Shani Asta 2025 : शनीच्या स्थितीतील बदलाचा परिणाम प्रत्येक राशीच्या लोकांच्या जीवनावर नक्कीच होतो. काहींना याचे वाईट परिणाम भोगावे लागतात, तर काहींवर शनीचा आशीर्वाद राहतो. यातच आता फेब्रुवारीच्या शेवटी शनि अस्त होणार आहे. शनि कुंभ राशीत मावळेल आणि पण मीन राशीत शनीचा उदय होईल. अनेक राशीच्या लोकांना शनीच्या अस्तामुळे लाभ होईल, तर अनेक राशींना या काळात सावधगिरी बाळगण्याची गरज आहे. शनि अस्ताचा कोणत्या राशींना जबर फटका बसणार? जाणून घेऊया.


वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार, शनि 28 फेब्रुवारीला संध्याकाळी 7:01 वाजता कुंभ राशीमध्ये अस्त होईल आणि 37 दिवस अस्त स्थितीत राहील. यानंतर 6 एप्रिल 2025 रोजी शनीचा मीन राशीत उदय होईल. शनि अस्त स्थितीतच 29 मार्चला मीन राशीत प्रवेश करेल.


मेष रास (Aries)


शनि अस्त काळात या राशीच्या लोकांनी थोडं सावध राहणं आवश्यक आहे. अनावश्यक खर्चामुळे तुम्हाला त्रास होऊ शकतो. उत्पन्नात घट होईल, त्यामुळे हुशारीने खर्च करा. जर तुम्ही शेअर मार्केट किंवा बिझनेसमध्ये गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर या काळात अजिबात करू नका. यामुळे तुमचं मोठं नुकसान होऊ शकतं. कामात काही ना काही अडथळे येऊ शकतात. यासोबतच नोकरीतही अनेक समस्या निर्माण होऊ शकतात. आरोग्याबाबत सावध राहा, आरोग्याची काळजी घ्या.


सिंह रास (Leo)


या राशीच्या लोकांनी थोडं सावध राहणं आवश्यक आहे. या राशीच्या लोकांची कमाई कमी होऊ शकते. यासोबतच अचानक खर्च वाढल्याने तुम्हाला त्रास होऊ शकतो. अशा परिस्थितीत कर्ज घेण्याची गरज भासू शकते. कौटुंबिक समस्यांमुळे तुम्ही त्रस्त राहू शकता. आयुष्यात काही चांगलं करत असताना काहीतरी वाईट घडू शकतं. म्हणून, कोणतेही पाऊल उचलण्यापूर्वी काळजीपूर्वक विचार करा. यासोबतच वैवाहिक जीवनात काही गैरसमज निर्माण होऊ शकतात. त्यामुळे थोडं सावध राहा, कारण तुमचा अहंकार तुमचं नातं तोडू शकतो.


मकर रास (Capricorn)


मकर राशीच्या लोकांना आर्थिक आणि मानसिक समस्यांना सामोरं जावं लागू शकतं. कुटुंबासोबत काही मुद्द्यावरून वाद होऊ शकतो. कामात काही ना काही अडथळे येऊ शकतात. काही गोष्टींबाबत मानसिक तणाव असू शकतो. आर्थिक नुकसानही होण्याची शक्यता आहे. तुमच्या आरोग्याबाबत थोडं सावध राहा, कारण जुना आजार पुन्हा बळावू शकतो.


(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)


हेही वाचा:


Rahu : राहूला 'या' 2 राशी अत्यंत प्रिय; यांच्या केसालाही बसू देत नाही धक्का, देतो अपार पैसा आणि सुख-समृद्धी