Horoscope Today 20 February 2025: पंचांगानुसार, आज 20 फेब्रुवारी 2025, आज गुरूवारचा दिवस आहे. आजचा दिवस सर्व राशींसाठी खास आणि लाभदायक ठरणार आहे. या दिवशी ग्रहांच्या हालचाली पाहता आजचा दिवस फार महत्त्वाचा आहे, ज्याचा परिणाम सर्व 12 राशींच्या लोकांवर दिसून येईल. तुमचा आजचा दिवस कसा असेल? कोणासाठी दिवस फलदायी ठरेल? 12 राशींचे आजचे राशीभविष्य (Horoscope Today) जाणून घ्या.
मेष रास (Aries Horoscope Today)
मेष राशीच्या लोकांसाठी आज थोडा तापट स्वभाव सगळ्यावर पाणी पडू शकतो, वैवाहिक जीवनात सामंजस्याचे धोरण ठेवावे लागेल
वृषभ रास (Taurus Horoscope Today)
वृषभ राशीच्या लोकांनी प्रकृती सांभाळावी, ज्यांना मधुमेह सांधेदुखीचा त्रास आहे त्यांनी पथ्य पाणी पाळावे.
मिथुन रास (Gemini Horoscope Today)
मेष राशीच्या महिलांनी लहरी स्वभावाला आळा घालावा, मनाविरुद्ध गोष्टी करणे आवडणार नाही
कर्क रास (Cancer Horoscope Today)
कर्क राशीच्या लोकांनी घरामध्ये जास्तीत जास्त वेळ द्यावा लागेल, नाहीतर तणावाचे वातावरण निर्माण होईल
सिंह रास (Leo Horoscope Today)
सिंह राशीच्या जोडीदाराची मते विचारात घेतली नाही, तर संघर्षमय परिस्थिती निर्माण होऊ शकते
कन्या रास (Virgo Horoscope Today)
कन्या राशीच्या लोकांनी भावना पेक्षा कर्तव्याला जास्त महत्त्व द्यावे लागेल, यावरून जोडीदाराशी वाद होतील
तूळ रास (Libra Horoscope Today)
तूळ राशीच्या लोकांनी परिस्थितीचा साधक बाधक विचार करून निर्णय घ्यावा महिलांनी चिकाटी ठेवणे आवश्यक
वृश्चिक रास (Scorpio Horoscope Today)
मानसिक तणावाला सामोरे जावे लागल्यामुळे प्राणायाम आणि ओंकार करणे आवश्यक आहे
धनु रास (Sagittarius Horoscope Today)
पोकळ डामडौल अथवा अभिरुची कडे न वळणे चांगले ठरेल, महिलांनी चिकाटी ठेवणे आवश्यक आहे.
मकर रास (Capricorn Horoscope Today)
आज अति भावनेच्या आहारी गेल्यामुळे त्याचे तोटे सहन करावे लागतील
कुंभ रास (Aquarius Horoscope Today)
तुमच्या समोर शत्रूंचे काही चालणार नाही प्रत्येक विरोधावर मात करण्याची ताकद येईल
मीन रास (Pisces Horoscope Today)
समाजात तुम्हाला मान मिळेल, परंतु त्यासाठी करावी लागणारे कष्ट विचारात न घेतलेलेच बरे
डॉ. शिल्पा अग्निहोत्री (ज्योतिषाचार्य)
संपर्क - 9823322117
हेही वाचा>>>
Shani Dev: मार्चपासून शनिदेवांचा हिशोब होणार! 'या' राशीच्या लोकांनी सावधान, साडेसाती सुरू होणार, ज्योतिषशास्त्रात म्हटलंय..
(टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही. )
ब्रेकिंग तसेच ताज्या बातम्यांसाठी पाहा...