(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Horoscope Today 29 September 2024 : मेष, वृषभ, मिथुन राशींचं नशीब फळफळणार, होणार धनलाभ; वाचा आजचे राशीभविष्य
Horoscope Today 29 September 2024 : मेष, वृषभ, मिथुन राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस व्यवसाय, आरोग्य, नातेसंबंध आणि प्रेमासाठी किती खास असणार आहे? आजचे राशीभविष्य जाणून घ्या...
Horoscope Today 29 September 2024 : आजचा दिवस काही लोकांसाठी चांगले, तर काहींसाठी वाईट परिणाम आणू शकतो. आज तुमचे ग्रह तुमच्यासाठी अनुकूल आहेत की नाही? आज तुम्हाला कोणत्या आव्हानांना तोंड द्यावे लागेल किंवा तुम्हाला कोणत्या प्रकारच्या संधी मिळू शकतात? मेष, वृषभ, मिथुन राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस व्यवसाय, आरोग्य, नातेसंबंध आणि प्रेमासाठी किती खास असणार आहे? आजचे राशीभविष्य जाणून घ्या...
मेष (Aries Today Horoscope)
नोकरी (Job) - आजचा दिवस चांगला जाईल. नोकरी करणाऱ्या लोकांबद्दल बोलायचं झालं तर, तुम्हाला काही नवीन काम करावसं वाटेल, ज्यासाठी तुम्हाला काही लोकांची मदत घ्यावी लागेल.
व्यवसाय (Business) - व्यवसाय करणाऱ्या लोकांना थोडं सावध राहावं लागेल, कारण त्यांचं काम रखडण्याची शक्यता आहे.
विद्यार्थी (Student) - विद्यार्थ्यांबद्दल बोलायचं झाल्यास, कुटुंबातील सदस्यांसह कुठेतरी बाहेर फिरायला जाऊ शकता.
आरोग्य (Health) - तुमच्या आरोग्याबद्दल बोलायचं झालं तर, आज तुमच्या तब्येतीत काही चढ-उतार येतील. तुमच्या खाण्यापिण्याची विशेष काळजी घ्या.
वृषभ(Taurus Today Horoscope)
नोकरी (Job) - नोकरी करणाऱ्या लोकांबद्दल बोलायचं तर, तुम्हाला आज सहकाऱ्यांची मदत लाभेल.
व्यवसाय (Business) - व्यवसाय साधारण असेल. तुमचे उत्पन्न वाढवण्यासाठी तुम्हाला नवीन स्रोत सापडतील.
विद्यार्थी (Student) - विद्यार्थ्यांना बौद्धिक आणि मानसिक ओझ्यातून आराम मिळेल.
आरोग्य (Health) - तुमच्या तब्येतीबद्दल बोलायचं तर, आरोग्याची काळजी घ्या. ताप, खोकला होण्याची शक्यता आहे.
मिथुन (Gemini Today Horoscope)
नोकरी (Job) - आजचा दिवस चांगला जाईल. नोकरी करणाऱ्या लोकांबद्दल बोलायचं झालं तर, मिथुन राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस सकारात्मक परिणाम देईल. कोणताही निर्णय विचारपूर्वक घ्यावा लागेल.
व्यवसाय (Business) - व्यावसायिकांबद्दल बोलायचं तर, व्यवसायात काहीतरी नवीन करण्याची तुमची सवय तुम्हाला आघाडीवर ठेवू शकते.
विद्यार्थी (Student) - तुम्ही काही निरुपयोगी कामात गुंतून राहाल.
आरोग्य (Health) - तुमच्या आरोग्याविषयी बोलायचं झालं तर, आज तुमचं आरोग्य ठणठणीत असेल.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा :