एक्स्प्लोर

Horoscope Today 29 August 2026 : आज शनिवारच्या दिवशी 'या' 8 राशींवर असणार शनिची करडी नजर, कर्माचं फळ कोणत्या राशींना मिळणार? वाचा आजचे राशीभविष्य

Horoscope Today 29 August 2026 : आजचा दिवस 12 राशींसाठी नेमका कसा असणार आहे. यासाठी वाचूयात सर्व 12 राशींचं आजचं राशीभविष्य. 

Horoscope Today 29 August 2026 : वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार, आज 29 ऑगस्ट 2026 चा दिवस आहे. त्यानुसार आजचा वार शनिवार आहे. आजचा दिवस आपण शनिदेवाला (Shani Dev) समर्पित करतो. तसेच, आजच्या दिवशी भक्त शनिदेवाची पूजा करतात. आपल्या चुकीची माफी मागतात. तसेच, ग्रहांच्या संक्रमणाच्या दृष्टीने देखील आजचा दिवस खास असणार आहे. त्यामुळे आजचा दिवस 12 राशींसाठी नेमका कसा असणार आहे. यासाठी वाचूयात सर्व 12 राशींचं आजचं राशीभविष्य (Horoscope Today). 

मेष रास (Aries Horoscope)

मेष राशीसाठी आजचा दिवस सामान्य असणार आहे. फक्त तुम्ही तुमच्या मुलांच्या आरोग्याची काळजी घ्यावी. प्रेमाच्या बाबतीत अहंकार बाळगू नका. तसेच, आजच्या दिवसात कोणताही नवीन निर्णय घेताना सावधानता बाळगा. घराच्या आसपास गाय दिसली तर दान करायला विसरू नका. तुमच्यासाठी लवकर चांगली बातमी आहे. 

वृषभ रास (Taurus Horoscope)

वृषभ राशीसाठी आजचा दिवस लाभदायी असणार आहे. तुमच्या व्यवसायाचा विस्तार वाढलेला दिसेल. नोकरदार वर्गातील लोकांना लवकरच नवीन प्रोजेक्ट हाती लागेल. तसेच, विद्यार्थ्यांसाठी आजचा दिवस सामान्य असणार आहे. तुमच्यातील कलागुणांना चांगला वाव मिळेल. 

मिथुन रास (Gemini Horoscope)

मिथुन राशीसाठी आजचा दिवस फार खास असणार आहे. आज तुमची एखाद्या जुन्या मित्राशी भेट होईल आणि जुन्या आठवणींना तुम्ही उजाळा द्याल. व्यवसायात एखादा करार होऊ शकतो. तसेच, संपत्तीचे अनेक मार्ग तुम्हाला सापडतील. मुलांसाठी आजचा दिवस अनुकूल आहे. काही महत्त्वाची कामे आज वेळेत पूर्ण होतील. 

कर्क रास (Cancer Horoscope)

कर्क राशीसाठी आजचा दिवस प्रगतीचा असणार आहे. तुमच्यापाठी घरातील ज्येष्ठ व्यक्तींचा पाठिंबा असताना तुम्हाला चिंता करण्याची गरज नाही. वैवाहिक जीवन सुखाचे जातील. आज संध्याकाळच्या वेळी पार्टनरला छान भेटवस्तू द्याल. तसेच, तुमचा आत्मविश्वासही वाढेल.

सिंह रास (Leo Horoscope)

सिंह राशीसाठी आजचा दिवस खास असणार आहे. तुम्हाला तुमच्या व्यवसायात काही दिग्गज लोकांची मदत मिळेल. कामाच्या निमित्ताने तुम्हाला फार प्रवास करावा लागेल. या दरम्यान अनेक लोकांशी तुमच्या भेटीगाठी होतील. एखाद्या कामाची सुरुवात करण्यासाठी आजचा दिवस शुभ आहे. 

कन्या रास (Virgo Horoscope)

कन्या राशीसाठी आजचा दिवस पूर्वीपेक्षा चांगला असणार आहे. महत्त्वाचं म्हणजे ज्या कामासाठी तुम्ही इतके दिवस थांबून होता ते काम तुमचं वेळेत पूर्ण होईल. तुमच्यातील कलागुणांना चांगला वाव मिळेल. तसेच, सामाजत तुमच्या नावाचं कौतुक केलं जाईल. प्रगतीचे अनेक संकेत निर्माण होणार आहेत.  

तूळ रास (Libra Horoscope)

तूळ राशीसाठी आजचा दिवस सामान्य असणार आहे. तुम्हाला ना लाभ ना तोटा होईल. पण, तुम्ही हाती घेतलेल्या कार्याने अनेकांना रोजगार मिळेल. त्यामुळे व्यवहारात फक्त स्वत:चाच विचार न करता इतरांचा देखील विचार करणं तुमच्यासाठी लाभदायी ठरेल.

