Horoscope Today 19 January 2025 : पंचांगानुसार, आज 19 जानेवारी 2025, रविवारचा दिवस जवळपास सर्व राशीच्या लोकांसाठी लाभदायक ठरेल. या दिवशी ग्रहांच्या हालचाली पाहता आजचा दिवस फार महत्त्वाचा आहे, ज्याचा परिणाम सर्व 12 राशींच्या लोकांवर दिसून येईल. तुमचा आजचा दिवस कसा असेल? कोणासाठी दिवस फलदायी ठरेल? 12 राशींचे आजचे राशीभविष्य (Horoscope Today) जाणून घ्या.


मेष रास (Aries Horoscope Today)


नवीन नोकरीसाठी प्रयत्नशील असाल. लवकरच शुभवार्ता मिळू शकते.


वृषभ रास (Taurus Horoscope Today)


स्वतःला काय वाटते यापेक्षा दुसऱ्याला काय वाटेल याचा विचार जास्त करावा लागेल. 


मिथुन रास (Gemini Horoscope Today)


महिलांना तडजोडीचे धोरण स्वीकारावे लागेल. तुमच्या विचारांमुळे लोक प्रभावित होतील. 


कर्क (Cancer Horoscope Today)


वैवाहिक जीवनात मागील कोणत्याही गोष्टी ज्यामुळे वाद निर्माण होतात ती गोष्ट टाळणे.


सिंह (Leo Horoscope Today)


एखादी भाग्यदायी घटना घडू शकते नवीन घराच्या शोधात असाल तर चांगला योग संभवतो. 


कन्या रास (Virgo Horoscope Today)


आज पैसा मिळाला तरी त्याला खर्चाच्या अनेक वाटा फुटतील परदेशात जाण्याचे योग येतील. 


तूळ रास (Libra Horoscope Today)


जवळचे प्रवास कराल. तुमच्या विरुद्ध कारवाया करणाऱ्यांना चांगलाच धडा शिकवाल. 


वृश्चिक रास (Scorpio Horoscope Today)


कुटुंबामध्ये अचानक चांगल्या वाईट घटनांचा सामना करावा लागेल. 


धनु रास (Sagittarius Horoscope Today)


आज बौद्धिक कामे सहज जमतील. शैक्षणिक क्षेत्रात यश मिळेल. 


मकर रास (Capricorn Horoscope Today)


प्रत्येक वेळी आकाशाला गवसणी घालून चालणार नाही कधी कधी शांत बसूनही घटनांचे निरीक्षण करावे लागेल. 


कुंभ रास (Aquarius Horoscope Today)


कोणतेही आर्थिक व्यवहार करताना जपून करावेत काही गडबडीने कोणतेही निर्णय घेऊ नयेत. 


मीन रास (Pisces Horoscope Today)


नोकरी व्यवसायात बरोबरीचे लोक तुमच्या पुढे जातील हे पाहिल्यावर थोडे निराशही व्हाल.


डॉ. शिल्पा अग्निहोत्री (ज्योतिषाचार्य)


संपर्क - 9823322117         


हेही वाचा: 


Weekly Horoscope : मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह आणि कन्या राशीसाठी नवीन आठवडा कसा राहील? जाणून घ्या साप्ताहिक राशीभविष्य