एक्स्प्लोर

Horoscope Today 21 April 2026 : आज मंगळवारच्या दिवशी 7 राशींवर असणार गणरायाची कृपा, समोर आलेलं विघ्न टळणार; वाचा आजचे राशीभविष्य

Horoscope Today 21 April 2026 : ग्रहांच्या संक्रमणाचा कोणकोणत्या राशींवर परिणाम होणार आणि 12 राशींसाठी आजचा दिवस नेमका कसा असणार आहे. यासाठी वाचूयात सर्व 12 राशींचं आजचं राशीभविष्य. 

Horoscope Today 21 April 2026 : वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार, आज 21 एप्रिल 2026 चा दिवस आहे. त्यानुसार आजचा वार मंगळवार आहे. हा दिवस भगवान हनुमानाला समर्पित आहे. आजच्या दिवशी भक्त हनुमान मंदिरात जाऊन पूजा करतात. तसेच, उपवास धरतात. आयुष्यात येणाऱ्या संकटांचा सामना करण्यासाठी बळ मिळावं तसेच, भविष्य चांगलं जाण्यासाठी लोक प्रार्थना करतात. ग्रहांच्या हालचालीच्या दृष्टीने देखील आजचा दिवस खास असणार आहे. कारण लवकरच गुरु ग्रहाचं संक्रमण होणार आहे. त्यामुळे ग्रहांच्या संक्रमणाचा कोणकोणत्या राशींवर परिणाम होणार आणि 12 राशींसाठी आजचा दिवस नेमका कसा असणार आहे. यासाठी वाचूयात सर्व 12 राशींचं आजचं राशीभविष्य (Horoscope Today)

मेष रास (Aries Horoscope)

मेष राशीसाठी आजचा दिवस सकारात्मक असणार आहे. दिवसाची सुरुवात तुमची चांगली होईल. तसेच, तुमच्या विचारात स्थिरता राहील. आरोग्याच्या बाबतीत हलगर्जीपणा करु नका. तसेच, तुमच्या व्यवहारात आज तुम्हाला अपेक्षेपेक्षा जास्त लाभ मिळेल.

वृषभ रास (Taurus Horoscope)

वृषभ राशीसाठी आजचा दिवस पराक्रमाचा असणार आहे. तुमच्या नोकरीत चांगली प्रगती दिसून येईल. तसेच, तुमचा व्यवहार सुरळीत चालेल. आजच्या दिवसात तुम्ही अनेक महत्त्वाचे निर्णय घ्याल. तुमच्या निर्णयाने बॉस खुश होऊ शकतो. 

मिथुन रास (Gemini Horoscope)

मिथुन राशीसाठी आजचा दिवस बरकतीचा असणार आहे. आज तुम्हाला अचानक धनलाभ होऊ शकतो. संध्याकाळच्या वेळी मित्रांना भेटाल. त्यांच्याबरोबर छान वेळ घालवाल. तसेच तुमच्या व्यवसायाचा विस्तार वाढलेला दिसेल. 

कर्क रास (Cancer Horoscope)

कर्क राशीसाठी आजचा दिवस काहीसा आव्हानात्मक असणार आहे. आज तुमच्या मनासारखी एकही गोष्ट न झाल्यामुळे तुमचा क्रोध वाढेल. अशावेळी रागावर नियंत्रण ठेवा आणि निगेटीव्ह माणसांच्या संपर्कात राहू नका. 

सिंह रास (Leo Horoscope)

सिंह राशीसाठी आजचा दिवस सामान्य असणार आहे. आज तुम्हाला ना फायदा ना तोटा होणार आहे. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यासाठी आजचा दिवस फार चांगला आहे. संध्याकाळचा वेळ धार्मिक कार्यात घालवाल. 

कन्या रास (Virgo Horoscope)

कन्या राशीसाठी आजचा दिवस लाभदायी असणार आहे. आज तुम्हाला कामाच्या निमित्ताने प्रवास करावा लागू शकतो. तसेच, तुम्हाला जुन्या गुंतवणुकीतून चांगला लाभ मिळेल. घरात लवकरच शुभवार्ता मिळण्याची शक्यता आहे.

तूळ रास (Libra Horoscope)

तूळ राशीसाठी आजचा दिवस शुभकारक असणार आहे. आज तुमची अनेक दिवसांपासून रखडलेली कामे तुम्ही वेळेत पूर्ण करु शकता. तसेच, कामाच्या निमित्ताने तुम्हाला प्रवास करावा लागू शकतो. मुलांच्या आरोग्याची काळजी घ्या. 

