एक्स्प्लोर

Horoscope Today 24 October 2026 : आज शनिवारच्या दिवशी 'या' 7 राशींवर असणार शनिची करडी नजर, कर्माचं फळ कोणाला मिळणार? वाचा आजचे राशीभविष्य

Horoscope Today 24 October 2026 : ग्रहांच्या संक्रमणाच्या दृष्टीने देखील आजचा दिवस खास असणार आहे. त्यामुळे आजचा दिवस 12 राशींसाठी नेमका कसा असणार आहे. यासाठी वाचूयात सर्व 12 राशींचं आजचं राशीभविष्य. 

Horoscope Today 24 October 2026 : वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार, आज 24 ऑक्टोबर 20 चा दिवस आहे. त्यानुसार आजचा वार शनिवार आहे. आजचा दिवस आपण शनिदेवाला (Shani Dev) समर्पित करतो. तसेच, आजच्या दिवशी भक्त शनिदेवाची पूजा करतात. आपल्या चुकीची माफी मागतात. तसेच, ग्रहांच्या संक्रमणाच्या दृष्टीने देखील आजचा दिवस खास असणार आहे. त्यामुळे आजचा दिवस 12 राशींसाठी नेमका कसा असणार आहे. यासाठी वाचूयात सर्व 12 राशींचं आजचं राशीभविष्य (Horoscope Today). 

मेष रास (Aries Horoscope)

मेष राशीसाठी आजचा दिवस सामान्य असणार आहे. फक्त तुम्ही तुमच्या मुलांच्या आरोग्याची काळजी घ्यावी. प्रेमाच्या बाबतीत अहंकार बाळगू नका. तसेच, आजच्या दिवसात कोणताही नवीन निर्णय घेताना सावधानता बाळगा. घराच्या आसपास गाय दिसली तर दान करायला विसरू नका. तुमच्यासाठी लवकर चांगली बातमी आहे. 

वृषभ रास (Taurus Horoscope)

वृषभ राशीसाठी आजचा दिवस लाभदायी असणार आहे. तुमच्या व्यवसायाचा विस्तार वाढलेला दिसेल. नोकरदार वर्गातील लोकांना लवकरच नवीन प्रोजेक्ट हाती लागेल. तसेच, विद्यार्थ्यांसाठी आजचा दिवस सामान्य असणार आहे. तुमच्यातील कलागुणांना चांगला वाव मिळेल. 

मिथुन रास (Gemini Horoscope)

मिथुन राशीसाठी आजचा दिवस फार खास असणार आहे. आज तुमची एखाद्या जुन्या मित्राशी भेट होईल आणि जुन्या आठवणींना तुम्ही उजाळा द्याल. व्यवसायात एखादा करार होऊ शकतो. तसेच, संपत्तीचे अनेक मार्ग तुम्हाला सापडतील. मुलांसाठी आजचा दिवस अनुकूल आहे. काही महत्त्वाची कामे आज वेळेत पूर्ण होतील. 

कर्क रास (Cancer Horoscope)

कर्क राशीसाठी आजचा दिवस प्रगतीचा असणार आहे. तुमच्यापाठी घरातील ज्येष्ठ व्यक्तींचा पाठिंबा असताना तुम्हाला चिंता करण्याची गरज नाही. वैवाहिक जीवन सुखाचे जातील. आज संध्याकाळच्या वेळी पार्टनरला छान भेटवस्तू द्याल. तसेच, तुमचा आत्मविश्वासही वाढेल.

सिंह रास (Leo Horoscope)

सिंह राशीसाठी आजचा दिवस खास असणार आहे. तुम्हाला तुमच्या व्यवसायात काही दिग्गज लोकांची मदत मिळेल. कामाच्या निमित्ताने तुम्हाला फार प्रवास करावा लागेल. या दरम्यान अनेक लोकांशी तुमच्या भेटीगाठी होतील. एखाद्या कामाची सुरुवात करण्यासाठी आजचा दिवस शुभ आहे. 

कन्या रास (Virgo Horoscope)

कन्या राशीसाठी आजचा दिवस पूर्वीपेक्षा चांगला असणार आहे. महत्त्वाचं म्हणजे ज्या कामासाठी तुम्ही इतके दिवस थांबून होता ते काम तुमचं वेळेत पूर्ण होईल. तुमच्यातील कलागुणांना चांगला वाव मिळेल. तसेच, सामाजत तुमच्या नावाचं कौतुक केलं जाईल. प्रगतीचे अनेक संकेत निर्माण होणार आहेत.  

