Horoscope Today 26 April 2024 : पंचांगानुसार, आज 26 एप्रिल 2024, आजचा दिवस शुक्रवार. आजचा दिवस काही राशींसाठी लाभदायक तर काही राशींसाठी तोट्याचा असणार आहे. आजच्या दिवशी ग्रहांच्या हालचाली पाहता काही राशीच्या लोकांच्या जीवनात आज अडथळा येऊ शकतो. सर्व राशीच्या लोकांसाठी आजचा शुक्रवारचा दिवस कसा राहील? आज तुम्हाला कोणत्या समस्यांचा सामना करावा लागेल? कोणासाठी दिवस फलदायी ठरेल? 12 राशींचे आजचे राशीभविष्य (Horoscope Today) जाणून घ्या.
मेष रास (Aries Horoscope Today)
आतून ताठर भूमिका ठेवत बाहेरून लवचिक आहोत असे भासवण्यात आज तुम्हाला यश मिळणार आहे. महिलांचा काहीतरी नवीन करण्याकडे कल राहील
वृषभ रास (Taurus Horoscope Today)
तुमच्या प्रभावी बोलण्याचा परिणाम समोरच्या माणसावर होऊन कामे मार्गी लागतील. महिला खूप धोरणी बनतील.
मिथुन रास (Gemini Horoscope Today)
आज कामे यशस्वी होतील. व्यवसाय नोकरीत जे ठरवाल ते करून दाखवाल. मग त्यासाठी किती कष्ट पडले तरी त्याची पर्वा करणार नाही.
कर्क रास (Cancer Horoscope Today)
लोकांशी जेवढा संपर्क ठेवाल तेवढी तुमच्या कामात प्रगती होईल. कमिशन एजंट लोकांना बऱ्यापैकी पैसे मिळतील.
सिंह रास (Leo Horoscope Today)
तुमच्यातील निर्मिती क्षमतेला वाव मिळेल. मुलांची प्रगती होईल. आर्थिक घडी चांगली बसेल.
कन्या रास (Virgo Horoscope Today)
जवळचे लोक मित्रांची मदत चांगली मिळेल. वैवाहिक जीवनात सौख्याचा आनंद मिळेल.
तूळ रास (Libra Horoscope Today)
तुमच्या शांत आणि प्रेमळ स्वभावाचा आज फायदा होणार आहे. वादविवाद टाळून सहकार्याने समस्या सोडवण्यात वाकबगार राहाल.
वृश्चिक रास (Scorpio Horoscope Today)
नोकरी धंद्यात आत्तापर्यंत केलेल्या कामाचे फळ मिळून आर्थिक फायदा होईल. नोकरीच्या शोधात असाल तर चांगल्या पगाराची नोकरीही मिळू शकते.
धनु रास (Sagittarius Horoscope Today)
सामाजिक काम करणाऱ्यांना त्यांच्या श्रमाचे चीज झाल्यासारखे वाटेल. मित्र मंडळींचे उत्तम सहकार्य मिळेल.
मकर रास (Capricorn Horoscope Today)
एखादे काम करून घ्यायचे असेल तर मोठ्या लोकांच्या ओळखीने करून घ्यावे. आजचा दिवस आनंदी राहण्याचा आहे.
कुंभ रास (Aquarius Horoscope Today)
जेथे जाल तेथे आनंद निर्माण कराल. आपल्या कर्तव्याशी प्रामाणिक राहाल. त्यामुळे ज्येष्ठ मंडळी तुमच्यावर फारच खुश राहतील.
मीन रास (Pisces Horoscope Today)
प्रेम प्रकरणांमध्ये प्रगती होऊन आपले प्रस्ताव ज्येष्ठांसमोर मांडायला हरकत नाही. एकंदरीत मन खुश राहील.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा :