एक्स्प्लोर

Horoscope Today 25 October 2023 : आजचा बुधवार 'या' 6 राशींसाठी लाभदायक! जाणून घ्या मेष ते मीन राशीच्या लोकांचं आजचं राशीभविष्य

Horoscope Today 25 October 2023 : आजचा दिवस कोणत्या राशींसाठी शुभ असणार आहे? मेष ते मीन राशीच्या सर्व राशींसाठी दिवस कसा असेल? राशीभविष्य जाणून घ्या.

Horoscope Today 25 October 2023 : आज बुधवार हा महत्त्वाचा दिवस आहे. आज मेष राशीच्या लोकांना वेळेत नोकरीची कामे पूर्ण करतील. तर, वृषभ राशीच्या लोकांसाठी अभ्यासासाठी चांगला काळ आहे. धनु राशीच्या लोकांचे जीवन आनंदाने भरलेले असेल. आजचा बुधवार मेष ते मीन राशीसाठी कसा असणार आहे? काय सांगतात तुमच्या नशिबाचे भाग्यवान तारे? जाणून घ्या आजचं राशीभविष्य. 

मेष

मेष राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस थोडा त्रासदायक असेल. तुम्ही तुमच्या तब्येतीची काळजी घेणं गरजेचं आहे. कामाच्या ठिकाणी जरा तुम्हाला मानसिक ताणाला सामोरे जावं लागेल. एक गोष्ट लक्षा ठेवा, ऑफिसमध्ये कोणाबरोबरही तुमच्या भावना शेअर करू नका. नाहीतर तुम्ही मोठ्या अडचणीत सापडू शकता. तुमच्या वैवाहिक नात्यात गोडवा असेल. कुटुंबात आनंदाचे वातावरण असेल. तुमच्या मुलांच्या वतीने तुमचे मनही समाधानी राहील. तुमच्या वडिलांचे आशीर्वाद सदैव तुमच्या पाठीशी राहतील. तुमचे कुटुंबातील सदस्य तुमच्या कामावर आणि वागण्याने समाधानी राहतील. 

वृषभ 

वृषभ राशीच्या लोकांबद्दल बोलायचे तर आज तुम्हाला तुमच्या व्यवसायात भरपूर नफा मिळू शकतो. तुमच्या व्यवसायात खूप प्रगती होईल आणि समाजात तुमचे नावही खूप वाढेल. तुमचे कुटुंबीय तुम्हाला पूर्ण सहकार्य करतील. पण तुमचे विरोधक तुमचे नुकसान करू पाहतील, त्यामुळे तुम्ही थोडे सावध राहा. बोलण्यावर नियंत्रण ठेवा. कुणालाही वाईट बोलू नका. आज तुमचा खर्च वाढण्याची शक्यता आहे. तुमच्या कुटुंबात एखादा धार्मिक कार्यक्रम आयोजित केला जाऊ शकतो ज्यामध्ये तुम्ही तुमच्या खास पाहुण्यांना आमंत्रित करू शकता. नोकरदार लोक आपल्या कामाबाबत खूप आनंदी राहतील. आज तुमचे आरोग्य चांगले राहील. तुम्हाला कोणत्याही प्रकारचा त्रास होणार नाही. 

मिथुन 

मिथुन राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस चांगला जाईल. शिक्षण विभागात काम करणाऱ्या लोकांना समाजात खूप मानसन्मान मिळू शकतो, ज्यामुळे तुमचे मन खूप आनंदी होईल. व्यावसायिक लोकांबद्दल बोलायचे तर, व्यावसायिक लोकांना त्यांचा व्यवसाय पुढे नेण्यासाठी मित्रांकडून सहकार्य मिळू शकते. यामुळे तुमचे मन खूप आनंदी राहील. जर तुम्ही तुमच्या व्यवसायात खूप मेहनत केली तर तुम्हाला खूप आर्थिक लाभ मिळू शकतो. 

कर्क 

कर्क राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस चांगला राहील. आज तुम्हाला तुमच्या कुटुंबातील सदस्यांकडून किंवा नातेवाईकांकडून एखादी चांगली बातमी मिळू शकते. तुम्ही तुमच्या कुटुंबातील सदस्यांच्या आरोग्याची विशेष काळजी घ्या. तुम्हाला नोकरीत बढती मिळू शकते. व्यवसाय करणाऱ्या लोकांबद्दल बोलायचे झाले तर, तुम्हाला भरपूर नफा मिळू शकतो. तुमच्या व्यवसायात खूप प्रगती होईल. 

सिंह 

सिंह राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस चांगला आहे. जे काही दिर्घकालीन आजाराने त्रस्त होते, त्यांच्या तब्येतीत हळूहळू सुधारणा दिसेल. व्यवसायासाठी आजचा दिवस चांगला राहील. आज तुम्ही नवीन लोकांच्या संपर्कात याल ज्याद्वारे तुम्हाला नफा मिळून तुमची आर्थिक स्थिती मजबूत होईल. मित्रांच्या मदतीने आर्थिक अडचणी दूर होतील. दूर राहणारे काही नातेवाईक आज तुमच्याशी संपर्क साधू शकतात. आपल्या प्रियजनांची काळजी घेणे ही चांगली गोष्ट आहे, परंतु त्यांची काळजी घेत असताना, आपल्या आरोग्याची देखील काळजी घ्या. नोकरदार लोक नोकरीत दिलेली कामे वेळेवर पूर्ण करण्याचा प्रयत्न करतील. अधिकाऱ्यांचे सहकार्य मिळेल. तुमच्या वाणीतील गोडव्यामुळे तुमची सर्व कामे पूर्ण होतील. 

कन्या 

कन्या राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस आनंददायी आहे. व्यवसाय मजबूत करण्यासाठी तुम्ही कोणतेही महत्त्वाचे पाऊल उचलू शकता, ज्यासाठी तुमच्या जवळची व्यक्ती तुम्हाला आर्थिक मदत करेल. संध्याकाळी तुमचे घर पाहुण्यांनी भरलेले असेल. प्रत्येकजण खूप मजा करताना दिसणार आहे. तुम्ही तुमच्या दैनंदिन दिनचर्येत मॉर्निंग वॉक, योग आणि ध्यान यांचा समावेश कराल, ज्यामुळे तुम्हाला खूप उत्साही वाटेल. तुम्ही तुमच्या व्यस्त दिवसातून थोडा वेळ स्वतःसाठी काढा, ज्यामध्ये तुम्ही तुमची आवडती कामे करा. तुमच्या जोडीदाराच्या आरोग्याबाबत तुम्ही चिंतेत असाल. शैक्षणिक क्षेत्रात यश मिळेल. 

तूळ

तूळ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस इतर दिवसांपेक्षा चांगला जाणार आहे. तुमचा व्यवसाय पुढे नेण्यासाठी तुम्ही तुमच्या मित्रांची मदत घेऊ शकता. एखाद्या ओळखीच्या व्यक्तीद्वारे तुम्हाला नवीन संपर्क मिळतील, त्यातून नफा मिळवून तुम्ही तुमची आर्थिक स्थिती मजबूत होईल. चांगल्या आयुष्यासाठी तुमचे आरोग्य आणि व्यक्तिमत्व सुधारण्याचा प्रयत्न करा. आज अनुभवी व्यक्तीच्या सल्ल्याशिवाय असे कोणतेही काम करू नका, ज्यामुळे तुमचे आर्थिक नुकसान होईल. तुमच्या दिवसाची सुरुवात चांगली होईल आणि त्यामुळे तुम्हाला उद्या दिवसभर उत्साही वाटेल. शैक्षणिक क्षेत्रात यश मिळेल. एखाद्या खास व्यक्तीच्या मदतीने तुम्हाला तुमचे रखडलेले पैसे मिळतील. वडिलोपार्जित संपत्तीतूनही आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. 

वृश्चिक 

वृश्चिक राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस चांगला आहे. नोकरीत दिलेली कामे वेळेवर पूर्ण करा. तुम्ही केलेल्या कामाचे कौतुक होईल. अधिका-यांकडून शुभवार्ता ऐकायला मिळतील. कुटुंबाचे सहकार्य मिळेल. कुटुंबातील सदस्यांबरोबर थोडा वेळ घालवा. नको असलेले विचार मनातून काढून टाका. स्वतःच्या शरीराची काळजी घ्या. शारीरिक व्यायामाला महत्त्व द्या. अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेल्या घरगुती कामांच्या बाबतीत दिवस चांगला आहे. तुमच्या जोडीदारासोबतचा आजचा दिवस तुमच्या आयुष्यातील सर्वात रोमँटिक दिवसांपैकी एक असू शकतो. 

धनु

धनु राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस खूप चांगला आहे. नोकरी करणाऱ्या लोकांना आपल्या नोकरीत बदल बघायला मिळतील. आज तुम्हाला कुटुंबाचं सहकार्य मिळेल. तसेच, घरातील ज्येष्ठ सदस्यांबरोबर बसून तुम्हाला पैशांची बचत कशी करायची? पैसे कसे गुंतवायचे? हे समजून घ्या. जेणेकरून भविष्यात कोणतीही अडचण येणार नाही. ओळखीच्या व्यक्तीच्या माध्यमातून उत्पन्नाच्या संधी उपलब्ध होतील. वडिलोपार्जित संपत्तीतून आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. भावा-बहिणींचे सहकार्य मिळेल. वाहन चालवताना सावधगिरी बाळगा. 