तूळ रास (Libra Horoscope)

तूळ राशीसाठी आजचा दिवस सामान्य असणार आहे. तुम्हाला ना लाभ ना तोटा होईल. पण, तुम्ही हाती घेतलेल्या कार्याने अनेकांना रोजगार मिळेल. त्यामुळे व्यवहारात फक्त स्वत:चाच विचार न करता इतरांचा देखील विचार करणं तुमच्यासाठी लाभदायी ठरेल.

वृश्चिक रास (Scorpio Horoscope)

वृश्चिक राशीच्या दिवसाची सुरुवात तर चांगली होईल. मात्र, दिवसाच्या शेवटी तुम्हाला कठीण परिस्थितीचा सामना करावा लागेल. भविष्यात तुम्ही प्लॅन केलेल्या योजनांवर याचा परिणाम होऊ शकतो. तसेच, तुमचा आत्मविश्वासही ढासळेल. नवीन गोष्टी शिकण्याचा प्रयत्न कराल.

धनु रास (Saggitarius Horoscope)

धनु राशीसाठी आजचा दिवस फार सामान्य असणार आहे. आज तुम्हाला तुमची अनेक रखडलेली कामे वेळेत पूर्ण करता येतील. तसेच, तुमच्या हाती चांगली बातमी लागेल. लवकरच एखाद्या नवीन कार्याची सुरुवात तुम्ही करु शकता. प्रवासाचे योग आहे. फक्त आळस दूर ठेवा. यश तुमचंच आहे. 

मकर रास (Capricorn Horoscope)

मकर राशीने शेअर बाजारात पैशांची गुंतवणूक करु नये. तुम्हाला धनहानीचे संकेत मिळू शकतात. तसेच, गुंतवणुकीसाठी हा काळ योग्य नाही. तुमचा व्यवसाय सुरळीत चालेल. मात्र, त्यात ना लाभ ना तोटा मिळेल. 

कुंभ रास (Aquarius Horoscope)

कुंभ राशीसाठी आजचा दिवस सामान्य आहे. दिवसाची सुरुवात प्रसन्न होईल. पण, जसजसा वेळ निघत जाईल तुम्हाला बैचेन वाटेल. तुमच्या मनात अनेक प्रश्न निर्माण होतील. 10 गोष्टी डोक्यात सुरु असतील पण उत्तर एकाचंही मिळणार नाही. 

मीन रास (Pisces Horoscope)

मीन राशीसाठी आजचा दिवस चांगला आहे. तुमची आर्थिक स्थितीही चांगली आहे. मात्र, तरीही पैशांचा अतिवापर करु नका. महिन्याचा शेवटचा दिवस आहे. त्यामुळे व्यवहाराच्या बाबतीत काळजी घ्या. वैवाहिक जीवनातील अडथळे दूर होतील. 

इतर महत्त्वाच्या बातम्या :

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

Baba Vanga Prediction : बाबा वेंगाची भविष्यवाणी! पुढचे 7 दिवस 5 राशींना लागणार लॉटरी; ग्रहांचा पॉवरफुल शुभ योग, हातात खेळणार पैसाच पैसा, वाचा लकी राशी

Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Diwali Horoscope 2026: मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्यापैकी 4 राशींची पाचही बोटं तुपात..'दिवाळीचा' 7 दिवसांचा काळ नशीब पालटणारा, पैसा, नोकरी, प्रेम.. राशीभविष्य..
मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्यापैकी 4 राशींची पाचही बोटं तुपात..'दिवाळीचा' 7 दिवसांचा काळ नशीब पालटणारा, पैसा, नोकरी, प्रेम.. राशीभविष्य..
Horoscope Today 27 October 2026: आज मंगळवारचा दिवस 7 राशींसाठी भाग्याचा! एका मागोमाग शुभ योग जुळले, कोणाचं नशीब चमकणार? आजचे राशीभविष्य..
आज मंगळवारचा दिवस 7 राशींसाठी भाग्याचा! एका मागोमाग शुभ योग जुळले, कोणाचं नशीब चमकणार? आजचे राशीभविष्य..
Lucky Zodiac Signs : 27 ऑक्टोबरचा दिवस 'या' 5 राशींसाठी भाग्यशाली! बजरंगबलीच्या कृपेने उत्पन्नाचे नवे मार्ग होतील खुले, वाईट काळ लवकरच संपणार
27 ऑक्टोबरचा दिवस 'या' 5 राशींसाठी भाग्यशाली! बजरंगबलीच्या कृपेने उत्पन्नाचे नवे मार्ग होतील खुले, वाईट काळ लवकरच संपणार
Rahu Ketu Gochar 2026 : डिसेंबर महिन्यात राहू-केतूचं महासंक्रमण! एका झटक्यात नशीब पालटणार, कोणकोणत्या राशींवर होणार धनवर्षाव? वाचा लकी राशी
डिसेंबर महिन्यात राहू-केतूचं महासंक्रमण! एका झटक्यात नशीब पालटणार, कोणकोणत्या राशींवर होणार धनवर्षाव? वाचा लकी राशी
Advertisement

