Horoscope Today 27 June 2024 : पंचांगानुसार, आज 27 जून 2024, गुरुवारचा दिवस जवळपास सर्व राशीच्या लोकांसाठी लाभदायक ठरेल. या दिवशी ग्रहांच्या हालचाली पाहता आजचा दिवस फार महत्त्वाचा आहे, ज्याचा परिणाम सर्व 12 राशींच्या लोकांवर दिसून येईल. तुमचा आजचा दिवस कसा असेल? कोणासाठी दिवस फलदायी ठरेल? 12 राशींचे आजचे राशीभविष्य (Horoscope Today) जाणून घ्या.
मेष रास (Aries Horoscope Today)
आज शिस्त आणि वेळेचे बंधन पळावे लागेल आर्थिक घडी चांगली बसेल.
वृषभ रास (Taurus Horoscope Today)
नवीन घर घेणे किंवा तत्सम व्यवहारांमध्ये अडचणी येतील. पचनशक्ती बिघडण्याची शक्यता आहे.
मिथुन रास (Gemini Horoscope Today)
आज वात प्रकृतीच्या माणसांना त्रास होऊ शकतो. व्यवसायात हाताखालच्या कामगारांचे प्रश्न सोडवताना नाकी दम येतील.
कर्क रास (Cancer Horoscope Today)
आज पचनशक्ती बिघडण्याची शक्यता. हाताखालच्या लोकांच्या अवास्तव मागण्या सामोपचाराने सोडवाव्या लागतील.
सिंह रास (Leo Horoscope Today)
स्पर्धेला तोंड द्यावे लागेल. समाजात लोकांशी संबंध येईल. त्यातील भेटणाऱ्या माणसांचा फायदा करून घ्यावा.
कन्या रास (Virgo Horoscope Today)
महिलांनी मानापमानाच्या कल्पनांना जास्त महत्त्व देऊ नये. घरामध्ये धार्मिक कार्यामध्ये आनंदाने सहभागी व्हाल.
तूळ रास (Libra Horoscope Today)
खूप कष्ट पडले तरी त्याचे तुम्हाला काही वाटणार नाही. फिरतीची नोकरी असणाऱ्यांना नोकरी मानवेल.
वृश्चिक रास (Scorpio Horoscope Today)
महत्त्वाचे निर्णय घेताना गंभीर निश्चय धोरणी बनाल. तरुण वर्ग प्रेम प्रकरणांमध्ये अडकेल.
धनु रास (Sagittarius Horoscope Today)
कोणत्याही कागदपत्रांमध्ये काही अडचणी येत असतील तर स्त्रियांच्या मध्यस्थीने कामे मार्गी लागतील.
मकर रास (Capricorn Horoscope Today)
आर्थिक घडी व्यवस्थित बसेल जोडीदाराची महत्त्वाची कामे होतील.
कुंभ रास (Aquarius Horoscope Today)
ज्यांना मधुमेहाचा त्रास असेल त्यांनी पथ्य पाणी आवश्यक. औषध पाणी आहार विहार व्यवस्थित ठेवायला हवा.
मीन रास (Pisces Horoscope Today)
संधी दार ठोठावते आहे ती संधी आहे हे ओळखा आणि कामाला लागा.
डॉ. शिल्पा अग्निहोत्री (ज्योतिषाचार्य)
संपर्क - 9823322117
हेही वाचा: