Horoscope Today 28 November 2024 : आज गुरुवार म्हणजेच दत्तगुरुंचा दिवस.आजचा दिवस काही लोकांसाठी चांगले, तर काहींसाठी वाईट परिणाम आणू शकतो. आज तुमचे ग्रह तुमच्यासाठी अनुकूल आहेत की नाही? आज तुम्हाला कोणत्या आव्हानांना तोंड द्यावे लागेल किंवा तुम्हाला कोणत्या प्रकारच्या संधी मिळू शकतात? सर्व 12 राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस व्यवसाय, आरोग्य, नातेसंबंध आणि प्रेमासाठी किती खास असणार आहे? आजचे राशीभविष्य (Horoscope Today) जाणून घ्या.
मेष रास (Aries Today Horoscope)
मेष राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस चांगला असणार आहे. आजच्या दिवसात तुम्ही कोणताही निर्णय घ्याल तर तो विचारपूर्वक घेण्याची गरज आहे. तसेच, तुमच्या कुटुंबात अनेक दिवसांपासून जर समस्या असतील तर त्याबद्दल बाहेर इतर कोणाशी चर्चा करु नका. तुम्हाला आज कामानिमित्त दूर जावं लागण्याची शक्यता आहे. तसेच, मित्रांचा पाठिंबा तुमच्याबरोबर असेल.
वृषभ रास (Taurus Today Horoscope)
वृषभ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस फलदायी असणार आहे. आज दिवसभरात तुम्ही काय करणार आहात या कामाचं नीट नियोजन करुन ठेवा. जेणेकरुन तुमचा गोंधळ उडणार नाही. तसेच, तुमच्या मुलाच्या प्रगतीत येणारे अडथळे दूर होण्याची शक्यता आहे. आई-वडिलांचा तुमच्यावर आशीर्वाद असल्या कारणाने तुम्हाला कोणत्याच गोष्टीची चिंता करण्याची गरज नाही.
मिथुन रास (Gemini Today Horoscope)
मिथुन राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस फार आव्हानात्मक असण्याची शक्यता आहे. आज तुम्हाला तुमच्या जुन्या गोष्टीतून केलेल्या चुकीतून शिकण्याची संधी मिळे. तसेच, ती चूक पुन्हा न करण्याचा बोधही मिळेल. आज विनाकराण कोणाच्याही कामात अडथळा आणण्याचा प्रयत्न करु नका. अन्यथा तुमचंच नुकसान होण्याची शक्यता आहे.
कर्क रास (Cancer Today Horoscope)
कर्क राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस मध्यम फलदायी असणार आहे. तुमची लव्ह लाईफ चांगली असणार आहे. तुमच्या पार्टनरप्रती तुम्हाला आदर वाढेल. तसेच, एकमेकांमध्ये विश्वास टिकून राहील. आज तुम्ही राजकारणातही तितकेच सक्रिय असाल. तुमच्या आरोग्याच्या बाबतीत बोलायचं झाल्यास, तुमची तब्येत एकदम ठणठणीत असेल.
सिंह रास (Leo Today Horoscope)
सिंह राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस विशेष फलदायक असणार आहे. आज तुम्हाला तुमच्या जबाबदारीची पूर्णपणे जाणीव असेल तसेच, तुम्ही दिलेलं काम वेळेत पूर्ण करण्याचा प्रयत्न कराल. तुमच्या आरोग्याच्या बाबतीत तुम्हाला अनेक चढ-उतार येऊ शकतात. या सगळ्याचा तुम्ही धैर्याने सामना करण्याची गरज आहे.
कन्या रास (Virgo Today Horoscope)
कन्या राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस आनंददायी असणार आहे. आज तुम्ही अधिक उत्साहात येऊन कार्य कराल. तसेच, तुमची अनेक दिवसांपासून रखडलेली कामे आज पूर्ण होण्याची शक्यता आहे. तुमच्या आरोग्याच्या बाबतीत तुम्ही कोणत्याच प्रकारे निष्काळजीपणा करु नये. मुलांच्या आरोग्याबाबत तुम्ही सतर्क असण्याची गरज आहे.
तूळ रास (Libra Today Horoscope)
तूळ राशीच्या लोकांच्या दिवसाची सुरुवात काहीशी आव्हानात्मक असणार आहे. तुम्ही नियोजित कामे वेळेत पूर्ण न झाल्याने तुमची चिडचिड होण्याची शक्यता आहे. तसेच, शेअर मार्केटमध्ये तुम्हाला चांगला लाभ न मिळाल्या कारणाने तुम्ही नाराज असण्याची शक्यता आहे. मात्र, जसजसा दिवस पुढे सरत जाईल तसतसा तुमचा उत्साह वाढत जाईल. त्यामुळे काळजी करण्याची गरज नाही.
वृश्चिक रास (Scorpio Today Horoscope)
वृश्चिक राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस चढ-उतारांचा असणार आहे. आ तुम्ही कोणताही निर्णय घ्याल तर तो विचारपूर्वक घेण्याची गरज आहे. तसेच, जर तुम्ही कोणाकडून पैसे उधारी घेतले असती तर ते वेळीच परत करण्याचा प्रयत्न करा. आज तुमच्या प्रगतीत येणारे अडथळे दूर होतील. त्यामुळे तुम्ही निश्चिंत असाल.
धनु रास (Sagittarius Today Horoscope)
धनु राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस प्रगतीचा असणार आहे. आज दिवसभरात तुम्ही उत्साही असाल. तुमच्या मनाप्रमाणे सर्व कामे होतील त्यामुळे तुम्हाला प्रसन्न वाटेल. तुमच्या व्यवसायात देखील प्रगतीच्या अनेक संधी दिसून येतील. आज संध्याकाळी तुमच्या घरी पाहुण्यांचं आगमन होण्याची शक्यता आहे.
मकर रास (Capricorn Today Horoscope)
मकर राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस आनंददायी असणार आहे. आज कामाच्या ठिकाणी तुम्हाल तुमच्या मेहनतीचं फळ मिळण्याची शक्यता आहे. तुमच्या बॉसकडून तुमच्या कामाचं कौतुक केलं जाईल. तसेच, जर तुम्हाला एखादं वाहन किंवा प्रॉपर्टी विकत घ्यायची असले तर त्या बाबतीत सकारात्मक गोष्टी घडण्याची शक्यता आहे. पैसे गुंतवण्यासाठी देखील आजचा दिवस चांगला आहे.
कुंभ रास (Aquarius Today Horoscope)
कुंभ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस चांगला आहे. मात्र, तुम्ही तुमच्या खर्चावर नियंत्रण ठेवण्याची शक्यता आहे. जर तुम्ही कोणाकडून पैसे उधार घेतले असतील तर ते त्या व्यक्तीला वेळीच देण्याचा प्रयत्न करा. इतरांचा विश्वास जिंकण्याचा प्रयत्न करा. तसेच, तुम्ही तुमच्या भावनांवर नियंत्रण ठेवण्याची गरज आहे. उगाच कोणासमोरही भावनिक होऊ नका.
मीन रास (Pisces Today Horoscope)
मीन राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस चांगला असणार आहे. आज तुम्हाला अचानक धनलाभ होण्याची शक्यता आहे. तुमची आर्थिक स्थिती मजबूत असेल. तसेच, आज इतरांच्या वादात पडू नका. यामुळे तुमचंच नुकसान होऊ शकतो. मात्र, इतरांसाठी मदतीचा हात नेहमी पुढे करा. यामुळे तुम्हाला मनातून शांती मिळेल.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा :