एक्स्प्लोर

Horoscope Today 26 May 2023 : आजचा दिवस 'या' राशीच्या लोकांसाठी भाग्याचा! जाणून घ्या सर्व 12 राशींचे राशीभविष्य

Horoscope Today 26 May 2023 : आजचा दिवस कोणत्या राशींसाठी शुभ असणार आहे? मेष ते मीन राशीच्या सर्व राशींसाठी दिवस कसा असेल? राशीभविष्य जाणून घ्या.

Horoscope Today 26 May 2023 : आज शुक्रवार हा महत्त्वाचा दिवस आहे. आज मेष राशीच्या लोकांनी बोलताना वाणीत गोडवा ठेवावा. तर, वृषभ राशीच्या लोकांना मित्रांचं सहकार्य मिळेल. मेष ते मीन राशीसाठी कसा असेल शुक्रवारचा दिवस? काय सांगतात तुमच्या नशिबाचे तारे? जाणून घ्या आजचं राशीभविष्य.

मेष

मेष राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस चांगला आहे. जे लोक व्यवसाय करत आहेत, त्यांना आज व्यवसायात मोठा फायदा होऊ शकतो. नोकरीत पद बदलण्याची शक्यता आहे. काही सुवर्णसंधी तुमच्या वाट्याला येऊ शकतात. परिश्रमानुसार पूर्ण फळ मिळेल. जर तुम्ही भागीदारीत व्यवसाय करत असाल तर तुम्हाला भरपूर नफा मिळणार आहे. नोकरदार लोकांना नोकरीत वरिष्ठांशी बोलताना वाणीतील गोडवा कायम ठेवावा लागेल. कुटुंबातील सदस्यांचे सहकार्य मिळेल. सर्व लोक मिळून कामे पूर्ण करताना दिसतील. आज तुम्हाला एखाद्या नातेवाईकांच्या ठिकाणी कार्यक्रमाला उपस्थित राहण्याची संधी मिळेल, जिथे सर्व लोकांशी सलोखा होईल. व्यवसायात यश मिळेल. वडिलोपार्जित संपत्तीतूनही आर्थिक लाभ मिळण्याची शक्यता आहे. 

वृषभ 

वृषभ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस तुमच्यासाठी आनंदाने भरलेला असेल. विद्यार्थ्यांसाठी आजचा दिवस यशाचा आहे. कलात्मक क्षेत्रात वाढ होईल. नवीन प्रोजेक्टवर काम करण्याची संधीही मिळेल. शिक्षकांचे सहकार्य मिळेल. उच्च शिक्षणासाठी काळ चांगला आहे. तुम्हाला तुमच्या आवडत्या विषयाचा अभ्यास करण्याची संधी मिळेल. गृहस्थ जीवनात सुख-शांती नांदेल. तुम्ही तुमच्या जोडीदाराबरोबर कुटुंबाच्या भल्यासाठी काम करताना दिसाल. नोकरीत अडकलेले पैसे परत मिळू शकतात. मित्रांच्या मदतीने तुम्हाला नवीन संपर्क मिळतील. तुमची आर्थिक स्थिती मजबूत होईल. समाजाच्या भल्यासाठी काम करणाऱ्यांना काम करण्याची संधी मिळेल. व्यवसाय करणारे लोक व्यवसायाला पुढे नेण्यासाठी नवीन पद्धती वापरतील. 

मिथुन

मिथुन राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस चांगला आहे. जे लोक नोकरीच्या शोधात फिरत आहेत त्यांना चांगली नोकरी मिळू शकते. कुटुंबातील सदस्यांचे पूर्ण सहकार्य मिळेल. राजकारणासाठी आजचा दिवस अनुकूल आहे. नोकरीच्या बदलाशी संबंधित कोणताही निर्णय काळजीपूर्वक घ्या. कार्यक्षेत्रात कुणालाही वाईट शब्द बोलू नका, नाहीतर अडचणीत येऊ शकता. व्यवसाय करणारे लोक व्यवसायाला पुढे नेण्यात यशस्वी होतील. आज नवीन व्यवसायाकडे वाटचाल करू शकता. सामाजिक क्षेत्रात काम करणार्‍यांनी सावधगिरी बाळगावी. परदेशातून आयात-निर्यातीचे काम करणाऱ्यांना चांगली बातमी मिळेल. जोडीदाराचा पूर्ण पाठिंबा मिळेल. 

कर्क 

कर्क राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस इतर दिवसांपेक्षा चांगला आहे. नोकरदार लोकांना नोकरीत बढतीची संधी मिळेल. वरिष्ठांचेही पूर्ण सहकार्य असेल. व्यवसाय करणाऱ्या लोकांना व्यवसायात अपेक्षित नफा मिळेल. मित्रांसोबत नवीन व्यवसाय सुरू करण्याचा विचारही तुम्ही करू शकता. आज कोणाच्याही सांगण्यावरून कोणतीही गुंतवणूक करू नका. अन्यथा तुम्हाला नुकसान सहन करावे लागू शकते. जे घरापासून दूर काम करत आहेत, त्यांना त्यांच्या कुटुंबाची आठवण येईल. मित्रासोबत कुठेतरी जाण्याचा बेत कराल. आज कुटुंबाच्या जबाबदाऱ्या तुमच्यावर सोपवण्यात येतील, ज्या तुम्ही पार पाडणं गरजेचं आहे. जर तुम्ही आधी कोणतीही गुंतवणूक केली असेल तर तुम्हाला त्याचाही पूर्ण फायदा मिळेल. वडिलांच्या माध्यमातून आर्थिक लाभ मिळण्याची शक्यता आहे.

सिंह 

सिंह राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस संमिश्र आहे. नोकरदार लोकांना आज नोकरीत नवीन जबाबदारीचा फायदा होईल. वरिष्ठांकडूनही तुमची प्रशंसा होईल. भावा-बहिणींचे सहकार्य मिळेल. आईच्या माध्यमातून आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. व्यवसाय करणारे लोक व्यवसायाला पुढे नेण्यात यशस्वी होतील. व्यावसायिक व्यवहारात सावधगिरी बाळगा. घरातून बाहेर पडताना आई-वडिलांचे चरणस्पर्श करून त्यांचा आशीर्वाद घ्या. आज तुम्ही तुमच्या कुटुंबीयांसह धार्मिक कार्यक्रमात सहभागी व्हा ज्यामुळे तुमच्या मनाला शांती मिळेल. 

कन्या

कन्या राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस खूप चांगला आहे. नोकरदार लोकांची नोकरीत प्रगती होईल. उत्पन्नात वाढ होईल. मित्रांचेही पूर्ण सहकार्य मिळेल. राजकारणात करिअर करू इच्छिणाऱ्यांसाठी काळ चांगला आहे. नोकरीच्या ठिकाणी वरिष्ठांकडून लाभ मिळू शकतो. आर्थिक स्थिती अनुकूल राहील. जास्त आत्मविश्वासाने चुकीचे निर्णय घेणे टाळा. काही कायदेशीर बाबी तुमच्या बाजूने असतील. सरकारी क्षेत्रांतूनही लाभ मिळतील. व्यवसायात यश मिळेल. छोटे व्यावसायिक देखील व्यवसायाला पुढे नेण्यासाठी खूप प्रयत्न करताना दिसतील. दूरच्या नातेवाईकांकडून मिळालेल्या माहितीमुळे कुटुंबात आनंदाचे वातावरण असेल. आज तुम्हाला नवीन नोकरीची ऑफर देखील मिळेल. शैक्षणिक क्षेत्रात यश मिळेल. 

तूळ

तूळ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस आनंददायी आहे. तुम्हाला सर्व क्षेत्रांतून लाभ मिळेल. आज तुम्हाला खूप उत्साही वाटेल. तुमची सर्व रखडलेली कामे पूर्ण करा. व्यवसाय वाढवण्यासाठी तुम्ही करत असलेले प्रयत्न यशस्वी होतील. शैक्षणिक क्षेत्रात यश मिळेल. नातेवाईकांच्या मदतीने रखडलेले पैसे मिळतील. नवीन वाहनाचा आनंदही मिळण्याची चिन्हे आहेत. सासरच्या मंडळींकडून चांगली बातमी ऐकायला मिळेल. जोडीदाराचा पूर्ण पाठिंबा मिळेल. कार्यक्षेत्रात कठोर परिश्रमानंतर यश मिळेल. व्यवसायाच्या दृष्टिकोनातून वेळ अनुकूल नाही. अनावश्यक वादविवादात पडणे टाळा. ज्येष्ठ सदस्यांशी बोलताना तुमच्या बोलण्यात गोडवा ठेवा. जर तुम्ही कोणाकडून पैसे घेतले असतील तर तेही तुम्ही वेळेवर परत करू शकाल. वडिलोपार्जित संपत्तीतून आर्थिक लाभ मिळण्याची शक्यता आहे.

