ठाणे : मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या (Mumbai Municipal Corporation Election 2026) अनुषंगाने शिवसेना आणि भाजप युतीच्या जागावाटपावर मोठ्या प्रमाणात एकमत झाले आहे. जवळपास 210 जागांवर सहमती झाल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. मात्र, अजूनही 17 जागांवर तिढा कायम असल्याची माहिती एबीपी माझाला सूत्रांनी दिली आहे. तर हा उर्वरित तिढा सोडवण्यासाठी महायुतीच्याउच्चपदस्थनेत्यांमध्येबैठकांचेसत्रआणिमध्यरात्रीपर्यंतखलबतंहोतानादिसतआहे. अशातच युतीची तिसरी बैठक शुक्रवारी एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या ठाण्याच्या घरी पुन्हाएकदाबैठकपारपडलीआहे. या बैठकीला एकनाथ शिंदे, श्रीकांत शिंदे, उदय सामंत, भाजपनेते रवींद्र चव्हाण, निरंजन डावखरे, नरेश म्हस्के उपस्थित होते.

Continues below advertisement

दरम्यान, याबैठकीलाठाणे, कल्याण डोंबिवली, नवी मुंबई महापालिकेतील युतीसंदर्भात चर्चा झाल्याचीमाहितीआहे. सोबत मुंबईसाठी देखील चर्चा झाल्याचीमाहितीआहे. युतीचा जागा वाटपाचा तिढ्ढा पूर्णपणेअद्याप सुटलेला नाही. मात्र उमेदवारी अर्ज भरण्याच्या तारखा निघून जात असल्याने आतामॅरॉथॉन बैठकांचेसत्र सुरू असूनयातलवकरचअंतिमनिर्णयहोण्याचीशक्यताआहे. तर आज आणि उद्या दोन दिवसात जागा फायनल करून जागा वाटप जाहीर करायचे आणि उमेदवारांना फॉर्म भरायचे प्रेशर देखीलता युतीच्या नेत्यांवर आहे.

Municipal Corporation Election 2026 : जागावाटपाचा फॉर्म्युला जवळपास निश्चित

Continues below advertisement

दुसरीकडेमुंबई महापालिकेत महायुतीचाच महापौर बसणार असा चंग भाजप आणि शिंदेंच्या शिवसेनेनं बांधलाय. तर अजित पवारांना बाजूला ठेवून युती करणाऱ्या या दोन पक्षांमध्ये जागावाटपाचा फॉर्म्युला जवळपास निश्चित झालाय, अशीदेखीलमाहितीआहे. त्यानुसार भाजप 140 तर शिंदेंची शिवसेना 87 जागा लढणार असल्याचं समजतंय. जेवढ्या लवकर उमेदवारांची यादी जाहीर करू तेवढी बंडखोरी होण्याची शक्यता जास्त आहे. म्हणून आता भाजप आणि शिवसेना उमेदवारांची यादी कधी जाहीर करते हे पाहावं लागेल.

Thane Election : ठाण्यामधला जागावाटपाचा तिढा अजूनही कायम, भाजपकडून 40 ते 45 जागांची मागणी 

मुंबईत जागावाटपाचं गणित सुटलं असलं तरी मुंबई शेजारी असलेल्या ठाण्यामधला जागावाटपाचा तिढा अजूनही कायम आहे. भाजपकडून 40 ते 45 जागांची मागणी केली जातेय. मात्र शिवसेनेला हा आकडा मान्य नाही. त्यामुळे निवडणूक प्रभारी निरंजन डावखरे, आमदार संजय केळकर यांनी भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांकडे धाव घेतलीय. आता या तिन्ही नेत्यांमध्ये जे काही ठरेल त्यानंतर मुख्यमंत्र्यांसोबत देखील बैठक होणार असल्याचं बोललं जातंय. त्यामुळेयावरनेमकाकायआणिकधीशिक्कामोर्तबहोतीहेपाहणेमहत्वाचेठरणारआहे. दुसरीकडे, विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांना आपल्याच पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या रोषाला सामोरं जावं लागतंय. कारण भाजपसोबत जागावाटपाच्या चर्चांमध्ये त्या कमी पडत असल्याचा कार्यकर्त्यांचा आरोप आहे. पुण्यात शिवसेनेकडून 35 जागांची मागणी करण्यात आलीय. मात्र भाजपनं 15 जागाच देऊ केल्यानं आता शिवसेनेनं निर्णायक इशारा दिलाय.

ही बातमी वाचा: