एक्स्प्लोर

Horoscope Today 30 April 2024 : आजचा मंगळवार खास! बजरंगबलीची 'या' राशींवर राहणार विशेष कृपा; जाणून घ्या सर्व 12 राशींचं रााशीभविष्य

Horoscope Today 30 April 2024 : सर्व 12 राशींच्या लोकांसाठी आजचा दिवस खास असणार आहे. परंतु काही राशींना आज थोड्या समस्यांचाही सामना करावा लागू शकतो. कोणासाठी आजचा दिवस शुभ किंवा कोणासाठी आजचा दिवस अशुभ असेल? जाणून घेण्यासाठी पाहा आजचे राशीभविष्य...

Horoscope Today 30 April 2024 : ज्योतिष शास्त्रानुसार, आजचा दिवस सर्व 12 राशींसाठी खास आहे. आज 30 एप्रिल, म्हणजे मंगळवारचा दिवस हनुमानाला समर्पित आहे. आज काही राशींच्या लोकांवर बजरंगबलीची विशेष कृपा राहील. सर्व 12 राशींच्या लोकांसाठी आजचा मंगळवार किती खास असणार आहे? आजचे राशीभविष्य (Horoscope Today) जाणून घेऊया.

मेष (Aries Today Horoscope)

नोकरी (Job) - आजचा दिवस चांगला जाईल. नोकरी करणाऱ्या लोकांबद्दल बोलायचं झालं तर, सहकाऱ्यांकडून मिळालेल्या माहितीचा योग्य वापर करुन नीट काम करा. जर तुम्ही निविदा भरणार असाल तर ही माहिती तुमच्यासाठी उपयुक्त ठरू शकते. सहकारी तुमच्या मागून बरेच गॉसिप्स करतील, त्याकडे लक्ष देऊ नका.

व्यवसाय (Business) - व्यवसाय करणाऱ्या लोकांबद्दल बोलायचं तर, आजचा दिवस व्यावसायिकांसाठी खूप चांगला असेल. आज तुम्हाला तुमचे जुने अडकलेले पैसे मिळू शकतात, ज्यासाठी तुम्ही बराच काळ प्रयत्नात होता. जर कोणी तुमच्याकडून पैसे घेतले असतील तर त्याला आठवण करून द्या आणि त्याच्याकडून पैसे घ्या.

विद्यार्थी (Student) - तरुणांसाठी आजचा दिवस चांगला राहील. आज तुम्ही कमी मेहनत करून जास्त यश मिळवू शकता. तुमच्या कुटुंबातील वातावरण आज अनुकूल असेल. तुमच्या कुटुंबात सुख-शांती नांदेल.

आरोग्य (Health) - तुमच्या आरोग्याबद्दल बोलायचं झालं तर, आज आपले शरीर निरोगी ठेवण्यासाठी जे योग्य आहे ते सर्व करा. संतुलित आहार घ्या आणि नियमित व्यायाम देखील करा, कारण तुमचं शरीर निरोगी असेल तरच तुम्ही चांगलं काम करू शकता.

वृषभ (Taurus Today Horoscope)

नोकरी (Job) - वृषभ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस चांगला जाईल. नोकरी करणाऱ्या लोकांबद्दल बोलायचं तर, आज कामाच्या ठिकाणी तुम्हाला तुमच्या उणिवांवर काम करावं लागेल आणि त्यात सुधारणा कराव्या लागतील.

व्यवसाय (Business) - व्यवसाय करणाऱ्या लोकांबद्दल बोलायचं तर, आज व्यावसायिकांनी विरोधकांपासून सावध राहावं, ते तुमचं नुकसान करण्याचा प्रयत्न करू शकतात. तुम्ही त्यांच्या प्रत्येक हालचालीवर बारीक नजर ठेवा.

विद्यार्थी (Student) - आजच्या तरुणांनी जुन्या चुकांवर पश्चात्ताप न करता नव्या संधी शोधायला हव्यात. प्रयत्न करत राहा, तुम्हाला यश नक्कीच मिळेल.

आरोग्य (Health) - तुमच्या तब्येतीबद्दल बोलायचं तर, जर तुम्ही शुगर पेशंट असाल, तर तुमची शुगर वेळोवेळी तपासत राहा, कारण तुमची शुगर वाढण्याची शक्यता असते. खाण्याच्या सवयींवर नियंत्रण ठेवा. मिठाईचा वापर कमीत कमी करा.

मिथुन (Gemini Today Horoscope)

नोकरी (Job) - आजचा दिवस चांगला जाईल. नोकरी करणाऱ्या लोकांबद्दल बोलायचं झालं तर, संभ्रमावस्थेत काम करण्यापेक्षा वरिष्ठांशी चर्चा करूनच कामाला सुरुवात करणं चांगलं राहील.

व्यवसाय (Business) - व्यापारी वर्गासाठी आजचा दिवस फायद्याचा आणि तोट्याचाही असेल. एकीकडे मोठ्या डील्स थांबतील, तर दुसरीकडे छोट्या व्यवसायातून नफा मिळू शकेल. तुमच्या अपेक्षेनुसार परिणाम साध्य करण्यात तुम्ही यशस्वी व्हाल.

विद्यार्थी (Student) - तरुणांबद्दल बोलताना, त्याच्यावर संशय घेण्याऐवजी त्यांच्यावर विश्वास ठेवण्याचा प्रयत्न करा, जास्त चौकशी करणं योग्य नाही.

आरोग्य (Health) - तुमच्या आरोग्याविषयी बोलायचं झालं तर, आज काही कामामुळे तुम्हाला इतका थकवा जाणवेल की तुम्हाला अस्वस्थ वाटू लागेल.

कर्क (Cancer Today Horoscope) 

नोकरी (Job) - कर्क राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस थोडा त्रासदायक असेल. नोकरदार लोकांबद्दल बोलायचं झालं तर, आज तुम्ही ऑफिसमध्ये तुमच्या कामाकडे बेफिकीर दिसाल. आजची कामं उद्यावर टाकणं सोडा, अन्यथा वरिष्ठांचा ओरडा ऐकावा लागेल.

व्यवसाय (Business) - जर आपण व्यावसायिक लोकांबद्दल बोललो तर, आज तुम्हाला काही समस्यांना सामोरं जावं लागू शकतं. व्यवसाय मंदावल्याने तुमचं मन अस्वस्थ होऊ शकतं.

विद्यार्थी (Student) - विद्यार्थ्यांबद्दल बोलायचं झालं तर, विद्यार्थ्यांना परीक्षेत यश मिळेल. विद्यार्थ्यांनी अभ्यास करताना मन एकाग्र केलं पाहिजे आणि इतर गोष्टींमध्ये विचलित होऊ नये. घरगुती बाबींमध्ये तुम्ही खूप आनंदी असाल.

आरोग्य (Health) - तुमच्या तब्येतीबद्दल बोलताना, आज तुम्हाला डोकेदुखीचा त्रास होऊ शकतो. काम करताना मधेच विश्रांती घ्या आणि मगच कामाला सुरुवात करा.

सिंह (Leo Today Horoscope) 

नोकरी (Job) - सिंह राशीच्या लोकांसाठीही आजचा दिवस थोडा त्रासदायक असू शकतो. आज तुम्हाला तुमच्या कार्यक्षेत्रात स्पर्धात्मक वातावरणाचा सामना करावा लागू शकतो. लोक तुम्हाला साथ देण्याऐवजी तुम्हाला मागे टाकण्याचा प्रयत्न करताना दिसतील.

व्यवसाय (Business) - व्यावसायिकांबद्दल बोलायचं तर, भाजीपाला आणि फळांचा व्यवसाय करणाऱ्यांसाठी आजचा दिवस खूप चांगला असेल. 

विद्यार्थी (Student) - तरुणांबद्दल बोलायचं तर, आजचा दिवस त्यांच्यासाठी चांगला असेल. जर तुम्ही प्रेमसंबंधात असाल तर तुम्ही तुमच्या प्रियकरासोबत कुठेतरी बाहेर फिरायला जाऊ शकता.

