एक्स्प्लोर

Horoscope Today 28 June 2023 : मेष, वृषभ, मकरसह 'या' राशीच्या लोकांनी आज 'हे' काम करू नये; जाणून घ्या सर्व राशींचं आजचं राशीभविष्य

Horoscope Today 28 June 2023 : आजचा दिवस कोणत्या राशींसाठी शुभ असणार आहे? मेष ते मीन राशीच्या सर्व राशींसाठी दिवस कसा असेल? राशीभविष्य जाणून घ्या.

Horoscope Today 28 June 2023 : आज बुधवार हा महत्त्वाचा दिवस आहे. ग्रहांच्या चालीनुसार मेष राशीचे लोक आज सर्वांशी प्रेमाने वागतील. कन्या राशीच्या लोकांनी कोणाच्याही सल्ल्याने कोणतीही गुंतवणूक करू नये, अन्यथा नुकसान होऊ शकते. आजचा दिवस मेष ते मीन राशीसाठी कसा असेल? काय म्हणतात तुमच्या नशिबाचे भाग्यवान तारे? जाणून घ्या आजचं राशीभविष्य.

मेष

मेष राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस चांगला जाणार आहे. कौटुंबिक जीवनात सुख-शांती राहील. सर्वजण एकत्र काम करताना दिसणार आहेत. आज तुमचा मित्रांबरोबर बाहेर जाण्याचा बेत असू शकतो. बेरोजगारांना चांगला रोजगार मिळेल. दूरच्या नातेवाईकांकडून शुभवार्ता मिळाल्याने सर्वजण खूप आनंदी होतील. भावा-बहिणींचे पूर्ण सहकार्य मिळेल. आज तुम्हाला उत्पन्नाच्या अनेक संधी मिळतील, ज्यातून तुम्ही नफा कमवू शकाल. तुमची आर्थिक स्थिती चांगली राहील. तुमची रखडलेली कामेही पूर्ण होतील. आज नोकरीत तुमच्यावर जबाबदारी सोपवली जाऊ शकते. व्यवसायात तणाव राहील. आपले मत व्यक्त करण्यास अजिबात संकोच करू नका. मनमोकळेपणाने विचार मांडा. आज तुमची रखडलेली कामेही पूर्ण होतील. विद्यार्थ्यांच्या उच्च शिक्षणासाठी काळ चांगला आहे. नवीन वाहनाचा आनंदही मिळू शकतो.

वृषभ

वृषभ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस संमिश्र असणार आहे. कामाच्या शोधात जे तरूण फिरतायत त्यांना लवकरच चांगला रोजगार मिळेल. आज तुम्हाला तुमच्या गुंतवणुकीचा पूर्ण फायदा मिळेल. वरिष्ठांचा आशीर्वाद तुमच्यावर राहील. वडिलांच्या माध्यमातून आर्थिक लाभ मिळण्याची शक्यता आहे. गृहस्थ जीवनात सुख-शांती राहील. आज तुम्हाला तुमच्या बोलण्यात गोडवा ठेवावा लागेल. आई-वडिलांसोबत धार्मिक स्थळाला भेट देण्याचा प्लॅन करू शकता. आजचाचा दिवस नोकरीसाठी छोट्या संघर्षाचा आहे. तुमची आर्थिक स्थिती मजबूत असेल. परस्पर विश्वासाच्या मदतीने तुमचे नाते अधिक घट्ट होईल. मेहनतीचे फळ तुम्हाला लवकरच मिळेल. नोकरीत पदोन्नतीकडे वाटचाल कराल.

