एक्स्प्लोर

Horoscope Today 2 November 2026 : आज सोमवारच्या दिवशी 'या' 7 राशींची कठीण परीक्षा; दिवसाच्या शेवटी मिळणार मोठा धक्का, आजचे राशीभविष्य

Horoscope Today 2 November 2026 : ग्रहांच्या संक्रमणाच्या दृष्टीने देखील आजचा दिवस खास असणार आहे. त्यामुळे आजचा दिवस 12 राशींसाठी नेमका कसा असणार आहे हे जाणून घेऊयात.

Horoscope Today 2 November 2026 : वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार, आज 2 नोव्हेंबर 2026 चा दिवस आहे. त्यानुसार आजचा वार सोमवार आहे. आजचा दिवस हा महादेवाला (Lord Shiva) समर्पित आहे. तसेच, ग्रहांच्या संक्रमणाच्या दृष्टीने देखील आजचा दिवस खास असणार आहे. त्यामुळे आजचा दिवस 12 राशींसाठी नेमका कसा असणार आहे. यासाठी वाचूयात सर्व 12 राशींचं आजचं राशीभविष्य (Horoscope Today). 

मेष रास (Aries Horoscope)

मेष राशीसाठी आजचा दिवस फार उत्साहाचा असणार आहे. दिवसभर तुमची कामाच्या बाबतीत धावपळ असेल. तसेच, तुम्ही घेतलेल्या मेहनतीला चांगलं यश मिळेल. कामाच्या बाबतीत तुम्ही सतर्क असाल. नोकरदार वर्गातील लोकांना जर नोकरीत बदल करायचा असेल तर हा काळ तुमच्यासाठी शुभकारक असणार आहे. 

वृषभ रास (Taurus Horoscope)

वृषभ राशीसाठी आजचा दिवस शुभकारक असणार आहे. कामाच्या ठिकाणी तुमच्यावर नवीन जबाबदाऱ्या येऊ शकतात. तसेच, कामाच्या बाबतीत तुम्हाला लवकरच प्रवासाचे योग जुळून येतील. जर एखादं नवीन कार्याची सुरुवात करायची असेल तर त्यासाठी हा काळ शुभकारक असणार आहे.

मिथुन रास (Gemini Horoscope)

मिथुन राशीसाठी आजचा दिवस सुखकारक असणार आहे. आजच्या दिवसात तुम्हाला तुमची रखडलेली कामे पूर्ण करता येतील. शुभ कार्यासाठी आजचा दिवस चांगला असणार आहे. तसेच, धार्मिक कार्यात तुमचं मन रमेल. दिवसभरात तुम्हाला एखादी शुभवार्ता ऐकायला मिळेल.

कर्क रास (Cancer Horoscope)

कर्क राशीसाठी आजचा दिवस सामान्य असणार आहे. आर्थिक बाबतीत तुम्हाला थोडाफार संघर्ष करावा लागणार आहे. तसेच कुटुंबातील एका सदस्याच्या आरोग्यावर परिणाम होऊ शकतो. घरातील वातावरण काहीसं तणावाचं असणार आहे. मित्रांचं सहकार्य तुमच्यासाठी लाभदायी ठरेल.

सिंह रास (Leo Horoscope)

सिंह राशीसाठी देखील आजचा दिवस शुभदायी असणार आहे. आज तुमची रखडलेली सगळी कामे तुम्हाला वेळेत पूर्ण करता येतील. रविवार सुट्टीचा दिवस असल्या कारणाने कुटुंबियांबरोबर तुम्ही चांगला वेळ घालवाल. तसेच, धार्मिक कार्यात देखील सहभागी व्हाल. तुमच्या व्यवसायाचा आलेख वर चढताना दिसेल.

कन्या रास (Virgo Horoscope)

कन्या राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस सामान्य असेल. आज तुम्ही तुमच्या आरोग्याची काळजी घ्यावी. आजच्या दिवसात तुम्ही एखादी चांगली सवय स्वत:ला लावून घेऊ शकता. किंवा स्वत:मध्ये काही बदल घडवून आणू शकता. नोकरदार वर्गातील लोकांसाठी देखील आजचा दिवस चांगला असेल.

तूळ रास (Libra Horoscope)

तूळ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस भरभराटीचा असणार आहे. देवी लक्ष्मीची तुमच्यावर विशेष कृपा असेल. काही तुमची रखडलेली कामे आज पार पडतील. महत्त्वाच्या कामामध्ये जास्त वेळ घालवू नका. तसेच, कुटुंबियांबरोबर तुमचा चांगला वेळ जाईल.

