एक्स्प्लोर

Horoscope Today 5 May 2026 : आज मंगळवारचा दिवस 7 राशींसाठी भाग्याचा; बजरंगबलीची सदैव राहील कृपा; वाचा आजचे राशीभविष्य

Horoscope Today 5 May 2026 : ग्रहांच्या संक्रमणाचा कोणकोणत्या राशींवर परिणाम होणार आणि 12 राशींसाठी आजचा दिवस नेमका कसा असणार आहे. यासाठी वाचूयात सर्व 12 राशींचं आजचं राशीभविष्य. 

Horoscope Today 5 May 2026 : वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार, आज 5 मे 2026 चा दिवस आहे. त्यानुसार आजचा वार मंगळवार आहे. हा दिवस आपण भगवान हनुमानाला समर्पित करतो. त्यानुसार, भक्त आज बजरंगबलीची पूजा करतात. उपवास धरतात आणि इच्छित फळ मागतात. ग्रहांच्या हालचालीच्या दृष्टीने देखील आजचा दिवस खास असणार आहे. कारण लवकरच शनि ग्रहाचं संक्रमण होणार आहे. त्यामुळे ग्रहांच्या संक्रमणाचा कोणकोणत्या राशींवर परिणाम होणार आणि 12 राशींसाठी आजचा दिवस नेमका कसा असणार आहे. यासाठी वाचूयात सर्व 12 राशींचं आजचं राशीभविष्य (Horoscope Today). 

मेष रास (Aries Horoscope)

मेष राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस थोडा चिंतेचा असेल. प्रवास करताना तुम्हाला काही अडचणी उद्भवू शकतात. तसेच, तुमच्या उत्पन्नात चढ-उतार पाहायला मिळेल. तुमच्या मानसिक स्वास्थ्यात थोडाफार बदल जाणवेल. तुमच्या व्यवसायाची स्थिती मध्यम राहील. तुमच्या आजूबाजूच्या नकारात्मक गोष्टींचा परिणाम तुमच्यावर होऊ शकतो. 

वृषभ रास (Taurus Horoscope)

वृषभ राशीच्या व्यवसायात थोडा चढ-उतार पाहायला मिळेल. कोर्ट-कचेरीच्या संदर्भातील जुने वाद तुमचे लवकरच मिटतील. मुलांकडून तुम्हाला आज आनंदाची बातमी मिळेल. तसेच, लाल वस्तू दान केल्याने तुमच्या मार्गातील अडथळे दूर होण्याची शक्यता आहे. त्यासाठी प्रयत्नशील राहाल. 

मिथुन रास (Gemini Horoscope)

मिथुन राशीसाठीसुद्धा आजचा दिवस फार सामान्य असणार आहे. तुमच्या मान-सन्मानाला आज ठेच लागण्याची दाट शक्यता आहे. प्रवास करताना तुम्हाला काही गोष्टींची विशेष काळजी घ्यावी लागेल. तसेच, धार्मिक कार्यात सहभागी होताना विशेष विधी करावी लागेल. झोप पूर्ण न झाल्यामुळे तुमची चिडचिड होऊ शकते.

कर्क रास (Cancer Horoscope)

कर्क राशीच्या लोकांसाठी दिवसाची सुरुवात फार नकारात्मक होईल. तुमच्या मनाविरुद्ध काम झाल्यामुळे तुम्हाला फार निराश वाटेल. तुमचा व्यवसाय चांगला चालेल. मात्र, त्यात तुम्हाला मनासारखा लाभ मिळणार नाही. आजच्या दिवसात निळ्या वस्तूचं दान करणं तुमच्यासाठी लाभदायी ठरेल. 

सिंह रास (Leo Horoscope)

सिंह राशीच्या लोकांनी आपल्या आरोग्याची काळजी घेणं जास्त गरजेचं आहे. आज काही कारणास्तव तुमचं मन फार नाराज होऊ शकतं. तुमच्या भूतकाळातील आठवणी आज ताज्या होतील. नोकरदार वर्गातील लोकांसाठी आजचा दिवस मध्यम स्वरुपाचा असेल. काही विशेष घडणार नाही.

कन्या रास (Virgo Horoscope)

कन्या राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस फार सतर्कतेचा असणार आहे. तुमचे शत्रू तुमच्या वाईटावर आहेत या गोष्टीची जाणीव तुम्हाला सतत जाणवेल. त्यामुळे तुमच्या कामाशी तुम्ही प्रामाणिक राहा. त्यामध्ये जराही दिरंगाई करु नका. प्रेम जीवन देखील सामान्य राहील.

