एक्स्प्लोर

Horoscope Today : 'या' राशींच्या लोकांसाठी आजचा दिवस असणार खास, वाचा आजचं राशीभविष्य...

Horoscope Today 8 January 2023 : आज रविवार दिनांक  8 जानेवारी 2023. काही राशींच्या लोकांसाठी आजचा दिवस खास असणार आहे.

Horoscope Today 8 January 2023 : आज रविवार दिनांक  8 जानेवारी 2023. आजचा दिवस मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या आणि तूळ या राशींच्या लोकांसाठी खास असणार आहे. इतरही राशींच्या लोकांसाठी आजचा दिवस चांगला राहणार आहे.  आज तुमच्या राशीबाबत नेमकं काय भाकित केलं आहे? याबाबतची माहिती आपण पाहणार आहोत. जाणून घेऊयात सविस्तर आजचं राशीभविष्य...

मेष

मेष राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस चांगला जाणार आहे. व्यवसाय करणाऱ्या लोकांसाठी आजचा दिवस उत्तम राहील. व्यवसाय वाढीसाठी रखडलेल्या योजना पुन्हा सुरू कराल, त्यामध्ये तुम्ही खूप व्यस्त असाल. त्यामुळं तुम्ही कुटुंबाला वेळ देऊ शकणार नाही. तुमची कामे दिलेल्या वेळेत पूर्ण करण्याचा प्रयत्न कराल. जे सामाजिक क्षेत्रात कार्यरत आहेत, त्यांना आज समाजासाठी चांगले काम करण्याची अधिक संधी मिळेल.

वृषभ

वृषभ राशींच्या लोकांसाठी आजचा दिवस शुभ असणार आहे. आज व्यापारी आपल्या व्यवसायात अधिक नफा कमावतील. जे तरुण बेरोजगार आहेत, जे कामाच्या शोधात इकडे तिकडे फिरत आहेत, त्यांच्यासाठी आजचा दिवस चांगला आहे. आज त्यांना चांगला रोजगार मिळू शकतो. जे लोक सरकारी नोकरीत आहेत, त्यांची आज बदली होऊ शकते, ज्यामुळे ते थोडे नाराज दिसतील. जे घरापासून दूर नोकरी करत आहेत, त्यांना आज कुटुंबाची उणीव भासू शकते. 

मिथुन

मिथुन राशींच्या लोकांसाठी आजचा दिवस चांगला जाणार आहे. जे लोक फायनान्सचे काम करतात, त्यांच्यासाठी आज नवीन ग्राहक मिळू शकतात. ज्यामुळं त्यांचा फायनान्सचा व्यवसाय प्रगती करेल. त्यानुसार तुमचे कमिशनही वाढेल. आज तुम्ही तुमच्या मित्रांसोबत थोडा वेळ घालवाल.


कर्क 

कर्क राशीच्या लोकांबद्दल बोलायचे झाले तर आजचा दिवस तुमच्यासाठी संमिश्र असणार आहे. व्यवसाय करणारे लोक आपला व्यवसाय वाढवण्यासाठी नवीन मार्ग तयार करतील. जे लोक कपड्यांचा व्यवसाय करतात, त्यांना आज ग्राहकांच्या आवडीनिवडी सांभाळाव्या लागतील. तरुणांनी आपल्या मनातील गोष्टी आपल्या आईला सांगाव्यात. तुमची रखडलेली कामे पूर्ण होतील.

सिंह

नोकरदार लोक त्यांच्या कार्यक्षेत्रातील कामे चांगल्या प्रकारे पूर्ण करतील. कोणतीही चूक होणार नाही याची काळजी घेतील. व्यवसाय करणाऱ्या लोकांना आज व्यवसायात चढ-उतार दिसतील. त्यामुळे ते खूप अस्वस्थ दिसतील. सिंह राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस संमिश्र असणार आहे. 


कन्या

जे लोक व्यवसाय करत आहेत, ते आज इच्छित नफा मिळवू शकतात. त्यांचा व्यवसाय वाढवण्यासाठी नवीन मार्ग स्वीकारतील. आज हॉटेल आणि रेस्टॉरंट व्यावसायिकांना चांगला फायदा होईल.  मित्रांकडून मदत मिळेल. त्यांच्या सहकार्यानं कामे सोपी होतील. आरोग्यामध्ये चढ-उतार होतील. तुम्ही तुमच्या दैनंदिन दिनचर्येत बदल केले तर ते तुमच्यासाठी चांगले राहील. आज तुमचा आत्मविश्वास वाढेल.

