एक्स्प्लोर

Horoscope Today 24 May 2026 : आज रविवारच्या दिवशी 'या' 7 राशींची सर्वात कठीण परीक्षा; दिवसाच्या शेवटी मिळणार 'हा' मोठ्ठा संकेत, आजचे राशीभविष्य

Horoscope Today 24 May 2026 : आजचा दिवस 12 राशींसाठी नेमका कसा असणार आहे. यासाठी वाचूयात सर्व 12 राशींचं आजचं राशीभविष्य (Horoscope Today). 

Horoscope Today 24 May 2026 : वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार, आज 24 मे 2026 चा दिवस आहे. त्यानुसार आजचा वार रविवार आहे. आजचा दिवस हा सूर्यदेवाला समर्पित आहे. तसेच, आजच्या दिवशी भक्त सूर्यदेवाला जल अर्पण करतात. पूजा करतात. तसेच, ग्रहांच्या संक्रमणाच्या दृष्टीने देखील आजचा दिवस खास असणार आहे. त्यामुळे आजचा दिवस 12 राशींसाठी नेमका कसा असणार आहे. यासाठी वाचूयात सर्व 12 राशींचं आजचं राशीभविष्य (Horoscope Today). 

मेष रास (Aries Horoscope)

मेष राशीच्या लोकांसाठी आजचा रविवार काहीसा आव्हानात्मक असणार आहे. आजच्या दिवसात तुम्हाला एखादी भीती सतत सतावू शकते. तसेच, आज तुमच्या खर्चातही विनाकारण वाढ झालेली दिसेल. संध्याकाळच्या वेळी तुम्हाला डोकेदुखी, डोळे दुखण्याचा त्रास उद्भवू शकतो. अशा वेळी जास्त मानसिक ताण घेऊ नका. 

वृषभ रास (Taurus Horoscope)

वृषभ राशीसाठी आजचा दिवस सामान्य असणार आहे.आजच्या दिवसात कुठेही लांबच्या प्रवासाला जाऊ नका. तसेच, तुमच्या मनात अनेक विचार सुरु असतील. कोणत्याही एका कामात तुमचं मन रमणार नाही. तुमचा व्यवसाय चांगला सुरु असेल. आरोग्याची काळजी घ्या. 

मिथुन रास (Gemini Horoscope)

व्यवसायाच्या बाबतीत तुम्हाला मनासारखे रिझल्ट्स नाही मिळणार. त्यामुळे तुमचं मन थोडं नाराज होईल. पण हिंमत हारु नका. कामाच्या ठिकाणी उच्च अधिकाऱ्यांचा तुम्हाला पाठिंबा मिळेल. तसेच, प्रेमी युगुलांसाठी आजचा दिवस चांगला असणार आहे. 

कर्क रास (Cancer Horoscope)

कर्क राशीसाठी आजचा दिवस चांगला असणार आहे. आज रविवार असल्या कारणाने मुलांचा दिवस आनंदात जाईल. आरोग्याची काळजी घ्या. तुमचा व्यवसाय देखील सुरळीत चालेल. आजच्या दिवशी लाल वस्तू तुमच्याजवळ ठेवणं शुभकारक राहील.

सिंह रास (Leo Horoscope)

सिंह राशीसाठी देखील आजचा दिवस शुभदायी असणार आहे. आज तुमची रखडलेली सगळी कामे तुम्हाला वेळेत पूर्ण करता येतील. रविवार सुट्टीचा दिवस असल्या कारणाने कुटुंबियांबरोबर तुम्ही चांगला वेळ घालवाल. तसेच, धार्मिक कार्यात देखील सहभागी व्हाल. तुमच्या व्यवसायाचा आलेख वर चढताना दिसेल.

कन्या रास (Virgo Horoscope)

कन्या राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस सामान्य असेल. आज तुम्ही तुमच्या आरोग्याची काळजी घ्यावी. आजच्या दिवसात तुम्ही एखादी चांगली सवय स्वत:ला लावून घेऊ शकता. किंवा स्वत:मध्ये काही बदल घडवून आणू शकता. नोकरदार वर्गातील लोकांसाठी देखील आजचा दिवस चांगला असेल.

तूळ रास (Libra Horoscope)

तूळ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस भरभराटीचा असणार आहे. देवी लक्ष्मीची तुमच्यावर विशेष कृपा असेल. काही तुमची रखडलेली कामे आज पार पडतील. महत्त्वाच्या कामामध्ये जास्त वेळ घालवू नका. तसेच, कुटुंबियांबरोबर तुमचा चांगला वेळ जाईल.

वृश्चिक रास (Scorpio Horoscope)

वृश्चिक राशीसाठी आजचा दिवस सकारात्मक असणार आहे. मित्रांचं सहकार्य तुमच्यासाठी महत्त्वाचं ठरेल. तसेच, तुमची मानसिक स्थिती चांगली असेल. प्रेमाच्या बाबतीत तुम्हाला सावधानता बाळगण्याची गरज आहे. पार्टनरबरोबर चांगला व्यवहार ठेवा. महत्त्वाच्या कामांना प्राधान्य द्या. 

धनु रास (Saggitarius Horoscope)

धनु राशीसाठी आजचा दिवस शुभकारक असेल. आजच्या तुमच्या हातून शुभकार्य घडेल. तसेच, घरगुती कार्यक्रमांमध्ये तुम्ही सहभागी व्हाल. जर तुम्हाला एखादं वाहन किंवा प्रॉपर्टी खरेची करायची असेल तर त्यासाठी आजचा दिवस शुभकारक असणार आहे. 

मकर रास (Capricorn Horoscope)

मकर राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस सामान्य असेल. तुमच्या व्यवसायात काही चढ-उतार पाहायला मिळतील. आरोग्याची काळजी घ्या. तसेच, इतरांचं बोलणं जास्त मनावर घेऊ नका. आज तुम्हाला तुमच्या मुलांकडून एखादी शुभवार्ता ऐकायला मिळेल. कलागुणांना चांगला वाव मिळेल. 

कुंभ रास (Aquarius Horoscope)

कुंभ राशीसाठी आज सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे. आज महत्त्वाची कामे करु नका. तसेच, पैशांशी संबंधित कोणतेही व्यवहार आज हातात घेणं टाळा. तुमचा व्यवसाय सुरळीत चालेल. आरोग्याच्या बाबतीत थोडेफार चढ-उतार तुम्हाला सांभाळावे लागतील. 

मीन रास (Pisces Horoscope)

मीन राशीसाठी आजचा दिवस चागंला असणार आहे. आज तुम्ही मुलांच्या आरोग्याची काळजी घ्या. तसेच, काही महत्त्वाच्या कामांना प्रोत्साहन द्या. नकारात्मक गोष्टींपासून दूर राहा. तसेच, तुमच्या व्यवसायात काही चढ-उतार असतील. मात्र, हळुहळू परिस्थिती नियंत्रणात राहील.

हे ही वाचा :

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

Baba Vanga Prediction : मेच्या शेवटच्या आठवड्यासाठी बाबा वेंगाची भविष्यवाणी; कर्क, सिंहसह 5 राशींची होणार छप्परफाड कमाई, कुंडलीत जुळून येणार राजयोग

महत्त्वाच्या बातम्या

Mangal Gochar 2026 : 5 राशींसाठी नवीन वर्षाची सुरुवातच भन्नाट; मंगळ ग्रहाच्या संक्रमणाने उघडणार नशिबाचे दार, उत्पन्नाचे मार्ग होतील खुले
5 राशींसाठी नवीन वर्षाची सुरुवातच भन्नाट; मंगळ ग्रहाच्या संक्रमणाने उघडणार नशिबाचे दार, उत्पन्नाचे मार्ग होतील खुले
Dev Uthani Ekadashi 2026 : भगवान विष्णू निद्रावस्थेतून जागताच 3 राशींचं भाग्य उजळणार; मागाल ती इच्छा होणार पूर्ण, धनलाभाचे मिळतील शुभ संकेत
भगवान विष्णू निद्रावस्थेतून जागताच 3 राशींचं भाग्य उजळणार; मागाल ती इच्छा होणार पूर्ण, धनलाभाचे मिळतील शुभ संकेत
Hindu Religion: देवघरात तुम्हीही देवांसाठी 'लाल' रंगाचे आसन ठेवता? 'या' गोष्टींची काळजी घ्या, धार्मिक महत्त्व, वास्तुशास्त्रातील मान्यता...
देवघरात तुम्हीही देवांसाठी 'लाल' रंगाचे आसन ठेवता? 'या' गोष्टींची काळजी घ्या, धार्मिक महत्त्व, वास्तुशास्त्रातील मान्यता...
Tulsi Vivah 2026: तुळशी विवाह घरच्या घरी कसा करावा? 'या' गोष्टींची काळजी घ्या..'हा' शुभ मुहूर्त चुकवू नका, योग्य पूजा पद्धत, धार्मिक महत्त्व, परंपरा...
तुळशी विवाह घरच्या घरी कसा करावा? 'या' गोष्टींची काळजी घ्या..'हा' शुभ मुहूर्त चुकवू नका, योग्य पूजा पद्धत, धार्मिक महत्त्व, परंपरा...

