एक्स्प्लोर

Horoscope Today 9 May 2023 : 'या' राशींसाठी आजचा दिवस आव्हानात्मक; जाणून घ्या सर्व राशींचे आजचे राशीभविष्य

Horoscope Today 9 May 2023 : आजचा दिवस कोणत्या राशींसाठी शुभ असणार आहे? मेष ते मीन राशीच्या सर्व राशींसाठी दिवस कसा असेल? राशीभविष्य जाणून घ्या.

Horoscope Today 9 May 2023 : आज मंगळवार हा एक महत्त्वाचा दिवस आहे. आज मिथुन राशीचे लोक कुटुंबियांबरोबर वेळ घालवतील. कुंभ राशील जोडीदाराचा पूर्ण पाठिंबा मिळेल. मेष ते मीन राशीसाठी आजचा सोमवार  कसा राहील? काय सांगतात तुमच्या नशिबाचे भाग्यवान तारे? जाणून घ्या आजचं राशीभविष्य.

मेष 

मेष राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस खूप चांगला जाईल. नोकरदार लोकांना दिलेली कामे वेळेत पूर्ण करावी लागतील. वरिष्ठांशी बोलताना आपल्या बोलण्यात गोडवा ठेवा. कुटुंबाचे सहकार्य मिळेल. ज्येष्ठ सदस्यांच्या चरणस्पर्श करून आशीर्वाद घ्या. आज तुमची प्रकृती चांगली राहील. आज काही नवीन आर्थिक करार निश्चित होतील. घरात आनंदाचे वातावरण राहील. आज कुटुंबीयांबरोबर कीर्तन सोहळ्यात सहभागी व्हा. आज तुम्हाला महत्त्वाच्या गोष्टींवर लक्ष केंद्रित करावे लागेल. वैवाहिक जीवन अधिक आनंदी करण्यासाठी तुम्हाला मेहनत घ्यावी लागेल. कुटुंबातील सदस्य तुम्ही केलेल्या कामाचे कौतुक करतील. लोकांच्या नात्याबद्दल बोलता येईल. आईचा सहवास मिळेल. तुम्ही तुमच्या मनातील समस्या तुमच्या मित्रासोबत शेअर करू शकता.

वृषभ 

वृषभ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस संमिश्र आणि फलदायी असणार आहे. व्यवसाय करणारे लोक व्यवसायाला पुढे नेण्यासाठी रखडलेल्या योजना पुन्हा सुरू करू शकतील. आज तुमचे आरोग्य चांगले राहील आणि तुम्ही आत्मविश्वासाने परिपूर्ण असाल. आज तुम्हाला काही समस्यांना सामोरे जावे लागू शकते. थांबलेले पैसे येऊ शकतात. आरोग्याची काळजी घ्या. तुमच्या दैनंदिन दिनचर्येत काही बदल केले तर बरे होईल. कला (Art) आणि संगीतात (Music) रुची असू शकते. कुटुंबातील (Family) सदस्यांच्या गरजा लक्षात ठेवा. खर्च जास्त राहील, पण रोजचे उत्पन्न चांगले राहील. घरातून बाहेर पडताना ज्येष्ठांचे चरणस्पर्श करून त्यांचे आशीर्वाद घ्या, तुमची सर्व कामे पूर्ण होतील. घरात नवीन पाहुण्यांचे आगमन होईल, त्यामुळे कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील. तुम्ही केलेल्या कामाचे सर्वजण कौतुक करतील. 

मिथुन

मिथुन राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस चांगला आहे. नोकरदार लोक नोकरीत दिलेली कामे वेळेत पूर्ण करण्याचा प्रयत्न करताना दिसतील. वरिष्ठांशी बोलताना वाणीतील गोडवा ठेवावा लागेल. नोकरदार लोकांना नोकरीत प्रगतीची संधी मिळेल. तुमचे उत्पन्नही वाढेल. तुमच्या पदरातही वाढ होण्याची चिन्हे आहेत. आजचा दिवस खर्चाने भरलेला असेल. आज तुम्हाला दिर्घकालीन आजारापासून मुक्ती मिळण्याची शक्यता आहे. गुंतवणूक करताना घाईघाईने निर्णय घेऊ नका, नीट विचार करूनच कोणाचा सल्ला घेऊनच गुंतवणूक करा. घरातील वातावरणामुळे तुम्ही उदास होऊ शकता. मुलांच्या कर्तृत्वामुळे पालकांना सन्मान मिळेल. तुम्ही तुमच्या व्यस्त दिवसातून थोडा वेळ तुमच्या मित्रांसाठी काढा आणि तुमच्या आवडीचे काम करा. 