आरोग्य (Health) - तुमच्या आरोग्याविषयी बोलायचं झालं तर, आज तुमचं आरोग्य सामान्य असेल. पण तरीही तुम्ही तुमच्या आरोग्याची काळजी घेणं चांगलं राहील. तुमच्या खाण्याच्या सवयींमध्ये संतुलन ठेवा आणि तुमच्या मुलाच्या आरोग्याची विशेष काळजी घ्या. तुम्हाला खोकला, सर्दी इत्यादी समस्यांना सामोरं जावं लागू शकतं.

कन्या (Virgo Today Horoscope) 

नोकरी (Job) - आजचा दिवस चांगला जाईल. जर आपण नोकरी करणाऱ्या लोकांबद्दल बोललो तर, आज तुम्ही ऑफिसमध्ये शांतीत काम करा, अन्यथा कोणाशी तरी वाद होऊ शकतो. लोकांशी जास्त बोलणं देखील तुम्हाला तुमच्या कामापासून लक्ष विचलित करू शकतं.

व्यवसाय (Business) - व्यवसाय करणाऱ्या लोकांबद्दल बोलायचं तर, आज तुम्हाला तुमच्या व्यवसायात काही कर्मचाऱ्यांची गरज भासू शकते. त्यामुळे तुमच्या व्यवसायात लवकरच नवीन नोकर भरती सुरू केल्यास चांगलं होईल.

विद्यार्थी (Student) - तरुणांबद्दल सांगायचे तर, ते कोणत्याही स्पर्धेची तयारी करत असतील तर ते त्यांची तयारी अर्धवट सोडून नोकरी शोधू शकतात, ज्याची त्यांना खूप गरज आहे. जर तुम्ही प्रेमप्रकरणात अडकले असाल तर आज तुम्ही तुमच्या जोडीदारासमोर तुमच्या मनातील सर्व भावना व्यक्त करू शकता.

आरोग्य (Health) - तुमच्या आरोग्याविषयी बोलायचं झालं तर, हार्ट पेशंटना स्वतःची काळजी घ्यावी लागेल. छातीत दुखणं, गोंधळ उडणं आणि अस्वस्थता यासारख्या समस्या तुम्हाला सतावू शकतात.

तूळ (Libra Today Horoscope) 

नोकरी (Job) - आजचा दिवस थोडा त्रासदायक ठरू शकतो. नोकरी करणाऱ्या लोकांबद्दल बोलायचं झालं तर, तुम्हाला कामाच्या ठिकाणी काही समस्यांना सामोरं जावं लागेल. दुपारनंतर परिस्थिती निवळेल. आज तुम्हाला एखाद्या मोठ्या कंपनीकडून नोकरीची ऑफर मिळू शकते, तुम्ही तुमची नोकरी बदलण्याचा विचार करू शकता. नोकरीत सहकाऱ्यांमध्ये स्पर्धा वाढू शकते.

व्यवसाय (Business) - व्यवसाय करणाऱ्या लोकांबद्दल बोलायचं झालं तर, तुम्हाला व्यवसायात चांगले परिणाम मिळतील, तुम्ही नवीन ठिकाणी आऊटलेट उघडण्याचा विचार करू शकता. तुमच्या उत्पन्नात वाढ होण्याची शक्यता आहे.

विद्यार्थी (Student) - वैद्यकीय क्षेत्रातील विद्यार्थ्यांना भविष्यात त्यांच्या प्रयत्नांचं चांगलं फळ मिळेल. तुम्ही अभ्यासाकडे अधिक लक्ष द्यावं.

आरोग्य (Health) - तुमच्या आरोग्याविषयी बोलायचं झालं तर, आज आरोग्याबाबत सावध राहा, आरोग्याची काळजी घ्या. तुमच्या दैनंदिन दिनचर्येत काही बदल करणं तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल.

वृश्चिक ( Scorpio Today Horoscope)  

नोकरी (Job) - नोकरदार लोकांबद्दल बोलायचं तर, कामाच्या ठिकाणी आज तुम्हाला एखादा निर्णय घ्यावा लागू शकतो. हा निर्णय घेताना तुम्ही कोणतीच घाई-गडबड करू नका. अन्यथा नंतर पश्चाताप होऊ शकतो. 

व्यवसाय (Business) - जर तुमच्या व्यवसायात एखादं महत्त्वाचं काम अनेक दिवसांपासून रखडलं असेल तर ते पूर्ण करण्यासाठी वरिष्ठ व्यक्तीचा सल्ला घ्या. 