मिथुन

मिथुन राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस तुमच्यासाठी चांगला जाणार आहे. आज तुमच्या तब्येतीत सुधारणा होईल. तुम्ही आधी केलेल्या गुंतवणुकीचा तुम्हाला पूर्ण लाभ मिळेल. बहिणीच्या तब्येतीत सुधारणा होईल. वडिलोपार्जित संपत्तीतून आर्थिक लाभ मिळण्याची शक्यता आहे. भावाचे पूर्ण सहकार्य मिळेल. तुम्ही तुमच्या जोडीदाराबरोबर प्रेमळ क्षण घालवाल. आज तुम्हीही शेजारी होणाऱ्या कीर्तनात सहभागी व्हा. मानसिक शांतीसाठी धार्मिक कार्यक्रमातही थोडा वेळ घालवा. घरोघरी पूजा-पाठचेही आयोजन केले जाईल, त्यात सर्व परिचितांचे येणे-जाणे सुरू राहील. आज नोकरीतील बदलाशी संबंधित कोणताही निर्णय काळजीपूर्वक घ्या. तुमची आर्थिक स्थिती सुधारण्याचे संकेत आहेत. नवीन व्यवसायाकडे वाटचाल करू शकाल. सुखद प्रवासाचे योगायोग आहेत.

कर्क 

कर्क राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस खूप चांगला जाणार आहे. जे समाजाच्या भल्यासाठी काम करतात, त्यांचा सन्मान वाढताना दिसेल. जे अविवाहित आहेत त्यांच्या लग्नाच्या प्रस्तावावर शिक्कामोर्तब होईल. जे घरापासून दूर काम करतायत त्यांना आज आपल्या कुटुंबाची आठवण येईल. काही नवीन काम सुरू करण्यासाठी तुम्हाला तुमचा जोडीदाराची साथ मिळेल, ज्यामुळे तुमचे उत्पन्न वाढू शकेल. नोकरीत प्रगतीची संधी मिळाल्याने नोकरदार लोक खूप आनंदी दिसतील. व्यवसाय करणारे लोक नवीन व्यवसाय सुरू करण्याचा विचार करतील. नोकरदार वर्गाला नोकरीत दिलेली कामे वेळेवर पूर्ण करावी लागतील. आज तुम्हाला पैसे कमावण्याच्या नवीन संधी लाभतील. 

सिंह

सिंह राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस तुमच्यासाठी नक्कीच फलदायी असणार आहे. आज तुम्हाला सरकारी क्षेत्रातून लाभ मिळण्याची शक्यता आहे. जर तुम्ही आधी कोणतीही गुंतवणूक केली असेल तर तुम्हाला त्याचाही पूर्ण फायदा मिळेल. नोकरीत बढतीची संधी मिळेल. व्यवसाय करणारे लोक व्यवसायाला पुढे नेण्यासाठी नवीन मार्ग स्वीकारतील. तुमची आर्थिक स्थिती चांगली राहील. मुलांचे पूर्ण सहकार्य मिळेल. तुम्ही तुमच्या व्यस्त दिवसातून थोडा वेळ तुमच्या मुलांसाठी काढा, ज्यामध्ये तुम्ही त्यांच्या आवडीनिवडी जपा. व्यवसायात नवीन करारामुळे फायदा होईल. आर्थिक स्थितीत चढ-उतार असतील. आज कोणतीही व्यवसाय योजना पुढे ढकलू नका. जर तुम्हाला शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करायची असेल तर तुम्ही तज्ञाचा सल्ला घ्यावा.

कन्या

कन्या राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस तुमच्यासाठी आनंददायी असणार आहे. आज तुम्हाला भावा-बहिणींचे पूर्ण सहकार्य मिळेल. वरिष्ठ सदस्यांकडून आर्थिक लाभ मिळण्याची शक्यता आहे. नातेवाईकांकडून चांगली बातमी ऐकायला मिळेल. संध्याकाळी तुमचे घर पाहुण्यांनी भरलेले असेल. राजकारणात करिअर करू इच्छिणाऱ्यांसाठी काळ चांगला आहे. तुम्हाला तुमचे उत्पन्न वाढवण्याच्या अनेक संधी मिळतील. नोकरीत स्थान बदलण्याची शक्यता आहे. व्यवसाय करणाऱ्या लोकांबद्दल बोलायचे झाले तर त्यांच्यासाठी दिवस चांगला आहे, त्यांना त्यांच्या व्यवसायातून अपेक्षित नफा मिळेल. आज तुम्हाला तुमचे थांबलेले पैसे मिळतील. नोकरीत यश मिळाल्याने आनंदी राहाल. वरिष्ठांचे सहकार्य मिळेल. जोडीदाराचे पूर्ण सहकार्य मिळेल. उच्च शिक्षणासाठी काळ चांगला आहे. कलात्मक क्षेत्रात वाढ होईल.

