Horoscope Today 3 December 2025 : आज बुधवारच्या दिवशी 5 राशींवर प्रसन्न होणार बाप्पा! मागाल ती इच्छा होईल पूर्ण, वाचा आजचे राशीभविष्य
Horoscope Today 3 December 2025 : 12 राशींसाठी आजचा दिवस नेमका कसा असणार आहे. यासाठी वाचूयात सर्व 12 राशींचं आजचं राशीभविष्य.

Horoscope Today 3 December 2025 : वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार, आज 3 डिसेंबर (December) 2025 चा दिवस आहे. त्यानुसार आजचा वार बुधवार आहे. हा दिवस देवी आपण लाडक्या गणरायाला (Lord Ganesha) समर्पित करतो. तसेच, आजच्या दिवशी भक्त गणेश मंदिरात जाऊन देवाची पूजा करतात. उपवास धरतात आणि इच्छित फळ मागतात. ग्रहांच्या हालचालीच्या दृष्टीने देखील आजचा दिवस खास असणार आहे. कारण लवकरच गुरु ग्रहाचं संक्रमण होणार आहे. त्यामुळे ग्रहांच्या संक्रमणाचा कोणकोणत्या राशींवर परिणाम होणार आणि 12 राशींसाठी आजचा दिवस नेमका कसा असणार आहे. यासाठी वाचूयात सर्व 12 राशींचं आजचं राशीभविष्य (Horoscope Today).
मेष रास (Aries Horoscope)
मेष राशीसाठी आजचा दिवस सकारात्मक असणार आहे. दिवसाची सुरुवात तुमची चांगली होईल. तसेच, तुमच्या विचारात स्थिरता राहील. आरोग्याच्या बाबतीत हलगर्जीपणा करु नका. तसेच, तुमच्या व्यवहारात आज तुम्हाला अपेक्षेपेक्षा जास्त लाभ मिळेल.
वृषभ रास (Taurus Horoscope)
वृषभ राशीसाठी आजचा दिवस चांगला जाणार आहे. तुम्ही तुमच्या मानसिक आणि शारीरिक आरोग्याची काळजी घेण्याची गरज आहे. तसेच मुलांच्या बाबतीत आज तुम्हाला शुभवार्ता मिळेल. व्यवहार सुरळीत चालेल. डोळ्यांची काळजी घ्या.
मिथुन रास (Gemini Horoscope)
मिथुन राशीसाठी आजचा दिवस सामान्य असणार आहे. कामाच्या गडबडीत आज तुम्ही फार व्यस्त असाल. पण, कुटुंबियांसाठी थोडा वेळ काढाल. जर तुम्ही प्रवास करणार असाल तर तुमच्या सामानाची योग्य काळ घ्या. आर्थिक बाबतीत आजचा दिवस थोडा कठीण आहे.
कर्क रास (Cancer Horoscope)
कर्क राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस सामान्य दिवसांपैकी एक असणार आहे. समाजात तुमची वेगळी प्रतिष्ठा निर्माण होईल. तुमच्या कामाचं बॉसकडून कौतुक होईल. तसेच, देवी लक्ष्मीच्या कृपेने धनसंपत्तीची बरकत होईल. महत्त्वाकांक्षी स्वभाव राहील.
सिंह रास (Leo Horoscope)
या राशीसाठी आजचा दिवस भाग्याचा असणार आहे. तुम्हाला तुमच्या चतुराईचा चांगला फायदा घेता येईल. तसेच, कामाच्या निमित्ताने तुम्हाला प्रवास करावा लागू शकतो. मित्रांचा सहवास तुमच्यासाठी महत्त्वाचा राहील.
कन्या रास (Virgo Horoscope)
कन्या राशीसाठी आजचा दिवस लाभदायी असणार आहे. तुमच्या नकळत तुम्हाला आज धनलाभ मिळेल. त्यामुळे तुम्ही खुश असाल. आज दिवसभरात तुम्हाला शुभवार्ता मिळू शकते. धार्मिक कार्यात तुमचं मन रमेल.
तूळ रास (Libra Horoscope)
तूळ राशीसाठी आजचा दिवस अनुकूल असणार आहे. आज तुमच्यासाठी उत्पन्नाचे अनेक मार्ग उघडे होतील. घरात आनंदाचं वातावरण राहील. काही कारणास्तव तुमचा पारा चढू शकतो. मात्र, तुम्ही लगेच शांतही व्हाल.
वृश्चिक रास (Scorpio Horoscope)
वृश्चिक राशीसाठी आजचा दिवस उत्साहाचा असणार आहे. आज उत्साहाच्या भरात जास्त पैसे खर्च करु नका. तसेच, कामाच्या बाबतीत तुम्हाला नवीन अनुभव घेता येईल. तुमच्या जोडीदाराकडून तुम्हाला भेटवस्तू मिळू शकते.
धनु रास (Saggitarius Horoscope)
धनु राशीसाठी आजचा दिवस सामान्य असणार आहे. आज तुम्ही तुमच्या कामात व्यस्त असाल. तुमच्या कामावर लक्ष केंद्रित राहील. तसेच, शनिच्या मार्गी चालीचा देखील या राशीवर शुभ परिणाम होताना दिसणार आहे. त्यामुळे लवकरच अच्छे दिन सुरु होतील.
मकर रास (Capricorn Horoscope)
मकर राशीसाठी आजचा दिवस चांगला असणार आहे. मित्रांच्या सहकार्याने तुमची सगळी रखडलेली कामे आज पूर्ण होतील. संध्याकाळचा वेळ तुम्ही धार्मिक कार्यात घालवाल. तसेच, मानसिक शांतीसाठी चिंतन कराल.
कुंभ रास (Aquarius Horoscope)
कुंभ राशीसाठी आजचा दिवस चढ-उताराचा असणार आहे. आज तुम्हाला ना लाभ ना तोटा मिळणार आहे. तसेच, शनिची मार्गी चाल असल्यामुळे काही काळासाठी तुमच्यासाठी हा काळ शुभकारक असणार आहे.
मीन रास (Pisces Horoscope)
मीन राशीसाठी आजचा दिवस भाग्यशाली असणार आहे. आज तुम्हाला तुमच्या मुलांकडून शुभवार्ता ऐकायला मिळू शकते. तसेच, आर्थिक अडचणीतून तुमची सुटका होईल. तुमच्या कामावर तुमचं मनापासून प्रेम असेल. आरोग्याची काळजी घ्या.
हे ही वाचा :
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)



















