एक्स्प्लोर

Horoscope Today 8 December 2025 : आज सोमवारच्या दिवशी 5 राशींवर असणार महादेवाची कृपा; संध्याकाळपर्यंत मिळणार शुभ संकेत, आजचे राशीभविष्य

Horoscope Today 8 December 2025 : सर्व 12 राशींसाठी आज सोमवारचा दिवस नेमका कसा असणार आहे. यासाठी वाचूयात सर्व 12 राशींचं आजचं राशीभविष्य. 

Horoscope Today 8 December 2025 : वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार, आज 8 डिसेंबर (December) 2025 चा दिवस आहे. त्यानुसार आजचा वार सोमवार आहे. हा दिवस भगवान शंकराला समर्पित आहे. आजच्या दिवशी भक्त शंकराच्या मंदिरात जाऊन महादेवाची पूजा करतात. तसेच, उपवास धरतात. आयुष्यात येणाऱ्या संकटांचा सामना करण्यासाठी बळ मिळावं तसेच, भविष्य चांगलं जाण्यासाठी लोक भगवान शंकराकडे प्रार्थना करतात. ग्रहांच्या हालचालीच्या दृष्टीने देखील आजचा दिवस खास असणार आहे. कारण लवकरच गुरु ग्रहाचं संक्रमण होणार आहे. त्यामुळे ग्रहांच्या संक्रमणाचा कोणकोणत्या राशींवर परिणाम होणार आणि 12 राशींसाठी आजचा दिवस नेमका कसा असणार आहे. यासाठी वाचूयात सर्व 12 राशींचं आजचं राशीभविष्य (Horoscope Today)

मेष रास (Aries Horoscope)

मेष राशीसाठी आजचा दिवस सकारात्मक असणार आहे. दिवसाची सुरुवात तुमची चांगली होईल. तसेच, तुमच्या विचारात स्थिरता राहील. आरोग्याच्या बाबतीत हलगर्जीपणा करु नका. तसेच, तुमच्या व्यवहारात आज तुम्हाला अपेक्षेपेक्षा जास्त लाभ मिळेल.

वृषभ रास (Taurus Horoscope)

वृषभ राशीसाठी आजचा दिवस पराक्रमाचा असणार आहे. तुमच्या नोकरीत चांगली प्रगती दिसून येईल. तसेच, तुमचा व्यवहार सुरळीत चालेल. आजच्या दिवसात तुम्ही अनेक महत्त्वाचे निर्णय घ्याल. तुमच्या निर्णयाने बॉस खुश होऊ शकतो. 

मिथुन रास (Gemini Horoscope)

मिथुन राशीसाठी आजचा दिवस बरकतीचा असणार आहे. आज तुम्हाला अचानक धनलाभ होऊ शकतो. संध्याकाळच्या वेळी मित्रांना भेटाल. त्यांच्याबरोबर छान वेळ घालवाल. तसेच तुमच्या व्यवसायाचा विस्तार वाढलेला दिसेल. 

कर्क रास (Cancer Horoscope)

कर्क राशीसाठी आजचा दिवस काहीसा आव्हानात्मक असणार आहे. आज तुमच्या मनासारखी एकही गोष्ट न झाल्यामुळे तुमचा क्रोध वाढेल. अशावेळी रागावर नियंत्रण ठेवा आणि निगेटीव्ह माणसांच्या संपर्कात राहू नका. 

सिंह रास (Leo Horoscope)

सिंह राशीसाठी आजचा दिवस सामान्य असणार आहे. आज तुम्हाला ना फायदा ना तोटा होणार आहे. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यासाठी आजचा दिवस फार चांगला आहे. संध्याकाळचा वेळ धार्मिक कार्यात घालवाल. 

कन्या रास (Virgo Horoscope)

कन्या राशीसाठी आजचा दिवस लाभदायी असणार आहे. आज तुम्हाला कामाच्या निमित्ताने प्रवास करावा लागू शकतो. तसेच, तुम्हाला जुन्या गुंतवणुकीतून चांगला लाभ मिळेल. घरात लवकरच शुभवार्ता मिळण्याची शक्यता आहे.

