India vs Bangladesh Playing-11 ICC Champions Trophy 2025 : भारतीय क्रिकेट संघ गुरुवारी बांगलादेशविरुद्धच्या सामन्याने चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 मध्ये आपल्या मोहिमेची सुरुवात करेल. हा सामना गुरुवारी (20 फेब्रुवारी) दुबईमध्ये होणार आहे. या स्पर्धेत भारताला जेतेपदाच्या प्रबळ दावेदारांपैकी एक मानले जात आहे. चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी टीम इंडियाच्या संघात 5 फिरकीपटूंची निवड करण्यात आली आहे. निवडकर्त्यांच्या या निर्णयावर बरीच टीका झाली. पण कर्णधार रोहित शर्माने पुष्टी केली की भारतीय संघाच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये 3 नाही तर 2 फिरकीपटू आहे.

2 फिरकीपटू, तर 3 अष्टपैलू खेळाडू - रोहित शर्मा 

पत्रकार परिषदेत रोहितला विचारण्यात आले की, संघातील पाच फिरकीपटूंबद्दल तुमचे काय मत आहे? यावर रोहित शर्मा म्हणाला, आमच्या संघात 2 फिरकीपटू, तर तीन अष्टपैलू खेळाडू आहेत. मला ते पाच फिरकीपटू वाटत नाहीत. रवींद्र जडेजा, अक्षर पटेल आणि वॉशिंग्टन सुंदर हे खेळाडू आम्हाला फलंदाजीत जास्त खोली देतात. ही आमची ताकद आहे आणि आम्ही नेहमीच आमच्या ताकदींवर टिकून राहू. जर संघात एक वेगवान गोलंदाज अष्टपैलू खेळाडू असेल, तर आपण असे म्हणत नाही की संघात पाच किंवा सहा वेगवान गोलंदाज आहे. 

रोहित सेना चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी सज्ज!

चॅम्पियन्स ट्रॉफीबाबत कर्णधार रोहित म्हणाला की, ही स्पर्धा 8 वर्षांनी होत आहे. आयसीसीचे प्रत्येक विजेतेपद खूप खास असते. यामध्येही काही फरक नाही. तुम्ही इथे फक्त जेतेपद जिंकण्याच्या विचाराने आला आहात. पण आमचे लक्ष्य एका वेळी एका सामन्यावर लक्ष केंद्रित करणे आणि तो जिंकणे आहे. यानंतर, पुढील रणनीती बनवावी लागेल. 

भारत सर्व सामने खेळणार दुबईत!

भारतीय संघ गुरुवारी बांगलादेशविरुद्ध चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये पहिला सामना खेळणार आहे. चॅम्पियन्स ट्रॉफीचे आयोजन पाकिस्तानने केले आहे, परंतु भारताने या स्पर्धेसाठी पाकिस्तानला जाण्यास नकार दिल्याने ते त्यांचे सामने दुबईमध्ये खेळेल. चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये भारताला अ गटात स्थान देण्यात आले आहे, ज्यामध्ये बांगलादेश, पाकिस्तान आणि न्यूझीलंडचाही समावेश आहे.

हे ही वाचा -

PAK vs NZ Champions Trophy : 2 शतकं अन् धावांचा पाऊस, चॅम्पियन्स ट्रॉफीच्या पहिल्याच सामन्यात न्यूझीलंडने पाकिस्तानला धू धू धुतले!