वृश्चिक रास (Scorpio Horoscope)

वृश्चिक राशीसाठी आजचा दिवस सकारात्मक असणार आहे. मित्रांचं सहकार्य तुमच्यासाठी महत्त्वाचं ठरेल. तसेच, तुमची मानसिक स्थिती चांगली असेल. प्रेमाच्या बाबतीत तुम्हाला सावधानता बाळगण्याची गरज आहे. पार्टनरबरोबर चांगला व्यवहार ठेवा. महत्त्वाच्या कामांना प्राधान्य द्या. 

धनु रास (Saggitarius Horoscope)

धनु राशीसाठी आजचा दिवस शुभकारक असेल. आजच्या तुमच्या हातून शुभकार्य घडेल. तसेच, घरगुती कार्यक्रमांमध्ये तुम्ही सहभागी व्हाल. जर तुम्हाला एखादं वाहन किंवा प्रॉपर्टी खरेची करायची असेल तर त्यासाठी आजचा दिवस शुभकारक असणार आहे. 

मकर रास (Capricorn Horoscope)

मकर राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस सामान्य असेल. तुमच्या व्यवसायात काही चढ-उतार पाहायला मिळतील. आरोग्याची काळजी घ्या. तसेच, इतरांचं बोलणं जास्त मनावर घेऊ नका. आज तुम्हाला तुमच्या मुलांकडून एखादी शुभवार्ता ऐकायला मिळेल. कलागुणांना चांगला वाव मिळेल. 

कुंभ रास (Aquarius Horoscope)

कुंभ राशीसाठी आज सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे. आज महत्त्वाची कामे करु नका. तसेच, पैशांशी संबंधित कोणतेही व्यवहार आज हातात घेणं टाळा. तुमचा व्यवसाय सुरळीत चालेल. आरोग्याच्या बाबतीत थोडेफार चढ-उतार तुम्हाला सांभाळावे लागतील. 

मीन रास (Pisces Horoscope)

मीन राशीसाठी आजचा दिवस चागंला असणार आहे. आज तुम्ही मुलांच्या आरोग्याची काळजी घ्या. तसेच, काही महत्त्वाच्या कामांना प्रोत्साहन द्या. नकारात्मक गोष्टींपासून दूर राहा. तसेच, तुमच्या व्यवसायात काही चढ-उतार असतील. मात्र, हळुहळू परिस्थिती नियंत्रणात राहील.

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

इतर महत्त्वाच्या बातम्या : 

Shani Dev: शनिदेवांची पूजा करण्यासाठी कोणता दिवस, कोणती वेळ शुभ मानतात? पूजेचे नियम माहितीय? 'या' चुका टाळा! धार्मिक मान्यता, ज्योतिषशास्त्र...                   

Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Horoscope Today 2 November 2026 : आज सोमवारच्या दिवशी 'या' 7 राशींची कठीण परीक्षा; दिवसाच्या शेवटी मिळणार मोठा धक्का, आजचे राशीभविष्य
आज सोमवारच्या दिवशी 'या' 7 राशींची कठीण परीक्षा; दिवसाच्या शेवटी मिळणार मोठा धक्का, आजचे राशीभविष्य
Diwali 2026 Shubh Yog: यंदा 5 राशींची दिवाळी जोरात, तब्बल 100 वर्षांनी जुळतोय पॉवरफुल 'पुष्य नक्षत्र योग'! सलग 2 दिवस धनलाभाचे संकेत, ज्योतिषशास्त्र....
यंदा 5 राशींची दिवाळी जोरात, तब्बल 100 वर्षांनी जुळतोय पॉवरफुल 'पुष्य नक्षत्र योग'! सलग 2 दिवस धनलाभाचे संकेत, ज्योतिषशास्त्र....
Weekly Horoscope: तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीन.. 4 राशी श्रीमंतीच्या मार्गावर! आजपासून नोव्हेंबरचा नवा आठवडा गेमचेंजर, साप्ताहिक राशीभविष्य..
तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीन.. 4 राशी श्रीमंतीच्या मार्गावर! आजपासून नोव्हेंबरचा नवा आठवडा गेमचेंजर, साप्ताहिक राशीभविष्य..
Weekly Horoscope: मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या.. 5 राशींच्या भाग्योदयाला सुरूवात! आजपासून नोव्हेंबरचा नवा आठवडा आयुष्याचा गेम पालटणार;  साप्ताहिक राशीभविष्य..
मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या.. 5 राशींच्या भाग्योदयाला सुरूवात! आजपासून नोव्हेंबरचा नवा आठवडा आयुष्याचा गेम पालटणार;  साप्ताहिक राशीभविष्य..
Advertisement