विद्यार्थी (Student) - आज तुमचे तुमच्या मित्राबरोबर वाद होऊ शकतात. जुन्या गोष्टी पुन्हा बाहेर काढल्या जाऊ शकतात. पण हा वाद जास्त वाढू देऊ नका अन्यथा तुम्ही मैत्री गमवाल.तुमच्या मनातील सर्व भावना व्यक्त करू शकता.

आरोग्य (Health) - महिलांनी आपल्या आरोग्याची जास्त काळजी घ्यावी. सांधेदुखीचा आजार तुम्हाला जास्त त्रास देऊ शकतो.

धनु (Sagittarius Today Horoscope)

नोकरी (Job) - आजचा दिवस चांगला जाईल. नोकरी करणाऱ्या लोकांबद्दल बोलताना, आज कामाच्या ठिकाणी तुमच्या कामावर तुमचे बॉस खूप खुश असतील. तुम्हाला नोकरीत बढतीची संधी देखील मिळू शकते. 

व्यवसाय (Business) - व्यवसाय करणाऱ्या लोकांबद्दल बोलायचं झालं तर, जर तुम्ही कोणाकडून पैसे उधारी घेतले असतील तर ते लवकरात लवकर परत करण्याचा प्रयत्न करा. कारण याचा तुमच्या व्यवसायावर नकारात्मक परिणाम होऊ शकतो. 

विद्यार्थी (Student) - जर तुम्ही एखाद्या स्पर्धेची तयारी करत असाल तर त्यात तुम्हाला यश मिळू शकतं.

आरोग्य (Health) - तुमच्या आरोग्याविषयी बोलायचं झालं तर, ज्या लोकांना मानदुखीचा त्रास आहे त्यांना आज अस्वस्थ वाटू शकतं. यासाठी थोडा वेळ आराम करा. 

मकर (Capricorn Today Horoscope)

नोकरी (Job) - आजचा दिवस चांगला जाईल. नोकरदार लोकांबद्दल बोलायचं तर, जे लोक पेशाने डॉक्टर आहेत त्यांच्यासाठी आजचा दिवस आव्हानात्मक असू शकतो. ऑपरेशन करताना काळजी घ्या. 

व्यवसाय (Business) - व्यवसाय करणाऱ्या लोकांबद्दल बोलायचं तर, जे छोटे व्यावहारिक आहेत त्यांना आज व्यवसायात चांगली ऑर्डर मिळू शकते. त्यामुळे काम करायला देखील उत्साह येईल. 

विद्यार्थी (Student) - आज विद्यार्थ्यांना काहीतरी नवीन शिकण्याची संधी मिळेल.प्रत्येक गोष्टीकडे सकारात्मक दृष्टीने पाहा.

आरोग्य (Health) - तुमच्या तब्येतीबद्दल बोलताना, बदलत्या वातावरणामुळे तुम्हाला घसादुखीचा त्रास होऊ शकतो. त्यामुळे तेलकट, तिखट पदार्थांचं सेवन करू नका. आणि थंड पाणी पिऊ नका. 

कुंभ (Aquarius Today Horoscope)

नोकरी (Job) - नोकरी करणाऱ्या लोकांबद्दल बोलायचं तर, आज तुम्ही तुमच्या करिअरला घेऊन थोडे गंभीर असाल. कारण वाढत्या स्पर्धेमुळे तुम्हाला तणाव होऊ शकतो. 

व्यवसाय (Business) - व्यवसाय करणाऱ्या लोकांबद्दल बोलायचं तर, ज्या ठिकाणी कोर्ट कचेरी असतील अशा व्यवसायात अडकू नका,नंतर प्रकरण तुमच्या गळ्याशी येऊ शकतं. 

कौटुंबिक (Family) - आज तुमच्या घरात पाहुण्यांची ये-जा असेल. आज तरूणांनी प्रेमसंबंध सोडून इतर बाबींवर लक्ष देणं गरजेचं आहे.

आरोग्य (Health) - तुमच्या आरोग्याविषयी बोलायचं तर, आज तुम्हाला पोटाचा त्रास जाणवू शकतो. त्यामुळे पौष्टीक पदार्थांचं सेवन करा.

