एक्स्प्लोर

Horoscope Today 22 September 2026 : आज मंगळवारच्या दिवशी 7 राशींना धोक्याचे संकेत, 'या' 5 राशींवर बजरंगबलीची कृपा; वाचा आजचे राशीभविष्य

Horoscope Today 22 September 2026 : ग्रहांच्या संक्रमणाचा कोणकोणत्या राशींवर परिणाम होणार आणि 12 राशींसाठी आजचा दिवस नेमका कसा असणार आहे. यासाठी वाचूयात सर्व 12 राशींचं आजचं राशीभविष्य. 

Horoscope Today 22 September 2026 : वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार, आज 22 सप्टेंबर (September 2026) चा दिवस आहे. त्यानुसार आजचा वार मंगळवार आहे. हा दिवस आपण भगवान हनुमानाला (Lord Hanuman) समर्पित करतो. त्यानुसार, भक्त आज बजरंगबलीची पूजा करतात. उपवास धरतात आणि इच्छित फळ मागतात. ग्रहांच्या हालचालीच्या दृष्टीने देखील आजचा दिवस खास असणार आहे. ग्रहांच्या संक्रमणाचा कोणकोणत्या राशींवर परिणाम होणार आणि 12 राशींसाठी आजचा दिवस नेमका कसा असणार आहे. यासाठी वाचूयात सर्व 12 राशींचं आजचं राशीभविष्य (Horoscope Today). 

मेष रास (Aries Horoscope)

मेष राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस सावधानतेचा असणार आहे. आज प्रवासाच्या संदर्भात तुम्हाला काळजी घ्यावी लागेल. तसेच, तुमच्या उत्पन्नात चढ-उतार पाहायला मिळेल. तुमच्या मानसिक स्वास्थ्यात थोडाफार बदल जाणवेल. तुमच्या व्यवसायाची स्थिती मध्यम राहील. तुमच्या आजूबाजूच्या नकारात्मक गोष्टींचा परिणाम तुमच्यावर होऊ शकतो. 

वृषभ रास (Taurus Horoscope)

वृषभ राशीच्या व्यवसायात थोडा चढ-उतार पाहायला मिळेल. कोर्ट-कचेरीच्या संदर्भातील जुने वाद तुमचे लवकरच मिटतील. मुलांकडून तुम्हाला आज आनंदाची बातमी मिळेल. तसेच, लाल वस्तू दान केल्याने तुमच्या मार्गातील अडथळे दूर होण्याची शक्यता आहे. त्यासाठी प्रयत्नशील राहाल. 

मिथुन रास (Gemini Horoscope)

मिथुन राशीसाठीसुद्धा आजचा दिवस फार सामान्य असणार आहे. तुमच्या मान-सन्मानाला आज ठेच लागण्याची दाट शक्यता आहे. प्रवास करताना तुम्हाला काही गोष्टींची विशेष काळजी घ्यावी लागेल. तसेच, धार्मिक कार्यात सहभागी होताना विशेष विधी करावी लागेल. झोप पूर्ण न झाल्यामुळे तुमची चिडचिड होऊ शकते.

कर्क रास (Cancer Horoscope)

कर्क राशीच्या लोकांसाठी दिवसाची सुरुवात फार नकारात्मक होईल. तुमच्या मनाविरुद्ध काम झाल्यामुळे तुम्हाला फार निराश वाटेल. तुमचा व्यवसाय चांगला चालेल. मात्र, त्यात तुम्हाला मनासारखा लाभ मिळणार नाही. आजच्या दिवसात निळ्या वस्तूचं दान करणं तुमच्यासाठी लाभदायी ठरेल. 

सिंह रास (Leo Horoscope)

सिंह राशीच्या लोकांनी आपल्या आरोग्याची काळजी घेणं जास्त गरजेचं आहे. आज काही कारणास्तव तुमचं मन फार नाराज होऊ शकतं. तुमच्या भूतकाळातील आठवणी आज ताज्या होतील. नोकरदार वर्गातील लोकांसाठी आजचा दिवस मध्यम स्वरुपाचा असेल. काही विशेष घडणार नाही.

कन्या रास (Virgo Horoscope)

कन्या राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस फार सतर्कतेचा असणार आहे. तुमचे शत्रू तुमच्या वाईटावर आहेत या गोष्टीची जाणीव तुम्हाला सतत जाणवेल. त्यामुळे तुमच्या कामाशी तुम्ही प्रामाणिक राहा. त्यामध्ये जराही दिरंगाई करु नका. प्रेम जीवन देखील सामान्य राहील.

