Horoscope Today 29th March 2024 Aries Taurus Gemini : आजचा दिवस काही लोकांसाठी चांगले तर काहींसाठी वाईट परिणाम आणू शकतो. आज तुमचे ग्रह तुमच्यासाठी अनुकूल आहेत की नाही? आज तुम्हाला कोणत्या आव्हानांना तोंड द्यावे लागेल किंवा तुम्हाला कोणत्या प्रकारच्या संधी मिळू शकतात? मेष, वृषभ, मिथुन राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस व्यवसाय, आरोग्य, नातेसंबंध आणि प्रेमासाठी किती खास असणार आहे? आजचे राशीभविष्य जाणून घ्या...


मेष (Aries Today Horoscope)


नोकरी (Job) - नोकरीच्या ठिकाणी तुमचा आत्मविश्वास वाढेल आणि प्रगती निश्चित आहे. नोकरीत बढतीची संधी मिळेल. अधिकाऱ्यांचे सहकार्य मिळेल.


व्यवसाय (Business) - व्यवसाय वाढवण्यासाठी अधिक मेहनत करण्याची गरज आहे, तरच तुम्हाला यश मिळेल.


कुटुंब (Family) - घरगुती जबाबदाऱ्यांकडे दुर्लक्ष केले तर कुटुंबातील लोक नाराज होतील.कुटुंबासह धार्मिक स्थळी जाण्याचा योग आहे 


आरोग्य (Health) - बाहेरचे खाणे टाळा. पोटाच्या समस्या उद्भवण्याची शक्यता आहे.


वृषभ (Taurus Today Horoscope)


आर्थिक जीवन (Wealth) -  आर्थिक जीवनात समृद्धी येईल. यासोबतच  तुम्ही करमुक्तही होऊ शकता.


कुटुंब (Family) -  नातेवाईक आणि मित्रांकडून अचानक भेटवस्तू मिळतील. कुटुंबाकडून सहकार्य मिळेल. तुम्ही कुटुंबातील सदस्यांसोबत वेळ घालवाल घरातील कामे आटोपल्यानंतर तुम्ही तुमच्या आवडीची कामे करून तुमच्या मोकळ्या वेळेचा पुरेपूर वापर कराल.


विद्यार्थी (Student) -  विद्यार्थी परीक्षेत चांगले गुण मिळवतील, ज्यामुळे त्यांच्या पालकांचा सन्मान होईल. जे घरापासून दूर  आहेत त्यांना त्यांच्या कुटुंबाची आठवण येऊ शकते.


आरोग्य (Health) -  मुलाच्या किंवा वृद्ध व्यक्तीच्या आरोग्याशी संबंधित समस्या उद्भवतील. व्यस्त वेळापत्रक असूनही, तुमचे आरोग्य पूर्णपणे ठीक राहील. तुम्ही तुमच्या दैनंदिन दिनचर्येत मॉर्निंग वॉक, योग आणि ध्यान यांचा समावेश कराल. 


मिथुन (Gemini Today Horoscope)


 आर्थिक जीवन (Wealth) - आईकडून आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. परदेशातून आयात-निर्यातीचे काम करणाऱ्या लोकांना चांगली बातमी मिळेल. घरबसल्या  काम करणाऱ्या लोकांनाही चांगला फायदा मिळेल.


व्यवसाय (Business) - आर्थिक नुकसान होण्याची शक्यता आहे, त्यामुळे व्यवहाराशी संबंधित बाबींमध्ये तुम्ही जेवढे सावध रहाल तेवढे तुमच्यासाठी चांगले राहील.


लव्ह लाईफ (Love Life) - एखाद्या व्यक्तीमुळे तुमच्या नात्यात मतभेद होऊ शकतात.जारी, मित्र किंवा नातेवाईक यांच्यामुळे वैवाहिक जीवनात मतभेद होण्याची शक्यता आहे. 


आरोग्य (Health) -  दिवस तुमच्यासाठी आनंददायी जाणार आहे. विवाहित लोक त्यांच्या घरगुती जीवनात आनंदाने आणि शांततेने जगतील.


(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)


हे ही वाचा :


Sagittarius April Horoscope 2024: धनु राशीच्या लोकांनी मुंगी होऊन साखर खावी, कसा असणार एप्रिल महिना? वाचा मासिक राशीभविष्य