वृश्चिक रास (Scorpio Horoscope)

वृश्चिक राशीसाठी दिवसाची सुरुवात चांगली असेल. दिवसाचा शेवट मात्र निराशाजनक असू शकतो. अशा वेळी आज कोणतीही मोठी रिस्क घेऊ नका. मात्र, तुम्ही केलेल्या मेहनतीचं फळ तुम्हाला नक्की मिळेल.

धनु रास (Saggitarius Horoscope)

धनु राशीसाठी आजचा दिवस खास असणार आहे. आज तुमची मोठ्या संकटातून सुटका होऊ शकते. महादेवाच्या कृपेने तुमच्या आर्थिक स्थिती चांगली भरभराट होईल. व्यवसायाचा विस्तार वाढेल.

मकर रास (Capricorn Horoscope)

मकर राशीच्या लोकांना जोडीदाराची चांगली साथ मिळेल.आज काही कारणास्त तुमच्या खर्चात वाढ होऊ शकते. अशा वेळी खर्च कमी करण्याचा प्रयत्न करा. तसेच, तुम्ही घेतलेल्या निर्णयाचं समाजत कौतुक होऊ शकतं. 

कुंभ रास (Aquarius Horoscope)

कुंभ राशीसाठी आजचा दिवस काहीसा आव्हानात्मक असणार आहे. आज तुम्हाला शत्रूवर विजय मिळवता येणार नाही. तसेच, मुलांच्या आरोग्याबाबत तुम्हाला सावधानता बाळगणं गरजेचं आहे. 

मीन रास (Pisces Horoscope)

मीन राशीसाठी आजचा दिवस खास असणार आहे. दिवसाची सुरुवातच तुम्ची फार सकारात्मक होणार आहे. त्यामुळे तुम्हाला फार प्रसन्न वाटेल. मुलांच्या बाबतीत तुम्हाला आज एखादी शुभवार्ता ऐकायला मिळू शकते.

हे ही वाचा :

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

Lucky Zodiac Signs: 21 एप्रिलचा दिवस 'या' 5 राशींसाठी भाग्यशाली! बाप्पाच्या कृपेने आलेलं संकट माघारी फिरणार, श्रीमंतीचे मोठे योग, कोणत्या राशी लकी?

Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Horoscope Today 10 July 2026 : आज शुक्रवारच्या दिवशी 8 राशींवर असणार देवी लक्ष्मीची कृपा; घरात लक्ष्मीच्या पावलांनी येणार पैसा, वाचा आजचे राशीभविष्य
आज शुक्रवारच्या दिवशी 8 राशींवर असणार देवी लक्ष्मीची कृपा; घरात लक्ष्मीच्या पावलांनी येणार पैसा, वाचा आजचे राशीभविष्य
Shravan 2026: सज्ज व्हा, श्रावण सुरू व्हायला फक्त 1 महिना शिल्लक! पहिलाच श्रावणी सोमवार - नागपंचमीचा पॉवरफुल योगायोग! तिथी, सण, भाग्यशाली राशी..
सज्ज व्हा, श्रावण सुरू व्हायला फक्त 1 महिना शिल्लक! पहिलाच श्रावणी सोमवार - नागपंचमीचा पॉवरफुल योगायोग! तिथी, सण, भाग्यशाली राशी..
Weekly Horoscope: मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या राशींपैकी 4 राशींची पाचही बोटं तुपात! जुलैचा नवा आठवडा नशीब पालटणार, पैसा, नोकरी..साप्ताहिक राशीभविष्य
मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या राशींपैकी 4 राशींची पाचही बोटं तुपात! जुलैचा नवा आठवडा नशीब पालटणार, पैसा, नोकरी..साप्ताहिक राशीभविष्य
Horoscope Today 10 July 2026: आजचा शुक्रवार 6 राशींचं नशीब पालटणारा! मागोमाग शुभ योग जुळले, देवी लक्ष्मी कृपेने कोण भाग्यशाली? आजचे राशीभविष्य...
आजचा शुक्रवार 6 राशींचं नशीब पालटणारा! मागोमाग शुभ योग जुळले, देवी लक्ष्मी कृपेने कोण भाग्यशाली? आजचे राशीभविष्य...
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