वृश्चिक

वृश्चिक राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस संमिश्र आणि फलदायी आहे. राजकारण्यांसाठी आजचा दिवस यशाचा आहे. सभांना संबोधित करण्याची संधी मिळेल. नेत्यांना भेटण्याचीही संधी मिळेल. व्यवसायात यश मिळेल. वडिलोपार्जित व्यवसायातील बदलांसाठी वरिष्ठांशी चर्चा करा. कामाच्या ठिकाणी संघर्षाला सामोरे जावे लागू शकते. तुम्ही आत्मविश्वासाने परिपूर्ण असाल. आज तुमच्या संपत्तीत वाढ होईल. पालकांकडून काही जबाबदाऱ्या तुमच्यावर सोपवल्या जातील, ज्या तुम्ही निश्चितपणे पार पाडा. घरी शुभ कार्यक्रम आयोजित केले जातील, सर्व लोक एकत्र काम करताना दिसतील. तुमच्या गोड बोलण्यामुळे तुम्ही तुमची सर्व कामे पूर्ण करू शकाल. तुम्ही धार्मिक कार्यक्रमातही थोडा वेळ घालवाल, ज्यामुळे तुमच्या मनाला शांती मिळेल. 

धनु

धनु राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस खूप चांगला आहे. नोकरीत प्रगतीची संधी मिळेल. आज तुम्हाला नवीन नोकरीची ऑफर देखील मिळेल. व्यवसाय करणारे लोक व्यवसायाला पुढे नेण्यात यशस्वी होतील. वरिष्ठांकडून तुमच्यावर कुटुंबातील काही जबाबदाऱ्या सोपवण्यात येतील, ज्या तुम्ही अत्यंत प्रामाणिकपणे पार पाडा. जे समाजाच्या भल्यासाठी काम करतात, त्यांचा सन्मान वाढताना दिसेल. घरबसल्या ऑनलाईन काम करणाऱ्यांना बरेच फायदे मिळतील. जोडीदाराच्या तब्येतीत सुधारणा होईल. भाऊ-बहिणींचे पूर्ण सहकार्य मिळेल. 

मकर

मकर राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस तुमचा सर्वोत्तम दिवस आहे. नोकरीत कोणताही निर्णय घेताना संभ्रमात राहाल. वरिष्ठांकडून मान-सन्मान मिळेल. कोणासाठीही वाईट शब्द बोलू नका. गृहस्थ जीवनात सुख-शांती नांदेल. तुम्ही तुमच्या जोडीदाराबरोबर प्रेमळ क्षण घालवाल. आज तुमची जुन्या मित्राची भेट होईल त्यामुळे जुन्या आठवणीही ताज्या होतील. शैक्षणिक क्षेत्रात यश मिळेल. भावा-बहिणींचे पूर्ण सहकार्य मिळेल. जे युवक स्पर्धेची तयारी करत आहेत, त्यांनी अधिक मेहनत घेण्याची गरज आहे. उच्च शिक्षणासाठी काळ चांगला आहे. आज तुम्हाला तुमचे रखडलेले पैसे मिळतील. तुमच्या मनातील कोणतीही इच्छा पूर्ण होईल. बेरोजगारांना चांगला रोजगार मिळण्याची चिन्हे आहेत. अविवाहित लोकांच्या लग्नाची चर्चा होऊ शकते.

कुंभ

कुंभ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस खूप चांगला आहे. आज तुम्ही तुमची रखडलेली कामे पूर्ण करण्यात खूप आनंदी व्हाल. मित्रांच्या मदतीने तुम्हाला उत्पन्नाचे काही स्रोत देखील मिळतील. जे लोक घरबसल्या ऑनलाईन काम करतात, त्यांना खूप फायदा होईल. जोडीदाराच्या तब्येतीत सुधारणा होईल. नोकरदार लोकांना नवीन नोकरीची ऑफर मिळेल, ज्यामध्ये उत्पन्न अधिक असेल. कामाच्या ठिकाणी आव्हानांना सामोरे जावे लागू शकते. जर तुम्ही व्यवसायाबाबत काही योजना आखल्या तर त्यातून तुम्हाला चांगला नफा मिळू शकेल. तुम्ही तुमच्या मित्रांसोबत नवीन व्यवसाय देखील सुरू करू शकता. नवीन वाहनाचा आनंदही मिळेल. एखादे घर, फ्लॅट खरेदी करण्याची जी योजना तुम्ही खूप दिवसांपासून आखत होतात, त्यात तुम्हाला यश मिळेल. 