मकर

मकर राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस संमिश्र आहे. आज तुम्हाला कामाच्या ठिकाणी अडचणींचा सामना करावा लागू शकतो. पण तुम्ही हिंमत हारू नका आणि तुमच्या चुकांवर काम करा, मेहनत घ्या आणि या अपयशांचा सामना करून तुमची प्रगती करा. अडचणीच्या काळात नातेवाईकही कामी येतील. आजचा तुमचा संपूर्ण दिवस व्यस्त असेल. पण, तुमच्या आवडत्या गोष्टी करण्यासाठी तुम्हाला पुरेसा वेळ मिळेल. स्पर्धेच्या तयारीसाठी विद्यार्थी मेहनत करताना दिसतील. उच्च शिक्षणासाठी काळ चांगला आहे. तुमचा वेळ वाया घालवणाऱ्या तुमच्या मित्रांपासून दूर राहा. 

कुंभ

कुंभ राशीच्या लोकांसाठी आजच्या दिवशी तुम्हाला नशिबाची साथ मिळेल. आज तुम्हाला चांगली बातमी ऐकायला मिळू शकते. तुमच्यामध्ये भरपूर आत्मविश्वास आहे याचा योग्य वापर करा. आज दिवसभर तुम्ही उत्साही राहाल. आज तुमच्याकडे पैसे उधार घ्यायला कोणीतरी येऊ शकतं पण कर्ज देण्यापूर्वी त्या व्यक्तीची विश्वासार्हता तपासा नाहीतर तुमचे पैसे रखडले जाऊ शकतात. तुमचं वैवाहिक जीवन चांगलं राहील. आज तुमचे कुटुंबीय तुमच्याबरोबर अनेक समस्या शेअर करतील. तुम्ही त्यावर विचारपूर्वक निर्णय घ्या. गरजूंना मदत करून तुम्हाला मानसिक शांतता मिळेल तसेच प्रसन्न वाटेल. व्यवसाय करणारे लोक व्यवसायातील रखडलेल्या योजना पुन्हा सुरू करू शकतात. 

मीन

मीन राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस संमिश्र आहे. कामाच्या ठिकाणी किंवा व्यवसायात तुमचा कोणताही निष्काळजीपणा आज तुम्हाला महागात पडू शकतो त्यामुळे काळजी घ्या. लक्षपूर्वक काम करा. तुमच्या आरोग्याबाबत अधिक काळजी घेणं आवश्यक आहे त्यामुळे तब्येतीकडे दुर्लक्ष न करता वेळीच डॉक्टरांचा सल्ला घ्या. नोकरीत प्रगतीच्या संधी मिळतील. बेरोजगारांना चांगला रोजगार मिळेल. मुलाला चांगली नोकरी मिळाल्याने पालकांना खूप आनंद होईल. घर, प्लॉट खरेदी करण्याची तुमची इच्छा पूर्ण होऊ शकते. वडिलोपार्जित संपत्तीतून आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. 

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

महत्त्वाच्या बातम्या : 

Horoscope Today 24 October 2023 : दसऱ्याचा दिवस 'या' राशींसाठी सोन्याचा! 12 राशींचे राशीभविष्य जाणून घ्या

महत्त्वाच्या बातम्या

Shani Transit 2026: अखेर शनिने नक्षत्र बदललं, 4 राशींचे नशीब फळफळलं! मोठा धनलाभ, उत्पन्नात वाढ, रखडलेली कामे पूर्ण होण्याचे संकेत
अखेर शनिने नक्षत्र बदललं, 4 राशींचे नशीब फळफळलं! मोठा धनलाभ, उत्पन्नात वाढ, रखडलेली कामे पूर्ण होण्याचे संकेत
Diwali Padwa Horoscope 2026: तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीन..आज 'दिवाळी पाडव्याचा' दिवस गेमचेंजर, 4 राशी मालामाल, पैसा, नोकरी, प्रेम.. राशीभविष्य..
तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीन..आज 'दिवाळी पाडव्याचा' दिवस गेमचेंजर, 4 राशी मालामाल, पैसा, नोकरी, प्रेम.. राशीभविष्य..
Diwali Padwa Horoscope 2026: मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या..आज 'दिवाळी पाडव्याचा' दिवस नशीब पालटणारा, अद्भूत योगायोग, पैसा, नोकरी, प्रेम.. राशीभविष्य..
मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या..आज 'दिवाळी पाडव्याचा' दिवस नशीब पालटणारा, अद्भूत योगायोग, पैसा, नोकरी, प्रेम.. राशीभविष्य..
Diwali Padwa 2026: आज दिवाळी पाडवा! पतीच्या औक्षणासाठी 'हा' सर्वात शुभ मुहूर्त, बलिप्रतिपदा तिथी, पूजाविधी, धार्मिक महत्त्व...
आज दिवाळी पाडवा! पतीच्या औक्षणासाठी 'हा' सर्वात शुभ मुहूर्त, बलिप्रतिपदा तिथी, पूजाविधी, धार्मिक महत्त्व...