व्हिडीओ

Karjat Tree Cutting : टोरंट कंपनीच्या जलविद्युत प्रकल्पावरुन राजकारण जोरात : Special Report
Nashik kumbh Mela 2026 : सिंहस्थ कुंभमेळ्याच्या ध्वजारोहणात ऐतिहासिक क्षण, नाशिकमध्ये 501 शंखांचा एकत्रित नाद
Nashik Kumb Mela 2026 : कुंभमेळ्याची परंपरा नेमकी कशी सुरू झाली? History of kumb Mela
Nashik Kumb mela : नाशिक कुंभमेळ्यात विश्वविक्रम, 501 गोदासेवकांचा एकाचवेळी शंखनाद, अमेरिकेचा विक्रम मोडीत
Raj Thackeray Speech | दुचाकी, चारचाकी, सिग्नल ते सरकार... नवी मुंबईतील मेळाव्यातलं राज यांचं भाषण!
Advertisement

फोटो गॅलरी

Advertisement

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मोठी बातमी, प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणी मीनाक्षी शिंदेंची चौकशी होणार, ठाणे पोलिसांचं खंडणीविरोधीपथकानं चौकशीला बोलावलं
प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणी मीनाक्षी शिंदेंची चौकशी होणार, ठाणे पोलिसांचं खंडणीविरोधीपथकानं चौकशीला बोलावलं
Election : सरपंचपदाच्या निवडणुकीच्या रिंगणात महिलेचा पराभव..., गावकऱ्यांनी मनाचा मोठेपणा दाखवला, चिडी देवींच्या कुटुंबाला थेट 25 लाखांची आर्थिक मदत
चिडी देवींचा निवडणुकीत पराभव, गावकऱ्यांकडून थेट 25 लाखांची आर्थिक मदत, लोकांच्या एका निर्णयानं कुंटुंबाला आश्चर्याचा धक्का
Mumbai Pune Missing Link : मुंबई-पुणे 'मिसिंग लिंक'वर नवे नियम; पिकअप व्हॅन, मालवाहतूक ट्रकसह अनेक वाहनांना प्रवेशबंदी, 1 नोव्हेंबरपासून बस, कारची वेगमर्यादा निश्चित
मुंबई-पुणे 'मिसिंग लिंक'वर नवे नियम; पिकअप व्हॅन, मालवाहतूक ट्रकसह अनेक वाहनांना प्रवेशबंदी, 1 नोव्हेंबरपासून बस, कारची वेगमर्यादा निश्चित
कॉम्प्युटर क्लास करुन घरी निघाला होता साहिल, मृत्यूला रेल्वेचा गलथान कारभारच जबाबदार; कुटुंबीयांचा आक्रोश
कॉम्प्युटर क्लास करुन घरी निघाला होता साहिल, मृत्यूला रेल्वेचा गलथान कारभारच जबाबदार; कुटुंबीयांचा आक्रोश
Arunachal Border Tension : 'आशा आहे भारत कराराचे पालन करेल'; अरुणाचल सीमेवरील तणावावर चीनच्या उलट्या बोंबा 
'आशा आहे भारत कराराचे पालन करेल'; अरुणाचल सीमेवरील तणावावर चीनच्या उलट्या बोंबा 
Vande Bharat Sleeper Train : मुंबई-बंगळुरु वंदे भारत स्लीपर ट्रेनबाबत केंद्रीय रेल्वे राज्यमंत्र्यांकडून अपडेट, ट्रेन कोणत्या मार्गे धावणार?
मुंबई-बंगळुरु वंदे भारत स्लीपर ट्रेनबाबत केंद्रीय रेल्वे राज्यमंत्र्यांकडून अपडेट, ट्रेन कोणत्या मार्गावरुन धावणार?
खोळंब्यानंतर लोकल सुरळीत, पण तुडूंब गर्दीमुळे प्रवाशांची हाणामारी; ठाणे रेल्वे स्थानकावर चाकरमानी संतप्त
खोळंब्यानंतर लोकल सुरळीत, पण तुडूंब गर्दीमुळे प्रवाशांची हाणामारी; ठाणे रेल्वे स्थानकावर चाकरमानी संतप्त
इंग्रजांकडून होत नव्हता, तेवढा त्रास यांच्याकडून; वृक्षतोडीवरुन जरांगे पाटील संतप्त, साय डोंगर परिसरात भेट देणार
इंग्रजांकडून होत नव्हता, तेवढा त्रास यांच्याकडून; वृक्षतोडीवरुन जरांगे पाटील संतप्त, साय डोंगर परिसरात भेट देणार
Embed widget