एक्स्प्लोर

Horoscope Today 30 September 2026: आज 30 सप्टेंबरचा दिवस भाग्याचा कि टेन्शनचा? 'या' 5 राशींचं भाग्य चमकणार; पैसा, नोकरी, प्रेमात काय बदल? आजचे सविस्तर राशीभविष्य

Horoscope Today 30 September 2026: ज्योतिषशास्त्रानुसार, ग्रहांच्या संक्रमणाच्या दृष्टीने देखील आजचा दिवस खास असणार आहे. त्यामुळे आजचा दिवस 12 राशींसाठी नेमका कसा असेल? 12 राशींचं आजचं राशीभविष्य. 

Horoscope Today 30 September 2026: वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार, आजचा दिवस 30 सप्टेंबर 2026 चा आहे. त्यानुसार आजचा वार बुधवार आहे. हा दिवस भगवान विठ्ठलाला समर्पित आहे. तसेच, आजचा दिवस हा ग्रहांच्या संक्रमणाच्या दृष्टीने देखील खास असणार आहे. त्यामुळे आजचा दिवस 12 राशींसाठी नेमका कसा असणार आहे. यासाठी जाणून घेऊया सर्व 12 राशींचं आजचं राशीभविष्य (Horoscope Today). 

मेष रास (Aries Horoscope)

ज्योतिषशास्त्रानुसार, 30 सप्टेंबरचा दिवस मेष राशीच्या व्यक्तींसाठी उत्साह आणि कामातील हालचाली घेऊन येणारा आहे. काही दिवसांपासून रखडलेले काम आज पुन्हा मार्गी लागू शकते. नोकरीत एखादी जबाबदारी वाढू शकते, पण ती पूर्ण करण्याची क्षमता तुमच्यात असेल. वरिष्ठांशी बोलताना आत्मविश्वास ठेवा, मात्र घाईघाईने प्रतिक्रिया देणे टाळा. आर्थिक बाबतीत दिवस साधारण राहील. अनावश्यक खरेदी करण्याची इच्छा होऊ शकते, त्यामुळे खर्चाचा विचार करूनच निर्णय घ्या. कुटुंबातील एखाद्या व्यक्तीशी मनमोकळा संवाद झाल्याने वातावरण हलके होईल. प्रेमसंबंधात गैरसमज असल्यास शांतपणे बोलून तो दूर करण्याची संधी मिळेल. 

वृषभ रास (Taurus Horoscope)

वृषभ राशीसाठी आजचा दिवस कामाच्या ठिकाणी तुमच्या सातत्याचा आणि संयमाचा फायदा मिळेल. एखादे महत्त्वाचे काम तुमच्या अपेक्षेप्रमाणे पुढे जाऊ शकते. व्यवसाय करणाऱ्यांना जुन्या ग्राहकांकडून किंवा परिचित व्यक्तींकडून काम मिळण्याची शक्यता आहे. पैशांच्या बाबतीत परिस्थिती नियंत्रणात ठेवता येईल, मात्र भविष्यासाठी बचतीचा विचार करणे चांगले राहील. घरातील वातावरण आनंदी राहण्याची शक्यता आहे. एखाद्या जवळच्या व्यक्तीशी झालेला जुना विषय पुन्हा निघू शकतो; त्यावेळी हट्ट न करता समजूतदारपणे बोलणे योग्य ठरेल.

मिथुन रास (Gemini Horoscope)

मिथुन राशीसाठी आजचा दिवस नवीन संधींचा आहे. तुमच्या बोलण्याच्या पद्धतीमुळे एखादे काम सहजपणे पुढे जाऊ शकते. नोकरीत नवीन प्रकल्प किंवा जबाबदारीची चर्चा होऊ शकते. व्यवसायात नवीन संपर्क निर्माण होतील आणि भविष्यात त्यांचा उपयोग होऊ शकतो. आर्थिक बाबतीत एखादी नवीन कल्पना मनात येईल, पण त्यावर लगेच पैसे खर्च करण्यापेक्षा आधी पूर्ण माहिती घेणे चांगले. वैयक्तिक आयुष्यात एखादा जुना गैरसमज दूर होण्याची शक्यता आहे. जोडीदाराशी किंवा जवळच्या व्यक्तीशी मनातील गोष्ट स्पष्टपणे बोलल्यास नात्यातील जवळीक वाढेल. 

