Horoscope Today 4 April 2024 : पंचांगानुसार, आज 4 एप्रिल 2024, गुरुवारचा दिवस जवळपास सर्व राशीच्या लोकांसाठी लाभदायक ठरेल. या दिवशी ग्रहांच्या हालचाली पाहता काही राशीच्या लोकांच्या जीवनात आज अडथळा येऊ शकतो, तर काहींचं जीवन सहज सोपं असेल. सर्व राशीच्या लोकांसाठी आजचा गुरुवार कसा राहील? 12 राशींचे आजचे राशीभविष्य (Horoscope Today) जाणून घ्या


मेष (Aries Horoscope Today)


आज घरात छानशी खरेदी करण्याचा मूड असेल. नोकरीत एखादे नवीन काम अंगावर घ्याल आणि ते पूर्णही कराल. सहकार्याची भावना ठेवली तर जास्त यशस्वी व्हाल. महिलांना थोडा धोकाही पत्करावा लागेल.


वृषभ (Taurus Horoscope Today)


नवीन आव्हाने पेलण्याची क्षमता निर्माण होईल, शत्रूंचे तुमच्यापुढे काही चालणार नाही. नोकर वर्गाला सांभाळून घ्यावे लागेल. नवीन जागेचे व्यवहार होऊ शकतात. त्वचारोग आहे त्यांनी वेळेवर औषध पाणी घ्यावे.


मिथुन (Gemini Horoscope Today)


समजुतीचे धोरण स्वीकारायला हरकत नाही, पण त्याचा मनावर जास्त ताण येऊ देऊ नका. गुप्तशत्रू त्रास देतील, अशावेळी श्रद्धा आणि सत्संग याचा मागोवा घ्या. महिलांनी नकारात्मक विचारांना बाजूला ठेवावे.


कर्क  (Cancer Horoscope Today)


नोकरीधंद्यात कोणतीही गोष्ट व्यवहाराच्या मुशीत घालून तपासून घ्या, म्हणजे पुढे त्रास होणार नाही. सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात पुढे जाणारे ग्रहमान आहे. महिलांनी आपली मते स्पष्टपणे मांडावीत.


सिंह  (Leo Horoscope Today)


प्रतिष्ठा आणि प्रसिद्धी मिळवण्यासाठी जीवाचे रान कराल. घरामध्ये जरा जास्तच पैसा खर्च होईल. संशोधनात उत्तुंग झेप घ्याल, जुनी दुखणी डोके वर काढतील.


कन्या (Virgo Horoscope Today)


आत्मविश्वासाने कोणत्याही समस्येशी टक्कर द्याल. जोमाने कामाला लागाल. व्यवसायात एक नवीन चैतन्य निर्माण कराल. राजकारणी लोक तळागाळात जाऊन काम करतील. महिलांना कुटुंबात तडजोडीचे धोरण स्वीकारावे लागेल.


तूळ (Libra Horoscope Today)


जोडीदाराशी छान जमेल, परंतु त्याच्या आरोग्याविषयी समस्या निर्माण होण्याची शक्यता आहे. अति कष्ट प्रकृतीला झेपणार नाहीत. घरातील लोकांचे सहकार्य चांगले मिळेल.


वृश्चिक (Scorpio Horoscope Today)


गृहशोख्यात भर पडेल. नोकरी व्यवसायात वरिष्ठांना खुश ठेवाल. विद्यार्थ्यांना अभ्यासात लक्ष घालत असताना आवड निर्माण होऊन अभ्यासात यश मिळेल. प्रेम प्रकरणात यशस्वी व्हाल.


धनु (Sagittarius Horoscope Today)


जवळच्या प्रवासाचे योग येतील कामाच्या ठिकाणी पूर्वीची एखादी योजना रद्द करावी लागेल. परदेशाशी संबंधित असलेल्या व्यवहारांमध्ये थोड्या अडचणी निर्माण होतील. महिलांना दुटप्पी वागण्याचा थोडा त्रास होईल.


मकर (Capricorn Horoscope Today)


सामाजिक क्षेत्रातील व्यक्तींना थोडी टीका सहन करावी लागेल. शैक्षणिक क्षेत्रातील व्यक्तींना संधी चालून येतील. जोडीदाराच्या तब्येतीची काळजी घ्यावी लागेल. महिलांना घरातील पूर्ण वेळ उपस्थितीची सर्वांची अपेक्षा पूर्ण करावी लागेल.


कुंभ (Aquarius Horoscope Today)


कोणताही मोह न ठेवता काम करावे लागेल. घरात मंगल कार्य ठरतील विद्यार्थी स्वतः बदल करतील. नोकरी करणारे नवीन नोकरीच्या शोधात राहतील. हाताची दुखणी त्रास देऊ शकतात.


मीन (Pisces Horoscope Today)


जुने मित्र भेटतील. नवनवीन स्वप्न बघायला हरकत नाही संधीचे सोने कराल. महिलांनी दिलेल्या शब्दाला जागावे. संधिवाताचा त्रास असणाऱ्यांनी काळजी घ्यावी.


डॉ. शिल्पा अग्निहोत्री (ज्योतिषाचार्य)


संपर्क - 9823322117


हेही वाचा:


Gudi Padwa 2024 :आला सण गुढीपाडव्याचा... यंदा 'या' मुहूर्तावर गुढी उभारणं ठरेल शुभ; वर्ष जाईल सुख-समृद्धीचं