तूळ

तूळ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस खूप चांगला जाणार आहे. आज तुम्हाला तुमच्या व्यवसायात सुरू असलेल्या समस्यांचे निराकरण मिळेल आणि नवीन व्यवसाय सुरू करण्याची योजना देखील तयार करा. मित्राच्या मदतीने तुम्हाला तुमचे रखडलेले पैसेही मिळतील. आज तुमची सर्व रखडलेली कामे पूर्ण करा. जर तुम्ही कोणाकडून पैसे घेतले असतील तर तुम्ही ते परत देखील कराल. जोडीदाराचा पूर्ण पाठिंबा मिळेल. शैक्षणिक क्षेत्रात यश मिळेल. जे ऑनलाइन काम करणाऱ्यांना खूप फायदा होईल. नवीन वाहनाचा आनंदही मिळेल. घर, दुकान खरेदी करण्याची तुमची इच्छा पूर्ण होईल. शारीरिक आरोग्य सुधारण्यासाठी संतुलित आहार घ्या. आज तुम्हाला मित्रांचे पूर्ण सहकार्य मिळेल.

वृश्चिक

वृश्चिक राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस खूप चांगला जाणार आहे. आज तुम्हाला तुमच्या कुटुंबातील सदस्यांचे पूर्ण सहकार्य मिळेल. वडिलोपार्जित संपत्तीतून आर्थिक लाभ मिळण्याची शक्यता आहे. विद्यार्थी एका शहरातून दुसऱ्या शहरात शिक्षणासाठी जाऊ शकतात. जे युवक स्पर्धेची तयारी करतायत, त्यांना त्यांच्या मेहनतीचे फळ मिळेल. तुम्ही तुमच्या व्यस्त दिवसातून थोडा वेळ स्वतःसाठी काढा, ज्यामध्ये तुम्ही तुमच्या आवडत्या गोष्टी करा.आज तुमच्या मनातील कोणतीही इच्छा पूर्ण होईल. तुम्हाला प्रॉपर्टीमध्ये गुंतवणूक करायची असेल तर त्यासाठी वेळ चांगला आहे. काही जबाबदाऱ्या तुमच्या वडिलांनी तुमच्यावर सोपवल्या जातील, ज्या तुम्ही पूर्ण करणं गरजेचं आहे. कुटुंबातील सर्व सदस्य एखाद्या धार्मिक स्थळी यात्रेसाठी जाण्याचा प्लॅन करतील. आयटी आणि बँकिंग नोकऱ्यांसाठी आजचा दिवस चांगला आहे. वडिलोपार्जित संपत्तीतून आर्थिक लाभ मिळण्याची शक्यता आहे. तुमच्या तब्येतीत चढ-उतार असतील. आज खर्चावर नियंत्रण ठेवा.

धनु 

धनु राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस इतर दिवसांपेक्षा चांगला असणार आहे. जोडीदाराच्या तब्येतीत सुधारणा दिसेल. जे समाजाच्या भल्यासाठी काम करतात, त्यांना आणखी काम करण्याची संधी मिळेल. आज तुम्ही तुमची रखडलेली कामे पूर्ण करू शकता.कार्यक्षेत्रात कामाचा ताण जास्त राहील पण सहकाऱ्यांचे पूर्ण सहकार्य मिळेल. आज तुम्हाला वरिष्ठ सदस्यांकडून पैसे कसे वाचवायचे हे शिकायला मिळेल, जेणेकरून भविष्यात कोणतीही अडचण येणार नाही. घरात शुभ कार्यक्रम होतील, या निमित्ताने सर्वांचे येणे-जाणे सुरु राहील. यामध्ये तुम्हाला तुमच्या बोलण्यात गोडवा ठेवावा लागेल, अन्यथा नात्यात दुरावा येऊ शकतो. नोकरी आणि व्यवसायात चांगली बातमी ऐकायला मिळेल. जर तुम्ही आधी कोणतीही गुंतवणूक केली असेल तर तुम्हाला त्याचा पूर्ण फायदा मिळेल. व्यवसायात नवीन करारांमधून प्रगतीची चिन्हे आहेत.

मकर 

मकर राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस तुमच्यासाठी आनंदाने भरलेला असेल. कौटुंबिक जीवनात सुख-शांती राहील. उत्पन्नाच्या काही नवीन संधी देखील उपलब्ध होतील, ज्यातून तुम्ही नफा मिळवू शकाल. नवीन वाहन खरेदी करण्यासाठी चांगला योग आहे. जर तुम्ही आधी कोणतीही गुंतवणूक केली असेल तर तुम्हाला त्याचाही पूर्ण फायदा मिळेल. शैक्षणिक क्षेत्रात यश मिळेल. जे युवक स्पर्धेची तयारी करतायत, त्यांनी अधिक मेहनत घेण्याची गरज आहे. मालमत्तेतून आर्थिक लाभ मिळण्याची शक्यता आहे. नोकरदार लोकांना आज नवीन नोकरीची ऑफर देखील मिळेल. छोट्या व्यावसायिकांना व्यवसायात चांगला नफा मिळेल. नोकरदार लोकांना नवीन नोकरीची ऑफर मिळेल, ज्यामध्ये उत्पन्न अधिक असेल. व्यवसायात यश मिळेल. कोणत्याही निर्णयाबाबत संभ्रमात राहाल.

कुंभ

कुंभ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस तुमच्यासाठी खूप चांगला आहे. आज तुम्हाला तुमच्या नोकरीत प्रगतीच्या संधी मिळतील. वरिष्ठांचे पूर्ण सहकार्य मिळेल. आज दिलेली कामे वेळेपूर्वी पूर्ण करा. व्यवसाय करणारे लोक रखडलेली व्यवसाय योजना पुन्हा सुरू करू शकतील. आज तुमच्या मनातील कोणतीही इच्छा पूर्ण होईल. मानसिक शांतीसाठी धार्मिक कार्यक्रमातही थोडा वेळ घालवा. तुम्ही तुमच्या व्यस्त दिवसातून थोडा वेळ तुमच्या मुलांसाठी काढा, ज्यामध्ये तुम्ही त्यांच्या आवडीनिवडी जपा. विद्यार्थ्यांसाठी आजचा दिवस अनुकूल आहे. जोडीदाराबरोबर झालेल्या वादामुळेआरोग्यावर वाईट परिणाम होईल. 

मीन 

मीन राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस तुमच्यासाठी आनंदाचा आहे. जे लोक परदेशातून आयात-निर्यातीचे काम करतात, त्यांना चांगली बातमी ऐकायला मिळेल. राजकारणात यश मिळण्याची शक्यता आहे. जर तुम्ही आधी कोणतीही गुंतवणूक केली असेल तर तुम्हाला त्याचाही पूर्ण फायदा मिळेल. जर तुम्ही तुमचे पैसे कोणाला दिले असतील तर ते तुम्हाला आज परत मिळतील. तुमची आर्थिक स्थिती चांगली राहील. तुमची रखडलेली कामेही पूर्ण करू शकाल. घर, दुकान, प्लॉट खरेदी करण्याची तुमची इच्छा पूर्ण होईल. तुमच्या आरोग्यात सुधारणा होईल. ज्येष्ठ सदस्यांचे आशीर्वाद तुमच्या पाठीशी राहतील. वडिलोपार्जित संपत्तीतून आर्थिक लाभ मिळण्याची शक्यता आहे. व्यवसायात प्रगती होईल. आज धनलाभ होण्याची शक्यता आहे. नोकरदार लोकांना वरिष्ठांकडून चांगली बातमी ऐकायला मिळेल. आरोग्याच्या बाबतीत आरोग्य चांगले राहील. धार्मिक कार्यात व्यस्त राहाल.