मीन

मीन राशीसाठी आजचा दिवस इतर दिवसांपेक्षा चांगला आहे. तब्येत हळूहळू सुधारेल. मुलांचे पूर्ण सहकार्य मिळेल. कुटुंबाच्या गरजा पूर्ण करण्यासाठी तुम्ही कठोर परिश्रम करताना दिसतील. तुम्ही तुमच्या व्यस्त दिवसातून थोडा वेळ स्वतःसाठी काढा, ज्यामध्ये तुम्ही तुमचे आवडते काम करा. आज तुमच्या मनातील कोणतीही इच्छा पूर्ण होईल. जर तुम्ही एखाद्याला पैसे दिले असतील तर ते तुम्हाला आज परत मिळतील. तुमची रखडलेली कामे पूर्ण करा. तुमचे प्रेम जीवन चांगले होईल. घरात पूजा आणि पाठही आयोजित केले जातील, ज्यामध्ये सर्व लोक येत-जात राहतील. आज तुम्ही तुमच्या कुटुंबीयांसह धार्मिक कार्यक्रमात सहभागी व्हा, ज्यामुळे तुमच्या मनाला शांती मिळेल. उच्च शिक्षणासाठी काळ चांगला आहे. 

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

महत्त्वाच्या बातम्या : 

Horoscope Today 25 May 2023 : आजचा गुरुवार 'या' 6 राशींसाठी लाभदायक! जाणून घ्या मेष ते मीन राशीच्या लोकांचं आजचं राशीभविष्य

महत्त्वाच्या बातम्या

Horoscope Today : आज रविवारचा दिवस 5 राशींसाठी भाग्याचा! सूर्यदेवाच्या कृपेने आजचा दिवस फलदायी, आजचे राशीभविष्य
आज रविवारचा दिवस 5 राशींसाठी भाग्याचा! सूर्यदेवाच्या कृपेने आजचा दिवस फलदायी, आजचे राशीभविष्य
Budh Vakri 2026 : 24 ऑक्टोबरला बुध ग्रहाची वक्री चाल; 'या' 3 राशींची होणार छप्परफाड कमाई, बुधाच्या संक्रमणाने धनसंपत्तीत होणार भरभराट
24 ऑक्टोबरला बुध ग्रहाची वक्री चाल; 'या' 3 राशींची होणार छप्परफाड कमाई, बुधाच्या संक्रमणाने धनसंपत्तीत होणार भरभराट
Dussehra 2026 : 20 की 21 ऑक्टोबर? दसरा नेमका कधी साजरा करायचा? वाचा धार्मिक महत्त्व आणि रावण दहनाचा शुभ मुहूर्त
20 की 21 ऑक्टोबर? दसरा नेमका कधी साजरा करायचा? वाचा धार्मिक महत्त्व आणि रावण दहनाचा शुभ मुहूर्त
Vastu Tips : घरात 'या' 7 ठिकाणी तुळशीचं रोप अजिबात ठेवू नका, घरात येईल कंगाली, वास्तूशास्त्रानुसार 'ही' दिशा योग्य
घरात 'या' 7 ठिकाणी तुळशीचं रोप अजिबात ठेवू नका, घरात येईल कंगाली, वास्तूशास्त्रानुसार 'ही' दिशा योग्य

