Continues below advertisement


Horoscope Today 27 October 2025: वैदिक पंचांगानुसार, आज 27 ऑक्टोबर 2025, आजचा वार सोमवार आहे. आजचा हा दिवस ज्योतिषशास्त्राच्या दृष्टीने खास आहे. हा दिवस सर्व राशींसाठी खास आणि लाभदायक ठरण्याची शक्यता आहे. या दिवशी ग्रहांची हालचाल पाहता दिवस फार महत्त्वाचा आहे, आज ग्रहांचा दुर्लभ संयोगही होत आहे. ज्याचा परिणाम सर्व 12 राशींच्या लोकांवर दिसून येईल. भगवान भोलेनाथांच्या कृपेने तुमचा आजचा दिवस कसा असेल? कोणासाठी दिवस फलदायी ठरेल? 12 राशींचे आजचे राशीभविष्य (Horoscope Today) जाणून घ्या.


मेष रास (Aries Horoscope Today)


मेष राशीच्या लोकांनो आज ज्या प्रमाणात आर्थिक सहकार्य मिळायला हवे ते न मिळाल्यामुळे थोडे नाराज व्हाल, परंतु जेवढा सकारात्मक दृष्टिकोन ठेवाल तेवढी कामाची गती वाढवू शकाल


वृषभ रास (Taurus Horoscope Today)


वृषभ राशीच्या लोकांनो आज तुमच्या एखाद्या निर्णयाला कुटुंबीयांचा विरोध होऊ शकतो, परंतु जनमानसात आपला चांगला ठसा उमटवाल


मिथुन रास (Gemini Horoscope Today)


मिथुन राशीच्या लोकांनो आज अहंकार दुखावला गेल्यास, अत्यंत अस्वस्थ व्हाल स्वप्नांची पूर्ती होईल


कर्क रास (Cancer Horoscope Today)


कर्क राशीच्या लोकांनो आज तुमच्यातील दिलदारपणा लोकांना मोहवून टाकेल, परंतु हम करे सो कायदा हा स्वभाव ठेवू नका


सिंह रास (Leo Horoscope Today)


सिंह राशीच्या लोकांनो आज थोडा आर्थिक त्रास होईल कुटुंबामध्ये जोडीदाराचे वर्चस्व सहन करावे लागेल


कन्या रास (Virgo Horoscope Today)


कन्या राशीच्या लोकांनो आज खिशात पैसे खुळखुळल्यामुळे खरेदी करण्याचा मोह होईल, यशाकडे वाटचाल चालू राहील


तूळ रास (Libra Horoscope Today)


तूळ राशीच्या लोकांनो आज तुमचे बोलणे चांगले राहिल्यामुळे लोकांची मने जिंकाल, महिला आवेशात कामाला लागतील


वृश्चिक रास (Scorpio Horoscope Today)


वृश्चिक राशीच्या लोकांनो आज लोकांना सहकार्य कराल आणि त्याचा आनंद घ्याल आर्थिक स्थिती चांगली राहील


धनु रास (Sagittarius Horoscope Today)


धनु राशीच्या लोकांनो आज लोकांनी आपल्याला चांगले म्हणावे या हव्यासापोटी बराच अनावश्यक पैसा खर्च कराल


मकर रास (Capricorn Horoscope Today)


मकर राशीच्या लोकांनो आज घरातील वातावरण आनंदी उत्साही राहील स्वतः काम करायला आणि इतरांनाही करायला लावाल


कुंभ रास (Aquarius Horoscope Today)


कुंभ राशीच्या लोकांनो आज खेळीमेळीचे वातावरण राहील कामेही पूर्ण होतील घरामध्ये चैनीच्या वस्तूंची खरेदी करण्याचे बेत आखाल


मीन रास (Pisces Horoscope Today)


मीन राशीच्या लोकांनो आज मनाप्रमाणे घरात बदल कराल, डोळ्यांच्या विकारापासून सावधानता बाळगा.


हेही वाचा>>


Weekly Lucky Zodiac Signs: पैसा... चांगली नोकरी...फ्लॅट... ऑक्टोबरचा शेवटचा आठवडा 'या' 5 राशींसाठी लकी! जबरदस्त हंस राजयोग बनतोय, गोल्डन टाईम सुरू


(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)