तूळ रास (Libra Horoscope)

तूळ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस चांगला असणार आहे. आज तुम्हाला तुमच्या आरोग्याची काळजी घेण्याची गरज आहे. तसेच, तुमच्या व्यवसायात तुम्हाला चांगलं यश मिळेल. कामाच्या ठिकाणी नवीन ऑर्डर्स येत असल्यामुळे तुमचं मन प्रसन्न राहील. मेहनतीचं फळ मिळेल. 

वृश्चिक रास (Scorpio Horoscope)

वृश्चिक राशीसाठी देखील आजचा दिवस शुभदायी असणार आहे. आज घरगुती कामांमध्ये तुम्ही व्यस्त राहाल. घरातील वातावरण चांगलं राहील. मात्र, भविष्याविषयी तुम्हाला चिंता वाटू शकते. अशा वेळी नकारात्मक विचार दूर करण्यासाठी चिंतन किंवा योग करा.

धनु रास (Saggitarius Horoscope)

धनु राशीसाठी आजचा दिवस सामान्य असेल. आज तुम्हाला नाक, कान घशाशी संबंधित आरोग्याच्या काही तक्रारी जाणवू शकतात. आज तुम्हाला तुमच्या मुलांकडून एखादी शुभवार्ता मिळू शकते. तसेच, देवी लक्ष्मीच्या कृपेने तुमची आर्थिक स्थिती चांगली असेल. कामाच्या निमित्ताने तुम्हाला प्रवास करावा लागू शकतो. 

मकर रास (Capricorn Horoscope)

मकर राशीच्या लोकांना धनहानीचे संकेत आहेत. त्यामुळे आज कोणताही पैशांचा व्यवहार करु नका. तसेच, गुंतवणुकीसाठी देखील आजचा दिवस योग्य नाही. ग्रहांची स्थिती तुमच्या राशीसाठी अनुकूल नसल्या कारणाने तुम्हाला त्याचे पडसाद भोगावे लागू शकतात. 

कुंभ रास (Aquarius Horoscope)

कुंभ राशीसाठी आजचा दिवस चांगला असेल. मात्र, आज कोणतीही महत्त्वाची कामे हाती घेऊ नका. त्यात तुम्हाला यश मिळणार नाही. तसेच, आरोग्याच्या बाबतीतही तुम्हाला तडजोड करावी लागू शकते. तुमच्या व्यवसायाचा विस्तार वाढेल. मात्र, मनासारखा लाभ मिळणार नाही. हिरव्या वस्तू दान करणं शुभकारक ठरेल.

मीन रास (Pisces Horoscope)

मीन राशीसाठी आजचा दिवस शुभकारक असणार आहे. आज तुमची अनेक दिवसांपासून रखडलेली काही महत्त्वाची कामे पार पडू शकतात. काही नवीन गोष्टी तुम्ही शिकण्याचा प्रयत्न कराल. तसेच, हाती घेतलेल्या कार्यात तुम्हाला यश मिळेल. लवकरच प्रवासाचे योग जुळून येतील. 

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

इतर महत्त्वाच्या बातम्या :

Ganesh Chaturthi 2026: काय सांगता..तब्बल 38 वर्षांपासून बाप्पाच्या मूर्तीचं विसर्जनच नाही? अकोल्यातील गणेश मंडळांची अनोखी परंपरा, कारण जाणून थक्क व्हाल...

Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

December Grah Gochar 2026 : 2026 वर्ष संपता-संपता 'या' 5 राशींवर होणार सुखाची बरसात; 4 मोठ्ठ्या ग्रहांच्या संक्रमणाने पैशांचा पडणार धो-धो पाऊस, ऐशोआरामात जगाल
2026 वर्ष संपता-संपता 'या' 5 राशींवर होणार सुखाची बरसात; 4 मोठ्ठ्या ग्रहांच्या संक्रमणाने पैशांचा पडणार धो-धो पाऊस, ऐशोआरामात जगाल
Rahu Ketu Gochar 2026 : वर्षाच्या शेवटी राहू-केतूचं होणार महासंक्रमण; 5 डिसेंबरपासून 5 राशींच्या जीवनात घडतील 'हे' बदल, वर्षाची सुरुवातच होणार भन्नाट
वर्षाच्या शेवटी राहू-केतूचं होणार महासंक्रमण; 5 डिसेंबरपासून 5 राशींच्या जीवनात घडतील 'हे' बदल, वर्षाची सुरुवातच होणार भन्नाट
Vastu Tips : घरात 'या' 7 ठिकाणी तुळशीचं रोप अजिबात ठेवू नका, घरात येईल कंगाली, वास्तूशास्त्रानुसार 'ही' दिशा योग्य
घरात 'या' 7 ठिकाणी तुळशीचं रोप अजिबात ठेवू नका, घरात येईल कंगाली, वास्तूशास्त्रानुसार 'ही' दिशा योग्य
Hindu Religion: देवघरातील कलशातील नारळात 'हे' बदल कोणते संकेत देतात? कुलदेवतेचा इशारा? धार्मिक मान्यता, परंपरा जाणून थक्क व्हाल...
देवघरातील कलशातील नारळात 'हे' बदल कोणते संकेत देतात? कुलदेवतेचा इशारा? धार्मिक मान्यता, परंपरा जाणून थक्क व्हाल...
Advertisement

