एक्स्प्लोर

Horoscope Today 22 July 2023 : आज 'या' राशींवर असेल शनिदेवाची कृपा; मेष ते मीन राशीचे जाणून घ्या आजचं राशीभविष्य

Horoscope Today 22 July 2023 : आजचा दिवस कोणत्या राशींसाठी शुभ असणार आहे? मेष ते मीन राशीच्या सर्व राशींसाठी दिवस कसा असेल? राशीभविष्य जाणून घ्या.

Horoscope Today 22 July 2023 : आज शनिवार हा एक महत्त्वाचा दिवस आहे. वृषभ राशीच्या लोकांच्या नोकरीत बदल होण्याची शक्यता आहे. तर तूळ राशीच्या बेरोजगारांना चांगला रोजगार मिळण्याची चिन्हे आहेत. आज कुंभ राशीला सावध राहण्याची गरज आहे. मेष ते मीन राशीसाठी आजचा शनिवार कसा राहील? काय सांगतात तुमच्या नशिबाचे भाग्यवान तारे? जाणून घ्या आजचं राशीभविष्य.

मेष 

मेष राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस खूप चांगला आहे. कुटुंबाचे सहकार्य मिळेल. आज तुम्ही कुटुंबातील सदस्यांसोबत वेळ घालवा आणि अनेक दिवसांपासून तुमच्या मनात सुरु असलेले विचार मांडा. यामुळे तुमचं मन मोकळ होईल. जोडीदाराचा पूर्ण पाठिंबा मिळेल. व्यवसायात मोठा फायदा होऊ शकतो. तुमची आर्थिक स्थितीही सुधारेल. जे घरापासून दूर काम करत आहेत, त्यांना त्यांच्या कुटुंबाची आठवण येईल. प्रेम जीवनात तुम्हाला चढ-उतार दिसतील. मित्राच्या हस्तक्षेपामुळे तुमच्या नात्यात दुरावा निर्माण होईल. आरोग्याची काळजी घ्या. बदलत्या हवामानामुळे आरोग्यात चढ-उतार दिसून येतील. आज तुम्हाला दूरच्या नातेवाईकाकडून चांगली बातमी ऐकायला मिळेल. आजूबाजूला होणाऱ्या भजन आणि कीर्तनात सहभागी व्हा. 

वृषभ 

वृषभ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस खूप चांगला आहे. विद्यार्थ्यांसाठी आजचा दिवस यशाचा आहे. नोकरीत पदोन्नतीकडे वाटचाल कराल. कुटुंबातील सर्व सदस्य एकत्र काही धार्मिक कार्यक्रमात सहभागी होतील, जिथे तुम्ही काही वेळ एकत्र घालवा, ज्यामुळे तुमच्या मनाला शांती मिळेल. आज कामाच्या ठिकाणी कामाचा ताण जास्त असेल, परंतु तुम्ही तुमची सर्व कामे वेळेवर पूर्ण करू शकाल. तुमच्या वरिष्ठांनी केलेल्या कामाचे कौतुक होईल. वरिष्ठांशी बोलताना बोलण्यात गोडवा ठेवा. तसेच आज तुमच्यावर कुटुंबातील काही जबाबदाऱ्या सोपवल्या जातील, ज्या तुम्ही निश्चितपणे पार पाडाल. तुम्ही तुमच्या व्यस्त दिवसातून थोडा वेळ स्वतःसाठी काढा, ज्यामध्ये तुम्ही तुमची आवडती कामे करा. आज जरा तब्येतीची काळजी घ्या आणि खाण्यापिण्यापासून दूर राहा. पोटाशी संबंधित कोणतीही समस्या तुम्हाला त्रास देऊ शकते. 

