Horoscope Today 6 June 2024 : पंचांगानुसार, आज 6 जून 2024, गुरुवारचा दिवस जवळपास सर्व राशीच्या लोकांसाठी लाभदायक ठरेल. या दिवशी ग्रहांच्या हालचाली पाहता आजचा दिवस फार महत्त्वाचा आहे, ज्याचा परिणाम सर्व 12 राशींच्या लोकांवर दिसून येईल. तुमचा आजचा दिवस कसा असेल? कोणासाठी दिवस फलदायी ठरेल? 12 राशींचे आजचे राशीभविष्य (Horoscope Today) जाणून घ्या.


मेष (Aries Horoscope Today)


जुनी आणी वसूल होतील. अशा वेळी तुम्ही केलेले उत्तम आर्थिक नियोजन फायद्याचे ठरेल.


वृषभ (Taurus Horoscope Today)


भावनेबरोबरच व्यवहारालाही उत्तम महत्व द्याल. घरामध्ये दुरुस्तीची कामे निघतील.


मिथुन (Gemini Horoscope Today)


नोकरी-व्यवसायात अनेक दिवस रखडलेली कामे उजेडात येऊन त्याची लवकर कारवाई कराल.


कर्क (Cancer Horoscope Today)


तरुण वर्ग आपल्या जोडीदार निवडण्यात यशस्वी होईल. महिलांना इतरांवर विश्वास ठेवावा लागेल. 


सिंह (Leo Horoscope Today)


घरातील शांतता टिकवण्यासाठी मध्यस्थीची भूमिका घ्यावी लागेल. अशा वेळी भावना बाजूला ठेवून कर्तव्याला प्राधान्य द्यावे लागेल.


कन्या (Virgo Horoscope Today)


जिथे जाल तिथे कष्ट आणि त्रासाचा सामना करावा लागेल. सरकारी नोकरीत असणाऱ्यांना याचा जास्त अनुभव येईल. 


तूळ (Libra Horoscope Today)


ज्यांचा स्वतंत्र धंदा आहे त्यांनी संयम पाळावा. आरोग्याच्या दृष्टीने जुन्या रेंगाळणाऱ्या व्याधींना तोंड द्यावे लागेल.


वृश्चिक (Scorpio Horoscope Today)


निग्रह निश्चय आणि नियमितपणा या त्रिसूत्रींना धरून राहिलात तर काम करणे सोपे जाईल.


धनु (Sagittarius Horoscope Today)


आज समस्यांना संधी माना. कोणत्याही कामाला आत्मविश्वासाने सामोरे जा म्हणजे काम होईल. 


मकर (Capricorn Horoscope Today)


स्वतःमधील चांगल्या गुणांचा आढावा घेऊन काम करणे महत्त्वाचे ठरेल. नकारात्मक विचारांना जागा देऊ नका. 


कुंभ (Aquarius Horoscope Today)


आज तुमचा दृष्टिकोन जरा सुधारेल. घरामध्ये काही सुधारणा किंवा नवीन खरेदी करण्याचा विचार कराल.


मीन (Pisces Horoscope Today)


अनपेक्षित पैसा खर्च करावा लागेल. घरातील दोन पिढीच्या विचारातील तफावत तुम्हाला बरीच अस्वस्थ करून जाईल


डॉ. शिल्पा अग्निहोत्री (ज्योतिषाचार्य)


संपर्क - 9823322117                                         


हेही वाचा:


Numerology : फारच रोमँटिक असतात 'या' जन्मतारखेची मुलं; जोडीदाराला ठेवतात नेहमी खुश, महागड्या गोष्टींचा असतो यांना शौक