Horoscope Today 30 September 2024 : सप्टेंबर महिन्यातला हा शेवटचा दिवस आहे. हा दिवस अनेक राशीच्या लोकांसाठी चांगले तर काहींसाठी वाईट परिणाम आणू शकतो. आज तुमचे ग्रह तुमच्यासाठी अनुकूल आहेत की नाही? आज तुम्हाला कोणत्या आव्हानांना तोंड द्यावे लागेल किंवा तुम्हाला कोणत्या प्रकारच्या संधी मिळू शकतात? कर्क, सिंह, कन्या राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस व्यवसाय, आरोग्य, नातेसंबंध आणि प्रेमासाठी किती खास असणार आहे? आजचे राशीभविष्य (Horoscope Today) जाणून घ्या.


कर्क रास (Cancer Today Horoscope)


नोकरी (Job) -  नोकरदार वर्गातली लोकांबद्दल बोलायचं झाल्यास, आज कामाच्या ठिकाणी काम करण्याचा तुमचा मूड नसेल.  सोमवार असल्या कारणाने तुम्हाला प्रसन्न वाटणार नाही.  


व्यवसाय (Business) -  व्यापारी वर्गातील लोक आज आपल्या मेहनतीने दुसरा व्यवसाय उभारण्याचा प्रयत्न करतील. ज्यामध्ये तुम्हाला नक्कीच यश मिळू शकतं.  


कुटुंब (Family) - आज तुमच्या कुटुंबातील वातावरण फार प्रसन्न असणार आहे. घरातील ज्येष्ठ व्यक्तींची काळजी घ्या. 


आरोग्य (Health) - तुमचे आरोग्य एकदम उत्तम असेल. फक्त कोणाच्याही बोलण्यावर विश्वास ठेवू नका.  


सिंह रास (Leo Today Horoscope)


नोकरी (Job) -  सिंह राशीच्या लोकांनी कामाच्या ठिकाणी अतिरेकीपणा करु नये. अन्यथा तुम्ही वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या नजरेत येऊ शकता.  


व्यवसाय (Business) -  आज तुम्हाला कामाच्या निमित्ताने परदेशात जाण्याची संधी मिळू शकते. या संधीचा तुम्ही लाभ घ्या. 


विद्यार्थी (Student) -  विद्यार्थी वर्गातील लोकांबद्दल बोलायचं झाल्यास आज तुमचं अभ्यासात चांगलं मन रमणार आहे. स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करायला सुरुवात करा. 


आरोग्य (Health) - आज कुटुंबातील ज्येष्ठ व्यक्तीच्या आरोग्याबाबत तुम्हाला सतत चिंता जाणवू शकते. अशा वेळी गोंधळून न जाता वेळीच डॉक्टरांचा सल्ला घ्या.


कन्या रास (Virgo Today Horoscope)


नोकरी (Job) - नोकरदार वर्गातील लोकांच्या बाबतीत बोलायचं झाल्यास आज कामाच्या ठिकाणी नवीन लोकांशी तुमच्या गाठीभेटी होतील. 


व्यवसाय (Business) - तुमचा एकंदरीत करिअरचा आलेख पाहता प्रगतीची हवा तुमच्या डोक्यात जाण्याची शक्यता आहे. तर, असे अजिबात होऊ देऊ नका. 


कुटुंब (Family) - तुमच्या कुटुंबात आजचं वातावरण फार धार्मिक असणार आहे. शेजारच्या मंदिराला जाऊन भेट द्या. . 


आरोग्य (Health) - तुमच्या आरोग्याच्या बाबतीत बोलायचं झाल्यास आरोग्य एकदम चांगलं असणार आहे. फक्त जंक फूड खाणं टाळा.   


(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)  


हेही वाचा :


Weekly Horoscope 30 September To 06 October 2024 : तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ आणि मीन राशींसाठी नवीन आठवडा कसा असणार? साप्ताहिक राशीभविष्य जाणून घ्या