तूळ

आज तुम्हाला कार्यालयीन कामे पूर्ण करण्यासाठी घाई करावी लागेल, ज्यामुळं तुम्हाला यश मिळेल. तुम्ही केलेल्या कामावर तुमचे वरिष्ठ खूश होतील. आज व्यावसायिकांना आर्थिक लाभ होईल. त्याचा व्यवसाय सुरळीत चालेल. काही कारणास्तव थांबलेली कामे आज पूर्ण करू शकाल.


वृश्चिक

नोकरदार लोक आपली कामे वेळेवर पूर्ण करण्यात यशस्वी होतील. आज तुम्ही कोणाच्या वादात पडणे टाळावे, अन्यथा अडचणीत येऊ शकता. सोन्या-चांदीचा व्यवसाय करणारे लोक आज काहीसे नाराज दिसतील. जे लोक सामाजिक क्षेत्रात काम करत आहेत, त्यांच्या मान-सन्मानात वाढ होईल. ज्यामुळं ते खूप आनंदी दिसतील.

धनु

जे लोक अभियांत्रिकी क्षेत्रात कार्यरत आहेत, त्यांच्या पदात आज वाढ होण्याची शक्यता आहे. जे व्यापाऱ्यांना आज चांगला नफा मिळू शकतो. ज्या विद्यार्थ्यांचा अभ्यास काही कारणास्तव अपूर्ण राहिला होता, ते आज पूर्ण करू शकतात. सर्वांच्या परस्पर समन्वयामुळं घरातील वातावरण प्रसन्न राहील. आरोग्याची काळजी घ्यावी लागेल. 

मकर

मकर राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस आनंदाचा असेल. जे वडिलोपार्जित व्यवसाय करत आहेत, त्यांना आज चांगला नफा मिळेल. युवकांनी मेहनत करावी, हार मानू नये, सर्व आव्हानांना खंबीरपणे सामोरे जावे. जर तुमची नकारात्मक लोकांशी मैत्री असेल तर त्यांच्यापासून दूर राहा. नोकरदार लोक आज आपली कामे करण्यात यशस्वी होतील. आज तुम्हाला काही नवीन आव्हाने देखील मिळतील, ज्यांचा तुम्ही खंबीरपणे सामना कराल. 


कुंभ

आज कुंभ राशींच्या लोकांची तुमची रखडलेली कामे पूर्ण होतील. तुम्ही इतरांच्या मदतीसाठी पुढे जाल. नोकरदार लोकांनी त्यांच्या कार्यक्षेत्रात अधिक मेहनत घेऊन काम केले तर ते तुमच्यासाठी चांगले राहील. तुमचे वरिष्ठ अधिकारीही तुमच्यावर खुश राहतील. ज्यांना व्यवसायात बदल करायचा आहे त्यांनी वेळेनुसार ते करावा. कुटुंबातील सदस्यांच्या आजारपणाची चिंता आज दूर होईल. .

मीन

मीन राशींच्या लोकांना सर्व क्षेत्रांतून चांगल्या बातम्या ऐकायला मिळतील. नोकरदार लोकांना आज त्यांच्या नोकरीत आज प्रगती पाहायला मिळेल. त्यामुळं ते खूप आनंदी दिसतील. आज जे बेरोजगार आहेत त्यांनाही काही चांगला रोजगार मिळू शकतो. व्यवसाय करणाऱ्या लोकांना त्यांच्या व्यवसायात अपेक्षित नफा मिळेल.

 

महत्त्वाच्या बातम्या

Horoscope Today 22 August 2026: आजचा श्रावणी शनिवार 7 राशींसाठी भाग्याचा! अद्भूत शुभ योग जुळले, शनिकृपेने कोण भाग्यशाली? आजचे राशीभविष्य वाचा...
आजचा श्रावणी शनिवार 7 राशींसाठी भाग्याचा! अद्भूत शुभ योग जुळले, शनिकृपेने कोण भाग्यशाली? आजचे राशीभविष्य वाचा...
Lucky Zodiac Signs 22 August 2026 : 22 ऑगस्टची तारीख ठरणार गेमचेंजर! दिवसाच्या सुरुवातीलाच मिळणार शुभवार्ता; आर्थिक लाभ मिळेल? वाचा लकी राशी
22 ऑगस्टची तारीख ठरणार गेमचेंजर! दिवसाच्या सुरुवातीलाच मिळणार शुभवार्ता; आर्थिक लाभ मिळेल? वाचा लकी राशी
Weekly Horoscope: सिंह, कन्या राशींसाठी खर्च वाढण्याचे संकेत, ऑगस्टचा शेवटचा आठवडा, पैसा जपून वापरा, साप्ताहिक राशीभविष्य
सिंह, कन्या राशींसाठी खर्च वाढण्याचे संकेत, ऑगस्टचा शेवटचा आठवडा, पैसा जपून वापरा, साप्ताहिक राशीभविष्य
Weekly Horoscope: मिथुन, कर्क राशींसाठी टेन्शन वाढण्याचे संकेत, ऑगस्टचा शेवटचा आठवडा सतर्कतेचा, पैसा, नोकरी, प्रेम... साप्ताहिक राशीभविष्य
मिथुन, कर्क राशींसाठी टेन्शन वाढण्याचे संकेत, ऑगस्टचा शेवटचा आठवडा सतर्कतेचा, पैसा, नोकरी, प्रेम... साप्ताहिक राशीभविष्य

