एक्स्प्लोर

Horoscope Today 28 November 2025 : आज शुक्रवारचा दिवस मेष, कन्यासह 'या' राशींसाठी भाग्यशाली; देवी लक्ष्मीची कृपा कोणत्या राशींवर असणार? आजचे राशीभविष्य

Horoscope Today 28 November 2025 : आज शनि मार्गी चाल करणार आहेत. तसेच, मंगळ आणि शुक्र ग्रहाची युती होणार आहे.  त्यामुळे ग्रहांच्या संक्रमणाचा कोणकोणत्या राशींवर परिणाम होणार हे पाहणं महत्त्वाचं असेल.

Horoscope Today 28 November 2025 : वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार, आज 28 नोव्हेंबर 2025 चा दिवस आहे. त्यानुसार आजचा वार शुक्रवार आहे. हा दिवस देवी लक्ष्मीला (Goddess Lakshmi) आपण समर्पित करतो. त्यामुळे आजच्या दिवशी भक्त देवी लक्ष्मीची पूजा करतात. ग्रहांच्या हालचालीच्या दृष्टीने देखील आजचा दिवस खास असणार आहे. कारण आज शनि मार्गी (Shani Margi) चाल करणार आहेत. तसेच, मंगळ आणि शुक्र ग्रहाची युती होणार आहे.  त्यामुळे ग्रहांच्या संक्रमणाचा कोणकोणत्या राशींवर परिणाम होणार आणि 12 राशींसाठी आजचा दिवस नेमका कसा असणार आहे. यासाठी वाचूयात सर्व 12 राशींचं आजचं राशीभविष्य (Horoscope Today)

मेष रास (Aries Horoscope)

मेष राशीसाठी आजचा दिवस फार अनुकूल असणार आहे. या राशीच्या अष्टम भावात मंगळ आणि शुक्र ग्रहाची युती होणार आहे. त्यामुळे जोडीदाराबरोबर आजचा दिवस फार आनंदात जाईल. उत्पन्नाचे नवे मार्ग तुम्हाला सापडतील. पण वाणीवर संयम गरजेचा आहे. 

वृषभ रास (Taurus Horoscope)

वृषभ राशीसाठी आजचा दिवस भाग्यशाली असणार आहे. या काळात जोडीदाराची तुम्हाला चांगली साथ लाभेल. काम आणि तुमचं आरोग्य यामध्ये संतुलन ठेवण्यात तुम्ही यशस्वी व्हाल. तसेच, लहान मुलांना बघून तुमचं मन प्रसन्न होईल. आज प्रवासाचा योग आहे. 

मिथुन रास (Gemini Horoscope)

मिथुन राशीसाठी आजचा दिवस सामान्य असणार आहे. कामाच्या गडबडीत आज तुम्ही फार व्यस्त असाल. पण, कुटुंबियांसाठी थोडा वेळ काढाल. जर तुम्ही प्रवास करणार असाल तर तुमच्या सामानाची योग्य काळ घ्या. आर्थिक बाबतीत आजचा दिवस थोडा कठीण आहे. 

कर्क रास (Cancer Horoscope)

कर्क राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस सामान्य दिवसांपैकी एक असणार आहे. समाजात तुमची वेगळी प्रतिष्ठा निर्माण होईल. तुमच्या कामाचं बॉसकडून कौतुक होईल. तसेच, देवी लक्ष्मीच्या कृपेने धनसंपत्तीची बरकत होईल. महत्त्वाकांक्षी स्वभाव राहील.

सिंह रास (Leo Horoscope)

या राशीसाठी आजचा दिवस भाग्याचा असणार आहे. तुम्हाला तुमच्या चतुराईचा चांगला फायदा घेता येईल. तसेच, कामाच्या निमित्ताने तुम्हाला प्रवास करावा लागू शकतो. मित्रांचा सहवास तुमच्यासाठी महत्त्वाचा राहील.

कन्या रास (Virgo Horoscope)

कन्या राशीसाठी आजचा दिवस लाभदायी असणार आहे. तुमच्या नकळत तुम्हाला आज धनलाभ मिळेल. त्यामुळे तुम्ही खुश असाल. आज दिवसभरात तुम्हाला शुभवार्ता मिळू शकते. धार्मिक कार्यात तुमचं मन रमेल.

तूळ रास (Libra Horoscope)

तूळ राशीसाठी आजचा दिवस अनुकूल असणार आहे. आज तुमच्यासाठी उत्पन्नाचे अनेक मार्ग उघडे होतील. घरात आनंदाचं वातावरण राहील. काही कारणास्तव तुमचा पारा चढू शकतो. मात्र, तुम्ही लगेच शांतही व्हाल. 

वृश्चिक रास (Scorpio Horoscope)

वृश्चिक राशीसाठी आजचा दिवस उत्साहाचा असणार आहे. आज उत्साहाच्या भरात जास्त पैसे खर्च करु नका. तसेच, कामाच्या बाबतीत तुम्हाला नवीन अनुभव घेता येईल. तुमच्या जोडीदाराकडून तुम्हाला भेटवस्तू मिळू शकते. 

धनु रास (Saggitarius Horoscope)

धनु राशीसाठी आजचा दिवस सामान्य असणार आहे. आज तुम्ही तुमच्या कामात व्यस्त असाल. तुमच्या कामावर लक्ष केंद्रित राहील. तसेच, शनिच्या मार्गी चालीचा देखील या राशीवर शुभ परिणाम होताना दिसणार आहे. त्यामुळे लवकरच अच्छे दिन सुरु होतील.

मकर रास (Capricorn Horoscope)

मकर राशीसाठी आजचा दिवस चांगला असणार आहे. मित्रांच्या सहकार्याने तुमची सगळी रखडलेली कामे आज पूर्ण होतील. संध्याकाळचा वेळ तुम्ही धार्मिक कार्यात घालवाल. तसेच, मानसिक शांतीसाठी चिंतन कराल. 

कुंभ रास (Aquarius Horoscope)

कुंभ राशीसाठी आजचा दिवस चढ-उताराचा असणार आहे. आज तुम्हाला ना लाभ ना तोटा मिळणार आहे. तसेच, शनिची मार्गी चाल असल्यामुळे काही काळासाठी तुमच्यासाठी हा काळ शुभकारक असणार आहे.

मीन रास (Pisces Horoscope)

मीन राशीसाठी आजचा दिवस भाग्यशाली असणार आहे. आज तुम्हाला तुमच्या मुलांकडून शुभवार्ता ऐकायला मिळू शकते. तसेच, आर्थिक अडचणीतून तुमची सुटका होईल. तुमच्या कामावर तुमचं मनापासून प्रेम असेल. आरोग्याची काळजी घ्या. 

हे ही वाचा :

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

Shani Margi 2025 : शनिच्या मार्गी चालीमुळे आजपासून 'या' राशींचं भाग्य उजळणार; जुलै 2026 पर्यंत या राशी जगतील 'टेन्शन फ्री', शनिचीच कृपा

महत्त्वाच्या बातम्या

Garud Puran: जावई आपल्या सासू-सासऱ्यांचे अंत्यसंस्कार का करत नाहीत? वारस नसेल तर? गरुडपुराणातील कारण जाणून व्हाल थक्क...
जावई आपल्या सासू-सासऱ्यांचे अंत्यसंस्कार का करत नाहीत? वारस नसेल तर? गरुडपुराणातील कारण जाणून व्हाल थक्क...
Horoscope Today 09 July 2026 : आज गुरुवारच्या दिवशी 6 राशींना सतर्कतेचा इशारा, प्रत्येक पावलावर संकट येण्याची शक्यता; वाचा आजचे राशीभविष्य
आज गुरुवारच्या दिवशी 6 राशींना सतर्कतेचा इशारा, प्रत्येक पावलावर संकट येण्याची शक्यता; वाचा आजचे राशीभविष्य
Weekly Horoscope: जुलैचा तिसरा आठवडा भाग्याचा कि टेन्शनचा? सोमवती अमावस्येसह ग्रहांचे शुभ संयोग, कोण मालामाल? पैसा, नोकरी, प्रेम.. साप्ताहिक राशीभविष्य
जुलैचा तिसरा आठवडा भाग्याचा कि टेन्शनचा? सोमवती अमावस्येसह ग्रहांचे शुभ संयोग, कोण मालामाल? पैसा, नोकरी, प्रेम.. साप्ताहिक राशीभविष्य
Horoscope Today 9 July 2026: आजचा गुरूवार 6 राशींचं नशीब पालटणारा! अनेक शुभ योग जुळले, दत्तगुरू कृपेने कोण भाग्यशाली? आजचे राशीभविष्य...
आजचा गुरूवार 6 राशींचं नशीब पालटणारा! अनेक शुभ योग जुळले, दत्तगुरू कृपेने कोण भाग्यशाली? आजचे राशीभविष्य...

व्हिडीओ

Ramesh Mhatre Special Report : महिला डॉक्टर मारहाण प्रकरणी रमेश म्हात्रेला अटक, माज उतरणार?
Sudhir Mungantiwar on Doctors Nurses Assaults : डॉक्टर,नर्सेसवरील मारहाणीचे समर्थन नाही
Sharad Pawar NCP Special Report : भेटीगाठी कशासाठी? शरद पवारांच्या निर्णयाकडे लक्ष
Missing Link : संवादाची लिंक मिसिंग? ठाकरेंच्या शिवसेनेचे वेगवेगळे सूर | Special Report
Zero Hour Full : 7 July | भारतीय रेल्वेचा प्रवास महिलांसाठी सुरक्षित आहे असं वाटतं का? | ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Multibagger Stock : एक लाख रुपयांच्या गुंतवणुकीचे सहा महिन्यात बनले दीड लाख रुपये, मल्टीबॅगर स्टॉकची कमाल, शेअर किती रुपयावंर पोहोचला?
एक लाख रुपयांच्या गुंतवणुकीचे सहा महिन्यात बनले दीड लाख रुपये, मल्टीबॅगर स्टॉकची कमाल, शेअर किती रुपयावंर पोहोचला?
Donald Trump : इराणला ज्या लोकांना मारायचं आहे त्या यादीत पहिल्या स्थानावर माझं नाव, डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा, इराणवर मोठ्या हल्ल्याची ट्रम्प यांची धमकी
इराणला ज्या लोकांना मारायचं आहे त्या यादीत पहिल्या स्थानावर माझं नाव, डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
KDMC Doctor Assault Case : शिंदेंच्या शिवसेनेचे मारकुटे नगरसेवक रमेश म्हात्रेंना अटक, तब्येत बिघडल्याने लागोलाग रुग्णालयात दाखल!
शिंदेंच्या शिवसेनेचे मारकुटे नगरसेवक रमेश म्हात्रेंना अटक, तब्येत बिघडल्याने लागोलाग रुग्णालयात दाखल!
EPFO : पीएफ खातेदारांसाठी गुड न्यूज, 2025-26 चं व्याज कधीपर्यंत खात्यात जमा होणार?, केंद्रीय श्रम मंत्र्यांनीच तारीख सांगितली
पीएफ खातेदारांसाठी गुड न्यूज, 2025-26 चं व्याज कधीपर्यंत खात्यात जमा होणार? तारीख समोर
देवेंद्र फडणवीस म्हणाले, खोटारडे, भाडे के टट्टू; आता विरोधकांचा पलटवार, भास्कर जाधव म्हणाले, तुम्ही म्हणजे महाराष्ट्र नाही
देवेंद्र फडणवीस म्हणाले, खोटारडे, भाडे के टट्टू; आता विरोधकांचा पलटवार, भास्कर जाधव म्हणाले, तुम्ही म्हणजे महाराष्ट्र नाही
Sanju Samson : ...अन्यथा संजू सॅमसनला संघात घेऊ नका, अभिषेक नायर यांनी संजूला कोणत्या क्रमांकावर खेळवायचं हे सांगत महत्वाचा सल्ला दिला
संजूला टीममध्ये पुन्हा संधी दिल्यास कोणत्या क्रमांकावर खेळवायचं? अभिषेक नायर यांचं रोखठोक मत
पातळगंगा नदीतून 3000 सिलेंडर वाहून गेले, टाक्या घेण्यासाठी नागरिकांची झुंबड; जिल्हाधिकाऱ्यांचं आवाहन
पातळगंगा नदीतून 3000 सिलेंडर वाहून गेले, टाक्या घेण्यासाठी नागरिकांची झुंबड; जिल्हाधिकाऱ्यांचं आवाहन
Accident : मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर भीषण अपघात, दोघे जागीच ठार; ठाण्यातही रिक्षावर टँकर पडून 2 मृत्यूमुखी
मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर भीषण अपघात, दोघे जागीच ठार; ठाण्यातही रिक्षावर टँकर पडून 2 मृत्यूमुखी
Embed widget