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

महत्त्वाच्या बातम्या : 

Horoscope Today : कन्या, तूळ, मकर आणि कुंभ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस खास, वाचा आजचं राशीभविष्य

महत्त्वाच्या बातम्या

Horoscope Today 31 July 2026: जुलैचा शेवटचा दिवस 7 राशींसाठी भाग्याचा! दुर्मिळ शुभ योग जुळले, देवी लक्ष्मीच्या कृपेने कोण भाग्यशाली? आजचे राशीभविष्य वाचा...
जुलैचा शेवटचा दिवस 7 राशींसाठी भाग्याचा! दुर्मिळ शुभ योग जुळले, देवी लक्ष्मीच्या कृपेने कोण भाग्यशाली? आजचे राशीभविष्य वाचा...
Gemini August Monthly Horoscope 2026 : मिथुन राशीसाठी ऑगस्टचा महिना सावधानतेचा, नोकरीत अडचणी, आर्थिक नुकसान? वाचा मासिक राशीभविष्य
मिथुन राशीसाठी ऑगस्टचा महिना सावधानतेचा, नोकरीत अडचणी, आर्थिक नुकसान? वाचा मासिक राशीभविष्य
Hindu Religion: देवघरातील देवांची मूर्ती 'या' दिवशी चुकूनही हलवू नये? देवांची स्वच्छता कोणत्या दिवशी करावी? मूर्ती कशा स्वच्छ कराव्यात? धार्मिक परंपरा...
देवघरातील देवांची मूर्ती 'या' दिवशी चुकूनही हलवू नये? देवांची स्वच्छता कोणत्या दिवशी करावी? मूर्ती कशा स्वच्छ कराव्यात? धार्मिक परंपरा...
Taurus August Monthly Horoscope 2026 : वृषभ राशीसाठी ऑगस्टचे पुढचे 15 दिवस सुखाचे, महिन्याच्या शेवटी बसणार आर्थिक फटका, मासिक राशीभविष्य
वृषभ राशीसाठी ऑगस्टचे पुढचे 15 दिवस सुखाचे, महिन्याच्या शेवटी बसणार आर्थिक फटका, मासिक राशीभविष्य

व्हिडीओ

Auto Rickshaw Driver Marathi : रिक्षा...आणि मराठीची बाराखडी, उरले फक्त 2 आठवडे Special Report
Amit Shah vs Rahul Gandhi Pellet Gun : 'कुठे आहेत गृहमंत्री?' प्रश्नांची सरबत्ती Special Report
Girish Mahajan Audio Clip Eknath Khadse Raksha Khadse : क्लिप गावभर, आपत्ती चव्हाट्यावर | ABP Majha Special Report
Ramdev Baba on Gen Z : जेन झींचं आंदोलन, रामदेव बाबांचं 'टीकासन' | ABP Majha Special Report
Mumbai High Court on FDA : अन्न-औषध प्रशासनाच्या कारवाई पद्धतीवरच हायकोर्टाकडून सवाल