व्हिडीओ

Abhijeet Dipke On School : शाळेत धडक, नियम किती कडक? | Special Report ABP Majha
Prithviraj Chavan On NCP : पृथ्वीराज चव्हाणांचा दावा, तापली राजकीय हवा | Special Report ABP Majha
Anganwadi Sevika : पोषण आहाराचं वास्तव, अन्याय कारवाईचा विस्तव | Special Report ABP Majha
Vishakha Raut BMC : नगरसेवक पद धोक्यात, कुणबी प्रमाणपत्र रद्द; विखाशा राऊत काय म्हणाल्या? | ABP Majha Marathi News
Laxman Hake Pune : 1 सप्टेंबरला ओबीसींना मुंबईत येण्याचं आवाहन, सरकारने फसवलंय म्हणत हाकेंचा हल्लाबोल!

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Swati Khanna : लंडनमध्ये शिक्षण, दिल्ली हायकोर्टात वकिली, राहुल गांधींसोबत संसदमार्ग पोलीस ठाण्यासमोर ठिय्या, कोण आहेत स्वाती खन्ना?
 राहुल गांधी आणि साहिलसोबत ठिय्या आंदोलनात दिवसभर उपस्थिती, वकील स्वाती खन्ना कोण आहेत?
ISRO कडून ऑर्डर मिळताच संरक्षण आणि एरोस्पेस पेनी स्टॉकला अप्पर सर्किट, जाणून घ्या
ISRO कडून ऑर्डर मिळताच संरक्षण आणि एरोस्पेस पेनी स्टॉकला अप्पर सर्किट, जाणून घ्या
PM Awas Yojana Beneficiary List 2026 : पीएम आवास योजना ग्रामीण घरकुल यादीमध्ये नाव कसं चेक करायचं? 
PM Awas Yojana Beneficiary List 2026 : पीएम आवास योजना ग्रामीण घरकुल यादीमध्ये नाव कसं चेक करायचं? 
Rahul Gandhi : साहिलच्या शरीरात छर्रे, आठ तासानंतर एफआयआर दाखल, गृहसचिव आणि अमित शाह यांना अंतिम परवानगी द्यावी लागली, राहुल गांधी यांचा दावा
साहिल लोचब याच्यासोबत आठ तास ठिय्या, एफआयआर दाखल होताच राहुल गांधी म्हणाले, न्यायाच्या दिशेनं पहिलं पाऊल
Nashik Road Issue : नाशिकमध्ये रस्ता खचला, खडीनं भरलेला डंपर रस्त्यामध्येच अडकला, रस्त्यांच्या दर्जाचा प्रश्न ऐरणीवर, पाहा Video
नाशिकमध्ये रस्ता खचला, खडीनं भरलेला डंपर रस्त्यामध्येच अडकला, Video व्हायरल
Tarique Rahman India Visit: बांगलादेशच्या पंतप्रधानांच्या भारत दौऱ्यावरून 'गोंधळ', राष्ट्रपती भवनाने अवघ्या तासाभरातच स्वागत संदेश मागे घेतला!
बांगलादेशच्या पंतप्रधानांच्या भारत दौऱ्यावरून 'गोंधळ', राष्ट्रपती भवनाने अवघ्या तासाभरातच स्वागत संदेश मागे घेतला!
Tukaram Mundhe: राजकारणात प्रवेश करणार का? FDA आयुक्त तुकाराम मुंढेंच्या एका वाक्यातील उत्तरानं भूवया उंचावल्या!
राजकारणात प्रवेश करणार का? FDA आयुक्त तुकाराम मुंढेंच्या एका वाक्यातील उत्तरानं भूवया उंचावल्या!
Sugar Price Hike : साखरेच्या दरात वाढ कोणत्या कारणांमुळं? माजी साखर आयुक्त शेखर गायकवाड दोन कारणं सांगत म्हणाले...
साखरेच्या दरात वाढ कोणत्या कारणांमुळं? माजी साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी दोन कारणं सांगितली
Embed widget