व्हिडीओ

Dawood house Musafir Khana in bhendi bazar: अंडरवर्ल्ड डॉन दाऊदच्या मुंबईतील घरावर हातोडा पडला तो क्षण, आकाशात ड्रोनच्या घिरट्या, कडेकोट पोलीस बंदोबस्त
Sushama Andhare Andolan Against Shaina NC : सुषमा अंधारेंच्या नेतृत्वात शायना एनसींविरोधात आंदोलन
Shaina NC Balasaheb Thackeray Photo : होता काँग्रेसशी 'सामना', फोटोमुळे वादात शायना Special Report
Maharashtra Jilha bank Politics : घराणेशाहीचं 'सहकार', जिल्हा बँकांमध्ये 'वारसदार' Special Report
Sanjay Raut Delhi : अश्विनी भिडेंच्या पत्राची दखल घेत ३०० प्रकल्पांना तात्काळ स्थगिती द्यावी

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sanjay Raut: द्रौपदीच्या वस्त्रहरणावेळी कौरवांच्या चेहऱ्यावर जे हास्य, तेच विकट हास्य शायन एनसींच्या चेहऱ्यावर; संजय राऊतांचा हल्लाबोल, आंदोलनावरही ठाम!
द्रौपदीच्या वस्त्रहरणावेळी कौरवांच्या चेहऱ्यावर जे हास्य, तेच विकट हास्य शायन एनसींच्या चेहऱ्यावर; संजय राऊतांचा हल्लाबोल, आंदोलनावरही ठाम!
Pune Forest Department Scam : झाडं न लावताच साडेबारा कोटींचा चुराडा? पुण्यात वृक्षलागवड घोटाळ्याचा आरोप; रोपं सुकली, बिलं निघाली! नेमकं काय घडलं?
झाडं न लावताच साडेबारा कोटींचा चुराडा? पुण्यात वृक्षलागवड घोटाळ्याचा आरोप; रोपं सुकली, बिलं निघाली! नेमकं काय घडलं?
Jalgaon Crime News: दोन दिवसांपूर्वी गावी आला; लग्नाला गेला अन्...; मंडपात झालेल्या वादातून सपासप वार करून प्रेमला संपवलं, लग्नाच्या ठिकाणी रक्ताचा सडा, जळगावमधील घटना
दोन दिवसांपूर्वी गावी आला; लग्नाला गेला अन्...; मंडपात झालेल्या वादातून सपासप वार करून प्रेमला संपवलं, लग्नाच्या ठिकाणी रक्ताचा सडा, जळगावमधील घटना
Mumbai Crime Local Train: रेड स्कर्ट, हाय हिल्स घातलेली तरुणी लोकल ट्रेनच्या मोटरमन केबिनला लटकली, शरीर मागे झोकून दिलं अन्... गोरेगाव स्टेशनवर सगळे पाहतच राहिले
रेड स्कर्ट, हाय हिल्स घातलेली तरुणी लोकल ट्रेनच्या मोटरमन केबिनला लटकली, शरीर मागे झोकून दिलं अन्... गोरेगाव स्टेशनवर सगळे पाहतच राहिले
Chhatrapati Sambhajinagar: रात्री 8 वाजून 57 मिनिटांच्या पोलीसांना फोन आला अन्..., तरुणाचा भररस्त्यात धिंगाणा! स्वतःची दुचाकी पेटवली अन् रस्त्यावरच झोपला; छत्रपती संभाजीनगरमध्ये नेमकं काय घडलं?
रात्री 8 वाजून 57 मिनिटांच्या पोलीसांना फोन आला अन्..., तरुणाचा भररस्त्यात धिंगाणा! स्वतःची दुचाकी पेटवली अन् रस्त्यावरच झोपला; छत्रपती संभाजीनगरमध्ये नेमकं काय घडलं?
Pune News : ऊन घेण्यासाठी गच्चीवर जातो असं सांगून गेले, इमारतीच्या आवारात बॉडी सापडली; पुण्यात निवृत्त लेफ्टनंट जनरल अशोक जोशी यांचा मृत्यू, नेमकं काय घडलं?
ऊन घेण्यासाठी गच्चीवर जातो असं सांगून गेले, इमारतीच्या आवारात बॉडी सापडली; पुण्यात निवृत्त लेफ्टनंट जनरल अशोक जोशी यांचा मृत्यू, नेमकं काय घडलं?
IND vs NZ 1st Test Day-1 : बॅट नाहीये... म्हणत शुभमन गिल थेट पंचांशी भिडला; तिसऱ्या पंचांच्या 'त्या' वादग्रस्त निर्णयाने वेलिंग्टनमध्ये हायव्होल्टेज ड्रामा! नेमकं काय घडलं?
बॅट नाहीये... म्हणत शुभमन गिल थेट पंचांशी भिडला; तिसऱ्या पंचांच्या 'त्या' वादग्रस्त निर्णयाने वेलिंग्टनमध्ये हायव्होल्टेज ड्रामा! नेमकं काय घडलं?
Rudransh Thakur Viral Video: हटके स्टाईल अन् स्वॅग भारी! अवघ्या 23 महिन्याच्या 'रुद्रांश'चा सोशल मीडियावर धुमाकूळ, अकरा कोटी चहात्यांना व्हिडिओची भुरळ, तर 90 लाख लोकांनी दिली पसंती
हटके स्टाईल अन् स्वॅग भारी! अवघ्या 23 महिन्याच्या 'रुद्रांश'चा सोशल मीडियावर धुमाकूळ, अकरा कोटी चहात्यांना व्हिडिओची भुरळ, तर 90 लाख लोकांनी दिली पसंती
Embed widget