व्हिडीओ

Hasan Mushrif speech Gokul : ... ती बंटी पाटलांची शेवटची सभासमजा, 13 संचालकांना इशारा
Gokul Chairman Rajesh Patil: हसन मुश्रीफ भाषणाला उभे राहताच महायुतीचा उमेदवार जिंकला; गोकुळमध्ये काय घडलं?
Gokul Chairman Election 2026: गोकुळमध्ये शासननियुक्त 4 संचालक पोहोचले तेव्हा...काय घडलं?, VIDEO
Vivekanand Patil Gokul Morcha Speech : कोरमचं कौतुक सांगू नका, गोकुळ मोर्चातील धमाल भाषण
Varsha Usgaonkar Majha Katta: कॉलेजचे किस्से ते सिनेमातील प्रवास,वर्षा उसगांवकरांसोबत दिलखुलास गप्पा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Gokul Chairman Election 2026: गोकुळच्या अध्यक्षपदी अजित पवारांचा 'राईट हँड' राजेश पाटील यांची निवड; महायुतीने अखेर कंडका पाडलाच, नेमकं काय काय घडलं?, A टू Z माहिती
गोकुळच्या अध्यक्षपदी अजित पवारांचा 'राईट हँड' राजेश पाटील यांची निवड; महायुतीने अखेर कंडका पाडलाच, नेमकं काय काय घडलं?, A टू Z माहिती
माझ्या विद्याच्या घरातील 4 माणसं जेलमध्ये होती, पहिल्या पत्नीबद्दल बोलताना चंद्रकांत पाटील भावनिक, म्हणाले, बंटी पाटील तू मला घटना शिकवणार का?
माझ्या विद्याच्या घरातील 4 माणसं जेलमध्ये होती, पहिल्या पत्नीबद्दल बोलताना चंद्रकांत पाटील भावनिक, म्हणाले, बंटी पाटील तू मला घटना शिकवणार का?
राष्ट्रवादीचे आमदार शरद पवारांना भेटणार, भेटीसाठी मागितली वेळ; विलिनीकरणाच्या चर्चेत राजकीय घडामोडींना वेग
राष्ट्रवादीचे आमदार शरद पवारांना भेटणार, भेटीसाठी मागितली वेळ; विलिनीकरणाच्या चर्चेत राजकीय घडामोडींना वेग
गोकुळसंदर्भात मी कायदा आणि संस्थेच्या मागे; मुख्यमंत्र्यांनी सांगितलं राज'कारण', राहुल गांधींनाही केलं लक्ष्य
गोकुळसंदर्भात मी कायदा आणि संस्थेच्या मागे; मुख्यमंत्र्यांनी सांगितलं राज'कारण', राहुल गांधींनाही केलं लक्ष्य
Gokul Chairman Election 2026: गोकुळवर आज महायुतीचा अध्यक्ष; पण कोर्टाचा निकाल विरोधात गेल्यास काय?; हसन मुश्रीफांनी पुढचा प्लॅन सांगितला!
गोकुळवर आज महायुतीचा अध्यक्ष; पण कोर्टाचा निकाल विरोधात गेल्यास काय?; हसन मुश्रीफांनी पुढचा प्लॅन सांगितला!
मोठी बातमी : गोकुळमध्ये मोठा ट्विस्ट, राजेश पाटील वर्षभरासाठीच अध्यक्ष, धनंजय महाडिकांनी फॉर्म्युला सांगितला!
मोठी बातमी : गोकुळमध्ये मोठा ट्विस्ट, राजेश पाटील वर्षभरासाठीच अध्यक्ष, धनंजय महाडिकांनी फॉर्म्युला सांगितला!
Satej Patil and Chandrakant Patil: अरे बंटी, तू कधी साहेब झालाच नाही, दादा तुटून पडले, गोकुळ चौकात चंद्रकांत पाटलांनी सतेज पाटलांची औकात काढली
अरे बंटी, तू कधी साहेब झालाच नाही, दादा तुटून पडले, गोकुळ चौकात चंद्रकांत पाटलांनी सतेज पाटलांची औकात काढली
UP Car Accident: दिवाळीसाठी निघाले, एक चूक आणि सगळे जिवंत जळाले; कार अपघातामध्ये 6 मित्रांचा मृत्यू, संपूर्ण गाव सुन्न!
दिवाळीसाठी निघाले, एक चूक आणि सगळे जिवंत जळाले; कार अपघातामध्ये 6 मित्रांचा मृत्यू, संपूर्ण गाव सुन्न!
Embed widget