तूळ रास (Libra Horoscope)

तूळ राशीसाठी आजचा दिवस शुभकारक असणार आहे. आज तुमची अनेक दिवसांपासून रखडलेली कामे तुम्ही वेळेत पूर्ण करु शकता. तसेच, कामाच्या निमित्ताने तुम्हाला प्रवास करावा लागू शकतो. मुलांच्या आरोग्याची काळजी घ्या. 

वृश्चिक रास (Scorpio Horoscope)

वृश्चिक राशीसाठी दिवसाची सुरुवात चांगली असेल. दिवसाचा शेवट मात्र निराशाजनक असू शकतो. अशा वेळी आज कोणतीही मोठी रिस्क घेऊ नका. मात्र, तुम्ही केलेल्या मेहनतीचं फळ तुम्हाला नक्की मिळेल.

धनु रास (Saggitarius Horoscope)

धनु राशीसाठी आजचा दिवस खास असणार आहे. आज तुमची मोठ्या संकटातून सुटका होऊ शकते. महादेवाच्या कृपेने तुमच्या आर्थिक स्थिती चांगली भरभराट होईल. व्यवसायाचा विस्तार वाढेल.

मकर रास (Capricorn Horoscope)

मकर राशीच्या लोकांना जोडीदाराची चांगली साथ मिळेल.आज काही कारणास्त तुमच्या खर्चात वाढ होऊ शकते. अशा वेळी खर्च कमी करण्याचा प्रयत्न करा. तसेच, तुम्ही घेतलेल्या निर्णयाचं समाजत कौतुक होऊ शकतं. 

कुंभ रास (Aquarius Horoscope)

कुंभ राशीसाठी आजचा दिवस काहीसा आव्हानात्मक असणार आहे. आज तुम्हाला शत्रूवर विजय मिळवता येणार नाही. तसेच, मुलांच्या आरोग्याबाबत तुम्हाला सावधानता बाळगणं गरजेचं आहे. 

मीन रास (Pisces Horoscope)

मीन राशीसाठी आजचा दिवस खास असणार आहे. दिवसाची सुरुवातच तुम्ची फार सकारात्मक होणार आहे. त्यामुळे तुम्हाला फार प्रसन्न वाटेल. मुलांच्या बाबतीत तुम्हाला आज एखादी शुभवार्ता ऐकायला मिळू शकते.

हे ही वाचा :

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

Aries Yearly Horoscope 2026 : मेष राशीला नवीन वर्ष 2026 मध्ये मिळणार मोठ्ठं सरप्राईज, फक्त तुमची 'ही' चूक महागात पडेल, वाचा शिक्षण. करिअर, आणि नोकरी, वार्षिक राशीभविष्य

महत्त्वाच्या बातम्या

Surya Nakshatra Parivartan 2026 : अवघ्या काही तासांतच केतूच्या नक्षत्रात सूर्याचा प्रवेश; 31 ऑगस्टपर्यंत 3 राशींच्या पदरात पडणार फक्त पुण्य, मालामाल होतील राशी
अवघ्या काही तासांतच केतूच्या नक्षत्रात सूर्याचा प्रवेश; 31 ऑगस्टपर्यंत 3 राशींच्या पदरात पडणार फक्त पुण्य, मालामाल होतील राशी
Weekly Horoscope: कुंभ, मीन राशीसाठी ऑगस्टचा तिसरा आठवडा प्रगतीचा, आर्थिक लाभाचे योग, साप्ताहिक राशीभविष्य
कुंभ, मीन राशीसाठी ऑगस्टचा तिसरा आठवडा प्रगतीचा, आर्थिक लाभाचे योग, साप्ताहिक राशीभविष्य
Weekly Horoscope : धनु, मकर राशीसाठी ऑगस्टचा तिसरा आठवडा धनलाभाचा, नोकरीत बदलीचे संकेत; आर्थिक स्थिती सुधारणा, साप्ताहिक राशीभविष्य
धनु, मकर राशीसाठी ऑगस्टचा तिसरा आठवडा धनलाभाचा, नोकरीत बदलीचे संकेत; आर्थिक स्थिती सुधारणा, साप्ताहिक राशीभविष्य
Budhaditya Yog 2026 : बुधादित्य योगामुळे सुरु होणार सुवर्णकाळ, 22 ऑगस्टपासून 4 राशींचं नशीब पालटणार, धनलाभाचे सुवर्णयोग
बुधादित्य योगामुळे सुरु होणार सुवर्णकाळ, 22 ऑगस्टपासून 4 राशींचं नशीब पालटणार, धनलाभाचे सुवर्णयोग

व्हिडीओ

Abhijeet Dipke Hingoli PC : नवीन पीएम हाऊस बांधण्यापेक्षा शाळा बांधा; अभिजीत दीपके आक्रमक!
Dhananjay Munde Speech : बहिणीचे आभार मानू कसे, पंकजा मुंडेंसाठी धनूभाऊंचे भाषण
Sunil Kendrekar Majha Katta : आएएस अधिकारी सुनील केंद्रेकर शेतीकडे कसे वळवले?
Special Report Gandhi Topi : उर्दू शाळेची शान, गांधी टोपीला मान, गणवेशात गांधी टोपी
Pm Modi Speech Highlites : मोदींच्या लाल किल्ल्यावरील भाषणातले टॉप 10 मुद्दे

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
रस्ते दुरुस्ती, घनकचरा ते पाणीपुरवठा, चाकण MIDC बाबत मंत्री उदय सामंतांचे मोठे निर्णय, कंत्राटदारांनाही दिला इशारा
रस्ते दुरुस्ती, घनकचरा ते पाणीपुरवठा, चाकण MIDC बाबत मंत्री उदय सामंतांचे मोठे निर्णय, कंत्राटदारांनाही दिला इशारा
Rohit Pawar : उद्योजकांनी प्रेस घेतल्यावर गडबड झाली, उद्योगमंत्री रविवारी चाकणमध्ये गेलेत, एवढ्या दिवस काय गोट्या खेळत होते का? : रोहित पवार
उदय सामंतांची चाकण एमआयडीसीत रविवारी बैठक, एवढ्या दिवस काय गोट्या खेळत होते का? : रोहित पवार
अमित ठाकरेंच्या भेटीनंतर मुंबईतील फ्लॅट एजंट भावेश कावरेची माफी; म्हणाला, मला शब्दाला शब्द वाढवायचा नाही
अमित ठाकरेंच्या भेटीनंतर मुंबईतील फ्लॅट एजंट भावेश कावरेची माफी; म्हणाला, मला शब्दाला शब्द वाढवायचा नाही
चार वर्षांपासून गर्लफ्रेंड, घरात लग्नाची बोलणी सुरु असतानाच दोस्ताच्या कारमध्ये दिसली; बाॅयफ्रेंड थांबवण्यासाठी धावत्या कारच्या बोनेटवर चढला अन् 200 मीटरवर चिरडून जीवानिशी गेला
चार वर्षांपासून गर्लफ्रेंड, घरात लग्नाची बोलणी सुरु असतानाच दोस्ताच्या कारमध्ये दिसली; बाॅयफ्रेंड थांबवण्यासाठी धावत्या कारच्या बोनेटवर चढला अन् 200 मीटरवर चिरडून जीवानिशी गेला
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 ऑगस्ट 2026 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 ऑगस्ट 2026 | रविवार
उपचाराच्या नावाखाली तंत्र-मंत्र करत मौलवीचा महिलेवर अत्याचार; युपीला पळून जाण्याच्या तयारीत, पोलिसांनी उचलला
उपचाराच्या नावाखाली तंत्र-मंत्र करत मौलवीचा महिलेवर अत्याचार; युपीला पळून जाण्याच्या तयारीत, पोलिसांनी उचलला
Prithviraj Chavan : गोपीनाथ मुंडेंबाबत माझ्या मनात आदर, ते काँग्रेसमध्ये आले असते तर 2014 ची निवडणूक जिंकलो असतो : पृथ्वीराज चव्हाण
गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये आले असते तर 2014 ला हारलो नसतो, मुख्यमंत्रिपदासाठी त्यांचं नाव सुचवलं असतं: पृथ्वीराज चव्हाण
Revanth Reddy: काँग्रेस सरकारला बदनाम करण्यासाठी कर्नाटक आणि तामिळनाडूतील मंदिरांना भेट देत तंत्र-मंत्र विधी केल्याचा आरोप
काँग्रेस सरकारला बदनाम करण्यासाठी कर्नाटक आणि तामिळनाडूतील मंदिरांना भेट देत तंत्र-मंत्र विधी केल्याचा आरोप
Embed widget