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
PM Modi: पेपरफुटीविरोधात कायदा मंजूर करताच पीएम मोदींचा आणखी एक सेल्फी कॅमेऱ्यातून व्हिडिओ; म्हणाले, 'मित्रांनो, ‘विकसित भारता’चे स्वप्न साकार करण्यासाठी..'
पेपरफुटीविरोधात कायदा मंजूर करताच पीएम मोदींचा आणखी एक सेल्फी कॅमेऱ्यातून व्हिडिओ; म्हणाले, 'मित्रांनो, ‘विकसित भारता’चे स्वप्न साकार करण्यासाठी..'
'आता माझा रोल बदललाय..' स्वस्ता समोस्यासाठी संसदेत आवाज उठवणारे राघव चड्ढा पहिल्यांदाच देशव्यापी विद्यार्थी आक्रोशावर बोलले; मोदींचे कौतुक करत काय काय म्हणाले?
'आता माझा रोल बदललाय..' स्वस्ता समोस्यासाठी संसदेत आवाज उठवणारे राघव चड्ढा पहिल्यांदाच देशव्यापी विद्यार्थी आक्रोशावर बोलले; मोदींचे कौतुक करत काय काय म्हणाले?
Public Examinations (Prevention of Unfair Means) Act: राज्यसभेतही पेपरफुटी विधेयक मंजूर, विरोधकांचा सभात्याग; राष्ट्रपतींच्या मुंजरीनंतर कायद्यात रुपांतर होणार
राज्यसभेतही पेपरफुटी विधेयक मंजूर, विरोधकांचा सभात्याग; राष्ट्रपतींच्या मुंजरीनंतर कायद्यात रुपांतर होणार
मग तुमच्या टोळीच्या बॉसने चार वर्षांपूर्वी दोन वर्षांत रस्ते खड्डे मुक्त होतील सांगितलं होतं, त्याचं काय झालं? मुंबईमधील कारभाऱ्यांच्या ‘इनोव्हा क्रिस्टा’ नादावर आदित्य ठाकरेंचा खोचक सवाल
मग तुमच्या टोळीच्या बॉसने चार वर्षांपूर्वी दोन वर्षांत रस्ते खड्डे मुक्त होतील सांगितलं होतं, त्याचं काय झालं? मुंबईमधील कारभाऱ्यांच्या ‘इनोव्हा क्रिस्टा’ नादावर आदित्य ठाकरेंचा खोचक सवाल
भाजपला तो शब्द खटकला; खासदार अनुराग ठाकूरांकडून राहुल गांधींविरुद्ध हक्कभंग, संसदीय भाषेचा दिला दाखला
भाजपला तो शब्द खटकला; खासदार अनुराग ठाकूरांकडून राहुल गांधींविरुद्ध हक्कभंग, संसदीय भाषेचा दिला दाखला
Virat Kohli on Ajinkya Rahane: 'तू माझा सर्वात आवडता कसोटी फलंदाजीचा साथीदार..' निवृत्तीची घोषणा करताच अजिंक्य रहाणेसाठी विराट कोहलीची अत्यंत भावूक पोस्ट
'तू माझा सर्वात आवडता कसोटी फलंदाजीचा साथीदार..' निवृत्तीची घोषणा करताच अजिंक्य रहाणेसाठी विराट कोहलीची अत्यंत भावूक पोस्ट
वन अधिकाऱ्याने वाहत्या पाण्यात कार घातली, जीव धोक्यात; गाडी गेली वाहून, सुदैवाने अझरुद्दीन बचावले
वन अधिकाऱ्याने वाहत्या पाण्यात कार घातली, जीव धोक्यात; गाडी गेली वाहून, सुदैवाने अझरुद्दीन बचावले
सैराट फेम अभिनेता अरबाज शेखच्या वडिलांचं निधन, महिन्याभरापासून सोलापुरातील खासगी रुग्णालयात सुरु होते उपचार 
सैराट फेम अभिनेता अरबाज शेखच्या वडिलांचं निधन, महिन्याभरापासून सोलापुरातील खासगी रुग्णालयात सुरु होते उपचार 
Embed widget