कर्क 

कर्क राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस तुमच्यासाठी आनंददायी आहे. कुटुंबाचे सहकार्य मिळेल. नोकरदारांना नोकरीत दिलेली कामे वेळेवर पूर्ण करावी लागतील. आज तुम्ही कुटुंबासोबत थोडा वेळ घालवा आणि संपत्तीचे जतन कसे करायचे ते शिका जेणेकरून भविष्यात कोणतीही अडचण येणार नाही. लोकांशी स्पष्टपणे बोलण्याची आणि कार्यक्रमांना उपस्थित राहण्याची भीती तुमच्या अस्वस्थतेचे कारण बनू शकते, ही समस्या टाळण्यासाठी, तुमचा आत्मविश्वास वाढवा. काही महत्त्वाच्या योजना राबवल्या जातील आणि त्यातून नवीन आर्थिक नफा मिळेल. तुमच्या मित्रांसोबत थोडा वेळ घालवा कारण ते तुमच्यासाठी खूप चांगले असेल. 

सिंह 

सिंह राशीच्या (Leo Horoscope) लोकांसाठी आजचा दिवस लाभाचा आहे. तुम्हाला तुमच्या वडिलांचा आशीर्वाद मिळेल आणि तुमची संपत्तीतही वाढ होईल. भावंडांच्या मदतीने रखडलेली कामे पूर्ण होतील आणि अचानक आर्थिक लाभ होण्याची दाट शक्यता आहे. आज कामाच्या ठिकाणी विरोधकांपासून सावध राहा. धार्मिक कार्यात खर्च केल्याने आज तुमची कीर्ती वाढेल आणि तुमचा मान-सन्मानही वाढेल. नवीन यश मिळविण्यासाठी तुम्हाला अधिक परिश्रम करावे लागतील, ज्यामुळे तुम्हाला नंतर खूप फायदा होईल. आज अनोळखी व्यक्तीसोबत पैशाचे व्यवहार करणे टाळा, अन्यथा तुम्हाला नुकसान सहन करावे लागेल. जे आपल्या कुटुंबीयांपासून दूर शिक्षण (Education) घेत आहेत, ते उद्या आपल्या कुटुंबियांना भेटण्यासाठी घरी जाऊ शकतात. घरात पूजा, पाठ आयोजित केले जातील. तुम्ही तुमच्या व्यस्त दिवसातून थोडा वेळ स्वतःसाठी काढा, ज्यामध्ये तुम्ही तुमची आवडती कामे करा. 

कन्या

कन्या राशीच्या (Virgo Horoscope) लोकांसाठी आजचा दिवस चांगला आहे. शैक्षणिक (Education) क्षेत्रात यश मिळेल. घरातून बाहेर पडताना ज्येष्ठांच्या चरणस्पर्श करून त्यांचे आशीर्वाद घ्या, मग तुमची सर्व कामे पूर्ण होतील. जोडीदाराचा (Life Partner) पूर्ण पाठिंबा मिळेल. आज तुमच्या मनात झटपट पैसे कमावण्याची इच्छा जागृत होईल. बदलत्या हवामानामुळे आईच्या तब्येतीत चढ-उतार असतील. विद्यार्थ्यांना कोणत्याही नवीन विषयाचा अभ्यास करण्याची संधीही मिळेल. शेजारच्या वादात पडणे टाळा. धार्मिक कार्यक्रमातही थोडा वेळ घालवा, ज्यामुळे मनाला शांती मिळेल. मित्रांच्या मदतीने नवीन संधी मिळतील. नोकरदार लोकांच्या उत्पन्नात वाढ होईल. घरोघरी शुभ कार्यक्रमाचे आयोजन केले जाईल. दूरच्या नातेवाईकाकडून चांगली बातमी ऐकायला मिळेल.

तूळ

तूळ राशीच्या (Libra Horoscope) लोकांसाठी आजचा दिवस आनंददायी आहे. व्यवसाय करणाऱ्या लोकांना व्यवसाय पुढे नेण्याची संधी मिळेल. तुमचे मित्र तुम्हाला मदत करतील. भांडण करणाऱ्या व्यक्तीशी झालेल्या वादामुळे तुमचा मूड खराब होऊ शकतो. हुशारीने वागा. आज तुमचे प्रेम जीवन चांगले राहील. आज तुम्हाला कुटुंबाचं सहकार्य मिळेल. तुम्ही करत असलेल्या व्यवसायात तुम्हाला हळूहळू यश मिळेल. तुम्ही आत्मविश्वासाने परिपूर्ण असाल. नातेवाईकांचेही सहकार्य मिळेल. आज तुमची आर्थिक स्थिती मजबूत कराल. जे विद्यार्थी स्पर्धा परीक्षेची तयारी करतायत त्यांनी अधिक मेहनत घेतल्यास परीक्षेत त्यांना चांगलं यश मिळेल. 

