एक्स्प्लोर

Horoscope Today 26 June 2026 : आज शुक्रवारच्या दिवशी 'या' 8 राशींना मिळणार कर्माचं फळ; पापातून मुक्ती की संकट ओढावणार? वाचा आजचे राशीभविष्य

Horoscope Today 26 June 2026 : ग्रहांच्या संक्रमणाच्या दृष्टीने देखील आजचा दिवस खास असणार आहे. त्यामुळे आजचा दिवस 12 राशींसाठी नेमका कसा असणार आहे. यासाठी वाचूयात 12 राशींचं आजचं राशीभविष्य. 

Horoscope Today 26 June 2026 : वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार, आजचा दिवस 26 जून (June 2026) 2026 चा आहे. त्यानुसार आजचा वार शुक्रवार आहे. हा दिवस देवी लक्ष्मीला समर्पित आहे. तसेच, आजच्या दिवशी भक्त देवीच्या मंदिरात जाऊन पूजा करतात. आपल्या चुकीच्या गोष्टींबद्दल माफी मागतात. तसेच, ग्रहांच्या संक्रमणाच्या दृष्टीने देखील आजचा दिवस खास असणार आहे. लवकरच शनि वक्री होणार आहे. त्यामुळे आजचा दिवस 12 राशींसाठी नेमका कसा असणार आहे. यासाठी वाचूयात सर्व 12 राशींचं आजचं राशीभविष्य (Horoscope Today)

मेष रास (Aries Horoscope)

मेष राशीसाठी आजचा दिवस खास असणार आहे. आज तुमच्यातील ध्येयवादी वृत्ती दिसून येईल. तसेच, तुमच्या ध्येयावर तुमचं नीट लक्ष असेल. तुमच्या कामाच्या गतीवर देखील परिणाम दिसून येईल. तसेच, जे तरुण आज जॉब इंटर्व्ह्यूसाठी जातील त्यांना सकारात्मक बदल दिसतील.

वृषभ रास (Taurus Horoscope)

वृषभ राशीसाठी आजचा दिवस सामान्य असणार आहे. विद्यार्थी आपल्या मेहनतीने यश कमावतील. तुमच्या वैवाहिक जीवनात छान स्थिरता दिसून येईल. एकमेकांना सपोर्ट कराल.तसेच, धार्मिक कार्यक्रमात तुमची रुची वाढलेली दिसेल. 

मिथुन रास (Gemini Horoscope)

तुमच्यासाठी दिवसाची सुरुवात फार चांगली होईल. सगळ्या गोष्टी तुमच्या मनाप्रमाणे घडतायत असं तुम्हाला वाटेल. पण कामाच्या बाबतीत योग्य काळजी घ्या. तुमचे विरोधक तुमचा सूड घेण्यास तयार असतील. सरकारी योजनांचा तुम्ही लाभ घ्याल. 

कर्क रास (Cancer Horoscope)

कर्क राशीसाठी आजचा दिवस चांगला असणार आहे. तुमच्या व्यवसायाचा विस्तार वाढलेला दिसेल. तसेच, तुमच्या मेहनतीने तुम्हाला यश मिळेल. घरात धनसंपत्तीची भरभराट होईल. आज मित्रांबरोबर तुम्ही बाहेर फिरायला जाण्याचा देखील प्लॅन करु शकता. 

सिंह रास (Leo Horoscope)

सिंह राशीच्या लोकांसाठी आज दिवसाची सुरुवात फार उत्तम असमार आहे. आज तुमच्या घरात आनंदी वातावरण पाहायला मिळले. तसेच, कामाच्या ठिकाणी तुमच्यावर अनेक जबाबदाऱ्या सोपवण्यात येतील. त्या तुम्ही प्रामाणिकपणे पार पाडाव्यात.

कन्या रास (Virgo Horoscope)

कन्या राशीच्या दिवसाची सुरुवात फार अनुकूल असणार आहे. तुमच्यासाठी रोजगाराच्या अनेक संधी उपलब्ध होतील. तसेच, प्रवासाचे योग जुळून येतायत. महत्त्वाची कामे करण्यात वेळ दवडू नका. तसेच, घरातून बाहेर पडताना घरातील ज्येष्ठ व्यक्तींचा आशीर्वाद घ्या.

तूळ रास (Libra Horoscope)

आज तुमची आर्थिक स्थिती फार चांगली असणार आहे. देवी लक्ष्मीच्या कृपेने अचानक तुम्हाला धनलाभ होऊ शकतो. तसेच, तुमच्यासाठी प्रगतीचे मार्ग मोकळे होतील. अनेक क्षेत्रात तुमचा वावर असेल. कामाच्या निमित्ताने तुम्हाला प्रवास करावा लागू शकतो. मात्र, हा प्रवास सुखकर असेल.