तूळ रास (Libra Horoscope)

तूळ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस चांगला असणार आहे. आज तुम्हाला तुमच्या आरोग्याची काळजी घेण्याची गरज आहे. तसेच, तुमच्या व्यवसायात तुम्हाला चांगलं यश मिळेल. कामाच्या ठिकाणी नवीन ऑर्डर्स येत असल्यामुळे तुमचं मन प्रसन्न राहील. मेहनतीचं फळ मिळेल. 

वृश्चिक रास (Scorpio Horoscope)

वृश्चिक राशीसाठी देखील आजचा दिवस शुभदायी असणार आहे. आज घरगुती कामांमध्ये तुम्ही व्यस्त राहाल. घरातील वातावरण चांगलं राहील. मात्र, भविष्याविषयी तुम्हाला चिंता वाटू शकते. अशा वेळी नकारात्मक विचार दूर करण्यासाठी चिंतन किंवा योग करा.

धनु रास (Saggitarius Horoscope)

धनु राशीसाठी आजचा दिवस सामान्य असेल. आज तुम्हाला नाक, कान घशाशी संबंधित आरोग्याच्या काही तक्रारी जाणवू शकतात. आज तुम्हाला तुमच्या मुलांकडून एखादी शुभवार्ता मिळू शकते. तसेच, देवी लक्ष्मीच्या कृपेने तुमची आर्थिक स्थिती चांगली असेल. कामाच्या निमित्ताने तुम्हाला प्रवास करावा लागू शकतो. 

मकर रास (Capricorn Horoscope)

मकर राशीच्या लोकांना धनहानीचे संकेत आहेत. त्यामुळे आज कोणताही पैशांचा व्यवहार करु नका. तसेच, गुंतवणुकीसाठी देखील आजचा दिवस योग्य नाही. ग्रहांची स्थिती तुमच्या राशीसाठी अनुकूल नसल्या कारणाने तुम्हाला त्याचे पडसाद भोगावे लागू शकतात. 

कुंभ रास (Aquarius Horoscope)

कुंभ राशीसाठी आजचा दिवस चांगला असेल. मात्र, आज कोणतीही महत्त्वाची कामे हाती घेऊ नका. त्यात तुम्हाला यश मिळणार नाही. तसेच, आरोग्याच्या बाबतीतही तुम्हाला तडजोड करावी लागू शकते. तुमच्या व्यवसायाचा विस्तार वाढेल. मात्र, मनासारखा लाभ मिळणार नाही. हिरव्या वस्तू दान करणं शुभकारक ठरेल.

मीन रास (Pisces Horoscope)

मीन राशीसाठी आजचा दिवस शुभकारक असणार आहे. आज तुमची अनेक दिवसांपासून रखडलेली काही महत्त्वाची कामे पार पडू शकतात. काही नवीन गोष्टी तुम्ही शिकण्याचा प्रयत्न कराल. तसेच, हाती घेतलेल्या कार्यात तुम्हाला यश मिळेल. लवकरच प्रवासाचे योग जुळून येतील. 

हे ही वाचा :

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

Sun Transit 2026 : शनिश्चरी अमावस्या देणार मोठ्ठं सरप्राईज; 6 राशींना अवघ्या काही दिवसांत मिळणार शुभवार्ता, धनलाभाचे शुभ योग

महत्त्वाच्या बातम्या

Horoscope Today 11 November 2026: आज भाऊबीजेचा दिवस 7 राशींसाठी भाग्याचा! अद्भूत शुभ योग जुळले, कोणाचं नशीब चमकणार? आजचे राशीभविष्य...
आज भाऊबीजेचा दिवस 7 राशींसाठी भाग्याचा! अद्भूत शुभ योग जुळले, कोणाचं नशीब चमकणार? आजचे राशीभविष्य...
Bhaubij 2026: उद्या भाऊबीज! भावाच्या औक्षणासाठी 'हा' शुभ मुहूर्त चुकवू नका! पूजा विधी, धार्मिक महत्त्व, परंपरा...
उद्या भाऊबीज! भावाच्या औक्षणासाठी 'हा' शुभ मुहूर्त चुकवू नका! पूजा विधी, धार्मिक महत्त्व, परंपरा...
Shani Transit 2026: अखेर शनिने नक्षत्र बदललं, 4 राशींचे नशीब फळफळलं! मोठा धनलाभ, उत्पन्नात वाढ, रखडलेली कामे पूर्ण होण्याचे संकेत
अखेर शनिने नक्षत्र बदललं, 4 राशींचे नशीब फळफळलं! मोठा धनलाभ, उत्पन्नात वाढ, रखडलेली कामे पूर्ण होण्याचे संकेत
Diwali Padwa Horoscope 2026: तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीन..आज 'दिवाळी पाडव्याचा' दिवस गेमचेंजर, 4 राशी मालामाल, पैसा, नोकरी, प्रेम.. राशीभविष्य..
तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीन..आज 'दिवाळी पाडव्याचा' दिवस गेमचेंजर, 4 राशी मालामाल, पैसा, नोकरी, प्रेम.. राशीभविष्य..