व्हिडीओ

Sanjay Raut Delhi : अश्विनी भिडेंच्या पत्राची दखल घेत ३०० प्रकल्पांना तात्काळ स्थगिती द्यावी
Shiv Sena PC : सोनिया गांधींच्या पुस्तकाचा निषेध,शिवसेनेने पुस्तकाचा 'तो' मजकूर फाडला
Shaina NC Balasaheb Thackeray Photo: ओहहह नोनोनो....; शिंदेंच्या शायना एनसींनी चुकून बाळासाहेबांचा फोटो फाडला, पेडणेकर संतापल्या
Amit Shah vs Uddhav Thackeray : 'कोरोना'तले फोन,आरोपांचा टोन Special Report
Rohit Pawar vs Devendra Fadnavis : आरोपांची बरसात,पण घरातूनच मिळेना साथ Special Report
Advertisement

फोटो गॅलरी

Advertisement

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Belonging: A Journey of Love : सोनिया गांधींच्या पुस्तकाची किती झाली कमाई? 2 लाखांहून अधिक प्रती विकल्या, किती कोटींची विकली पुस्तकं?
सोनिया गांधींच्या पुस्तकाची किती झाली कमाई? 2 लाखांहून अधिक प्रती विकल्या, किती कोटींची विकली पुस्तकं?
सांगली जिल्हा बँकेत 22 वर्षानंतर काँग्रेसचा अध्यक्ष, भाजपला 'दे धक्का'; शिंदेंच्या शिवसेनेचे तानाजी पाटील उपाध्यक्ष
सांगली जिल्हा बँकेत 22 वर्षानंतर काँग्रेसचा अध्यक्ष, भाजपला 'दे धक्का'; शिंदेंच्या शिवसेनेचे तानाजी पाटील उपाध्यक्ष
राज्यातील पहिला अंडरवॉटर ड्रोन कोल्हापुरात; पाण्यात उतरुन शोध घेणार, जाणून घ्या काय आहे खास?
राज्यातील पहिला अंडरवॉटर ड्रोन कोल्हापुरात; पाण्यात उतरुन शोध घेणार, जाणून घ्या काय आहे खास?
Silver Rate : चांदीमध्ये गुंतवणूक करणाऱ्यांवर रडण्याची वेळ, 10 महिन्यात चांदी 2.56 लाख रुपयांची घसरण, सोने चांदीचे नवे दर जाणून घ्या
चांदीमध्ये गुंतवणूक करणाऱ्यांवर रडण्याची वेळ, 10 महिन्यात चांदी 2.56 लाख रुपयांची घसरण
Kolhapur News:
"आडनावापेक्षा गाडीच्या नंबरवरून ओळख!"; कोल्हापूरकरांच्या 'नाद खुळा' फॅन्सी नंबरची राज्यभर चर्चा, नंबरसाठी मोजले तब्बल 19 कोटी 84 लाख रुपये
Shaina NC Balasaheb Thackeray Photo: ओहहह नोनोनो....; शिंदेंच्या शायना एनसींनी चुकून बाळासाहेबांचा फोटो फाडला, पेडणेकर संतापल्या
ओहहह नोनोनो....; शिंदेंच्या शायना एनसींनी चुकून बाळासाहेबांचा फोटो फाडला, पेडणेकर संतापल्या
शिवसेना प्रवक्त्यांनी सोनिया गांधींचं पुस्तक फाडलं; काँग्रेस नेत्यांचा संताप, BMC तील ठाकरेंचेही नगरसेवकही चिडले
शिवसेना प्रवक्त्यांनी सोनिया गांधींचं पुस्तक फाडलं; काँग्रेस नेत्यांचा संताप, BMC तील ठाकरेंचेही नगरसेवकही चिडले
Jaykumar Gore on Satara District Bank Chairman Election 2026: शंभुराज देसाईंनी धक्काबुक्कीचा वचपा काढला, अध्यक्षपदाच्या निवडणुकीनंतर जयकुमार गोरेंचा चेहरा पडला, शांतपणे बाहेर चालत आले अन् म्हणाले...
शंभुराज देसाईंनी धक्काबुक्कीचा वचपा काढला, जयकुमार गोरेंचा चेहरा पडला, निवडणुकीनंतर बाहेर चालत आले अन् म्हणाले...
Embed widget