कर्क रास (Cancer Horoscope)

कर्क राशीसाठी आजचा दिवस नियोजन आणि बारकाईने काम करण्याचा आहे. एखाद्या कामातील छोटी चूकही पुढे अडचण निर्माण करू शकते, त्यामुळे कागदपत्रे, आर्थिक व्यवहार किंवा महत्त्वाचे संदेश पाठवण्यापूर्वी ते पुन्हा तपासा. नोकरीत तुमच्या व्यवस्थित काम करण्याच्या पद्धतीचे कौतुक होऊ शकते. व्यवसायात जुन्या कामातून फायदा मिळू शकतो. पैशांची बचत करण्यासाठी आज योग्य नियोजन करता येईल. घरातील एखाद्या व्यक्तीला तुमच्या मदतीची गरज भासू शकते. प्रेमसंबंधात अपेक्षा जास्त ठेवण्यापेक्षा प्रत्यक्ष संवादावर भर द्या. 

सिंह रास (Leo Horoscope)

सिंह राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस आत्मविश्वास वाढवणारा आहे. कामाच्या ठिकाणी नेतृत्व करण्याची संधी मिळू शकते आणि तुमच्या कल्पनांकडे वरिष्ठांचे लक्ष जाऊ शकते. एखादे महत्त्वाचे काम तुमच्या निर्णयक्षमतेवर अवलंबून असेल. आर्थिक बाबतीत परिस्थिती चांगली राहू शकते, पण जोखीम असलेल्या व्यवहारात सावधगिरी आवश्यक आहे. कुटुंबातील व्यक्तीकडून एखादी आनंदाची बातमी मिळू शकते. प्रेमसंबंधात तुमचा आत्मविश्वास सकारात्मक परिणाम देईल, मात्र समोरच्याचे मतही तितकेच महत्त्वाचे आहे हे लक्षात ठेवा

कन्या रास (Virgo Horoscope)

कन्या राशीसाठी आजचा दिवस नियोजन आणि बारकाईने काम करण्याचा आहे. एखाद्या कामातील छोटी चूकही पुढे अडचण निर्माण करू शकते, त्यामुळे कागदपत्रे, आर्थिक व्यवहार किंवा महत्त्वाचे संदेश पाठवण्यापूर्वी ते पुन्हा तपासा. नोकरीत तुमच्या व्यवस्थित काम करण्याच्या पद्धतीचे कौतुक होऊ शकते. व्यवसायात जुन्या कामातून फायदा मिळू शकतो. पैशांची बचत करण्यासाठी आज योग्य नियोजन करता येईल. घरातील एखाद्या व्यक्तीला तुमच्या मदतीची गरज भासू शकते. प्रेमसंबंधात अपेक्षा जास्त ठेवण्यापेक्षा प्रत्यक्ष संवादावर भर द्या. सतत विचार करत राहण्यापेक्षा एखादे काम प्रत्यक्षात सुरू करणे आज अधिक फायदेशीर ठरेल.

तूळ रास (Libra Horoscope)

तूळ राशीसाठी आजचा दिवस हा संबंध आणि समतोल यांना महत्त्व देणारा आहे. कामाच्या ठिकाणी इतरांच्या सहकार्याने एखादे काम पूर्ण होईल. भागीदारीत काम करणाऱ्यांनी निर्णय घेण्यापूर्वी समोरच्या व्यक्तीशी सविस्तर चर्चा करावी. आर्थिक स्थिती सामान्य राहील; मात्र एखादा अनपेक्षित खर्च येऊ शकतो. कुटुंबातील वातावरण चांगले राहील. जोडीदाराशी काही विषयावर मतभेद झाले तरी शांत संवादातून तोडगा निघू शकतो. जुन्या मित्राशी संपर्क होण्याची शक्यता आहे..