SIR Form Maharashtra : SIR चा फॉर्म कसा भरायचा? संपूर्ण माहिती
ABP Majha Headlines Today 7 AM : 10 July 2026: एबीपी माझा हेडलाईन्स : Marathi News Maharashtra
Raj Thackeray Vs Fadnavis Special Report : ठाकरेंची टीका, फडणवीस ते गडकरी, रायकीय फैरीRaj
Bajrang Sonawane Vs Prithviraj Chavan : राष्ट्रवादीत अस्वस्थता? पृथ्वीराज चव्हाणांचा दावा
Raj Thackeray On CM : बघून घेऊ म्हणतात, अरे मुख्यमंत्री आहे ना तू... आणि हिंदीमधून का बोलता?
Advertisement

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sharad Pawar NCP : शरद पवारांचे पाच ते सहा खासदार अस्वस्थ, पृथ्वीराज चव्हाण यांचं वक्तव्य ; खासदार बजरंग सोनवणे दावा फेटाळत म्हणाले...
शरद पवारांचे पाच ते सहा खासदार अस्वस्थ, पृथ्वीराज चव्हाण यांचा दावा, बजरंग सोनवणे म्हणाले आठ खासदार....
Maharashtra Live blog updates: डोंबिवलीतील शास्त्रीनगर रुग्णालयात नगरसेवकाकडून झालेल्या मारहाणीनंतर दोन्ही डॉक्टरांकडून राजीनामे
Maharashtra Live blog updates: डोंबिवलीतील शास्त्रीनगर रुग्णालयात नगरसेवकाकडून झालेल्या मारहाणीनंतर दोन्ही डॉक्टरांकडून राजीनामे
Aaditya Thackeray : मुंबईकरांचे प्रश्न महापालिकेत प्रखरपणे मांडा, आदित्य ठाकरेंच्या नगरसेवकांना सूचना, मातोश्रीवरील बैठकीत रणनीती ठरली
मुंबईकरांचे प्रश्न महापालिकेत प्रखरपणे मांडा, आदित्य ठाकरेंच्या नगरसेवकांना महत्वाच्या सूचना
NIFTY : निफ्टीतील 2 दिवसांच्या घसरणीला ब्रेक, अमेरिका- इराण संघर्ष वाढूनही निर्देशांकात तेजी
निफ्टीतील 2 दिवसांच्या घसरणीला ब्रेक, अमेरिका- इराण संघर्ष वाढूनही निर्देशांकात तेजी
Ramesh Mhatre Dombivli: रमेश म्हात्रेंसारख्या प्रवृत्तीसोबत सभागृहात बसायला भीती वाटते, केडीएमसीतील नगरसेविकेची म्हात्रेंच्या निलंबनाची मागणी
रमेश म्हात्रेंसारख्या प्रवृत्तीसोबत सभागृहात बसायला भीती वाटते, केडीएमसीतील नगरसेविकेची म्हात्रेंच्या निलंबनाची मागणी
बीडमधील ज्ञानराधा मल्टीस्टेटच्या ठेवीदारांचे पैसे त्वरित द्या, मुख्यमंत्र्यांचे निर्देश; ठेवीदारांचे हित जपण्यासाठी कायद्यात सुधारणा
बीडमधील ज्ञानराधा मल्टीस्टेटच्या ठेवीदारांचे पैसे त्वरित द्या, मुख्यमंत्र्यांचे निर्देश; ठेवीदारांचे हित जपण्यासाठी कायद्यात सुधारणा
डेक्कन क्वीन, इंटरसिटीसह अनेक एक्स्प्रेस गाड्या 17 जुलैपर्यंत रद्द; मुंबई-पुण्याच्या प्रवाशांना रेल्वेकडून महत्त्वाचं आवाहन
डेक्कन क्वीन, इंटरसिटीसह अनेक एक्स्प्रेस गाड्या 17 जुलैपर्यंत रद्द; मुंबई-पुण्याच्या प्रवाशांना रेल्वेकडून महत्त्वाचं आवाहन
Abhijeet Dipke: गुडघे टेकले, पोलीस अधिकाऱ्याचे पाय धरले; अभिजीत दीपकेंचा दिल्लीतला आंदोलनस्थळाचा व्हिडिओ व्हायरल
गुडघे टेकले, पोलीस अधिकाऱ्याचे पाय धरले; अभिजीत दीपकेंचा दिल्लीतला आंदोलनस्थळाचा व्हिडिओ व्हायरल
Embed widget