Horoscope Today 4 June 2024 : पंचांगानुसार, आज 4 जून 2024, मंगळवारचा दिवस जवळपास सर्व राशीच्या लोकांसाठी लाभदायक ठरेल. या दिवशी ग्रहांच्या हालचाली पाहता आजचा दिवस फार महत्त्वाचा आहे, ज्याचा परिणाम सर्व 12 राशींच्या लोकांवर दिसून येईल. तुमचा आजचा दिवस कसा असेल? कोणासाठी दिवस फलदायी ठरेल? 12 राशींचे आजचे राशीभविष्य (Horoscope Today) जाणून घ्या.
मेष (Aries Horoscope Today)
आज तुमच्या अंगी असलेल्या कलेला उत्तेजन मिळेल. मानसिक अवस्था थोडी द्विधा झाल्यामुळे कोणतेही निर्णय पटकन घेतले जाणार नाहीत.
वृषभ (Taurus Horoscope Today)
आर्थिक स्थिती समाधानकारक राहिल्यामुळे चार पैसे हातात खुळखुळतील. प्रेम प्रकरणांमध्ये समोरच्या व्यक्तीकडून म्हणावा असा प्रतिसाद मिळणार नाही.
मिथुन (Gemini Horoscope Today)
आज दिवस थोडा अस्वस्थतेत जाईल. मजेत जगण्यासाठी नित्य बदलत्या आयुष्याचं स्वागत करा.
कर्क (Cancer Horoscope Today)
विद्यार्थी अभ्यासाव्यतिरिक्त इतर गोष्टींमध्ये जास्त रमतील. महिलांनी राग आवरावा.
सिंह (Leo Horoscope Today)
कला, लेखन, नाट्य, अभिनय या गोष्टींकडे आज जास्त कल राहील. छानशा मित्र-मैत्रिणी भेटतील.
कन्या (Virgo Horoscope Today)
आज जीवनाचा एक वेगळा रंग अनुभवाल. संततीच्या बाबतीत थोडे खटके उडण्याची शक्यता आहे.
तूळ (Libra Horoscope Today)
तुमची मतं इतरांना पटणार नाहीत, परंतु तुमच्या विचारात आणि आचारात नाविन्याची झलक असेल.
वृश्चिक (Scorpio Horoscope Today)
नोकरी व्यवसाय तुमचे काम वैशिष्ट्यपूर्ण झाल्यामुळे वरिष्ठ खूश होतील. संगणक क्षेत्रात काम करणाऱ्यांना वेगवेगळ्या संधी येतील.
धनु (Sagittarius Horoscope Today)
आज एकापेक्षा अनेक कामं करण्याची शक्यता आहे. टाकीचे घाव सोसल्याशिवाय देवपण येत नाही याचा अनुभव घ्याल.
मकर (Capricorn Horoscope Today)
तुमच्या स्पष्ट आणि परखड बोलल्यामुळे जवळची माणसं दुखावण्याची शक्यता. महिलांच्या कामाच्या बाबतीत नाविन्य शोधण्याचा कल राहील.
कुंभ (Aquarius Horoscope Today)
नोकरी व्यवसायामध्ये कागदपत्रांमुळे कामं अडली असतील तर ती पूर्ण होण्यासाठी आजचा दिवस चांगला आहे.
मीन (Pisces Horoscope Today)
मानसिक अस्थिरता जाऊन क्रियाशील बनाल. उत्तम आत्मविश्वास आणि कष्टाची तयारी या दोन्हीमुळे नोकरी-व्यवसायात फायदा होईल.
डॉ. शिल्पा अग्निहोत्री (ज्योतिषाचार्य)
संपर्क - 9823322117
हेही वाचा: