Horoscope Today 6 May 2024 : आजचा दिवस काही लोकांसाठी चांगले, तर काहींसाठी वाईट परिणाम आणू शकतो. आज तुमचे ग्रह तुमच्यासाठी अनुकूल आहेत की नाही? आज तुम्हाला कोणत्या आव्हानांना तोंड द्यावे लागेल किंवा तुम्हाला कोणत्या प्रकारच्या संधी मिळू शकतात? कर्क, सिंह, कन्या राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस व्यवसाय, आरोग्य, नातेसंबंध आणि प्रेमासाठी किती खास असणार आहे? आजचे राशीभविष्य (Horoscope Today) जाणून घ्या.


कर्क रास (Cancer Horoscope Today)


नोकरी (Job) - आज कामाच्या ठिकाणी कोणतीच जोखीम घेऊ नका. या जोखमीमुळे तुमचे आर्थिक, सामाजिक नुकसान होऊ शकते. 


व्यापार (Business) - आज तुमचे प्रतिस्पर्धी तुमच्या व्यवसायिक क्षेत्रात तुमच्या कामात हस्तक्षेप करू शकतात. त्यामुळे वेळीच त्यांना आवरणं गरजेचं आहे.


तरूण (Youth) - कामाच्या ठिकाणी तुम्हाला नवीन संधी मिळू शकतात. पण, कोणतंही काम हातात घेण्याआधी नीट विचार करा. 


आरोग्य (Health) - जर तुम्ही उच्च रक्तदाबाचे रूग्ण असाल तर तुम्ही तुमच्या रागावर नियंत्रण ठेवा.


सिंह रास (Leo Horoscope Today)


नोकरी (Job) - तुम्ही कामाव्यतिरिक्त तुमच्या व्यवसायाकडेही लक्ष देणं गरजेचं आहे. त्या ठिकाणी दुर्लक्ष करून चालणार नाही. 


व्यापार (Business) - तुमचा व्यवसाय चांगला चालेल. कामाच्या संदर्भात तुम्हाला प्रवास करावा लागू शकतो. 


विद्यार्थी (Students) - विद्यार्थ्यांच्या सध्या सुट्ट्या सुरु आहेत. त्यामुळे तुम्ही तुमच्या आवडीचे काम करू शकतात. यामुळे तुमच्या कलागुणांना वाव मिळू शकतो. 


आरोग्य (Health) - तुमचे आरोग्य पूर्वीपेक्षा चांगले होऊ शकते. तुमचे दिर्घकालीन आजारही दूर होऊ शकतात. 


कन्या रास (Virgo Horoscope Today)


नोकरी (Job) - तुमच्या कामात तुमची चांगली प्रगती होईल. सहकाऱ्यांकडून तुमच्या कामाचं कौतुक होईल. 


व्यापार (Business) - व्यवसायाबद्दल बोलायचं झाल्यास, इतरांना तुमच्या व्यवसायात हस्तक्षेप करून देण्याचा प्रयत्न करू नका. तुमचे निर्णय तुम्ही घ्या. 


तरूण (Youth) - तुम्हाला ज्या काही गोष्टींचा त्रास होतोय. त्याबद्दल तुम्ही कुटुंबिय़ांशी चर्चा करा. यामुळे अनेक प्रश्न सुटतील. 


आरोग्य (Health) - रक्ताशी संबंधित कोणतीही समस्या तुम्हाला त्रास देऊ शकते. त्यामुळे नीट काळजी घ्या. 


(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)


हेही वाचा: 


Weekly Numerology 6 to 12 May 2024 : 'या' जन्मतारखेच्या लोकांसाठी नवीन आठवडा सुपर लकी; ठरवलेलं प्रत्येक काम होईल पूर्ण, आरोग्यही राहील उत्तम