वृश्चिक रास (Scorpio Horoscope)

वृश्चिक राशीच्या दिवसाची सुरुवात तर चांगली होईल. मात्र, दिवसाच्या शेवटी तुम्हाला कठीण परिस्थितीचा सामना करावा लागेल. भविष्यात तुम्ही प्लॅन केलेल्या योजनांवर याचा परिणाम होऊ शकतो. तसेच, तुमचा आत्मविश्वासही ढासळेल. नवीन गोष्टी शिकण्याचा प्रयत्न कराल.

धनु रास (Saggitarius Horoscope)

धनु राशीसाठी आजचा दिवस फार सामान्य असणार आहे. आज तुम्हाला तुमची अनेक रखडलेली कामे वेळेत पूर्ण करता येतील. तसेच, तुमच्या हाती चांगली बातमी लागेल. लवकरच एखाद्या नवीन कार्याची सुरुवात तुम्ही करु शकता. प्रवासाचे योग आहे. फक्त आळस दूर ठेवा. यश तुमचंच आहे. 

मकर रास (Capricorn Horoscope)

मकर राशीने शेअर बाजारात पैशांची गुंतवणूक करु नये. तुम्हाला धनहानीचे संकेत मिळू शकतात. तसेच, गुंतवणुकीसाठी हा काळ योग्य नाही. तुमचा व्यवसाय सुरळीत चालेल. मात्र, त्यात ना लाभ ना तोटा मिळेल. 

कुंभ रास (Aquarius Horoscope)

कुंभ राशीसाठी आजचा दिवस सामान्य आहे. दिवसाची सुरुवात प्रसन्न होईल. पण, जसजसा वेळ निघत जाईल तुम्हाला बैचेन वाटेल. तुमच्या मनात अनेक प्रश्न निर्माण होतील. 10 गोष्टी डोक्यात सुरु असतील पण उत्तर एकाचंही मिळणार नाही. 

मीन रास (Pisces Horoscope)

मीन राशीसाठी आजचा दिवस चांगला आहे. तुमची आर्थिक स्थितीही चांगली आहे. मात्र, तरीही पैशांचा अतिवापर करु नका. महिन्याचा शेवटचा दिवस आहे. त्यामुळे व्यवहाराच्या बाबतीत काळजी घ्या. वैवाहिक जीवनातील अडथळे दूर होतील. 

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

इतर महत्त्वाच्या बातम्या :      

Weekly Horoscope : मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या राशींसाठी सप्टेंबरचा पहिला आठवडा कसा असणार? 6 पैकी 4 राशी होतील मालामाल, साप्ताहिक राशीभविष्य

Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Horoscope Today 29 October 2026: आज संकष्टी चतुर्थीचा दिवस 7 राशींसाठी भाग्याचा! विशेष शुभ योग जुळले, कोणाचं नशीब चमकणार? आजचे राशीभविष्य..
आज संकष्टी चतुर्थीचा दिवस 7 राशींसाठी भाग्याचा! विशेष शुभ योग जुळले, कोणाचं नशीब चमकणार? आजचे राशीभविष्य..
Mahakumbh Mahasamvad 2026: “कुंभमेळ्याचा विपर्यास करण्याचा प्रयत्न आतापासूनच”; महाकुंभ महासंवादात तुषार भोसलेंची प्रतिक्रिया, धर्म, संस्कृती ते प्रशासनापर्यंत विचारमंथन..
“कुंभमेळ्याचा विपर्यास करण्याचा प्रयत्न आतापासूनच”; महाकुंभ महासंवादात तुषार भोसलेंची प्रतिक्रिया, धर्म, संस्कृती ते प्रशासनापर्यंत विचारमंथन..
Kumbh Mela 2027: नाशिकमध्ये एबीपी माझाचा ‘महाकुंभ महासंवाद’; धर्म, संस्कृती ते प्रशासनापर्यंत रंगणार विचारमंथन!
नाशिकमध्ये एबीपी माझाचा ‘महाकुंभ महासंवाद’; धर्म, संस्कृती ते प्रशासनापर्यंत रंगणार विचारमंथन!
Kumbh Mela 2027: गोदावरीच्या तीरावर भरणार श्रद्धेचा महासागर! 31 ऑक्टोबरला ध्वजारोहण, 2028 पर्यंत चालणार सिंहस्थ पर्व, अमृतस्नानांचं महत्त्व, वेळापत्रक जाणून घ्या!
गोदावरीच्या तीरावर भरणार श्रद्धेचा महासागर! 31 ऑक्टोबरला ध्वजारोहण, 2028 पर्यंत चालणार सिंहस्थ पर्व, अमृतस्नानांचं महत्त्व, वेळापत्रक जाणून घ्या!
Advertisement

व्हिडीओ

Raj Thackeray Karjat Full Speech : महाराष्ट्र उद्योगपतींच्या चावीवर चालणार नाही! राज ठाकरेंची गर्जना
Shiv Sena PC On Pradeep Purnekar Case :एकनाथ शिंदेंवर चुकीचं बोलणारा नेता ठाण्यातून परत जाणार नाही, नरेश म्हस्केंची वॉर्निंग
Pratap Patil On Win : मराठवाड्यातील पदवीधरांच्या रोजगारासाठी मी काम करणार : प्रताप पाटील
Nilesh Chandramuni Mumbai : कबुतरखाना वादानंतर निलेश चंद्रमुनींचा राज ठाकरेंना पाठिंबा : ABP Majha
Nitesh Karale Guruji On Win : अनपेक्षित निकाला लागण्याची शक्यता, कराळे गुरुजींना विजयाचा विश्वास
Advertisement

फोटो गॅलरी

Advertisement

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Varanasi MLC Election Result : पंतप्रधान मोदींच्या वाराणसीमध्ये भाजपला मोठा धक्का, शिक्षक मतदारसंघामध्ये समाजवादीचा विजय, पदवीधरमध्येही विजयाच्या उंबरठ्यावर
पंतप्रधान मोदींच्या वाराणसीमध्ये भाजपला मोठा धक्का, शिक्षक मतदारसंघामध्ये समाजवादीचा विजय, पदवीधरमध्येही विजयाच्या उंबरठ्यावर
Raj Thackeray : अमित शाह, कुऱ्हाडीचा आवाज येतो, पण देवाच्या काठीचा येत नाही, तो ज्या दिवशी येईल...; कर्जत वृक्षतोडीवरून राज ठाकरे भडकले
अमित शाह, कुऱ्हाडीचा आवाज येतो, पण देवाच्या काठीचा येत नाही, तो ज्या दिवशी येईल...; कर्जत वृक्षतोडीवरून राज ठाकरे भडकले
अर्णब चक्रीवादळाने आंध्र प्रदेशात हाहाकार, विशाखापट्टणममध्ये जुलै महिन्याच्या दीडपट पाऊस 18 तासात कोसळला, तिघांचा बळी; 57 हजार लोकांना सुरक्षित स्थळी हलवलं, 50 रेल्वे 21 विमानसेवा रद्द
अर्णब चक्रीवादळाने आंध्र प्रदेशात हाहाकार, विशाखापट्टणममध्ये जुलै महिन्याच्या दीडपट पाऊस 18 तासात कोसळला, तिघांचा बळी; 57 हजार लोकांना सुरक्षित स्थळी हलवलं, 50 रेल्वे 21 विमानसेवा रद्द
मुंबईत 15 लाखांच्या लाचप्रकरणी अधिकारी अटकेत; येवल्यात 1500 रु घेताना तलाठी रंगेहात अडकला
मुंबईत 15 लाखांच्या लाचप्रकरणी अधिकारी अटकेत; येवल्यात 1500 रु घेताना तलाठी रंगेहात अडकला
निवडणुकीत राष्ट्रवादीच्या तुतारीने दोन जागा जिंकल्या, जयंत पाटलांचा भाजपला टोला; कराळे मास्तरांच्या निलंबनावरही बोलले
निवडणुकीत राष्ट्रवादीच्या तुतारीने दोन जागा जिंकल्या, जयंत पाटलांचा भाजपला टोला; कराळे मास्तरांच्या निलंबनावरही बोलले
Narendra Modi Tweet: विधानपरिषदेच्या 28 जागांसाठी निवडणूक, बॅलेटपेपरवर मतदान; मोदी म्हणाले, काँग्रेसने किती जागा जिंकल्या, ओळखा?
विधानपरिषदेच्या 28 जागांसाठी निवडणूक, बॅलेटपेपरवर मतदान; मोदी म्हणाले, काँग्रेसने किती जागा जिंकल्या, ओळखा?
...अन्यथा पक्षाला आगामी निवडणुकांमध्ये किंमत मोजावी लागू शकते; राष्ट्रवादीच्या पराभवानंतर अमोल मिटकरींची पहिली प्रतिक्रिया
...अन्यथा पक्षाला आगामी निवडणुकांमध्ये किंमत मोजावी लागू शकते; राष्ट्रवादीच्या पराभवानंतर अमोल मिटकरींची पहिली प्रतिक्रिया
Chhatrapati Sambhajinagar Graduates Constituency Result 2026 मराठवाडा पदवीधरमध्ये राष्ट्रवादीला 'दे धक्का'; सतीश चव्हाणांच्या पराभवाची 6 कारणे, बदलाचा मुद्दा प्रभावी ठरला
मराठवाडा पदवीधरमध्ये राष्ट्रवादीला 'दे धक्का'; सतीश चव्हाणांच्या पराभवाची 6 कारणे, बदलाचा मुद्दा प्रभावी ठरला
Embed widget