व्हिडीओ

Kolhapur-Gokul Election : लावा भंडारा, बुक्का आणि मारा शिक्का! | Special Report ABP Majha
Ramanandacharya Narendracharya Maharaj Majha Katta : लोकांनी आपला गुरु कसा निवडावा? रामानंदाचार्य नरेंद्राचार्य माझा कट्ट्यावर : ABP Majha
SIR Election Commision And BJP : मुद्दा एसआयआरच्या घोळाचा, आरोप सत्तेच्या खेळाचा | Special Report ABP Majha
Shetitil Navdurga | Sarika Gaikwad | दुःखातून उभी राहिली, मातीतून यश घडवलं!
Sanjay Raut News : मी सर्वोच्च न्यायालयाची माफी मागतो… संजय राऊत यांची दिलगिरी; नेमकं काय म्हणाले?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
दिवाळीचा शिधा दसऱ्यादिवशी रवाना करणार, शेतकऱ्यांची दिवाळी काळी होणार नाही, दिलेला शब्द पाळणार : एकनाथ शिंदे
दिवाळीचा शिधा दसऱ्यादिवशी रवाना करणार, शेतकऱ्यांची दिवाळी काळी होणार नाही, दिलेला शब्द पाळणार : एकनाथ शिंदे
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ तालुक्यात हॉटेल मॅनेजमेंटचे शिक्षण घेणाऱ्या 24 वर्षीय तरुणीला संपवलं; घराकडे जात असताना प्राणघातक हल्ला करून हल्लेखोर पसार
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ तालुक्यात हॉटेल मॅनेजमेंटचे शिक्षण घेणाऱ्या 24 वर्षीय तरुणीला संपवलं; घराकडे जात असताना प्राणघातक हल्ला करून हल्लेखोर पसार
शिवसेना नेत्या शायना एनसींच्या मुलीचा साखरपुडा; राज ठाकरेंसह बॉलिवूडचा भाईजान उपस्थित, नव दाम्पत्यास शुभेच्छा
शिवसेना नेत्या शायना एनसींच्या मुलीचा साखरपुडा; राज ठाकरेंसह बॉलिवूडचा भाईजान उपस्थित, नव दाम्पत्यास शुभेच्छा
Uddhav Thackeray: मग दिल्लीत हजारो पोलिस दांडिया खेळायला आणलेत का? अशी राजवट गाडलीच पाहिजे आणि ती गाडण्यासाठीच आम्ही सगळे उभे आहोत; उद्धव ठाकरेंचं राजनाथ सिंहांना प्रत्युत्तर
मग दिल्लीत हजारो पोलिस दांडिया खेळायला आणलेत का? अशी राजवट गाडलीच पाहिजे आणि ती गाडण्यासाठीच आम्ही सगळे उभे आहोत; उद्धव ठाकरेंचं राजनाथ सिंहांना प्रत्युत्तर
तुमची शांतताच हुकूमशाहीला बळ देते! भाजपच्या विरोधात बोलणे म्हणजे देशद्रोह नाही, भाजप म्हणजे भारत नव्हे आणि भारत म्हणजे भाजप नव्हे; पूजा बेदीचा हल्लाबोल
तुमची शांतताच हुकूमशाहीला बळ देते! भाजपच्या विरोधात बोलणे म्हणजे देशद्रोह नाही, भाजप म्हणजे भारत नव्हे आणि भारत म्हणजे भाजप नव्हे; पूजा बेदीचा हल्लाबोल
कार्यक्षेत्राच्या बाहेर जाऊन कोणी कारवाया केल्यास निलंबन; FDA च्या अधिकाऱ्यांना मंत्री नरहरी झिरवाळांची वॉर्निंग
कार्यक्षेत्राच्या बाहेर जाऊन कोणी कारवाया केल्यास निलंबन; FDA च्या अधिकाऱ्यांना मंत्री नरहरी झिरवाळांची वॉर्निंग
Student Protest: आता आणखी एका देशाच्या राजधानीत विद्यार्थ्यांचं आंदोलन पेटलं, पीएमओ, सरकारी इमारती अन् बँकांना आग लावली; जगाच्या पाठीवर भारत, फ्रान्स, जर्मनीसह 11 देशातील विद्यार्थ्यांचा रस्त्यावर आक्रोश
आता आणखी एका देशाच्या राजधानीत विद्यार्थ्यांचं आंदोलन पेटलं, पीएमओ, सरकारी इमारती अन् बँकांना आग लावली; जगाच्या पाठीवर भारत, फ्रान्स, जर्मनीसह 11 देशातील विद्यार्थ्यांचा रस्त्यावर आक्रोश
Gokul Election: गोकुळसाठी उद्या मतदान; सतेज पाटलांची कडवी झुंज, महायुतीने ठरावधारकांना यल्लमाच्या भंडारा, परडीवर हात मारून शपथाच घ्यायला लावल्या, निकराच्या लढाईत कोण बाजी मारणार?
गोकुळसाठी उद्या मतदान; सतेज पाटलांची कडवी झुंज, महायुतीने ठरावधारकांना यल्लमाच्या भंडारा, परडीवर हात मारून शपथाच घ्यायला लावल्या, निकराच्या लढाईत कोण बाजी मारणार?
Embed widget