व्हिडीओ

Hasan Mushrif speech Gokul : ... ती बंटी पाटलांची शेवटची सभासमजा, 13 संचालकांना इशारा
Gokul Chairman Rajesh Patil: हसन मुश्रीफ भाषणाला उभे राहताच महायुतीचा उमेदवार जिंकला; गोकुळमध्ये काय घडलं?
Gokul Chairman Election 2026: गोकुळमध्ये शासननियुक्त 4 संचालक पोहोचले तेव्हा...काय घडलं?, VIDEO
Vivekanand Patil Gokul Morcha Speech : कोरमचं कौतुक सांगू नका, गोकुळ मोर्चातील धमाल भाषण
Varsha Usgaonkar Majha Katta: कॉलेजचे किस्से ते सिनेमातील प्रवास,वर्षा उसगांवकरांसोबत दिलखुलास गप्पा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Video: पाडव्यादिनी सुनील तटकरे बारामतीत; सुनेत्रा पवारांसोबत 45 मिनिटे चर्चा, विलिनीकरणाच्या मुद्द्यावर स्पष्टच बोलले
Video: पाडव्यादिनी सुनील तटकरे बारामतीत; सुनेत्रा पवारांसोबत 45 मिनिटे चर्चा, विलिनीकरणाच्या मुद्द्यावर स्पष्टच बोलले
तुमचं पण दूध जातं का गोकुळात? पिट्याभाईची कमेंट, अध्यक्ष निवडीनंतर कलाकारांमध्येही गोकुळची चर्चा
तुमचं पण दूध जातं का गोकुळात? पिट्याभाईची कमेंट, अध्यक्ष निवडीनंतर कलाकारांमध्येही गोकुळची चर्चा
बारामतीत 10 हजार पणत्यांनी उजळला सनसेट पॉईंट; अजित दादांच्या आठवणीत बारामतीकर भावूक
बारामतीत 10 हजार पणत्यांनी उजळला सनसेट पॉईंट; अजित दादांच्या आठवणीत बारामतीकर भावूक
दफनविधीसाठी जागा मिळेना, 8 तासांपासून मृतदेह प्रतिक्षेत; पीडित कुटुंबीयांचा संताप, तोडगा काढण्याचा प्रयत्न
दफनविधीसाठी जागा मिळेना, 8 तासांपासून मृतदेह प्रतिक्षेत; पीडित कुटुंबीयांचा संताप, तोडगा काढण्याचा प्रयत्न
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 10 नोव्हेंबर 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 10 नोव्हेंबर 2026 | मंगळवार
Gokul Chairman Election 2026: गोकुळच्या अध्यक्षपदी अजित पवारांचा 'राईट हँड' राजेश पाटील यांची निवड; महायुतीने अखेर कंडका पाडलाच, नेमकं काय काय घडलं?, A टू Z माहिती
गोकुळच्या अध्यक्षपदी अजित पवारांचा 'राईट हँड' राजेश पाटील यांची निवड; महायुतीने अखेर कंडका पाडलाच, नेमकं काय काय घडलं?, A टू Z माहिती
माझ्या विद्याच्या घरातील 4 माणसं जेलमध्ये होती, पहिल्या पत्नीबद्दल बोलताना चंद्रकांत पाटील भावनिक, म्हणाले, बंटी पाटील तू मला घटना शिकवणार का?
माझ्या विद्याच्या घरातील 4 माणसं जेलमध्ये होती, पहिल्या पत्नीबद्दल बोलताना चंद्रकांत पाटील भावनिक, म्हणाले, बंटी पाटील तू मला घटना शिकवणार का?
राष्ट्रवादीचे आमदार शरद पवारांना भेटणार, भेटीसाठी मागितली वेळ; विलिनीकरणाच्या चर्चेत राजकीय घडामोडींना वेग
राष्ट्रवादीचे आमदार शरद पवारांना भेटणार, भेटीसाठी मागितली वेळ; विलिनीकरणाच्या चर्चेत राजकीय घडामोडींना वेग
Embed widget