मिथुन

मिथुन राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस संमिश्र आहे. नोकरदार लोकांना नोकरीत प्रगतीची संधी मिळेल. आज तुम्हाला तुमच्या नोकरीतील बदलाशी संबंधित कोणताही निर्णय काळजीपूर्वक घ्यावा लागेल. बेरोजगारांना चांगला रोजगार मिळण्याचे संकेत आहेत. व्यवसाय करणारे लोक देखील नवीन व्यवसायाकडे जाऊ शकतात. छोट्या व्यावसायिकांनाही भरीव लाभ मिळेल. वैवाहिक जीवनात आनंद कायम राहील. तुमच्या जोडीदारासाठी तुम्ही नवीन काम सुरू करू शकता. कुटुंबातील सदस्यांमध्ये गैरसमज निर्माण करू शकतो. आज व्यवसायात डीलच्या नवीन ऑफर मिळू शकतात. जर तुम्ही कोणाकडून पैसे घेतले असतील तर तेही तुम्ही वेळेवर परत करा. आधी केलेल्या गुंतवणुकीचा पूर्ण लाभ आज तुम्हाला मिळेल. उच्च शिक्षणासाठी काळ चांगला आहे. 

कर्क 

कर्क राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस खूप चांगला आहे. तुम्ही तुमच्या दैनंदिन दिनचर्येत काही बदल करणं गरजेचं आहे, ज्यामुळे तुम्हाला खूप उत्साही वाटेल. तुमची संपत्तीही वाढेल. वडिलोपार्जित संपत्तीतूनही आर्थिक लाभ मिळण्याची शक्यता आहे. नवीन वाहनही खरेदी करण्याचा योग आहे. खाण्यापिण्याच्या निष्काळजीपणा करू नका. विरोधकांपासून सावध राहा. तुमची सर्व कामे आजचा करा ती उद्यावर ढकलू नका. आज तुम्हाला मुलांचे पूर्ण सहकार्य मिळेल. तुमच्या जोडीदाराकडून तुमच्यावर काही काम सोपवले जाईल, जे तुम्हाला नक्कीच पूर्ण करावे लागेल. घरातून बाहेर पडताना ज्येष्ठांच्या चरणस्पर्श करून त्यांचे आशीर्वाद घ्या, तुमची सर्व कामे पूर्ण होतील.नोकरदार लोकांना नवीन नोकरीची ऑफर देखील मिळेल, ज्यामध्ये उत्पन्न अधिक असेल. राजकारणात यश मिळेल, नेत्यांना भेटण्याची संधी मिळेल. 

सिंह 

सिंह राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस चांगला आहे. तुम्ही खूप दिवसांपासून घर, प्लॉट खरेदी करण्याचा विचार करत असाल तर त्यात तुम्हाला त्यात यश मिळेल. आत्मविश्वासाने परिपूर्ण व्हा आणि अतिउत्साह टाळा. मित्राच्या मदतीने नोकरीच्या संधी मिळू शकतात. नोकरदार लोकांना अधिका-यांकडून काही संधी मिळतील, त्यामुळे तुमच्या नोकरीत प्रगती होईल. उत्पन्नात वाढ होईल. कुटुंबात मांगलिक कार्यक्रम आयोजित केले जातील, ज्यामध्ये सर्व नातेवाईकांचे येणे-जाणे सुरू होईल. 

कन्या
 
कन्या राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस शुभ आहे. आज घरातील सदस्यांबरोबर पैसे कसे वाचवायचे हे शिकून घ्या जेणेकरून भविष्यात तुम्हाला फायदा होईल. आज कुटुंबातील एखाद्या सदस्याबरोबर एखाद्या गोष्टीवरून वादाची परिस्थिती उद्भवू शकते, ज्यामध्ये तुम्हाला तुमच्या बोलण्यात गोडवा ठेवावा लागेल आणि जास्त राग टाळावा लागेल. आज तुम्हाला तुमच्या मुलांमुळे आर्थिक लाभ मिळण्याची शक्यता आहे. मित्रांचे सहकार्य मिळेल. मित्रांच्या माध्यमातून उत्पन्नाच्या संधी उपलब्ध होतील. शैक्षणिक क्षेत्रात यश मिळेल. जोडीदाराचा पूर्ण पाठिंबा मिळेल.