वृश्चिक 

वृश्चिक राशीच्या (Scorpio Horoscope) लोकांसाठी आजचा दिवस संमिश्र असणार आहे. ज्यांना राजकारणात (Politics) करिअर करायचे आहे, त्यांना आज यश मिळेल. सभांना संबोधित करण्याची संधी मिळेल. आज मोठ-मोठ्या नेत्यांनाही भेटण्याची संधी मिळेल, त्यामुळे तुम्ही खूप आनंदी राहाल. आज नकारात्मक (Negative) गोष्टींकडे दुर्लक्ष करण्याचा प्रयत्न करा आणि सकारात्मक (Positive) गोष्टींचा विचार करा. रागावर नियंत्रण आणि बोलण्यात गोडवा ठेवल्यास कामाच्या ठिकाणी सहकारी आणि वरिष्ठांचेही सहकार्य मिळेल. घरातून बाहेर पडण्यापूर्वी वडिलांचे चरणस्पर्श करून आशीर्वाद घ्या, मग तुमची सर्व कार्य पूर्ण होतील. 

धनु 

धनु राशीच्या (Sagittarius Horoscope) लोकांसाठी आजचा दिवस आनंदाने भरलेला असेल. नोकरीत चांगली बातमी मिळेल. तुम्ही तुमच्या पदातही वाढ पाहाल. व्यवसाय करणाऱ्या लोकांना व्यवसायात अपेक्षित नफा मिळेल. मित्रांच्या मदतीने तुम्हाला उत्पन्नाचे अनेक स्त्रोत मिळतील. तुमच्या जोडीदाराच्या आरोग्याबाबत तुम्हाला थोडी चिंता जाणवेल. शेअर बाजारात गुंतवणूक करायची असेल तर वेळ चांगली आहे. तुम्ही आधी केलेल्या गुंतवणुकीचा तुम्हाला पूर्ण लाभ मिळेल. तुम्ही तुमच्या व्यस्त दिवसातून थोडा वेळ स्वतःसाठी काढा, ज्यामध्ये तुम्ही तुमच्या आवडत्या गोष्टी करा. जे समाजसेवेसाठी काम करतात, त्यांचा सन्मान वाढेल. तुमच्या गोड बोलण्यामुळे तुम्ही सर्वांकडून तुमचे काम करून घ्याल. 

मकर

मकर राशीच्या (Capricorn Horoscope) लोकांसाठी आजचा दिवस चांगला आहे. आज तुमचा जोडीदाराशी वाद होऊ शकतो, परंतु तुम्ही ते तुमच्या समजुतीने संपवाल, परस्पर समज वाढेल. सामाजिक कार्यात हातभार लावा. आजूबाजूच्या परिसरात होणार्‍या भजन आणि कीर्तनात तुम्ही सहभागी व्हा, त्यामुळे तुमचा सर्व लोकांशी सलोखा वाढेल. राजकारणात करिअर करू इच्छिणाऱ्यांसाठी काळ चांगला आहे. घरातून बाहेर पडताना ज्येष्ठांच्या चरणस्पर्श करून त्यांचे आशीर्वाद घेतले तर सर्व कामे पूर्ण होतील. घर, फ्लॅट खरेदी करण्यासाठी तुम्ही ज्या योजना आखत होत्या, त्या आज यशस्वी होतील. नवीन वाहनाचा आनंद मिळेल. घरोघरी शुभ कार्यक्रमाचे आयोजन केले जाईल. जर तुम्ही याआधी कोणतीही गुंतवणूक केली असेल, तर तुम्हाला त्याचा पूर्ण फायदाही मिळेल.

