Baba Vanga Prediction 2026 : ज्योतिष शास्त्रानुसार, बाबा वेंगा (Baba Vanga) यांनी आतापर्यंत अनेक भविष्यवाणी केल्या आहेत. त्यानुसार, यंदाही नवीन वर्ष सुरु होण्याआधीच बाबा वेंगा यांनी केलेली भविष्यवाणी सध्या सोशल मीडियावर फार व्हायरल होतेय. त्यानुसार, बाबा वेंगा यांच्या म्हणण्यानुसार, नवीन वर्षात 5 राशींचा चांगलाच धनलाभ होणार आहे. या राशींना (Zodiac Signs) मालामाल होण्याची सुवर्णसंधी मिळणार आहे. या लकी राशी नेमक्या कोणत्या आहेत ते जाणून घेऊयात.
2026 च्या 'या' आहेत 5 लकी राशी
वृषभ रास (Taurus Horoscope)
2026 मध्ये वृषभ राशीच्या लोकांना चांगला धनलाभ मिळेल. या राशींच्या धनसंपत्तीत चांगली वाढ होण्याची शक्यता आहे. तसेच, ग्रहांच्या स्थितीनुसार, नवीन वर्षात वृषभ राशीच्या लोकांच्या आर्थिक स्थितीत चांगली सुधारणा येईल. तुमचे उत्पन्न वाढल्याने बॅंक बॅलेन्समध्येही चांगली वाढ झालेली दिसेल.
सिंह रास (Leo Horoscope)
नवीन वर्षात सिंह राशीच्या लोकांवर शनीच्या ढैय्याचा उतरता काळ असेल. त्यामुळे तुम्हाला इतर अडचणी भेडसावणार नाहीत. तसेच, तुमच्या आर्थिक स्थितीत पूर्वीपेक्षा चांगली सुधारणा पाहायला मिळेल. समाजात तुम्हाला मान-सन्मान मिळेल. तसेच, नोकरीत तुम्हाला चांगलं यश मिळून पद प्रतिष्ठेत चांगली वाढ झालेली दिसेल.
कन्या रास (Virgo Horoscope)
कन्या राशीसाठी नवीन वर्ष चांगलं असणार आहे. या कालावधीत तुमच्यासाठी करिअरच्या अनेक संधी निर्माण होतील. तुमच्या व्यवसायाचा विस्तार वाढेल. तसचे, तुम्ही जे कार्य हाती घ्याल त्यात तु्म्हाला चांगलं यश मिळेल. तुमच्या उत्पन्नात चांगली भर पडेल.
वृश्चिक रास (Scorpio Horoscope)
वृश्चिक राशीसाठी नवीन वर्ष नवीन संधी घेऊन येणारं असणार आहे. या काळात जर तुम्ही नोकरीत प्रमोशनची दीर्घ काळापासून वाट पाहात असाल तर तुमचा सुवर्णकाळ लवकरच सुरु होणार आहे. तुमची आर्थिक स्थिती मजबूत असेल.
मकर रास (Capricorn Horoscope)
मकर राशींच्या लोकांवर नवीन वर्षात शनि देवाची विशेष कृपा असणार आहे. या काळात जर तुम्हाला नवीन घर किंवा प्रॉपर्टी विकत घ्यायची असेल तर त्यासाठी ही चांगली संधी आहे. जे लोक दिर्घकाळापासून संघर्ष करतायत त्यांना त्यांच्या मेहनतीचं फळ मिळेल.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हे ही वाचा :