मीन (Pisces Today Horoscope)

नोकरी (Job) - जर आपण नोकरी करणाऱ्या लोकांबद्दल बोललो तर, कामाच्या ठिकाणी तुमचे वरिष्ठ, बॉस आणि टीम मॅनेजमेंटकडून तुमच्या कामाचं कौतुक होईल. नोकरी करणाऱ्या व्यक्तींना आज ऑफिसमध्ये मीटिंग अटेंड करावी लागेल.

व्यवसाय (Business) - व्यवसाय करणाऱ्या लोकांसाठीही दिवस चांगला राहील. व्यवसाय करणाऱ्या लोकांबद्दल बोलायचं तर, आज व्यवसायात काही अडचणी येऊ शकतात, पण तुम्ही त्या सहज सोडवाल. तुम्ही व्यवसायात गुंतवणूक करण्याची योजना आखू शकता. आज तुम्हाला पैशाशी संबंधित चांगली बातमी मिळू शकते.

विद्यार्थी (Student) - विद्यार्थ्यांबद्दल सांगायचं तर, विद्यार्थ्यांनी आज शिक्षकांचा सल्ला घ्यावा. त्यांना काहीतरी नवीन शिकायला मिळेल, जे त्यांच्या भविष्यात उपयोगी पडेल.

आरोग्य (Health) - तुमच्या तब्येतीबद्दल बोलायचं झालं तर, आज तुम्हाला कोणतीच समस्या जाणवणार नाही. आरोग्य सुधारल्याने कामाच्या ठिकाणी तुमच्या कामाला गती मिळेल.

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.) 

हेही वाचा :

Weekly Lucky Zodiacs : नवीन आठवडा 'या 5 राशींसाठी ठरणार भाग्याचा; पगारवाढीसह अनेक शुभवार्ता मिळणार, रखडलेली कामंही होणार पूर्ण

महत्त्वाच्या बातम्या

Lucky Zodiac Signs : 21 ऑगस्टचा दिवस ठरणार भाग्याचा! देवी लक्ष्मीच्या कृपेने धन-संपत्तीत होणार भरभराट; एकामागोमाग मिळतील शुभवार्ता
21 ऑगस्टचा दिवस ठरणार भाग्याचा! देवी लक्ष्मीच्या कृपेने धन-संपत्तीत होणार भरभराट; एकामागोमाग मिळतील शुभवार्ता, वाचा लकी राशी
Hindu Religion: देवघरात 'कुलदेवतेचा कळस' तुम्हीही ठेवता? कळस भरण्याची 'ही' योग्य पद्धत माहितीय? कळस कधी भरावा? कोणी भरावा? धार्मिक मान्यता...
देवघरात 'कुलदेवतेचा कळस' तुम्हीही ठेवता? कळस भरण्याची 'ही' योग्य पद्धत माहितीय? कळस कधी भरावा? कोणी भरावा? धार्मिक मान्यता...
Raksha Bandhan 2026 : रक्षाबंधनानंतर राखी कधी काढावी? राखी काढण्याची योग्य पद्धत कोणती? वाचा A to Z माहिती
रक्षाबंधनानंतर राखी कधी काढावी? राखी काढण्याची योग्य पद्धत कोणती? वाचा A to Z माहिती
Garud Puran: अंत्यसंस्कारापूर्वी मृतदेहाला स्नान का घालतात? कर्मांशी याचा संबंध काय? गरूडपुराणातील 'हा' उल्लेख फार कमी लोकांना माहित.. 
अंत्यसंस्कारापूर्वी मृतदेहाला स्नान का घालतात? कर्मांशी याचा संबंध काय? गरूडपुराणातील 'हा' उल्लेख फार कमी लोकांना माहित.. 