कुंभ 

कुंभ राशीच्या (Aquarius Horoscope) लोकांसाठी आजचा दिवस संमिश्र आहे. व्यवसाय करणारे लोक व्यवसायात नवीन योजना राबवतील, ज्यामुळे ते व्यवसायाला पुढे नेण्यात यशस्वी होतील. नोकरदार लोकांना नवीन नोकरीची ऑफर मिळेल, ज्यामध्ये उत्पन्न अधिक असेल. आज तुम्ही कोणताही विचार करण्यापूर्वी दोनदा विचार करा. कारण नकळत तुमच्या वृत्तीमुळे कोणाच्या तरी भावना दुखावू शकतात. आज तुम्ही तुमचे पैसे धार्मिक कार्यात गुंतवू शकता, ज्यामुळे तुम्हाला मानसिक शांती मिळण्याची शक्यता आहे. आज जर तुमच्याकडे मोकळा वेळ असेल तर तुम्ही या वेळेचा उपयोग ध्यान आणि योगासने करण्यासाठी करू शकता. तुम्हाला मानसिक शांती मिळेल. मित्रांच्या माध्यमातून तुम्हाला उत्पन्नाच्या संधी मिळतील. तुमची आर्थिक स्थिती चांगली राहील. जोडीदाराचे सहकार्य मिळेल.

मीन 

मीन राशीच्या (Pisces Horoscope) लोकांसाठी आजचा दिवस चांगला आहे. तुम्हाला आज जो मोकळा वेळ मिळेल त्याचा तुम्ही पुरेपूर आनंद घ्या. विनाकारण पैसे खर्च करू नका कारण हेच पैसे उद्या तुमच्या कठीण प्रसंगी तुम्हाला उपयोगी पडतील म्हणून पैसे वाचवण्याचा विचार करा. जर तुम्ही तुमच्या घरगुती जबाबदाऱ्यांकडे दुर्लक्ष केले तर काही लोक तुमच्यावर नाराज होऊ शकतात. तुमच्या वैवाहिक जीवनात आनंद आणि शांती असेल. तुमच्या मनात काही गोष्टी साचून राहिल्या असतील तर तुम्ही त्या तुमच्या वडिलांबरोबर देखील शेअर करू शकता. जे बेरोजगार आहेत त्यांना रोजगाराच्या चांगल्या संधी मिळतील. तुमचे रखडलेले पैसे तुम्हाला मिळतील. वडिलोपार्जित संपत्तीतून आर्थिक लाभ मिळण्याची शक्यता आहे. 

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

महत्त्वाच्या बातम्या : 

Horoscope Today 8 May 2023 : 'या' राशीच्या लोकांना आज आर्थिक लाभ होईल; जाणून घ्या सर्व 12 राशींचं आजचं राशीभविष्य

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Devendra Fadnavis: शक्तिपीठ मार्ग बदलणार, देवेंद्र फडणवीसांनी विधानसभेत सगळंच सांगितलं, कसा असणार मार्ग?
शक्तिपीठ मार्ग बदलणार, देवेंद्र फडणवीसांनी विधानसभेत सगळंच सांगितलं, कसा असणार मार्ग?
Devendra Fadnavis: एकट्या विदर्भात 5 लाख कोटींची गुंतवणूक, इतिहासातील सर्वात मोठी भरती; मिहानमध्ये IT क्षेत्रातले बिग-6; मुख्यमंत्र्यांची विधानसभेत मोठी घोषणा
एकट्या विदर्भात 5 लाख कोटींची गुंतवणूक, इतिहासातील सर्वात मोठी भरती; मिहानमध्ये ITक्षेत्रातले बिग-6; मुख्यमंत्र्यांची विधानसभेत मोठी घोषणा
कोल्हापुरात 100 कोटीतून 60 कोटींचे सुद्धा रस्ते होणार नाहीत, महापालिका मतदान होईपर्यंत रस्ते टिकले तरी धन्यता; सतेज पाटलांचा हल्लाबोल, आता राजेश क्षीरसागरांचे चॅलेंज, म्हणाले..
कोल्हापुरात 100 कोटीतून 60 कोटींचे सुद्धा रस्ते होणार नाहीत, महापालिका मतदान होईपर्यंत रस्ते टिकले तरी धन्यता; सतेज पाटलांचा हल्लाबोल, आता राजेश क्षीरसागरांचे चॅलेंज, म्हणाले..
Pune Crime News: पुण्यात दिवसाढवळ्या करायचे घरफोड्या, पोलिसांना सुगावा लागताच मोठी कारवाई, सोन्या-चांदीचे दागिने जप्त
पुण्यात दिवसाढवळ्या करायचे घरफोड्या, पोलिसांना सुगावा लागताच मोठी कारवाई, सोन्या-चांदीचे दागिने जप्त

व्हिडीओ

Rahul Narvekar Nagpur : आज अधिवेशनात विरोधी नेते पदाचा निकाल लागणार? राहुल नार्वेकर स्पष्टच बोलले..
Devendra Fadnavis vs Siddharth Kharat : तुम्हाला सभागृहाची शिस्त माहिती नाही,फडणवीस चिडले
Prithviraj Chavan on India PM : मराठी माणूस भारताचा पंतप्रधान होणार, पृथ्वीराज चव्हाणांचं भाकीत
Mahayuti on BMC Election : महायुतीचं ठरलं, मुंबईसाठी पुढील दोन दिवसांत जागावाटपासाठी बैठक
Prithviraj Chavan on PM : मराठी माणूस भारताचा पंतप्रधान होणार, पृथ्वीराज चव्हाणांचं भाकीत