तूळ

तूळ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस चांगला आहे. व्यवसाय करणारे लोक व्यवसायातील रखडलेल्या योजना पुन्हा सुरू करू शकतील, ज्यामध्ये तुमचे मित्र तुम्हाला मदत करतील. मित्रांद्वारे तुम्ही नवीन लोकांच्या संपर्कात याल ज्यातून तुम्हाला नफा होईल आणि तुमची आर्थिक स्थिती मजबूत होईल. कुणाच्या तरी मदतीने तुमचे रखडलेले पैसेही मिळतील. शैक्षणिक क्षेत्रात यश मिळेल. तुम्ही तुमच्या जोडीदाराबरोबर प्रेमळ क्षण घालवाल. कुटुंबातील सदस्यांबरोबर बसून आयुष्यातील अनेक महत्त्वाच्या विषयांवर चर्चा करा. ज्यामुळे तुमचे मन प्रसन्न राहील. मनःशांतीसाठी धार्मिक कार्यक्रमात थोडा वेळ घालवा. 

वृश्चिक 

वृश्चिक राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस तुमच्या इतर दिवसांपेक्षा खूप चांगला आहे. विद्यार्थी ज्या परीक्षेसाठी तयार करत होते त्यामध्ये त्यांना यश मिळेल. उच्च शिक्षणासाठी काळ चांगला आहे. आज मुलाच्या आरोग्याबाबत तुम्हाला थोडी चिंता जाणवू शकते. आत्मविश्वासाने परिपूर्ण असा तुमचा दिवस असेल. तुमचं वैवाहिक जीवन तुम्ही अधिक सुखकर करण्याचा प्रयत्न कराल. कुटुंबाचे सहकार्य मिळेल. कुटुंबातील सदस्यांसह एखाद्या धार्मिक स्थळी जाण्याची योजना करा, जिथे सर्वजण खूप आनंदी दिसतील. जे घरापासून दूर शिकत आहेत, त्यांना कुटुंबाची आठवण येऊ शकते. आपल्या व्यस्त दिवसातून थोडा वेळ स्वतःसाठी काढा. ज्यामध्ये तुमच्या आवडीच्या गोष्टी करा. 

धनु

धनु राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस आनंददायी आहे. नोकरीत यश मिळेल, ज्यामुळे तुमची आर्थिक स्थिती मजबूत होईल. रखडलेला पैसा तुम्हाला परत मिळण्याची चिन्हे आहेत. कौटुंबिक समस्या त्रासदायक असू शकतात. तुमच्या वैवाहिक जीवनात दुसऱ्या व्यक्तीच्या बोलण्यामुळे तणावाची परिस्थिती निर्माण होऊ शकते. बेरोजगारांना रोजगार मिळण्याचे संकेत आहेत. आज तुम्हाला तुमचा जुना मित्र देखील भेटू शकतो. ज्याच्यासोबत तुमच्या बालपणीच्या आठवणी ताज्या होतील. तुम्ही तुमचे सुख-दु:ख तुमच्या मित्रांसोबत शेअर करू शकता. विद्यार्थी स्पर्धेच्या तयारीसाठी मेहनत घेतील. उच्च शिक्षणासाठी काळ चांगला आहे.

मकर

मकर राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस खूप चांगला आहे. व्यवसाय करणाऱ्या लोकांसाठी आजचा दिवस अतिशय शुभ आहे. नोकरी करणाऱ्या लोकांना त्यांच्या कामात यश मिळेल. रिअल इस्टेट व्यवसायात लाभ होण्याची शक्यता आहे. जे घरबसल्या ऑनलाइन काम करतात, त्यांना चांगला फायदा होईल. प्रॉपर्टी डीलिंगचे काम करणार्‍यांना चांगली डील मिळू शकते ज्यातून त्यांना फायदा होईल. व्यवसाय करणारे लोक व्यवसायाला पुढे नेण्यात यशस्वी होतील. नवीन वाहनाचा आनंद मिळेल. स्वतःसाठी थोडी खरेदी करा. जोडीदाराकडून काही चांगली बातमी ऐकायला मिळेल. 

कुंभ

कुंभ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस खूप चांगला जाणार आहे. नोकरीत यश मिळण्याची शक्यता आहे. तुम्ही नोकरीशी संबंधित कामे मोठ्या समर्पणाने आणि मेहनतीने करताना दिसाल. वरिष्ठ तुम्ही केलेल्या कामाचे कौतुक करतील. नवीन वाहनाचा आनंदही मिळेल. जोडीदाराचा पूर्ण पाठिंबा मिळेल. तुम्ही तुमच्या कामावर लक्ष केंद्रित केले तर यश आणि प्रतिष्ठा तुमचीच असेल. तुमचा आत्मविश्वास अधिक वाढेल. कामाच्या ठिकाणी काही अडचणींचा सामना करावा लागू शकतो. खर्च वाढतील पण आर्थिक स्थिती मजबूत राहील. ऑनलाईन काम करणाऱ्यांना चांगला फायदा होईल. शैक्षणिक क्षेत्रात यश मिळेल. वडिलोपार्जित संपत्तीतून आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. 

मीन

मीन राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस आनंददायी आहे. शैक्षणिक क्षेत्रात यश मिळेल. तुम्ही काही नवीन काम करण्याची योजना करत असाल तर त्यात तुम्हाला यश येईल ज्यामध्ये तुमचे मित्र तुम्हाला मदत करतील. तुमची रखडलेली कामे आज पूर्ण होऊ शकतात. जर कोणी तुमचे पैसे घेतले असतील तर तेही तुम्हाला आज परत मिळण्याची शक्यता आहे. आज घरात शुभवार्ता ऐकायला मिळू शकते. वडिलोपार्जित संपत्तीतून आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. घर, प्लॉट खरेदी करण्याची इच्छा असेल तर हा योग चांगला आहे.

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

महत्त्वाच्या बातम्या :

Horoscope Today 21 July 2023 : आजचा दिवस 'या' राशीच्या लोकांसाठी ठरणार भाग्याचा; जाणून घ्या सर्व 12 राशींचं आजचं राशीभविष्य

महत्त्वाच्या बातम्या

Gemini August Monthly Horoscope 2026 : मिथुन राशीसाठी ऑगस्टचा महिना सावधानतेचा, नोकरीत अडचणी, आर्थिक नुकसान? वाचा मासिक राशीभविष्य
मिथुन राशीसाठी ऑगस्टचा महिना सावधानतेचा, नोकरीत अडचणी, आर्थिक नुकसान? वाचा मासिक राशीभविष्य
Hindu Religion: देवघरातील देवांची मूर्ती 'या' दिवशी चुकूनही हलवू नये? देवांची स्वच्छता कोणत्या दिवशी करावी? मूर्ती कशा स्वच्छ कराव्यात? धार्मिक परंपरा...
देवघरातील देवांची मूर्ती 'या' दिवशी चुकूनही हलवू नये? देवांची स्वच्छता कोणत्या दिवशी करावी? मूर्ती कशा स्वच्छ कराव्यात? धार्मिक परंपरा...
Taurus August Monthly Horoscope 2026 : वृषभ राशीसाठी ऑगस्टचे पुढचे 15 दिवस सुखाचे, महिन्याच्या शेवटी बसणार आर्थिक फटका, मासिक राशीभविष्य
वृषभ राशीसाठी ऑगस्टचे पुढचे 15 दिवस सुखाचे, महिन्याच्या शेवटी बसणार आर्थिक फटका, मासिक राशीभविष्य
तुलसीदासांना अभिप्रेत असलेले 'श्रीराम'!
तुलसीदासांना अभिप्रेत असलेले 'श्रीराम'!

व्हिडीओ

Girish Mahajan Audio Clip Eknath Khadse Raksha Khadse : क्लिप गावभर, आपत्ती चव्हाट्यावर | ABP Majha Special Report
Ramdev Baba on Gen Z : जेन झींचं आंदोलन, रामदेव बाबांचं 'टीकासन' | ABP Majha Special Report
Mumbai High Court on FDA : अन्न-औषध प्रशासनाच्या कारवाई पद्धतीवरच हायकोर्टाकडून सवाल
Rahul Gandhi Vs Amit Shah : विधेयकाची नौका पार, 'पॅलेट'वरुन 'गोळीबार' | Special Report ABP Majha
Pune University Scam | बाजार डीग्रीचा, शिक्षणाचा बट्ट्याबोळ | Special Report ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
'आता माझा रोल बदललाय..' स्वस्ता समोस्यासाठी संसदेत आवाज उठवणारे राघव चड्ढा पहिल्यांदाच देशव्यापी विद्यार्थी आक्रोशावर बोलले; मोदींचे कौतुक करत काय काय म्हणाले?
'आता माझा रोल बदललाय..' स्वस्ता समोस्यासाठी संसदेत आवाज उठवणारे राघव चड्ढा पहिल्यांदाच देशव्यापी विद्यार्थी आक्रोशावर बोलले; मोदींचे कौतुक करत काय काय म्हणाले?
Public Examinations (Prevention of Unfair Means) Act: राज्यसभेतही पेपरफुटी विधेयक मंजूर, विरोधकांचा सभात्याग; राष्ट्रपतींच्या मुंजरीनंतर कायद्यात रुपांतर होणार
राज्यसभेतही पेपरफुटी विधेयक मंजूर, विरोधकांचा सभात्याग; राष्ट्रपतींच्या मुंजरीनंतर कायद्यात रुपांतर होणार
मग तुमच्या टोळीच्या बॉसने चार वर्षांपूर्वी दोन वर्षांत रस्ते खड्डे मुक्त होतील सांगितलं होतं, त्याचं काय झालं? मुंबईमधील कारभाऱ्यांच्या ‘इनोव्हा क्रिस्टा’ नादावर आदित्य ठाकरेंचा खोचक सवाल
मग तुमच्या टोळीच्या बॉसने चार वर्षांपूर्वी दोन वर्षांत रस्ते खड्डे मुक्त होतील सांगितलं होतं, त्याचं काय झालं? मुंबईमधील कारभाऱ्यांच्या ‘इनोव्हा क्रिस्टा’ नादावर आदित्य ठाकरेंचा खोचक सवाल
भाजपला तो शब्द खटकला; खासदार अनुराग ठाकूरांकडून राहुल गांधींविरुद्ध हक्कभंग, संसदीय भाषेचा दिला दाखला
भाजपला तो शब्द खटकला; खासदार अनुराग ठाकूरांकडून राहुल गांधींविरुद्ध हक्कभंग, संसदीय भाषेचा दिला दाखला
Virat Kohli on Ajinkya Rahane: 'तू माझा सर्वात आवडता कसोटी फलंदाजीचा साथीदार..' निवृत्तीची घोषणा करताच अजिंक्य रहाणेसाठी विराट कोहलीची अत्यंत भावूक पोस्ट
'तू माझा सर्वात आवडता कसोटी फलंदाजीचा साथीदार..' निवृत्तीची घोषणा करताच अजिंक्य रहाणेसाठी विराट कोहलीची अत्यंत भावूक पोस्ट
वन अधिकाऱ्याने वाहत्या पाण्यात कार घातली, जीव धोक्यात; गाडी गेली वाहून, सुदैवाने अझरुद्दीन बचावले
वन अधिकाऱ्याने वाहत्या पाण्यात कार घातली, जीव धोक्यात; गाडी गेली वाहून, सुदैवाने अझरुद्दीन बचावले
सैराट फेम अभिनेता अरबाज शेखच्या वडिलांचं निधन, महिन्याभरापासून सोलापुरातील खासगी रुग्णालयात सुरु होते उपचार 
सैराट फेम अभिनेता अरबाज शेखच्या वडिलांचं निधन, महिन्याभरापासून सोलापुरातील खासगी रुग्णालयात सुरु होते उपचार 
मुंबईत VIP रेल्वे तिकीट घोटाळा उघड, चक्क राज्यपालांच्या नावाने बनावट शिक्के, सह्या; आंतरराज्यीय टोळी जेरबंद
मुंबईत VIP रेल्वे तिकीट घोटाळा उघड, चक्क राज्यपालांच्या नावाने बनावट शिक्के, सह्या; आंतरराज्यीय टोळी जेरबंद
Embed widget