व्हिडीओ

Vande Mataram Special Report : वंदे मातारमबाबत काँग्रेसचा ठराव, अमित शाहांचा हल्लाबोल
Sinhagad Fort 'किल्ले सिंहगड' ॲप नोंदणी द्वारेच मिळणार गडावर प्रवेश; एआय कॅमेऱ्यांची राहणार करडी नजर
Pawar Family Special Report : बारामतीकडे लक्ष द्या, बारामतीकरांनी थेट लिहलं पवार कुटुंबाला पत्र
Shiv Sena Hearing Special Report : राहुल नार्वेकरांच्या निर्णयावर आक्षेप, ठाकरेंच्या नेत्यांचा हल्लाबोल
Shiv Sena Hearing : तर धनुष्यबाण चिन्ह गोठवा, ठाकरेंची मागणी | Special Report ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Burger : अंधेरीतील 'जिमीज बर्गर'मध्ये धक्कादायक प्रकार; बर्गरमध्ये आढळला काचेचा तुकडा, ग्राहकाची तुकाराम मुंढेंच्या FDA कडे तक्रार
Burger : अंधेरीतील 'जिमीज बर्गर'मध्ये धक्कादायक प्रकार; बर्गरमध्ये आढळला काचेचा तुकडा, ग्राहकाची तुकाराम मुंढेंच्या FDA कडे तक्रार
मुक्ताईनगरमध्ये एकनाथ खडसेंचा सत्कार, मुख्यमंत्री फडणवीसांसह दिग्गजांची उपस्थिती; अरुणभाईंनी दिली माहिती
मुक्ताईनगरमध्ये एकनाथ खडसेंचा सत्कार, मुख्यमंत्री फडणवीसांसह दिग्गजांची उपस्थिती; अरुणभाईंनी दिली माहिती
भंगारवाल्याकडून 30 हजारांची लाच घेताना पोलीस हवालदारास बेड्या; एसीबीने रंगेहात पकडलं
भंगारवाल्याकडून 30 हजारांची लाच घेताना पोलीस हवालदारास बेड्या; एसीबीने रंगेहात पकडलं
Nashik Crime News : एकाच अपार्टमेंटमध्ये शेजारी, विवाहितांच्या प्रेमसंबंधात ठिणगी; दारू पिऊन प्रियकराने 34 वर्षीय मैत्रिणीला रिसॉर्टच्या दारातच चिरडले, नेमकं काय घडलं?
एकाच अपार्टमेंटमध्ये शेजारी, विवाहितांच्या प्रेमसंबंधात ठिणगी; दारू पिऊन प्रियकराने 34 वर्षीय मैत्रिणीला रिसॉर्टच्या दारातच चिरडले, नेमकं काय घडलं?
जंतर मंतर आंदोलनात पोलिसी बळाचा वापर, आरोपांची चौकशी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाकडून चौकशी समिती स्थापन; माजी न्यायमूर्तींची अध्यक्षपदी नियुक्ती
जंतर मंतर आंदोलनात पोलिसी बळाचा वापर, आरोपांची चौकशी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाकडून चौकशी समिती स्थापन; माजी न्यायमूर्तींची अध्यक्षपदी नियुक्ती
साखरेच्या इतिहासात आत्तापर्यंतची सर्वात मोठी दरवाढ, 65 वरुन 80 रुपयांवर उसळी, ग्राहकांच्या खिशाला मोठी झळ
साखरेच्या इतिहासात आत्तापर्यंतची सर्वात मोठी दरवाढ, 65 वरुन 80 रुपयांवर उसळी, ग्राहकांच्या खिशाला मोठी झळ
Ind vs Eng : तेच मैदान, तेच ठिकाण, तोच संघ; लंडनमधील लॉर्डमध्ये पु्न्हा एकदा टी-शर्ट काढून सेलिब्रेशन, टीम इंडियाकडून इंग्लंडचा धुव्वा
Video: तेच मैदान, तेच ठिकाण, तोच संघ; लंडनमधील लॉर्डमध्ये पु्न्हा एकदा टी-शर्ट काढून सेलिब्रेशन, टीम इंडियाकडून इंग्लंडचा धुव्वा
सुप्रीम कोर्टात वकिलांनी आज कळस चढवला; शिवसेना पक्ष अन् चिन्हाबाबत सुनावणी, अरविंद सावंतांना मोठा विश्वास
सुप्रीम कोर्टात वकिलांनी आज कळस चढवला; शिवसेना पक्ष अन् चिन्हाबाबत सुनावणी, अरविंद सावंतांना मोठा विश्वास
Embed widget