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Devendra Fadnavis: शक्तिपीठ मार्ग बदलणार, देवेंद्र फडणवीसांनी विधानसभेत सगळंच सांगितलं, कसा असणार मार्ग?
शक्तिपीठ मार्ग बदलणार, देवेंद्र फडणवीसांनी विधानसभेत सगळंच सांगितलं, कसा असणार मार्ग?
Devendra Fadnavis: एकट्या विदर्भात 5 लाख कोटींची गुंतवणूक, इतिहासातील सर्वात मोठी भरती; मिहानमध्ये IT क्षेत्रातले बिग-6; मुख्यमंत्र्यांची विधानसभेत मोठी घोषणा
एकट्या विदर्भात 5 लाख कोटींची गुंतवणूक, इतिहासातील सर्वात मोठी भरती; मिहानमध्ये ITक्षेत्रातले बिग-6; मुख्यमंत्र्यांची विधानसभेत मोठी घोषणा
कोल्हापुरात 100 कोटीतून 60 कोटींचे सुद्धा रस्ते होणार नाहीत, महापालिका मतदान होईपर्यंत रस्ते टिकले तरी धन्यता; सतेज पाटलांचा हल्लाबोल, आता राजेश क्षीरसागरांचे चॅलेंज, म्हणाले..
कोल्हापुरात 100 कोटीतून 60 कोटींचे सुद्धा रस्ते होणार नाहीत, महापालिका मतदान होईपर्यंत रस्ते टिकले तरी धन्यता; सतेज पाटलांचा हल्लाबोल, आता राजेश क्षीरसागरांचे चॅलेंज, म्हणाले..
Pune Crime News: पुण्यात दिवसाढवळ्या करायचे घरफोड्या, पोलिसांना सुगावा लागताच मोठी कारवाई, सोन्या-चांदीचे दागिने जप्त
पुण्यात दिवसाढवळ्या करायचे घरफोड्या, पोलिसांना सुगावा लागताच मोठी कारवाई, सोन्या-चांदीचे दागिने जप्त
Gujarat Crime: गुजरातमध्ये 500 जणांच्या जमावानं चारी बाजूने घेरून पोलिसांची धडाधड डोकी फोडली; दगडफेक, गोफणी, धनुष्यबाणाने हल्ला, वाहने सुद्धा जाळली, तब्बल 47 अधिकारी जखमी
गुजरातमध्ये 500 जणांच्या जमावानं चारी बाजूने घेरून पोलिसांची धडाधड डोकी फोडली; दगडफेक, गोफणी, धनुष्यबाणाने हल्ला, वाहने सुद्धा जाळली, तब्बल 47 अधिकारी जखमी
Mahanagarpalika Election: मनपा निवडणुकीत महायुती होण्यावर शिक्कामोर्तब होताच शिंदेंच्या शिवसेनेनं आता नवं अस्त्र उपसलं; भाजपला खिंडीत पकडणार!
मनपा निवडणुकीत महायुती होण्यावर शिक्कामोर्तब होताच शिंदेंच्या शिवसेनेनं आता नवं अस्त्र उपसलं; भाजपला खिंडीत पकडणार!
Dhananjay Munde: धनंजय मुंडे पोटतिडकीने म्हणाले, महाराष्ट्रातील सामाजिक समता संपलेय; देवेंद्र फडणवीसांनी एका वाक्यात उत्तर देऊन विषय संपवला
धनंजय मुंडे पोटतिडकीने म्हणाले, महाराष्ट्रातील सामाजिक समता संपलेय; देवेंद्र फडणवीसांनी एका वाक्यात उत्तर देऊन विषय संपवला
Ahilyanagar Leopard Attack : गिन्नी गवतात दबा धरुन बसला; संधी साधून सिद्धेशवर घातली झडप; चार वर्षाच्या चिमुकल्याचा जागेवरच मृत्यू, नरभक्षक बिबट्याला ठार मारण्याची मागणी
गिन्नी गवतात दबा धरुन बसला; संधी साधून सिद्धेशवर घातली झडप; चार वर्षाच्या चिमुकल्याचा जागेवरच मृत्यू, नरभक्षक बिबट्याला ठार मारण्याची मागणी
Embed widget