वृश्चिक रास (Scorpio Horoscope)

वृश्चिक राशीच्या लोकांच्या आयुष्यात अनेक दिवसांपासून सुरु असलेल्या समस्या हळुहळू संपतील. त्यामुळे तुम्हाला फार सकारात्मक वाटेल. तसेच, नोकरदार वर्गातील लोकांना आपल्या कामाचा योग्य मोबदला मिळेल. राजकारणी लोकांपासून दूरच राहा.

धनु रास (Saggitarius Horoscope)

धनु राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस फार सामान्य असणार आहे. तुमच्या कामात थोडीशी दिरंगाई दिसून येईल. तसेच, अचानक थंडी वाढल्यामुळे तुम्हाला थोडा सर्दीचा त्रासही जाणवेल. आज महत्त्वाच्या कामांना आराम द्या. आणि कामाच्या गडबडीतून थोडा वेळ काढून विश्रांती घ्या.

मकर रास (Capricorn Horoscope)

मकर राशीच्या दिवसाची सुरुवात खास असेल. आज फार दिवसांनंतर तुम्ही तुमच्या कुटुंबियांबरोबर छान वेळ घालवाल. घरात चांगली सुख शांती नांदेल. तसेच, लक्ष्मीच्या पावलांनी लवकरच घरात पैसा येण्याची शक्यता आहे. आज तुमच्या सिनिअर्सकडून तुम्हाला एखादी महत्त्वाची माहिती मिळेल.

कुंभ रास (Aquarius Horoscope)

कुंभ राशीसाठी आजचा दिवस आदल्या दिवसापेक्षा जास्त खास असणार आहे. आज तुमच्या जवळच्या नातेवाईकांबरोबर असलेले वाद मिटतील. अनेक दिवसांपासून सुरु असलेल्या तुमच्या समस्या आज संपतील. तसेच, शनिदेवाच्या कृपेने लवकरच तुम्हाला तुमच्या कर्माचं फळ मिळेल.

मीन रास (Pisces Horoscope)

मीन राशीसाठी आजचा दिवस लाभदायी असणार आहे. आज तुमच्या कामात तुम्हाला यश मिळेल. तसेच, नशिबाची तुम्हाला चांगली साथ मिळेल. घरगुती कामात तुमचं मन रमेल. तसेच, विद्यार्थ्यांच्या कलागुणांना चांगला वाव मिळेल. मित्रांबरोबर तुम्ही फिरायला जाण्याचा प्लॅन करु शकता.

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

हे ही वाचा :

Numerology : 'या' जन्मतारखेचे लोक असतात 'माईंड रिडर'; समोरच्या व्यक्तीच्या मनातलं ओळखण्याची असते अद्भूत शक्ती, सिक्स सेन्स असतो स्ट्रॉंग

Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Lucky Zodiac Signs : 21 ऑगस्टचा दिवस ठरणार भाग्याचा! देवी लक्ष्मीच्या कृपेने धन-संपत्तीत होणार भरभराट; एकामागोमाग मिळतील शुभवार्ता
21 ऑगस्टचा दिवस ठरणार भाग्याचा! देवी लक्ष्मीच्या कृपेने धन-संपत्तीत होणार भरभराट; एकामागोमाग मिळतील शुभवार्ता, वाचा लकी राशी
Hindu Religion: देवघरात 'कुलदेवतेचा कळस' तुम्हीही ठेवता? कळस भरण्याची 'ही' योग्य पद्धत माहितीय? कळस कधी भरावा? कोणी भरावा? धार्मिक मान्यता...
देवघरात 'कुलदेवतेचा कळस' तुम्हीही ठेवता? कळस भरण्याची 'ही' योग्य पद्धत माहितीय? कळस कधी भरावा? कोणी भरावा? धार्मिक मान्यता...
Raksha Bandhan 2026 : रक्षाबंधनानंतर राखी कधी काढावी? राखी काढण्याची योग्य पद्धत कोणती? वाचा A to Z माहिती
रक्षाबंधनानंतर राखी कधी काढावी? राखी काढण्याची योग्य पद्धत कोणती? वाचा A to Z माहिती
Garud Puran: अंत्यसंस्कारापूर्वी मृतदेहाला स्नान का घालतात? कर्मांशी याचा संबंध काय? गरूडपुराणातील 'हा' उल्लेख फार कमी लोकांना माहित.. 
अंत्यसंस्कारापूर्वी मृतदेहाला स्नान का घालतात? कर्मांशी याचा संबंध काय? गरूडपुराणातील 'हा' उल्लेख फार कमी लोकांना माहित.. 
Advertisement

व्हिडीओ

Sinhagad Fort 'किल्ले सिंहगड' ॲप नोंदणी द्वारेच मिळणार गडावर प्रवेश; एआय कॅमेऱ्यांची राहणार करडी नजर
Pawar Family Special Report : बारामतीकडे लक्ष द्या, बारामतीकरांनी थेट लिहलं पवार कुटुंबाला पत्र
Shiv Sena Hearing Special Report : राहुल नार्वेकरांच्या निर्णयावर आक्षेप, ठाकरेंच्या नेत्यांचा हल्लाबोल
Shiv Sena Hearing : तर धनुष्यबाण चिन्ह गोठवा, ठाकरेंची मागणी | Special Report ABP Majha
Vidit Gujrathi Arjuna Award : अर्जुन पुरस्कार जाहीर झाल्यानंतर बुद्धिबळपटू विदित गुजरातीची 'माझा'वर मुलाखत
Advertisement

फोटो गॅलरी

Advertisement

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Nashik Crime News: नाशिकमधील विवाहबाह्य प्रेमप्रकरणाचा भयंकर शेवट, वेळ देत नसल्यामुळे तिची चिडचिड, कडाक्याचं भांडण, रागाच्या भरात त्याने कार अंगावर घातली अन्...
नाशिकमधील विवाहबाह्य प्रेमप्रकरणाचा भयंकर शेवट, वेळ देत नसल्यामुळे तिची चिडचिड, कडाक्याचं भांडण, रागाच्या भरात त्याने कार अंगावर घातली अन्...
Bus Fire Accident: सकाळी सव्वा दहाची वेळ; गाडीत बिघाड झाल्याचं चालकाच्या लक्षात आलं अन्..., पिंपरी चिंचवडमध्ये स्कुल बस जळून खाक
सकाळी सव्वा दहाची वेळ; गाडीत बिघाड झाल्याचं चालकाच्या लक्षात आलं अन्..., पिंपरी चिंचवडमध्ये स्कुल बस जळून खाक
Pune Crime News: राजगडावरून फिरून आले; मध्यरात्री वेताळ टेकडीवर गेले अन्... अल्पवयीन मित्रांनीच मित्राला हातोडी डोक्यात घालून संपवलं
राजगडावरून फिरून आले; मध्यरात्री वेताळ टेकडीवर गेले अन्... अल्पवयीन मित्रांनीच मित्राला हातोडी डोक्यात घालून संपवलं
लग्नासाठी चढवली होती वर्दी, प्रवासी अन् पोलिसांना धूळ चारली; अखेर रेल्वे स्टेशनवरील तोतया महिला अटकेत
लग्नासाठी चढवली होती वर्दी, प्रवासी अन् पोलिसांना धूळ चारली; अखेर रेल्वे स्टेशनवरील तोतया महिला अटकेत
Sajjan Kumar: काँग्रेस नेते सज्जन कुमार यांचे तिहार तुरुंगात निधन, शीखविरोधी दंगली प्रकरणी जन्मठेपेची शिक्षा भोगत असतानाच अखेरचा श्वास घेतला
काँग्रेस नेते सज्जन कुमार यांचे तिहार तुरुंगात निधन, शीखविरोधी दंगली प्रकरणी जन्मठेपेची शिक्षा भोगत असतानाच अखेरचा श्वास घेतला
Video: धक्कादायक! झेडपी शाळेत चक्क खासगी शाळेतील विद्यार्थी बसवले; अभिजीत दिपकेंसमोरच मुलांची कबुली
Video: धक्कादायक! झेडपी शाळेत चक्क खासगी शाळेतील विद्यार्थी बसवले; अभिजीत दिपकेंसमोरच मुलांची कबुली
दिल्लीतील पाकिस्तानी उच्चायुक्तालयाच्या दारात बुलडोझर फिरवला; बॅरिकेड्स आणि कुंपण हटवलं, इस्लामाबादमधील कारवाईनंतर जोरदार प्रत्युत्तर
दिल्लीतील पाकिस्तानी उच्चायुक्तालयाच्या दारात बुलडोझर फिरवला; बॅरिकेड्स आणि कुंपण हटवलं, इस्लामाबादमधील कारवाईनंतर जोरदार प्रत्युत्तर
Nashik Crime News: मैत्रीत दगाफटका; फिरायला गेले अन् मित्राने महिलेला कारनं चिरडलं, अपघाताचा बनाव रचला पण..., असं फुटलं बिंग, नाशिकमधील घटना
मैत्रीत दगाफटका; फिरायला गेले अन् मित्राने महिलेला कारनं चिरडलं, अपघाताचा बनाव रचला पण..., असं फुटलं बिंग, नाशिकमधील घटना
Embed widget