वृश्चिक रास (Scorpio Horoscope)

वृश्चिक राशीसाठी आजचा दिवस हा महत्त्वाच्या निर्णयांचा ठरू शकतो. कामात प्रगती होण्याची शक्यता आहे आणि एखादे रखडलेले प्रकरण पुन्हा सुरू होऊ शकते. मात्र संवेदनशील माहिती किंवा कार्यालयातील वैयक्तिक विषय सर्वांसोबत शेअर करणे टाळा. आर्थिक व्यवहार करताना कागदपत्रे नीट तपासा. नातेसंबंधात भावना तीव्र राहतील. एखाद्या व्यक्तीच्या वागण्याचा चुकीचा अर्थ काढण्यापेक्षा थेट संवाद साधणे चांगले. कुटुंबातील व्यक्तीकडून आधार मिळेल.

धनु रास (Saggitarius Horoscope)

धनु राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस पुढे जाण्याची प्रेरणा मिळेल. नोकरी किंवा व्यवसायात नवीन कल्पना मांडण्याची संधी मिळू शकते. एखाद्या प्रवासाचे किंवा पुढील कामाचे नियोजन होऊ शकते. आर्थिक बाबतीत खर्च वाढण्याची शक्यता असल्याने हात आखडता घेणे चांगले. मित्रांशी किंवा परिचितांशी झालेली चर्चा भविष्यात उपयोगी ठरू शकते. प्रेमसंबंधात मोकळेपणाने बोलल्यास जवळीक वाढेल. मात्र प्रत्येक गोष्ट लगेच करण्याची घाई न करता योग्य वेळेची वाट पाहणे आज फायदेशीर ठरेल..

मकर रास (Capricorn Horoscope)

मकर राशीसाठी आजचा दिवस काम आणि जबाबदाऱ्यांचा दिवस आहे. नोकरीत एखादे महत्त्वाचे काम तुमच्यावर सोपवले जाऊ शकते. तुमची मेहनत लगेच दिसून आली नाही तरी तिचा फायदा पुढे मिळण्याची शक्यता आहे. आर्थिक बाबतीत दीर्घकालीन नियोजन करण्यासाठी दिवस चांगला आहे. घरातील जबाबदाऱ्या आणि कामाचा ताण यामध्ये समतोल साधण्याचा प्रयत्न करा. जोडीदार किंवा कुटुंबातील व्यक्तीला तुमच्या वेळेची गरज असू शकते. आरोग्याच्या बाबतीत सतत काम करत राहण्यापेक्षा मध्ये थोडी विश्रांती घेणे आवश्यक आहे.

कुंभ रास (Aquarius Horoscope)

कुंभ राशीसाठी आजचा दिवस नवीन कल्पना आणि नवीन संपर्क घेऊन येऊ शकतो. कामाच्या ठिकाणी नेहमीपेक्षा वेगळ्या पद्धतीने विचार करण्याची संधी मिळेल. नवीन व्यक्तीशी झालेली ओळख भविष्यात उपयोगी ठरू शकते. आर्थिक बाबतीत नवीन पर्यायांचा विचार कराल, मात्र निर्णय घेण्यापूर्वी त्यातील जोखीम समजून घ्या. मित्रपरिवारात आनंदाचे वातावरण राहील. प्रेमसंबंधात जुन्या विषयांपेक्षा भविष्यातील योजनांवर चर्चा होऊ शकते. मानसिक ताजेपणासाठी नेहमीच्या दिनक्रमातून थोडा बदल करणे चांगले ठरेल..

मीन रास (Pisces Horoscope)

मीन राशीसाठी आजचा दिवस शांतपणे कामे पूर्ण करण्याचा आहे. काही दिवसांपासून प्रलंबित असलेले काम आज मार्गी लावता येईल. नोकरीत तुमच्या संयमी स्वभावाचा फायदा होईल. व्यवसायात फार मोठा धोका न घेता सध्याच्या कामावर लक्ष केंद्रित करणे योग्य राहील. आर्थिक स्थिती नियंत्रणात राहील, पण अनावश्यक खर्च टाळणे आवश्यक आहे. कुटुंबातील व्यक्तीसोबत भावनिक संवाद होऊ शकतो आणि त्यातून मन हलके होईल. प्रेमसंबंधात समोरच्या व्यक्तीच्या भावना समजून घेणे महत्त्वाचे ठरेल. आज भूतकाळातील एखाद्या गोष्टीचा जास्त विचार करण्यापेक्षा पुढील काही दिवसांचे नियोजन करणे अधिक फायदेशीर ठरेल.

हेही वाचा :

Astrology: पितृपक्ष ते थेट नोव्हेंबर..4 राशींचं नशीब मोठ्या संघर्षांनंतर फळफळणार! पॉवरफुल लक्ष्मीनारायण राजयोग सक्रीय, पैसा, नोकरी, प्रेमात मोठे बदल, ज्योतिषशास्त्र...

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

 

Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Garud Puran : रात्रीच्या वेळीही मृतदेहाला एकटं सोडत नाहीत? गरुड पुराणात सांगितलंय यामागचं खास कारण; जाणून घ्या धार्मिक मान्यता
रात्रीच्या वेळीही मृतदेहाला एकटं सोडत नाहीत? गरुड पुराणात सांगितलंय यामागचं खास कारण; जाणून घ्या धार्मिक मान्यता
Weekly Horoscope : मेष ते मीन, सर्व 12 राशींसाठी नोव्हेंबरचा शेवटचा आठवडा कसा असणार? वाचा लकी कलर, नंबर आणि टीप
मेष ते मीन, सर्व 12 राशींसाठी नोव्हेंबरचा शेवटचा आठवडा कसा असणार? वाचा लकी कलर, नंबर आणि टीप
Baba Vanga Prediction : बाबा वेंगाची भविष्यवाणी! पुढच्या 7 दिवसांत 'या' 5 राशींना लागणार लॉटरी; नोकरीत मिळणार प्रमोशनची संधी? वाचा लकी राशी
बाबा वेंगाची भविष्यवाणी! पुढच्या 7 दिवसांत 'या' 5 राशींना लागणार लॉटरी; नोकरीत मिळणार प्रमोशनची संधी? वाचा लकी राशी
Horoscope Today : आज रविवारचा दिवस 5 राशींसाठी आव्हानात्मक, भूतकाळाचं सत्य समोर येण्याची शक्यता; वाचा तुमचे आजचे राशीभविष्य
आज रविवारचा दिवस 5 राशींसाठी आव्हानात्मक, भूतकाळाचं सत्य समोर येण्याची शक्यता; वाचा तुमचे आजचे राशीभविष्य
Advertisement

व्हिडीओ

Shruti Sadolikar Katkar Majha Katta : शास्त्रीय संगीताचं चालतं बोलतं विद्यापीठ, श्रृती सडोलीकरांशी गप्पा | ABP Majha
Ratnagiri Water Shortage : कोकणातील पाणीटंचाईवर श्रमदानातून मात! Special Report
Kolhapur Milk Price Hike : गोकुळ आणि वारणा दूध संघाकडून दुधाच्या विक्री दरात वाढ Special Report
Kurla Phoenix Mall Mumbai Crime News: पैसे मागितले, काही उर्दुमध्ये बोलत होते; कुर्ला तरुण-तरुणी मारहाण प्रकरणावर प्रत्यक्षदर्शी महिलेची धक्कादायक माहिती, VIDEO
Kurla Phoenix Mall Garden : कुर्ल्यात जिथे तरुण-तरुणीला मारहण, तिथलं हादरवणारं वास्तव
Advertisement

फोटो गॅलरी

Advertisement

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Pune News: रामवाडी मेट्रो मार्गावर तांत्रिक बिघाड! वनाज ते रामवाडी अन् रामवाडी ते वनाज या दोन्ही दिशांमधील मेट्रो सेवा ठप्प; स्थानकांवर प्रवाशांची मोठी गर्दी
रामवाडी मेट्रो मार्गावर तांत्रिक बिघाड! वनाज ते रामवाडी अन् रामवाडी ते वनाज या दोन्ही दिशांमधील मेट्रो सेवा ठप्प; स्थानकांवर प्रवाशांची मोठी गर्दी
मी सत्ताधारी नसल्याचे सांगताना नगरसेवकाचं वादग्रस्त वक्तव्य, महौपारांनी बाहेर हाकललं; महापालिकेत राडा
मी सत्ताधारी नसल्याचे सांगताना नगरसेवकाचं वादग्रस्त वक्तव्य, महौपारांनी बाहेर हाकललं; महापालिकेत राडा
FDA Action On Nashik Misal Points: नाशिकच्या नामांकित मिसळ व्यावसायिकांवर FDA ची कारवाई; विहार मिसळ परिसरात शुकशुकाट
नाशिकच्या नामांकित मिसळ व्यावसायिकांवर FDA ची कारवाई; विहार मिसळ परिसरात शुकशुकाट
Sunil Tatkare: डिलिमिटेशन बिलावरील समर्थनाचा अर्थ एनडीएला पाठिंबा नव्हे; सुप्रिया सुळेंच्या भूमिकेचं तटकरेंकडून स्वागत; शरद पवार गट एनडीएसोबत जाण्याच्या चर्चांवरही स्पष्टचं सांगितलं!
डिलिमिटेशन बिलावरील समर्थनाचा अर्थ एनडीएला पाठिंबा नव्हे; सुप्रिया सुळेंच्या भूमिकेचं तटकरेंकडून स्वागत; शरद पवार गट एनडीएसोबत जाण्याच्या चर्चांवरही स्पष्टचं सांगितलं!
Nagpur Air Fest 2026 Air Show : नागपुरात भारतीय हवाई दलाच्या शौर्याचं दर्शन, आकाशात रंगल्या चित्तथरारक कसरती, आकाशगंगा, सारंग अन् सूर्यकिरणचं अद्भुत शौर्य, photos
नागपुरात भारतीय हवाई दलाच्या शौर्याचं दर्शन, आकाशात रंगल्या चित्तथरारक कसरती, आकाशगंगा, सारंग अन् सूर्यकिरणचं अद्भुत शौर्य, photos
Pune Swargate Bus Depo Crime : स्वारगेटमध्ये शिवशाही बसमध्ये तरुणीवर अत्याचार; सुनावणीवेळी कोर्टामध्ये पीडिता ढसाढसा रडली, नेमकं काय घडलं?
स्वारगेटमध्ये शिवशाही बसमध्ये तरुणीवर अत्याचार; सुनावणीवेळी कोर्टामध्ये पीडिता ढसाढसा रडली, नेमकं काय घडलं?
Pune FDA Action: पुण्यातील आठ हॉटेलांचे परवाने एफडीएकडून निलंबित; अस्वच्छता, कीटकांचा प्रादुर्भाव, बुरशी अन् मुदतबाह्य पदार्थ सापडले, कोणकोणत्या हॉटेल्सचा समावेश?
पुण्यातील आठ हॉटेलांचे परवाने एफडीएकडून निलंबित; अस्वच्छता, कीटकांचा प्रादुर्भाव, बुरशी अन् मुदतबाह्य पदार्थ सापडले, कोणकोणत्या हॉटेल्सचा समावेश?
Dhule Pawar Family Accident In Rajasthan News: उभ्या ट्रकला क्रूझर धडकली, धुळ्यातील पवार कुटुंबातील 9 जणांनी जागीच जीव सोडला; 8 जण जखमी, अख्खं घर सुन्न
उभ्या ट्रकला क्रूझर धडकली, धुळ्यातील पवार कुटुंबातील 9 जणांनी जागीच जीव सोडला; 8 जण जखमी, अख्खं घर सुन्न
Embed widget