात्री रुग्णालयात दाखल; आज अचानक जामीन अर्ज मागे घेतला, एका दिवसांत नेमकं काय घडलं?
वाल्मिक कराड रात्री रुग्णालयात दाखल; आज अचानक जामीन अर्ज मागे घेतला, एका दिवसांत नेमकं काय घडलं?
Embed widget