Horoscope Today 27 December 2025 : वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार, आज 27 डिसेंबर 2025 चा दिवस आहे. त्यानुसार आजचा वार शनिवार आहे. आजचा दिवस आपण शनिदेवाला (Shani Dev) समर्पित करतो. तसेच, आजच्या दिवशी भक्त शनि मंदिरात जातात आणि शनिदेवाची पूजा करतात. आपल्या चुकीची माफी मागतात. तसेच, ग्रहांच्या संक्रमणाच्या दृष्टीने देखील आजचा दिवस खास असणार आहे. त्यामुळे आजचा दिवस 12 राशींसाठी नेमका कसा असणार आहे. यासाठी वाचूयात सर्व 12 राशींचं आजचं राशीभविष्य (Horoscope Today)

Continues below advertisement

मेष रास (Aries Horoscope)

मेष राशीसाठी आजचा दिवस चढ-उताराचा असणार आहे. तुमची अनेक दिवसांपासून रखडलेली कामे तुम्हाला पूर्ण करता येतील. मात्र, तुमच्या व्यवसायात तुम्हाला अनेक अडचणींचा सामना करावा लागेल. कुटुंबाशी संबंधित तुम्हाला काही समस्या भेडसावू शकतात. तसेच, आज तुमच्या खर्चातही वाढ होईल. त्यामुळे तुमचा बजेट सांभाळून व्यवहार करा. 

वृषभ रास (Taurus Horoscope)

वृषभ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस धावपळीचा असणार आहे. तुम्ही केलेल्या मेहनतीचं फळ तुम्हाला मिळेल. करिअरमध्ये तुम्हाला अनेक अडचणींचा सामना करावा लागेल. आई-वडिलांशी तुमचे मतभेद होऊ शकतात. त्यामुळे कोणतंही काम करताना संयमाने करा. तसेच, प्रतिस्पर्ध्यांशी सांभाळून व्यवहार करा. 

Continues below advertisement

मिथुन रास (Gemini Horoscope)

मिथुन राशीसाठी आजचा दिवस काहीसा आव्हानात्मक असणार आहे. तसेच, तुम्हाला तुमच्या कामातून मनासारखे परिणाम न मिळाल्यामुळे तुमचं मन थोडं विचलित होऊ शकतं. सामाजिक क्षेत्रात तुमचं चांगलं योगदान लाभेल. तसेच, तुम्हाला तुमच्या जुन्या कर्जातून मुक्ती मिळेल. मित्रांशी तुमचे चांगले संबंध निर्माण होतील. 

कर्क रास (Cancer Horoscope)

कर्क राशीसाठी आजचा दिवस मानसिक शांतीचा असेल. तुम्हाला तुमच्या कामातून समाधान मिळेल. तसेच, प्रेम जीवनातील रुसवे फुगवे कमी होतील. आर्थिक स्थितीत सुधारणा होईल. आरोग्याच्या बाबतीत हलगर्जीपणा करु नका. 

सिंह रास (Leo Horoscope)

सिंह राशीला नशिबाची चांगली साथ मिळेल. तुम्ही जे कार्य हाती घ्याल त्याला नेटाने पार पाडाल. नकारात्मक गोष्टींपासून दूर राहा. तसेच, कोणाच्या अध्यात मध्यात पडू नका. आज तुमचं मन थोडं विचलित होऊ शकतं. 

कन्या रास (Virgo Horoscope)

कन्या राशीसाठी आजचा दिवस चांगला असणार आहे. तुम्हाला करिअरची नवी दिशा मिळेल. तसेच, तुमच्या मेहनतीला चांगलं फळ मिळेल. भावनांवर नियंत्रण ठेवण्याची गरज आहे. एखाद्या जुन्या मुद्द्यावर विनाकारण चर्चा करु नका. 

तूळ रास (Libra Horoscope)

तूळ राशीच्या लोकांनी आपल्या आरोग्याची काळजी घेणं गरजेचंस आहे. तुमच्या दिनश्चर्येत तुम्हाला काही महत्त्वाचे बदल करावे लागतील. तसेच, नकारात्मक ऊर्जा असणाऱ्यांच्या संपर्कात राहू नका. व्यवसायावर लक्ष केंद्रित करा. 

वृश्चिक रास (Scorpio Horoscope)

वृश्चिक राशीसाठी आजचा दिवस खास असणार आहे. घरात आनंदाचं वातावरण राहील. जवळच्या नातेवाईकांकडून तुम्हाला शुभवार्ता मिळू शकते. तसेच, तुमची रखडलेली कामेही तुम्हाला पूर्ण करता येतील. 

धनु रास (Saggitarius Horoscope)

धनु राशीने आजच्या दिवशी सावधानता बाळगावी. शत्रूंची तुमच्यावर वाईट नजर असू शकते. त्यामुळे तुमच्या कोणत्याही कामात दिरंगाई करु नका. समाजाता तुमचा मान-सन्मान टिकून राहील. कामाच्या निमित्ताने प्रवास सुरु राहील. 

मकर रास (Capricorn Horoscope)

मकर राशीने शेअर बाजारात पैशांची गुंतवणूक करु नये. तुम्हाला धनहानीचे संकेत मिळू शकतात. तसेच, गुंतवणुकीसाठी हा काळ योग्य नाही. तुमचा व्यवसाय सुरळीत चालेल. मात्र, त्यात ना लाभ ना तोटा मिळेल. 

कुंभ रास (Aquarius Horoscope)

कुंभ राशीसाठी आजचा दिवस सामान्य आहे. दिवसाची सुरुवात प्रसन्न होईल. पण, जसजसा वेळ निघत जाईल तुम्हाला बैचेन वाटेल. तुमच्या मनात अनेक प्रश्न निर्माण होतील. 10 गोष्टी डोक्यात सुरु असतील पण उत्तर एकाचंही मिळणार नाही. 

मीन रास (Pisces Horoscope)

मीन राशीसाठी आजचा दिवस चांगला आहे. तुमची आर्थिक स्थितीही चांगली आहे. मात्र, तरीही पैशांचा अतिवापर करु नका. महिन्याचा शेवटचा दिवस आहे. त्यामुळे व्यवहाराच्या बाबतीत काळजी घ्या. वैवाहिक जीवनातील अडथळे दूर होतील. 

हे ही वाचा :

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

Baba Vanga Prediction : 2026 मध्ये 'या' 5 राशींवर पडणार पैशांचा धो-धो पाऊस; पैसा, नोकरी, करिअरमध्ये जबरदस्त यश; बाबा वेंगाची भविष्यवाणी