व्हिडीओ

Coffee With Kaushik Sandeep Tamgadge : चीनची घुसखोरी ते म्यानमारमधील तस्करी, भिडणारा अधिकारी
India Alliance Vs BJP : 'इंडिया' आघाडीचा महामोर्चा, भाजपच्या देशभरात पदयात्रा Special Report
Inflation Diwali : दिवाळीपूर्वीच महागाईचा दणका...CNG चे दर वाढले, जेट इंधनातही भाववाढ Special Report
Sanjay Raut Delhi PC : रावणलीला' संपवण्यासाठीच रामलीला मैदानावर आंदोलन! संजय राऊतांचा घणाघात
Mann Suddha Tujha Season 3 : सोबत | मन सुद्ध तुझं | Episode 5 | ABP Majha
Advertisement

फोटो गॅलरी

Advertisement

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
अर्णबनंतर आता बंगालच्या उपसागरात मुरासू चक्रीवादळ तयार; 3 नोव्हेंबरला आंध्र किनारपट्टीवर धडकणार; एका आठवड्यात दुसरं चक्रीवादळ
अर्णबनंतर आता बंगालच्या उपसागरात मुरासू चक्रीवादळ तयार; 3 नोव्हेंबरला आंध्र किनारपट्टीवर धडकणार; एका आठवड्यात दुसरं चक्रीवादळ
EPFOची व्हॉट्सॲप सेवा सुरू, पीएफ बॅलन्स पासबुक अन् 5 नवीन व्यवहारांपर्यंतची माहिती उपलब्ध होणार
EPFOची व्हॉट्सॲप सेवा सुरू, पीएफ बॅलन्स पासबुक अन् 5 नवीन व्यवहारांपर्यंतची माहिती उपलब्ध होणार
अनाथ, दिव्यांग अन् वृ्द्धांसाठी रिलायन्सकडून मायेचा निवारा; कर्जतमध्ये 100 एकरवर 'अनंत आश्रय' टाऊनशीप, नीता अंबानींची घोषणा
अनाथ, दिव्यांग अन् वृ्द्धांसाठी रिलायन्सकडून मायेचा निवारा; कर्जतमध्ये 100 एकरवर 'अनंत आश्रय' टाऊनशीप, नीता अंबानींची घोषणा
हिंजवडी आयटी पार्क परिसरात पावसाची जोरदार हजेरी, रस्ते जलमय
हिंजवडी आयटी पार्क परिसरात पावसाची जोरदार हजेरी, रस्ते जलमय
Mumbai Accident: रेल्वे, बेस्ट ते रस्त्यांपर्यंत, मुंबईत चिरडून मरणं अगदी स्वस्त झालंय; कांदिवलीत फक्त 30 मिनिटात रस्त्यावरील ऑईलमुळे 14 दुचाकी फरफटत गेल्या, अनेक जखमी
रेल्वे, बेस्ट ते रस्त्यांपर्यंत, मुंबईत चिरडून मरणं अगदी स्वस्त झालंय; कांदिवलीत फक्त 30 मिनिटात रस्त्यावरील ऑईलमुळे 14 दुचाकी फरफटत गेल्या, अनेक जखमी
शरद पवार शेतकऱ्यांच्या बांधावर, तुळशी गावात भेट; 50 लाखांची मदतही दिली, दुष्काळ परिस्थितीबाबत मोदींना सांगणार
शरद पवार शेतकऱ्यांच्या बांधावर, तुळशी गावात भेट; 50 लाखांची मदतही दिली, दुष्काळ परिस्थितीबाबत मोदींना सांगणार
Satara Bank Election: सातारा जिल्हा बँक निवडणुकीत विक्रमी 97.92 टक्के मतदान; कोरेगाव, खंडाळा आणि वाईमध्ये 100 टक्के प्रतिसाद
सातारा जिल्हा बँक निवडणुकीत विक्रमी 97.92 टक्के मतदान; कोरेगाव, खंडाळा आणि वाईमध्ये 100 टक्के प्रतिसाद
वेतनवाढीच्या मागणीसाठी बांगलादेशात वस्त्रोद्योग कामगारांचे आंदोलन, तीन ठिकाणी हिंसाचार; आंदोलकांची पोलिसांवर दगडफेक, वाहने जाळली
वेतनवाढीच्या मागणीसाठी बांगलादेशात वस्त्रोद्योग कामगारांचे आंदोलन, तीन ठिकाणी हिंसाचार; आंदोलकांची पोलिसांवर दगडफेक, वाहने जाळली
Embed widget